ADVERTISEMENT
home / xSEO
Importance Of Exercise In Marathi

Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सतत कामाची चिंता, नात्यातील दुरावा, आजारपण आणि इनफेक्शनची भीती आणि नैराश्य वाढताना दिसत आहे. याचं मुख्य कारण बैठ्या जीवनशैलीमुळे माणसाची शारीरिक हालचाल कमी झाली आणि त्यामुळे त्याचे आरोग्य बिघडले. शरीराचा आणि मनाचा एकमेकांवर परिणाम होत असल्यामुळे हळू हळू माणसाचे मानसिक स्वास्थ कमी झाले. यावर सोपा उपाय म्हणजे कितीही काम असलं तरी व्यायामासाठी नियमित वेळ काढायला हवा. कारण व्यायामामुळे तुमचे शारीरिक आरोग्य तर सुदृढ राहतेच शिवाय मानसिक शांतताही मिळते. व्यायामाचे तुमच्या शरीरावर, मनावर, हॉर्मोन्सवर चांगले परिणाम होतात. निरोगी राहण्यासाठी, मानसिक शांतता मिळण्यासाठी, वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी, सतत उत्साही राहण्यासाठी व्यायाम करणे फायद्याचे ठरते. यासाठीच जाणून घ्या व्यायामाचे जीवनातील महत्त्व (Importance Of Exercise In Marathi).

Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे

Importance Of Exercise In Marathi
Importance Of Exercise In Marathi

निरोगी जीवनशैलीसाठी प्रत्येकाने दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे तरी काढायलाच हवीत. यासाठीच जाणून घ्या व्यायामाचे महत्त्व आणि फायदे (Vyayamache Mahatva) आणि (Vyayamache Fayde) 

वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते

आजकाल वाढते वजन ही प्रत्येकासाठी एक डोकेदुखी ठरत आहे. मात्र जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर तुमचे वजन नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत होते. व्यायामामुळे तुमचे वजन कमी होतेच शिवाय तुम्ही निरोगीदेखील राहता. कारण व्यायामासाठी तुम्हाला सतत शारीरिक हालचाल करावी लागते. जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात शारीरिक हालचाल करता तेव्हा तुमच्या शरीरातील कॅलरिज बर्न होतात. ज्याचा परिणाम तुमच्या वजनावर होतो आणि वजन कमी होते. वजन कमी करण्यासाठी जीममध्ये जावून तज्ञ्जांच्या मार्गदर्शनाखाली योग्य व्यायामाचे प्रकार शिकून घ्यायला हवेत. जर तुमचे वजन नियंत्रणात राहवे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चालण्याचा व्यायामदेखील नियमित करू शकता. 

वाचाल तर थक्क व्हाल (Benefits Of Cycling In Marathi)

ADVERTISEMENT

ह्रदयाच्या समस्यांचा धोका कमी होतो

नियमित व्यायाम करणे ह्रदयाच्या आरोग्यासाठी हितकारक असते. कारण अयोग्य जीवनशैली आणि चुकीचा आहार याचे प्रमाण वाढलेले आहे. ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची निर्मिती वाढून ह्रदयाचे आरोग्य बिघडताना दिसून येते. मात्र व्यायाम केल्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढत नाही. ज्याचा चांगला परिणाम ह्रदयाच्या आरोग्यावर होतो आणि तुमचे ह्रदय मजबूत राहते. ह्रदयाच्या आरोग्यासाठी योग्य पद्धतीने कार्डिओ व्यायाम प्रकार करायला हवेत.

मानसिक आरोग्य आणि मूड सुधारतो

शरीराप्रमाणेच मानसिक आरोग्यही खूप महत्त्वाचे आहे. वास्तविक शारीरिक स्थितीचा मनावर आणि मानसिक स्थितीचा शरीरावर परिणाम होत असतो. कामाची चिंता अथवा नातेसंबधांमधील ताणतणावामुळे नैराश्य आले असेल तर तुम्हाला नियमित व्यायामाची गरज आहे. कारण व्यायामामुळे तुमचा मेंदू कार्यरत राहतो आणि तुमच्या भावना आणि मनावर चांगला परिणाम होतो. मनावरील ताण दूर करण्यासाठी तुम्ही योगासने, प्राणायम, मेडिटेशनचा सराव करू शकता. 

हाडे आणि स्नायू  मजबूत बळकट होतात

व्यायामामुळे तुमची हाडे मजबूत आणि स्नायू बळकट होतात. वेटलिफ्टिंग सारख्या व्यायामप्रकारामुळे तुमच्या हाडे आणि स्नायूंवर चांगला ताण येतो. वयोमानानुसार शारीरिक हालचालींवर मर्यादा येतात. यासाठी उतरत्या काळातही हाडे मजबूत राहण्यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामामुळे तुमच्या शरीरातील बोन डेन्सिटी वाढते. ज्यामुळे तुम्ही कायम तरूण आणि उत्साही दिसता. खेळाडूंना हाडे मजबूत राहण्यासाठी व्यायाम करणे खूप गरजेचे असते. 

Vyayamache Fayde
Vyayamache Fayde

झोप चांगली लागते

आजकाल जास्त उशीरा काम करणे, रात्री उशीरा झोपणे, रात्री उशीरापर्यंत टीव्ही अथवा मोबाईल पाहणे, उशीरा जेवणे यामुळे झोपेचे चक्र बिघडते. अनेकांना रात्री झोप न लागणे अथवा झोपमोड होण्याचा त्रास जाणवतो. मात्र जर तुम्ही नियमित व्यायाम करत असाल तर तुमच्या झोपेवर कोणताही परिणाम होत नाही. व्यायामामुळे तुम्हाला चांगला आराम मिळतो आणि शांत झोप लागते.

ADVERTISEMENT

शारीरिक ऊर्जा वाढते

कामाचा वेग आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी तुम्ही सतत उत्साही असणे गरजेचं आहे. मात्र दैनंदिन कामाची चिंता, घरच्या जबाबदाऱ्या आणि ताणतणाव यामुळे तुमची शारीरिक ऊर्जा कमी होते आणि त्याचा परिणाम तुमच्या कामावर आणि शरीरावर होतो. यासाठीच नियमित व्यायाम करा ज्यामुळे तुम्ही सतत उत्साही राहाल. व्यायामामुळे तुमच्या शरीरातील ऑस्किजनची पातळी वाढते. शरीरातील प्रत्येक अवयवाला पुरेसा ऑक्सिजन मिळाल्यामुळे तुमचा कामाचा उत्साह वाढतो. 

मेंदूचे कार्य आणि स्मरणशक्ती सुधारते

मेंदूचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी व्यायाम नियमित करणे गरजेचे आहे. कारण व्यायामामुळे तुमच्या ह्रदयाचे ठोके नियंत्रित राहतात, तुमच्या शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, ऑक्सिजनची पातळी वाढते. ज्यामुळे तुमच्या मेंदूला चालना मिळते आणि तुमची विचारशक्ती, स्मरणशक्ती, निर्णय शक्ती, आकलन शक्ती वाढू लागते. 

सेक्स लाईफ सुधारते

सुखी वैवाहिक जीवनासाठी चांगले सेक्स लाईफ देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण शारीरिक सुख ही प्रत्येकाची गरज असते. मात्र आजकाल काम करून थकल्यामुळे, कामाची चिंता, नात्यातील ताणतणावामुळे सेस्क लाईफ कमी झालेले दिसून येते. पण जर तुम्ही नियमित व्यायाम केला तर तुमची शारीरिक ऊर्जा वाढते. ज्यामुळे तुमच्या सेक्स लाईफवर चांगला परिणाम होतो. 

रक्तातील साखर नियंत्रणात राहते

आजकाल जीवनशैलीत झालेल्या बदलामुळे टाईप 2 मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मधुमेहींची संख्या इतकी वाढली आहे की मधुमेह हा एक जीवनशैली विकार झाला आहे. मात्र नियमित व्यायाम केल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवता येते.ज्यामुळे तुमचा मधुमेह नियंत्रणात राहू शकतो. व्यायामामुळे मधुमेहींचे वजन वाढत वाही आणि अधिक शारीरिक समस्या वाढण्याचा धोका कमी होतो.

ADVERTISEMENT

आयुष्य वाढते

जीवनशैलीत झालेले बदल, चुकीचा आहार यामुळे माणसाचे आरोग्य बिघडते आणि आयुष्य कमी होताना दिसून येते. मात्र जर आयुष्य वाढवायचे असेल तर माणसाने पुन्हा त्याच्या जीवनशैलीत योग्य ते बदल करायला हवेत. वेळेत झोपणे, सकाळी लवकर उठणे, योग्य आहार घेणे, ताणतणावापासून दूर राहणे यासोबतच नियमित व्यायाम करणे यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण व्यायामामुळे तुमच्या शरीराला आणि मनाला आराम मिळतो. ज्याचा चांगला परिणाम तुमच्या संपूर्ण आरोग्य आणि जीवनावर होतो. थोडक्यात आयुष्य जास्त आनंदी आणि सुखात जगायचे असेल तर योग्य जीवनशैलीचा अवलंब करायला हवा. 

Vyayamache Prakar | व्यायामाचे प्रकार

व्यायामाचे जीवनातील महत्त्व
व्यायामाचे जीवनातील महत्त्व

व्यायामाचे विविध प्रकार आहेत. तुम्ही तुमचे वय, वजन,  आरोग्य आणि आवड यानुसार कोणता व्यायाम प्रकार (Vyayamache Prakar)  करायचा हे तुम्ही ठरवू शकता. मुख्यतः व्यायामाचे चार भाग आपण यासाठी करणार आहोत.

अॅरोबिक व्यायाम प्रकार

अॅरोबिक व्यायाम प्रकार म्हणजे व्यायामाचे असे प्रकार ज्यामुळे तुमच्या ह्रदय, फुफ्फुसे आणि स्नायूंना आराम मिळतो. नियमित अॅरोबिक व्यायाम केल्यामुळे तुमचे मधुमेह, ह्रदयविकार अशा आजारांपासून संरक्षण होते. यासाठी तुम्ही नियमित चालणे, सायकल चालवणे, धावणे, पोहणे, खेळ खेळणे असे व्यायाम करू शकता.

‘एरोबिक’ चे हे व्यायाम प्रकार तुम्हाला स्वस्त ठेवतील (Best Aerobic Exercises In Marathi)

ADVERTISEMENT

स्ट्रेचिंग व्यायाम प्रकार

स्ट्रेचिंग व्यायामाचे प्रकार हे तुमच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी केले जातात. त्यामुळे यासाठी तुम्हाला जीममध्ये जाण्याची आणि तज्ञ्जांचा सल्ला घेण्याची गरज असते. अशा व्यायाम प्रकारामुळे तुमचे पाय आणि हाताचे स्नायू बळकट होतात. हाडे मजबूत होण्यासाठी लहानपणापासून मुलांना हे व्यायाम प्रकार शिकवायला हवेत.

फ्लेक्सिबिलीटी व्यायाम प्रकार

खेळाडूंना त्यांचे स्नायू मजबूत आणि लवचिक असणं गरजेचं असतं. यासाठी अशा लोकांना फ्लेक्सिबिलीटी व्यायाम प्रकार करायला हवेत. हा व्यायाम प्रकार तज्ञ्जांच्या सल्ल्याने करायला हवा कारण यात स्नायूंना कोणतीही दुखापत न होता त्यावर ताण देता येणं यायला हवं. योगासने अथवा स्ट्रेचिंग व्यायाम करून शरीरामध्ये लवचिकता आणता येते. 

बॅलन्सिंग व्यायाम प्रकार

व्यायाम म्हणजे शरीर आणि मनाला संतुलित ठेवणारी एक साधना आहे. त्यामुळे यासाठी शरीराचा योग्य बॅलन्स साधणे गरजेचे असते. एका पायावर तोल सांभाळणे, मागच्या दिशेने चालणे, पायाच्या टाचांवर तोल सांभाळणे अशा प्रकारचे व्यायाम प्रकार करताना शरीरासोबत मनाचेही संतुलन साधले जाते.

वजन वाढवण्यासाठी कोणता व्यायाम करावा, वापरा ट्रिक्स – Exercises To Gain Weight In Marathi

ADVERTISEMENT

व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि काही निवडक प्रश्न – FAQ’s

Importance Of Exercise In Marathi
Importance Of Exercise In Marathi

1. व्यायाम केल्यामुळे काय सामाजिक फायदे होतात ?

व्यायामाचे माणसाच्या वैयक्तिक, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक अशा सर्वच जीवनावर चांगले परिणाम होतात. व्यायामामुळे तुम्ही सदैव आनंदी आणि उत्साही राहता. ज्यामुळे तुमचे सामाजिक जीवन अधिक समृद्ध होते. 

2. घरात व्यायाम करणे योग्य आहे का ?

व्यायामासाठी प्रत्येकवेळी घराबाहेर अथवा जीमलाच जायला हवे असे नाही. तुम्ही घरच्या घरी व्यायाम नक्कीच करू शकता. तुमच्या घरी किती जागा आहे आणि तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यायाम करणार आहात यावर ते अवलंबून आहे. योगासने, प्राणायम असे व्यायाम प्रकार तुम्ही घरी करू शकता.

3. दररोज किती तास व्यायाम करावा ?

व्यायाम किती वेळ करावा हे त्या व्यक्तीच्या वय, आरोग्य, आवड आणि ते करत असलेल्या व्यायाम प्रकार यावर अवलंबून आहे. तरीदेखील प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात साधारणपणे तीस मिनीटे ते दोन तास व्यायाम करणे फायद्याचे आहे. मात्र त्यापेक्षा जास्त वेळ व्यायाम करायचा असेल तर तज्ञ्जांचा सल्ला अवश्य घ्यावा. 

17 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT