ADVERTISEMENT
home / Weight Loss
Excessive Sweating And Weight Loss in Marathi

जास्त घाम आला तर होतो का वेट लॉस, जाणून घ्या

निरोगी जीवनशैलीसाठी दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे. यासाठी Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे प्रत्येकाला माहीत असायला हवे. पण व्यायाम करताना अंगातून अक्षरशः घामाच्या घारा लागतात. घामामुळे कधी कधी व्यायाम अथवा योगासने करण्याचा कंटाळा येतो. पण जितका जास्त घाम येणार तितकं जास्त वजन कमी होणार असं नेहमी म्हटलं जातं. हे खरं आहे का ? असा प्रश्न तुमच्याही मनात येत असणार. जर तुम्ही फक्त वजन कमी व्हावं यासाठी व्यायाम करताना घाम गाळत असाल तर तुम्हाला याबाबत माहीत असणं गरजेचं आहे. व्यायाम करण्याची योग्य पद्धत कोणती आणि किती आणि कशामुळे घाम आल्यावर वजन कमी होतं हे जाणून घेण्यासाठी खालील माहिती वाचा…

अंगातून अति घाम का येतो

अंगातून घाम तेव्हाच बाहेर पडतो जेव्हा तुमच्या शरीराचं तापमान वाढू लागतं. त्वचेच्या आत अनंत त्चचापेशी असतात. यातील काही त्वचापेशी शरीराचं तापमान वाढू लागताच शरीरात थंडावा निर्माण करण्यासाठी त्वचेवर इलेक्ट्रोलाइट आणि पाण्याचा स्त्राव तयार करतात. ज्या प्रोसेसमध्ये अंगातून घाम तयार होतो. तुम्ही व्यायाम करत असताना शारीरिक हालचालीमुळे तापमान वाढू लागते तेव्हा अंगातून घाम येतो, उन्हाळ्यात बाहेरील तापमान वाढल्यामुळे शरीर थंड राखण्यासाठी घाम निर्माण होतो. म्हणजेच घाम येण्यामागचा मुख्य उद्देश शरीर थंड ठेवणं हा असतो.

अति घाम येणं आणि वजन कमी होणं याचा काय आहे सबंध 

प्रत्येक माणसाच्या अंगातून घाम बाहेर पडण्याची क्षमता वेगवेगळी असते. काही लोकांना मुळीच घाम येत नाही तर काहींच्या अंगातून सतत घामाच्या धारा लागलेल्या असतात. कोणाच्या अंगातून किती घाम येणार हे तो राहत असलेलं वातावरण, शारीरिक हालचाल आणि पाणी पिण्याची क्षमता यावर अवलंबून असतं. ज्यामुळे जर तुम्ही व्यायाम न करता भरपूर पाणी पित असाल तरी देखील तुमच्या अंगातून भरपूर घाम येऊ शकतो. उन्हाळ्यात वातावरण उष्ण असल्यामुळे अंगातून जास्त घाम येतो. त्यामुळे फक्त घामामुळेच वजन कमी होतं असं नाही.

व्यायाम करताना अति घाम आल्यामुळे वजन होतं का कमी

व्यायाम करताना अति घाम आल्यामुळे तुमचं काही काळासाठी वजन कमी होतं. घाम आल्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दररोज सातत्याने व्यायाम करावा लागतो. जर तुम्ही योग्य आहार घेत असाल, मुबलक पाणी पित असाल, नियमित व्यायाम करत असाल आणि योग्य जीवनशैली जगत असाल तर अंगातून आलेला घाम तुमचं वजन कमी करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. वजन कमी करण्यासाठी व्यायामादरम्यान अंगातून घाम येण्यासोबत आहारात योग्य प्रोटीन्सचा समावेश असणंही गरजेचं आहे. कारण प्रोटीन्समुळे शरीराचे मेटाबॉलिझम वाढतं, भुक नियंत्रणात येते आणि हॉर्मोन्स संतुलित राहतात. ज्याचा एकूण परिणाम तुमच्या शरीरावर होतो आणि वजन कमी होतं. यासाठी जाणून घ्या आहारातील प्रोटीनचे मुख्य स्रोत कोणते (Source Of Protein Food In Marathi)

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

25 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT