प्रत्येक महिलेला सुंदर आणि डाग विरहित त्वचा हवी असते. पण काही जणांच्या चेहऱ्यावर असणारे ओपन पोर्स मात्र हे स्वप्नं पूर्ण होऊ देत नाहीत. चेहऱ्यावर बाकी ठिकाणी नक्कीच आपण हा त्रास सहन करू शकतो. पण नाक, गाल आणि हनुवटीच्या आसपास येणारे जिद्दी डॉट्स आणि पोर्स यांच्याकडे दुर्लक्ष करणं अतिशय कठीण होतं. जेव्हा तुम्ही तुमचा मेकअप करता तेव्हा तुम्हाला नक्कीच या गोष्टीचा त्रास होत असणारा कारण मेकअप केल्यावर अधिकाधिक उत्पादनं या पोर्सच्या आजूबाजूला जमतात. यामुळे चेहरा ओबडधोबड आणि खराब दिसतो. पण तुम्ही चिंता करण्याची अजिबात गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगत असणारे नाईट केअर रूटीन तुम्ही सांभाळले तर तुम्हाला नक्कीच या ओपन पोर्सचा त्रास होणार नाही. तसंच तुमची त्वचा कॉम्बिनेशन त्वचा असेल आणि तुम्हाला सारखा मुरूमांचा त्रास होत असेल तर तुम्ही हे नाईट स्किन केअर रूटीन नक्कीच ट्राय करू शकता. याचा वापर कसा करून घ्यायचा आणि नक्की काय करायचं ते आपण जाणून घेऊया.
ऑईल क्लिंन्झिंग
तुम्ही दिवसा चेहऱ्याला मेकअप करताना फाऊंडेशन, काजळ आणि लिपस्टिक अथवा सनस्क्रिन अशा उत्पादनांचा वापर करत असाल तर तुम्ही चेहरा स्वच्छ करण्यासाठी रोज रात्री क्लिंन्झिंग करणे अत्यंत आवश्यक आहे. ऑईल क्लिंन्झिंगमुळे त्वचेची अगदी आतून स्वच्छता करता येते. तसंच तेलाच्या पोषक तत्वामुळे त्वचा अधिक चमकदारही होते. त्यामुळे याचा फायदा ओपन पोर्ससाठी होतो.
क्रिम टाईप फेशियल वॉश
नैसर्गिक तेल आपल्या चेहऱ्यावर असते. हे तेल चेहऱ्यावर तसंच राहणं गरजेचं असतं. मग हे नैसर्गिक तेल चेहऱ्यापासून वेगळं न करता जर चेहरा स्वच्छ करायचा असेल तर तुम्ही क्रिम टाईप फेशियल वॉशचा वापर करणे योग्य आहे. हे फेशियल वॉश संवेदनशील आणि कॉम्बिनेशन या दोन्ही त्वचेवर उत्तम काम करते.
फोम टाईप फेशियल वॉश
Shutterstock
तुमच्या चेहऱ्यावर क्रिम टाईप फेशियल वॉश लावण्यापूर्वी तुम्ही फोम टाईपचा वापर करू शकता. पण तुम्हाला ओपन पोर्सपासून सुटका हवी असेल तर तुम्हाला फोम टाईपचा वापर करायलाच हवा. कारण यामुळे चेहऱ्याचे डबल क्लिंन्झिंग होते. ओपन पोर्सच्या समस्येपासून सुटका मिळते.
एक्सफोलिएटर
आठवड्यातून एकदा तुम्ही तुमची त्वचा एक्सफोलिएट करणे अत्यंत गरजेचे आहे. हे पोर्स स्वच्छ करते. डेड स्किन हटविण्यासाठीही याचा उपयोग होतो. आपल्या त्वचेवरील सुस्त झालेली कातडी बाजूला सारून त्वचा अधिक चमकदार करण्यासाठी एक्सफोलिएटरचा उपयोग होतो. एकापेक्षा अधिकवेळा एक्सफोलिएट करून नका नाहीतरी त्वचेवर ब्रेकआऊट होण्याची अर्थात त्वचेला तडा जाण्याची शक्यता असते. त्यामुळे ओपन पोर्सची समस्या असल्यास किमान आठवड्यातून एकदा त्वचा एक्सफोलिएट करा.
त्वचेची समस्या दूर करण्यासाठी वापरा इन्स्टंट उटणे, त्वचा उजळेल
सीरम
तुमच्या चेहऱ्यावर असणाऱ्या सुरकुत्या, फाईन लाईन्स, पिगमेंटेशन, निस्तेज त्वचा आणि ओपन पोर्स या सगळ्यावर सीरम हा उत्तम उपाय आहे. सीरमच्या वापरामुळे त्वचेला चांगले मॉईस्चराईज करता येते आणि त्वचा उत्तम राहते. त्यामुळे नाईट केअर रूटीन (night care routine) मध्ये याचा समावेश करून घ्या.
घरीच तयार करा कोणत्याही त्वचेसाठी हायड्रेटिंग सीरम
टोनर
डबल क्लिंन्झिंगनंतरदेखील आपल्या पोर्समध्ये अशुद्धी राहतेच. त्यामुळे टोनरचा वापर करा. केवळ पोर्सवरील उपचारच आपला चेहरा अधिक चांगला करू शकतात. टोनर आपल्या त्वचेतील मऊपणा राखतो आणि अधिक चांगली ठेवण्यास मदत करतो. याशिवाय टोनरचा वापरही त्वचेची पीएच लेव्हल चांगली ठेवतो. टोनिंगच्या मदतीने चेहरा अधिक कसदार होतो आणि नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्यावर चमक येण्यास मदत मिळते. त्यामुळे नाईट केअर रूटीनमध्ये याचा वापर करावा.
शीट मास्क
यामध्ये सीरमप्रमाणेच तत्व असतात. योग्य शीट मास्क लावल्याने त्वचा हायड्रेट होते आणि चेहऱ्यावर असणारे अतिरिक्त तेल कमी करण्यास मदत मिळते. तसंच पोर्समध्ये सुधारणा होते. तुम्ही आठवड्यातून एकदा या शीटमास्कचा वापर करू शकता. पण तुमचा चेहरा अधिक निस्तेज झाला असेल तर तुम्ही याचा वापर किमान दोन वेळा करावा.
मॉईस्चराईजर अथवा क्रिम
प्रत्येक गोष्टीनंतर सर्वात शेवटची पायरी म्हणजे मॉईस्चराईजरचा वापर. मॉईस्चराईजर लावल्याने त्वचेवरील काळे डाग, मुरूमं, ब्लॅकहेड्स कमी दिसतात. तसंच तुमची त्वचा खेचली गेली असेल तर त्यावर सुरकुत्या लगेच दिसतात. पण नियमित नाईट केअर रूटीनमध्ये मॉईस्चराईजरचा वापर केल्यास, तुम्ही सुरकुत्यांपासून लांब राहू शकता. तसंच मॉईस्चराईजरचा नियमित वापर हा त्वचा अधिक मऊ आणि मुलायम ठेवण्यास मदत करतो.
मॉईस्चराईजर निवडताना लक्षात ठेवा महत्त्वाच्या गोष्टी
विशेष सूचना
- आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी जे उत्पादन खरेदी करणार आहात त्याच्या आधी आपण आपल्या त्वचेचा नक्की कोणता टाईप आहे ते जाणून घ्यायला हवे
- नाईट केअर रूटीनची प्रत्येक स्टेप करताना त्यामध्ये किमान 30 सेकंदाचा अवधी द्या. जेणेकरून उत्पादन लावल्याचा उपयोग होईल आणि त्वचा उत्पादन व्यवस्थित शोषून घेऊ शकेल
- आम्ही दिल्याप्रमाणेच तुम्ही त्याच क्रमाने वापर करू शकता. केवळ अधिक चिकट उत्पादन असेल तर ते नंतर वापरा
या नाईट स्किन केअर रूटीनचा वापर करा आणि ओपन पोर्सपासून सुटका मिळवा. तसंच तुम्ही त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी याचा नियमित वापर करू शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक