ADVERTISEMENT
home / आरोग्य
difference-between-digession-problem-and-heart-attack

छातीत दुखणे हे अपचन आहे की येणारा हार्ट अटॅक – जाणून घ्या फरक

भारत ही जगातील डायबेटिक कॅपिटल अर्थात मधुमेहाची राजधानी बनली आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही आणि लवकरच भारत हे जगातील हार्ट डिसीझ राजधानी बनण्यास सज्ज आहे. इंडियन हार्ट असोसिएशनच्या मते, हार्ट अटॅकच्या (Heart Attack) अर्थात हृदयविकाराच्या अर्ध्याहून अधिक घटना 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्ये होतात आणि 25% हार्ट अटॅकच्या घटना 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना होतो. विकसित देशांतील लोकांच्या तुलनेत भारतीय लोकांमध्ये 10 वर्ष पूर्वीच हृदयविकार विकसित होतो. मेनोपॉज पूर्वी पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना हृदयविकाराचा झटका कमी येतो. मेनोपॉजनंतर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता पुरुष आणि महिलांमध्ये समान असते. महिलांमध्ये सामान्य लक्षणे असतात आणि सहसा या चिन्हांकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे निदान होणे आणि उपचारात विलंब होऊ शकतो. भारतीय जनतेमध्ये त्यांच्या अनुवांशिक घटक, आहार, व्यायामाचा अभाव, धूम्रपान आणि तंबाखू यामुळे अधिक प्रवण आहेत. आपल्या देशात जागरूकतेचा अभाव, दुरबळ सामाजिक-आर्थिक स्थिती आणि असमानपणे वितरित आरोग्य सेवांमुळे भारतीयांचा मृत्यू दर जास्त आहे. याबाबत आम्ही डॉ. रुचित शहा, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, मसीना हॉस्पिटल यांच्याकडून अधिक जाणून घेतले. 

कोविड झालेल्या व्यक्तींना अधिक धोका  

for heart

डॉक्टरांनी कोविड 19 ची लागण झालेल्या लोकांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या घटनांचे निरीक्षण केले आहे. कोविड संसर्गाच्या पहिल्या 2-3 आठवड्या दरम्यान हृदयविकाराच्या घटना सर्वाधिक असतात आणि धोका 3-6 महिन्यांपर्यंत कायम राहू शकतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला कोविडची लागण होते तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली दाहक प्रतिक्रिया वाढवते. यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होऊ शकतात आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका आणि मृत्यू कोविडची लागण झालेल्या तरुण व्यक्तींमध्येदेखील पाहिले आहे.
हृदयविकाराचा झटका येण्याची लक्षणे छातीत दुखणे, छातीत अस्वस्थता, छातीत जळजळ, श्वासोच्छ्वास, अस्वस्थता, थकवा, घाम येणे, धडधडणे किंवा कोणतीही असामान्य भावना असू शकते. जबड्यापासून नाभीपर्यंत कोणतीही अस्वस्थता, समोर किंवा मागे हार्ट अटॅकचे लक्षण असू शकते आणि लवकर ईसीजी काढण्याची आवश्यकता दर्शविते. लवकर आपत्कालीन अँजिओप्लास्टी ही सुवर्ण मानक उपचार आहे. लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास उपचारांना विलंब होतो आणि ते घातक ही ठरू शकते.

कसे वाचाल

तुमच्या हृदयाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही सर्वात महत्त्वाची गोष्ट जी करू शकता ती म्हणजे धूम्रपान, तंबाखू आणि अल्कोहोल टाळणे. मार्गदर्शक सूचना साधारण आठवड्यातून किमान 5 वेळा तरी 30-45 मिनिटे व्यायामाची शिफारस करतात. व्यायाम एरोबिक (चालणे, जॉगिंग, सायक्लिंग, पोहणे, मैदानी खेळ) आणि वजन प्रशिक्षण यांचे मिश्रण असावे. योग आणि प्राणायाम आपले मन, शरीर आणि आत्मा यांना आराम देतात. आपण कमी फॅट, कमी तेल आणि कमी मीठयुक्त आहाराचे सेवन करावे जे फळे, भाज्या आणि स्प्राऊट्सने भरपूर आहेत. आपल्या आहारावर, व्यायामावर आणि आपल्या कामावर योग्य नियंत्रण ठेवावे आणि त्यानुसार आपण आपली काळजी घ्यावी. उगीच तणाव घेत काम करत राहू नये. तसंच आपल्या आहारावर आणि व्यायामावर नियमित लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
29 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT