लव्ह मॅरेज असो वा अरेंज मॅरेज असो साखरपुडा झाला म्हणजे ऑफिशयली एकत्र फिरायची फुल परमिशन. कारण लग्नपत्रिका नमुना संदेश ठरवणे आणि लग्नाची लगबग सुरू होण्यापूर्वीचे हे दिवस सोनेरी असतात. त्यामुळे एंगेजमेंटचा लुक (marathi engagement look) आणि आठवणी नेहमी आपल्यासोबत असतात. आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण सगळ्यांसोबत शेअर तर करायलाच हवा आणि त्यासाठी सर्वात सोपं ठिकाण म्हणजे सोशल मीडिया. त्यातही सुपरफास्ट म्हणजे फेसबुक आणि इन्स्टा. कारण असं स्टेटस शेअर होताच तुमची वॉलवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू होतो. मग ही अनाउन्समेंटही तेवढीच हटके आणि क्रिएटीव्ह असायलाच हवी. त्याचसाठी आम्ही तुमच्यासाठी खास लिस्ट आणली आहे साखरपुड्याचे बेस्ट कोटस आणि स्टेटसची. मग साखरपुडा झाला की, लगेच या लिस्टमधील कॅप्शन्स वापरून तुमचं स्टेटस चेंज करा. कारण लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा मिळण्याआधी साखरपुडा साजरा करायचा आहे.
Engagement Status For Facebook In Marathi | फेसबुक स्टेटस फोर इंगेज्ड कपल
इंगेजमेंटची बातमी अशी द्या की, सगळ्यांच्या लक्षात राहील. मग चांगला आणि मस्त स्टेटस ठेवा आणि होऊ द्या फेसबुकवर चर्चा (Engagement Status For Facebook In Marathi). साखरपुडा झाल्यानंतर अभिनंदन शुभेच्छा पण येणारच ना? साखरपुडा हा आपल्या आयुष्यातील खूप जिव्हाळ्याचा क्षण असतो.
- या संपूर्ण जगात जे कोणी करू शकलं नाही ते तू केलंस. माझ्या हृदयाला जिंकलंस आणि कुटुंबालाही. मी तयार आहे love forever साठी!
- एकेकाळी आपण अनोळखी होतो. पण आज आपण परफेक्ट जोडी आहोत. Proudly Engaged!
- हे सेलिब्रेशन फक्त आज किंवा उद्यासाठी नाहीतर नेहमी आणि फोर एव्हरसाठी.
- हा मेसेज त्या खास व्यक्तीसाठी जी आता माझ्या आयुष्याची जोडीदार झाली आहे. ना फक्त माझ्या सुखदुःखात तर माझ्या वडापावमध्येही….
- सातव्या आस्मानात असण्याचा आनंद म्हणजे Just engaged!
- आयुष्यातील इच्छा पूर्णही होतात. ज्याची पहिली पायरी त्या व्यक्तीसोबत इंगेज होणं. खरंय ना…
- आपल्या सुंदर प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. लक्षात ठेव मी वयाने कितीही म्हातारा झालो तरी माझं प्रेम तुझ्यासाठी नेहमीच चिरतरूण राहील.
- माझ्या आयुष्यात घडलेली सर्वात सुंदर गोष्ट आहेस तू…लव्ह यू फोरएव्हर.
- माझी आयटम ते माझी मिसेस हा प्रवास अखेर तू पूर्ण केलास. Proudly Engaged!
- माझ्या प्रेमात पडल्यावर पतंग त्याची कटली. आता प्रेमाच्या मांज्यातून आयुष्यभर सुटका नाही. Just engaged!
Engagement Quotes In Marathi | साखरपुडा कोट्स मराठी
तो असो ती…दोघांसाठी साखरपुड्याचा दिवस असतो खास. आयुष्याला नवीन कलाटणी देणारा हा दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या घरच्यांसाठीही तितकाच महत्त्वाचा असतो. तुमच्या प्रेमाच्या गाडीला मिळालेला हा हिरवा सिग्नल तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी पोचवतो. मग साखरपुड्यानंतर आकंठ प्रेमात बुडालेल्या ऑफिशियल लव्हबर्ड्ससाठी खास रोमँटिक इंगेजमेंट कोट्स (Romantic Engagement Quotes In Marathi).
1. “चला फायनली साखरपुडा झाला. आता आयुष्यभरासाठी तुझी सुटका नाही.”
2. “मी तुला निवडलं आहे आणि …… तुलाच सदैव निवडेन. पुन्हा.. पुन्हा..न थांबता…न शंका घेता. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. सो हॅपी टू इंगेज्ड टू यू.”
3. “ज्याने माझं हृदय चोरलं आणि त्याचं मला दिलं त्या प्रिन्स चार्मिंगशी अखेर इंगेज झाले.”
4. “साखरपुड्यापर्यंतचा प्रवासही काही सोपा नाही. चला अखेर हिरवा कंदील मिळाला आणि आता ऑफिशियली आम्ही मिरवणार. आयुष्यातील नव्या चॅप्टरला सुरूवात. ही खूषखबर तुमच्यासोबत शेअर करायला खूपच आनंद होत आहे.”
5. “उडत्या रोमान्सचा चॅप्टर संपला आणि फॉरेव्हर लव्ह स्टोरीला सुरूवात झाली.”
6. “किती छान ना. आयुष्यभर पिडण्यासाठी मला स्पेशल व्यक्ती मिळाली.”
7. “ही आहे आमची स्वीट लिटील स्टोरी, ज्यामध्ये माझं पान आणि त्याचं पान आता एक झालं आहे. उद्या आमची कथा कुठे जाईल माहीत नाही. पण वाचली तर नक्कीच जाईल.”
8. “साखरपुडा झाला आणि ती माझी झाली. आयुष्यभराच्या प्रवासाला तिची साथ मिळाली. आता उत्सुकता आहे त्या सोनेरी भविष्याची ज्यात ती माझी आणि मी तिचा आहे.”
9. “यापुढे नसेल एकट्याने चालणं कारण आता हातात असेल तिचा हात आणि डोक्यावर प्रेमाचं छप्पर.”
10. “तुझ्या हातात माझा हात आहे. सुख अजून काय हवं. साखरपुड्याच्या आपल्या दोघांना खूप खूप शुभेच्छा.”
वाचा – Lagna Patrika Format In Marathi
Cute Engagement Quotes In Marathi | क्युट इंगेजमेट कोटस
साखरपुडा हा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक आहे. मग या गोष्टीच्या प्रेमात पडणं साहजिक आहे. म्हणूनच साखरपुड्यानंतर एकमेकांच्या प्रेमात बुडालेल्या क्युट कपल्ससाठी क्युट इंगेजमेंट कोट्स (Cute Engagement Quotes In Marathi).
1. “आम्ही दोन्ही वर्षांपासून एकत्र आहोत. पण तेवढी पुरेशी वाटली नाहीत. म्हणून मग म्हटलं जन्मभरच एकत्र राहूया. ”
2. तुमच्या क्युट पेटबरोबर तुम्ही इंगेज्ड असं प्लाकार्ड धरून क्युट फोटो शेअर करू शकता आणि त्याला कॅप्शन द्या “माझे मालक मालकीण लग्न करत आहेत.”
3. “आयुष्यभरासाठी एका व्यक्तीला त्रास देण्याचं मी ठरवलं आहे. Happy and engaged!”
4. तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो हूलाहुपसोबत काढा आणि त्याला पुढील कॅप्शन द्या. “ते म्हणतात ना, तुम्हाला आवडेल त्या वस्तूभोवती रिंग टाका. मीही तसंच केलं.’ *Wink*”
5. “प्रत्येकवेळी मला असंच वाटायचं की तूच तो आहेस ज्याची मी वाट पाहत होते. मग काय केलं त्याला forever माझं. ”
6. “अखेर आम्ही झालो आहे engaged! तयार आहोत भविष्यातील सुंदर आयुष्याच्या प्रवासाला.”
7. “यशस्वी लग्न करण्यासाठी एकाच माणसाच्या अनेक वेळा प्रेमात पडणं आवश्यक आहे. मग तुझ्याशी इंगेजमेंट करून माझी ती एक इच्छा तर मी पूर्ण केलीच आहे.“
8. “मी तुझ्या परफेक्शनच्या प्रेमात पडले नाहीतर तुझ्या चुकांच्या प्रेमात पडले आणि झाली आयुष्यभराची मोठी चूक.”
9. “प्रेम ही आनंदी जगाची मास्टर किल्ली आहे. माझ्या लव्ह ऑफ लाईफशी इंगेज होताच ती मला मिळाली आहे.”
10. “जर माझं हृदय आकाश असेल तर मला माझा ध्रुवतारा मिळाला आहे.”
Cool Engagement Quotes In Marathi | कूल इंगेजमेट कोटस
जर तुम्ही तुमच्या आयुष्याबाबत आणि तुमच्या पार्टनरबाबत कूल आहात तर मग कॅप्शन्सही तसेच हवेत ना. मग तुमच्या साखरपुड्यानंतर हे कोट्स (Cool Engagement Quotes In Marathi) नक्की शेअर करा.
1. “या सिम्रनला मिळाला आहे तिचा राज, आता फक्त लग्न होणं बाकी आहे #JustEngaged’
2. “तो म्हणाला, ‘ माझी बायको होशील का, आपण दोघं करू rock ’. मीही मग म्हटलं काय भाव खायचा. बोलून टाकलं हो…
3. “आत्ताच आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि आत्तापासूनच टेन्शन येतंय.”
4. “सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या बरं !!!!!! I am engaged!”
5. “आयुष्यातील ध्येय : लग्नासाठी चांगला मुलगा शोधणे आणि त्याचा होकार मिळवणे. चेक.”
6. “आता माझ्या बोटात आहे चमचणारं काही खास.”
7. “तुझ्याशिवाय मी काहीच नाही. तू आहेस म्हणून मी आहे. पण एकत्र आल्यावर आपलं जग पूर्ण आहे.”
8. “मी सगळ्या जगाशी एका हाताने लढू शकते फक्त माझा दुसरा हात तुझ्या हातात असावा.”
9. “मला त्याचं आडनाव खूपच आवडलं होतं मग तेच लावायचं ठरवलं.”
10. “सहजीवनाची पहिली पायरी म्हणजे साखरपुडा. थँक्स मला तुझ्या सहजीवनाची साथी केल्याबद्दल.”
Marathi Engagement Quotes For Photo | साखरपुडा अनाउन्समेंटसाठी खास कोटस
तुम्ही साखरपुड्याची पोस्ट शेअर करताना सुंदर फोटोज तर नक्कीच टाकणार असाल. पण त्यासोबतच जर तुमच्या फोटोच कॅप्शनही छान असेल तर ती पोस्ट परफेक्ट वाटेल. कारण फेसबुकप्रमाणेच तुम्हाला ही पोस्ट इन्स्टावर शेअर करणंही मग सोपं जाईल. मग पाहा फोटोजसोबत टाकण्यासाठी खास कोट्स.
1. “He asked. I said ‘about damn time’.”
2. “Miss to Mrs चा प्रवास.”
3. “ही रिंग पाहून वाटतंय का मी इंगेज झालीयं?”
4. “मला तुझ्याबरोबर forever मेमरीज बनवायच्या आहेत.”
5. “ओह खरंच आता रिअलमध्ये real diamond घालायचाय.”
6. “सदैव, सातत्याने, फक्त तुझ्यासोबत.”
7. “सॉरी आता मी available नाही. आयुष्याभराचं डील झालं.”
8. “माझी जागा आणि पार्टनरचं रिजर्व्हेशन झालं… सर्वात लांबच्या आयुष्य नावाच्या प्रवासासाठी”.
9. “सुरूवात तर फक्त क्रश म्हणून झाली होती…पण आता तर बोटात रिंगही आली.”
10. “दोन विरूद्ध लोकं आकर्षित होतात पण युनिक लोकं आयुष्यभरासाठी एकत्र येतात.”
हेही वाचा :
शादी के बधाई संदेश
स्वयं की शादी की सालगिरह (हैप्पी मैरिज एनिवर्सरी)
Engagement Quotes in English
Engagement Gift Ideas in English