ADVERTISEMENT
home / बिग बॉस
‘पठाण’मध्ये स्वतः स्टंट्स करणार दीपिका पादुकोण

‘पठाण’मध्ये स्वतः स्टंट्स करणार दीपिका पादुकोण

शाहरूख खान आणि दीपिका पादुकोण ही जोडी पठाण चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. बऱ्याच वर्षांनी या एकत्र येणाऱ्या या जोडीला एकत्र पाहायला मिळणार त्यामुळे सध्या पठाण चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. पठाणमध्ये दीपिकाची भूमिका आव्हानात्मक असल्यामुळे ती सध्या तिच्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात दीपिकाच्या जबरदस्त अॅक्शन मूव्हज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे या अॅक्शन आणि स्टंटसाठी दीपिका पादुकोण बॉडी डबलची मदत घेणार नाही आहे. ती चक्क स्वतः सर्व स्टंट या चित्रपटात करणार आहे.

हिंदीमध्ये झळकतोय आता हा नवा मराठमोळा चेहरा, मिळत आहेत नवे कॅम्पेन्स

पठाणमध्ये दीपिकाची आव्हानात्मक भूमिका 

दीपिका नेहमीच निरनिराळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आलेली आहे. ती नेहमीच तिच्या भूमिकांसाठी मेहनत घेऊन त्यामध्ये स्वतःचा जीव ओतते. वास्तविक पठाणमध्ये दीपिका पहिल्यांदा अॅक्शन भूमिका करणार नाही आहे. याआधी तिने ‘चांदनी चौक टू चायना’ या चित्रपटातही अॅक्शन सीन्स दिलेले आहेत. त्यामुळे ती अॅक्शन असलेल्या भूमिकाही तितक्याच ताकदीने निभावू शकते हे एव्हाना सर्वांना माहीत असेलच. अभिनय आणि सौंदर्यासोबत दीपिकाचा हा अॅक्शन अवतार चाहत्यांना भुरळ घालतो. रजनीकांतसोबत ‘कोचडीयान’ या चित्रपटातही दीपिकाने तिच्या अॅक्शन मूव्हजने चाहत्यांना थक्क केलं होतं. दीपिका एक अॅथलीट असल्यामुळे तिचं शरीर लवचिक आहे. त्यामुळे तिला स्वतःचे स्टंट स्वतःच करणं जास्त भावतं. चांदनी चौक टू चायनासाठी तिने मार्शल आर्टचं ट्रेनिंगदेखील घेतलं होतं. या चित्रपटात तर असे काही सीन्स होते जे तिने बॉडी डबलच्या मदतीशिवाय करून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला होता.

प्रेक्षकांच्या इच्छेनुसार ठरणार आता एकताची इच्छाधारी नागिण, या अभिनेत्रीच्या नावाची चर्चा

ADVERTISEMENT

दीपिका ‘पठाण’साठी सज्ज

आता दीपिकाला असेच काही आश्चर्याचे धक्के पुन्हा एकदा चाहत्यांना पठाणमधून द्यायचे आहेत. सिद्धार्थ आनंदच्या पठाणमधून दीपिका हा नवा अवतार सर्वांसमोर आणण्यासाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटातील खतरनाक स्टंटसाठी तिने बॉडी डबलची मदत नाकारली आहे.सहाजिकच हे सर्व स्टंट बॉडी डबलशिवाय करणं थोडं रिस्की नक्कीच आहे. पण दीपिकाला ती ते करू शकेल असा आत्मविश्वास आहे. ती खेळाडूंच्या कुटुंबातील आहे. त्यामुळे तिचे शरीर यासाठी नक्कीच तयार आहे. शिवाय स्क्रीनवर स्वतःचे स्टंट स्वतः करणं हे एखाद्या कलाकारासाठी एखाद्या स्वप्नाप्रमाणे असू शकतं असं तिचं मत आहे. शाहरूख आणि दीपिकाची जोडी आणि दीपिकाचे ह्रदयाचा ठोका चुकवणारे स्टंट असं पठाणचं भांडवल आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल आता प्रेक्षकांना जास्तच उत्सुकता लागली आहे. 

गानसम्राज्ञी लतादीदींना अजूनही काही काळ ठेवणार आयसीयुमध्ये, डॉक्टरांची माहिती

18 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT