ADVERTISEMENT
home / Uncategorized
प्रेक्षकांच्या इच्छेनुसार ठरणार आता एकताची इच्छाधारी नागिण, या अभिनेत्रीच्या नावाची चर्चा

प्रेक्षकांच्या इच्छेनुसार ठरणार आता एकताची इच्छाधारी नागिण, या अभिनेत्रीच्या नावाची चर्चा

एकताचा सुपरनॅचरल ड्रामा ‘नागिन’ टेलीव्हिजनवरील एक लोकप्रिय शो आहे. आतापर्यंत या शोचे पाच सीझन खूप गाजले आहेत. आता प्रेक्षकांना सहाव्या सीझनची प्रतिक्षा लागली आहे. मात्र डेली सोप क्वीन एकताला अजून तिच्या सीझन 6 ची नागिण सापडली नाही आहे. नागिन 6 साठी आतापर्यंत अनेक अभिनेत्रींची नावे पुढे आली आहेत.पण अजून यासाठी कास्ट फायनल नाही झाल्याचा एक व्हिडिओ एकताने चाहत्यांसोबत शेअर केला आहे. एवढंट नाही तर तिने चक्क चाहत्यांना यासाठी योग्य अभिनेत्रीचे नाव सूचवण्याचा पर्याय दिला आहे.

मौनी रॉयचे लग्न, गोव्यामध्ये रंगणार लग्नसोहळा

प्रेक्षकांनी दिला या अभिनेत्रीला कौल

एकता कपूरने नागिन सारख्या लोकप्रिय शोची कास्ट सूचवण्याचा पर्याय समोर ठेवल्यावर चाहत्यांना अधिकच उत्साहा आला. ज्यामुळे त्यांनी त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीच्या नावाला कौल देण्यास सुरुवात केली. चाहत्यांच्या इच्छेनुसार एकता कपूरच्या नागिनच्या नव्या सीझनची मुख्य अभिनेत्री रूबीना दिलैक असावी…. कारण दिवसेंदिवस रूबीनाचा चाहतावर्ग वाढत आहे शिवाय ती सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांनी एकतासमोर रूबीनाला नागिन बनवण्याचा पर्याय सूचवला आहे. जर  प्रेक्षकांचा हा कौल एकताच्या मनाला भावला तर कदाचित या सीझनची नागिण रूबीनाच असू शकते.

गानसम्राज्ञी लतादीदींना अजूनही काही काळ ठेवणार आयसीयुमध्ये, डॉक्टरांची माहिती

ADVERTISEMENT

एकताने शेअर केली पोस्ट

एकताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने शेअर केलं आहे की, “#Nagin6 साठी  अजून कोणाला कास्ट करण्यात आलेलं नाही. तुमच्या सर्वांकडून सल्ला हवाय. मी आताच covid मधून रिकव्हर होत आहे. शरीर, मांसपेशींच्या दुखण्यातून आणि पोटाच्या इनफेक्शनमधून मी काही नावे ऐकली आहेत. ज्यांना फायनल सांगितलं जात आहे. अरे भावंडानो, मी अजून कोणाशी संपर्क केलेला नाही आणि कोणाचे नावही फायनल झालेले नाही. तुम्हीच सूचवा” अजून रूबीनाच्या कंमेटवर एकताने कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आता ती काय घोषणा करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मिसेस मुख्यमंत्री’ ची जोडी मोठ्या पडद्यावर करणार ‘दिशाभूल’

17 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT