ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
Eyebrow Growth Tips In Marathi

आयब्रो दाट होण्यासाठी आणि जलद वाढीसाठी टिप्स | Eyebrow Growth Tips In Marathi

Eyebrow Growth Tips In Marathi – भुवया हा आपल्या चेहेऱ्याचा एक महत्वपूर्ण भाग आहे. तज्ज्ञांच्या मते माणसाला भुवया असण्याचे दोन मुख्य उद्देश आहेत. एक म्हणजे आपल्या डोळ्यांपासून मॉइश्चर दूर ठेवणे आणि दुसरे म्हणजे संवाद साधणे. एखाद्याने मास्क जरी घातला असेल तरी त्याच्या भुवयांवरून आपण त्याच्या चेहेऱ्यावरील हावभावांचा अंदाज लावू शकतो. शारीरिकदृष्ट्या, आपले डोळे स्वच्छ आणि क्लिअर  ठेवण्यास मदत करण्यासाठी भुवया आहेत. आपल्या भुवया आपल्या चेहऱ्यावरचा  घाम आणि पावसाची आर्द्रता आपल्या डोळ्यांपासून दूर ठेवतात ज्यामुळे आपल्याला दिसायला त्रास होत नाही.भुवया तुमच्या डोळ्यांत येणारा प्रकाश देखील कमी करू शकतात आणि त्यांच्यापासून घाण दूर ठेवतात. भुवया या एखाद्याच्या चेहऱ्याची छाप पूर्णपणे बदलू शकतात. कमानीचा कोन, रेषांचा गोलाकारपणा, जाडी, दोन भुवयांमधील अंतर या सर्वांमुळे चेहऱ्याचा संपूर्ण वरचा अर्धा भाग पूर्णपणे वेगळा दिसतो. म्हणूनच सुंदर लुक हवा असल्यास आयब्रोजचा आकार योग्य ठेवा.

सौंदर्याच्या दृष्टीने बोलायचे झाले तर भुवया एखाद्या व्यक्तीच्या चेहेऱ्यावरच्या सर्वात प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक असतात. अर्थात, प्रत्येकजण उत्तम प्रकारे मॅनिक्युअर केलेल्या भुवया घेऊन जन्माला येत नाही; त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी भुवया नियमितपणे ट्रिम कराव्या लागतात, त्यांना आकार द्यावा लागतो. काही जणांना छान दाट भुवया असतात. पण काहींच्या भुवयांच्या केसांना कमी ग्रोथ असते. त्या खूपच पातळ आणि बारीक असतात. अशा वेळी त्यांना हवा तो आकार देणे कठीण होते. भुवया दाट होण्यासाठी उपाय (Eyebrow Growth Tips In Marathi) केले तर त्यांची चांगली ग्रोथ होऊ शकते व आपल्याला हवा तसा आकार देता येतो. वाचा भुवया दाट करण्यासाठी घरगुती उपाय. 

अधिक वाचा – तुमच्या Eyebrows ना द्या Perfect शेप

भुवया दाट होण्यासाठी सोप्या टिप्स । Simple Eyebrow Growth Tips In Marathi

आनुवांशिक लॉटरी लागल्यामुळे काहींना जन्मत:च जाड, ठळक आणि सुंदर भुवया मिळतात, तर इतरांना मात्र त्यासाठी अधिक मेहनत करावी लागेल. काही कारणांमुळे तुमच्या भुवयांचे केस गळत असतील  किंवा अति प्रमाणात प्लकिंग केल्याने भुवयांची चांगली ग्रोथ होत नसेल तर त्या पुन्हा वाढवण्याची काही साधने, युक्त्या आणि तंत्रे आहेत. वाचा आयब्रो दाट होण्यासाठी उपाय ((Eyebrow Growth Tips In Marathi).

ADVERTISEMENT
Eyebrow Growth Tips In Marathi
Eyebrow Growth Tips In Marathi
  • तुमच्या भुवयांचे केस का गळत आहेत या समस्येच्या मुळाशी जा. काही लोकांच्या भुवया आनुवंशिक कारणांमुळे बारीक असतात, परंतु जर तुमच्या भुवया आधीपासून जाड असतील आणि आता त्यांचे केस गळत असतील, तर त्याचे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे. 
  • भुवयावरील केस अनेक कारणांमुळे गळू शकतात. फंगल इंफेक्शन, ऍलर्जी किंवा ऍलोपेसिया एरियाटा नावाची ऑटोइम्यून डिसऑर्डर असणे यामुळे भुवयांचे केस गळतात.
  • काहींना आयब्रो पेन्सिल आणि पावडरची ऍलर्जी असू शकते, ज्यामुळे भुवयांचे केस गळू शकतात. किंवा व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेही असे होऊ शकते. त्यामुळे त्या समस्येच्या मुळाशी जाऊन उपाय करणे आवश्यक आहे. 
  • जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या भुवया योग्य दिशेने वाढल्या पाहिजेत, तर भुवयांचे कंडिशनर आणि ब्रो ऑइल ही वाढीस मदत करणारी उत्पादने तुम्ही वापरू 
  • बायोटिन आणि पेप्टाइड्स सारखे घटक असलेली उत्पादने तुम्हाला मदत करू शकतात.परंतु ही उत्पादने तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वापरा.
  • तुम्ही भुवयांना आकार देण्यासाठी ट्विझर्सचा वापर करत असाल तर तो सोडून द्या. कमीत कमी दहा आठवडे तरी ट्विझर हातात सुद्धा घेऊ नका. तसेच शक्यतोवर थ्रेडिंग सुद्धा करू नका. दहा ते पंधरा आठवड्यांनी भुवयांची ग्रोथ झाल्यावर तुम्हाला त्यांना हवा तो आकार देता येईल.
  • भुवयांच्या खालच्या बाजूस दररोज केसांच्या कूपांना मसाज करा. 
  • दिवसातून एकदा भुवयांच्या सभोवतालची त्वचा एक्सफोलिएट करा. यामुळे मृत पेशी साफ होतील आणि रक्ताभिसरण वाढेल.
  • दिवसातून दोन ते तीन वेळा भुवयांवर पेट्रोलियम जेली लावा. यामुळे तुमचे भुवयांचे केस कंडिशन आणि मॉइश्चरायझ होतील.. यासोबतच भुवया जाड होण्यास मदत होईल. 
  • व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये असलेले तेल दिवसातून दोनदा भुवयांवर लावा. सतत ट्विझर्स किंवा वॅक्सिंगने भुवयांचे केस काढू नका. 

अधिक वाचा – आयब्रो स्लिट्सचा ट्रेंड, जाणून घ्या काय आहे स्टाईल

नैसर्गिकरित्या भुवया दाट होण्यासाठी उपाय । Natural Eyebrow Growth Tips In Marathi 

चेहेऱ्याच्या अनुरूप सुंदर आकार दिलेल्या भुवया असल्या की माणसाचे वय दिसत नाही.  आपण वयापेक्षा लहान दिसतो. लोक जेव्हा तुमच्याकडे पाहतात तेव्हा तुमच्याबाबतीत पहिली लक्षात येणारी गोष्ट म्हणजे तुमच्या भुवया असतात., कोणत्याही मेकअप बिघडलेल्या आकाराच्या भुवयांना लपवू शकत नाही.  योग्यप्रकारे आकार दिलेल्या भुवयांमुळे चेहऱ्याचाही आकार चांगला दिसतो व आणि डोळे मोठे आणि तरुण दिसतात. परंतु भुवयांना योग्य आकार देण्यासाठी त्यांची ग्रोथ चांगली असायला हवी. तुमच्या भुवया नैसर्गिकरित्या दाट होण्यासाठी काही सोपे उपाय खाली दिलेले आहेत. ते करून बघा. 

  • भुवयांवर जास्त मेकअप करू नका. 
  • भुवयांवर पेन्सिलचा जास्त वापर करू नका. 
  • भुवया कधीही कठोरपणे चोळू नका. 
  • ताणतणावापासून लांब राहा. तणावावर उपाय करा. कारण तणावामुळे तुमच्या भुवयावरील केसांची वाढ थांबू शकते. 
  • दिवसातून किमान सहा तास झोप घेतलीच पाहिजे. यामुळे तुमच्या भुवयाचे केस जलद वाढतील आणि दाटही होतील.
  •  दररोज पुरेसे पाणी प्या. यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहील आणि तुमच्या भुवयांचे केस मऊ होतील. 

तसेच पुढील नैसर्गिक उपाय तुम्ही करू शकता. 

एरंडेल तेल – आयब्रो दाट होण्यासाठी आणि जलद वाढीसाठी उपयुक्त आहे

एरंडेल तेल - Eyebrow Growth Tips In Marathi
एरंडेल तेल – Eyebrow Growth Tips In Marathi

एरंडेल तेल जाड भुवया मिळविण्यासाठी सर्वात प्रभावी उपायांपैकी एक आहे. एरंडेल तेल केसांच्या वाढीस मदत करू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे.  सेंद्रिय कोल्ड प्रेस्ड शुद्ध एरंडेल तेलाचे काही थेंब तुमच्या बोटांवर घ्या व भुवयांवर बोटांच्या टोकांनी मसाज करा. मसाज केल्यानंतर तेल 30 मिनिटे ठेवा. त्यानंतर मेकअप रिमूव्हरने भुवया व आजूबाजूचा भाग हळुवार पुसून घ्या आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही भुवयांना एरंडेल तेलाचा मसाज दररोज करू शकता. पण  शुद्ध एरंडेल तेलाची तुम्हाला ऍलर्जी असल्यास पुरळ उठू शकते. म्हणूनच ते वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.

ADVERTISEMENT

खोबरेल तेल – वापरून आयब्रो दाट आणि जलद वाढण्यास मदत होईल

खोबरेल तेल - Eyebrow Growth Tips In Marathi
खोबरेल तेल

भुवयांवरचे केस हे प्रथिनांपासून बनलेले असतात. खोबरेल तेल भुवयांच्या केसांची वाढ करण्यात फायदेशीर आहे. त्यात असलेले लॉरिक ऍसिड प्रतिजैविक एजंट म्हणून कार्य करते. त्यामुळे तुमच्या भुवयांचे आणखी नुकसान टळते. खोबरेल तेल भुवयांच्या केसांना जलद वाढण्यास उत्तेजित करते. रात्री झोपताना कापसाचा बोळा खोबरेल तेलात बुडवून भुवयांना लावा. रात्रभर तसेच ठेवा व सकाळी चेहेरा फेसवॉशने स्वच्छ धुवा.तुम्ही दररोज तुमच्या भुवयांवर खोबरेल तेल लावलेत तर तुम्हाला लवकरच बदल दिसून येतील. 

ऑलिव्ह ऑइल – लावून आयब्रो दाट आणि जलद वाढवा

ऑलिव्ह ऑइल - Eyebrow Growth Tips In Marathi
ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमध्ये oleuropein असते. हे एक फिनोलिक कंपाऊंड आहे केसांच्या वाढीस मदत करते. त्यामुळे तुमच्या भुवया दाट होण्यासही ते मदत करू शकते. तुमच्या बोटाच्या टोकावर एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलचा एक थेंब घ्या आणि त्याचा भुवयांवर मसाज करा. दोन तास तसेच ठेवा आणि फेसवॉश आणि पाण्याने चेहेरा स्वच्छ धुवा. दिवसातून एकदा हा उपाय करा. भुवयांना लावण्यासाठी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलचाच वापर करा कारण त्यात हानिकारक रसायने नसतात.  

बदाम तेल – Eyebrow Growth Tips In Marathi

बदाम तेल - Eyebrow Growth Tips In Marathi
बदाम तेल – Eyebrow Growth Tips In Marathi

बदामाच्या तेलामध्ये ओमेगा- 3 फॅटी ऍसिड असतात जे केसांना पोषण देतात आणि मजबूत करण्यास मदत करतात. त्यामुळे भुवयांवर केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळून ते दाट होण्यास मदत होऊ शकते. रात्री झोपताना आपल्या बोटांच्या टोकांवर बदाम तेलाचे काही थेंब घ्या आणि भुवयांवर तेलाचा मसाज करा.रात्रभर ठेवा आणि सकाळी स्वच्छ धुवा. जर तुम्हाला बदामाची ऍलर्जी असेल तर बदामाचे तेल टाळा कारण त्यामुळे खाज सुटणे, सूज येणे आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि श्वासोच्छवासाच्या समस्या यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात. 

कोरफड चा वापर आयब्रो दाट आणि सुंदर बनवण्यासाठी बेस्ट

कोरफड - Eyebrow Growth Tips In Marathi
कोरफड

कोरफडी मध्ये aloenin नावाचे संयुग असते जे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते. यामुळे भुवया जाड होण्यास मदत होऊ शकते. कोरफडीचा गर बोटांवर घेऊन त्याचा तुमच्या भुवयांना गर शोषला जाईपर्यंत मसाज करा.कमीतकमी 30 मिनिटे ठेवा व नंतर चेहरा चिकट वाटत असल्यास धुवून टाका. हे तुम्ही दिवसातून दोनदा करू शकता. 

ADVERTISEMENT

जाड भुवयांसाठी टिप्स मराठी । Thicker Eyebrow Growth Tips In Marathi 

भुवयांचा आकार योग्य असेल तर तुमचा चेहेरा व खास करून तुमचे डोळे सुंदर दिसतात. पण चुकीचा आकार असेल तर तुमचा चेहेरा वृद्ध, थकलेला किंवा रागावलेला दिसू शकतो. चांगल्या ग्रूम केलेल्या भुवया तुम्हाला एक पॉलिश लुक देतात. भुवया ग्रूम केलेल्या असतील तर मेकअप नसतानाही स्त्री सामान्यत: अधिक सुंदर आणि स्मार्ट दिसते. जाड भुवयांना कसाही मनासारखा आकार देता येतो. तुमच्या भुवया जर विरळ होत असतील तर पुढील उपाय करून बघा. 

लव्हेंडर इसेन्शियल ऑइल जाड भुवयांसाठी टिप्स

लव्हेंडर इसेन्शियल ऑइल -  जाड भुवयांसाठी टिप्स  (Eyebrow Growth Tips In Marathi)
लव्हेंडर इसेन्शियल ऑइल जाड भुवयांसाठी टिप्स

लव्हेंडर तेल केसांच्या वाढीस मदत करू शकते असे तज्ज्ञांना अनेक अभ्यासांत आढळले आहे.लव्हेंडर इसेन्शियल ऑईलचे काही थेम्ब 1-2 चमचे जोजोबा किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळा. व या मिश्रणाने भुवयांवर मसाज करा. रात्रभर असेच ठेवा आणि सौम्य फेसवॉशने चेहेरा धुवा. सर्व इसेन्शियल ऑईल्सप्रमाणेच लॅव्हेंडर इसेन्शियल ऑइल वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. इसेन्शियल ऑईल्स कधीच थेट त्वचेवर लावू नयेत कारण त्यांचा त्वचेला त्रास होऊ शकतो. ते कायम खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑइलमध्ये मिसळूनच लावावे. 

पेट्रोलियम जेली वापरून भुवया जाड करा

पेट्रोलियम जेली - जाड भुवयांसाठी टिप्स   - Eyebrow Growth Tips In Marathi
पेट्रोलियम जेलीजाड भुवयांसाठी टिप्स

पेट्रोलियम जेली तुमच्या भुवयाखालील त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि तिचे पोषणही करते. त्यामुळे भुवयांवरील केस तुटण्याची शक्यता कमी होते. पेट्रोलियम जेली भुवयांवर लावा आणि रात्रभर तशीच राहू द्या. पण जेली जास्त प्रमाणात लावू नका नाहीतर त्याठिकाणी पिंपल्स येतील. सकाळी कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. तुमची त्वचा जर कोरडी असेल तर तुम्ही रोज रात्री हा उपाय करू शकता. पण जर तुमच्या त्वचेवर मुरूम येत असतील तर हा घरगुती उपाय वापरू नका कारण पेट्रोलियम जेलीमुळे तुमची त्वचा तेलकट होऊ शकते.

जवस/फ्लेक्ससीड तेल – Eyebrow Growth Tips In Marathi

जवस/फ्लेक्ससीड तेल - Eyebrow Growth Tips In Marathi
जवस/फ्लेक्ससीड तेल

जवसाच्या तेलामध्ये असलेले आवश्यक फॅटी ऍसिड्स केसांच्या वाढीस मदत करतात. हे तुम्हाला जाड भुवया मिळविण्यात मदत करू शकते. जवस तेल किंवा फ्लेक्ससीड तेलात स्वच्छ मस्कारा वॉन्ड बुडवा आणि ते तुमच्या भुवयांवर लावा आणि रात्रभर ठेवा. सकाळी फेस वॉश आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय तुम्ही रोज करू शकता. 

ADVERTISEMENT

तिळाचे तेल लावून भुवया होतील जाड

तिळाचे तेल- Eyebrow Growth Tips In Marathi
तिळाचे तेल

तिळाच्या तेलामुळे निरोगी केस मिळतात आणि केसांची वाढ चांगली होते. कारण त्यात आवश्यक पोषक घटक असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात. तिळाच्या तेलाचे काही थेंब हाताच्या बोटांवर घ्या आणि भुवयांवर मसाज करा. रात्रभर असेच ठेवा आणि फेसवॉश आणि थंड पाण्याने स्वच्छ धुवा.हे तुम्ही रोज केलेत तर तुम्हाला काहीच दिवसांत फरक जाणवेल.

टी ट्री ऑइल च्या वापराने भुवया जाड होण्यास मदत होते

टी ट्री ऑइल- Eyebrow Growth Tips In Marathi
टी ट्री ऑइल

टी ट्री ऑईलचा केसांच्या वाढीशी संबंध जोडणारा कोणताही प्रत्यक्ष अभ्यास नाही. परंतु काही अभ्यासांत असे लक्षात आले आहे की टी ट्री ऑइल त्वचेतील रंध्रे बंद करू शकते आणि मृत त्वचेच्या पेशी आणि भुवयांवर रसायने तयार होण्यास प्रतिबंध करू शकते. यामुळे, भुवयांवर केस वाढण्यास प्रोत्साहन मिळू शकते. टी ट्री 2-3 थेंब 2 चमचे ऑलिव्ह ऑइल किंवा जोजोबा ऑइल मध्ये मिसळा व त्याचा आपल्या भुवयांवर मसाज करा. रात्रभर राहू द्या व सकाळी फेसवॉशने चेहेरा धुवा. टी ट्री ऑइल हे अत्यंत स्ट्रॉंग असल्यामुळे ऍलर्जी होऊ शकते. म्हणून ते डायल्युट केल्याशिवाय वापरू नका. तसेच, हे तेल वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा. 

अधिक वाचा – घरीच कसे करावे स्वतःचे आयब्रोज, जाणून घ्या सोपी युक्ती

भुवया दाट करण्यासाठी घरगुती उपाय । Home Remedies For Bold Eyebrows In Marathi 

आपल्यापैकी कुणाचाच चेहरा पूर्णपणे सिमिट्रिकल नसतो परंतु आपल्यापैकी बहुतेकांना एक सिमिट्रिकल  चेहरा हवा असतो कारण सिमिट्रिकल चेहेरा सुंदर दिसतो. सिमिट्रिकल नसलेल्या भुवया तुमच्या चेहऱ्याचे संतुलन बिघडवू शकतात, ज्यामुळे एक डोळा दुसऱ्यापेक्षा मोठा दिसू शकतो किंवा तुमचा संपूर्ण लुक पूर्णपणे बदलू शकतो.भुवयांमध्ये आपल्या चेहऱ्यात असणाऱ्या किरकोळ त्रुटी दूर करून चेहऱ्याचे स्वरूप पूर्णपणे बदलण्याची ताकद असते. म्हणूनच भुवया दाट करण्यासाठी खालील घरगुती उपाय तुम्ही करू शकता. 

ADVERTISEMENT

कांद्याचा रस हा सोपा भुवया दाट करण्यासाठी घरगुती उपाय आहे

कांद्याचा रस  - Eyebrow Growth Tips In Marathi
कांद्याचा रस

कांद्याचा रस केसगळती रोखू शकतो आणि केसांच्या वाढीस मदत करतो. कांद्याला तिखट व तीव्र वास असल्याने, वासाचे सर्व ट्रेस काढून टाकण्यासाठी त्याबरोबर लिंबाचा रस वापरणे चांगले.1 छोटा कांदा, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, २-३ टेबलस्पून पाणी, Q-टीप, कापसाचा बोळा हे साहित्य घ्या. कांदा चिरून घ्या. कांद्याचे तुकडे ब्लेंडरमध्ये टाकून त्याची पेस्ट बनवा. रस मिळविण्यासाठी हे गाळून घ्या. क्यू-टिप वापरून, तुमच्या भुवयांवर हा रस लावा. तासभर तसाच ठेवा. त्यानंतर डायल्युट केलेल्या लिंबाच्या रसात भिजवलेल्या कापसाच्या बोळ्याने भुवया पुसून घ्या व नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. प्रत्येकी एक दिवसाआड तुम्ही कांद्याचा रस भुवयांना लावू शकता. 

व्हिटॅमिन ई तेल लावून घरच्या घरी भुवया दाट करा

व्हिटॅमिन ई तेल- Eyebrow Growth Tips In Marathi
व्हिटॅमिन ई तेल

व्हिटॅमिन ई केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते आणि नाजूक केस मजबूत करते. त्यात tocotrienol हे अँटिऑक्सिडेंट आहे जे केसांच्या वाढीस प्रतिबंधित करणारा कोणताही ताण कमी करण्यास मदत करते. म्हणूनच, ते तुमच्या भुवयांवर केसांच्या वाढीस देखील मदत करू शकते. व्हिटॅमिन ई च्या कॅप्सूल फोडून आतमध्ये असलेले तेल बोटांच्या साहाय्याने तुमच्या भुवयांवर लावा. काही मिनिटे मसाज करा आणि रात्रभर राहू द्या. दररोज रात्री झोपण्यापूर्वी हे करा व फरक बघा. 

अंड्याचा पिवळा बलक आहे भुवया दाट करण्यासाठी उपयुक्त

अंड्याचा पिवळा बलक - Eyebrow Growth Tips In Marathi
अंड्याचा पिवळा बलक

अंड्यातील पिवळ बलक हा बायोटिनचा समृद्ध स्रोत आहे जो तुमचे केस जलद वाढण्यास मदत करतो. त्यामुळे, भुवयांच्या केसांच्या वाढीला चालना देण्यासाठी व ते दाट होण्यास मदत करू शकतो. अंड्यातील पिवळ बलक पांढऱ्यापासून वेगळा करा व तो फेटून घ्या. क्यू-टिप किंवा ब्रशने तुमच्या भुवयांवर लावा. 20 मिनिटे ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा भुवयांवर अंड्यातील पिवळ बलक लावू शकता.अंड्यातील पिवळ बलक त्वचेची रंध्रे ब्लॉक करू शकतोआणि पुरळ होऊ शकते. म्हणूनच, जर तुम्हाला पिम्पल्सचा त्रास असेल तर हा उपाय करू नका.

दूध वापरून बनवा भुवया सुंदर

दूध - Eyebrow Growth Tips In Marathi
दूध

दुधामध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. दूध केसांच्या मुळांचे पोषण करण्यास आणि भुवया दाट होण्यास मदत करू शकते. कापसाचा बोळा दुधात भिजवा व त्याने भुवयांना मसाज करा. 15 मिनिटे ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा. हा उपाय तुम्ही रोज करू शकता. 

ADVERTISEMENT

मेथी दाणे च्या वापराने बनतात भुवया दाट आणि सुंदर

मेथी दाणे - Eyebrow Growth Tips In Marathi
मेथी दाणे

मेथी दाणे केसांची निगा राखण्यासाठी एक महत्त्वाचा घटक मानला जातो.. म्हणूनच, ते भुवयांच्या केसांची वाढ होण्यास देखील मदत करू शकतात. 1/4 कप मेथी दाणे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. बारीक वाटून घ्या आणि भुवयांना लावा. 30-45 मिनिटे ठेवा आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2 वेळा करू शकता.

अधिक वाचा – आयब्रोजची अशी राखा निगा, फक्त थ्रेडिंग करणं पुरसं नाही

भुवयांमधील जागा कशा भराव्या। How to fix bald spots on eyebrows

प्रथम भुवयांचे केस गळण्याची मूळ कारणे शोधणे आवश्यक आहे जेणे करून तुम्हाला योग्य उपाय मिळेल.भुवयांचे केस गळण्याची ताण, ट्रायकोटिलोमॅनिया, ऑटोइम्यून डिसीज जसे की अलोपेसिया एरियाटा, एक्जिमा, केमोथेरपी, ऍलर्जी, थायरॉईड समस्या, वय ही कारणे असू शकतात.  तुमचे डॉक्टर तपासणी करून किंवा रक्त तपासणीद्वारे समस्येचे निदान करण्यात मदत करू शकतात. भुवयांचे ज्या ठिकाणचे केस गळले आहेत ते नैसर्गिकरित्या दुरुस्त करणे नेहमीच शक्य नसते. केमोथेरपी घेत असलेल्या लोकांना भुवयांसाठी कॉस्मेटिक सोल्यूशन्स वापरण्याची आवश्यकता भासू शकते. तसेच थायरॉईडच्या समस्या असलेल्या लोकांना त्यांच्या डॉक्टरांच्या निर्देशानुसार औषधांची आवश्यकता असते. मायक्रोब्लेडिंग किंवा पर्मनंट कॉस्मेटिक टॅटू काढून घेणे किंवा केस प्रत्यारोपण करून घेऊन तुम्ही ही समस्या कायमची सोडवू शकता. किंवा तुम्हाला जास्त त्रास नको असेल तर मेकअप तुमच्या मदतीला धावून येतो. तुम्ही LIT BROW DEFINER PENCIL वापरून भुवयांमधील जागा भरू शकता.

तसेच STAY DEFINED LIQUID EYELINER BROW POWDER चाही वापर करू शकता. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – निवडा तुमच्या आयब्रोजसाठी बेस्ट आयब्रो फिलर कसे ते घ्या जाणून

आयब्रोला मसाज कसा करावा । How to do Eyebrow massage

Eyebrow Growth Tips In Marathi

केसांच्या वाढीस चालना देण्यासाठी, भुवयांच्या केसांच्या मुळांना मसाज करा. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा तुमच्या भुवयांना त्यांच्या वाढीच्या दिशेने गोलाकार हालचालीत मसाज करा. यामुळे त्यांच्या वाढीला चालना मिळेल आणि तुमच्या भुवया लवकर वाढतील. तसेच, मऊ टूथब्रशने एक्सफोलिएट केल्याने वाढीस चालना मिळण्यास आणखी मदत होते. मेकअपचे अवशेष, सीरम, क्रीम व मळ भुवयांच्या आरोग्यास आणि वाढीस अडथळा आणू शकतात. म्हणूनच भुवयांची वाढ होण्यासाठी नियमितपणे या भागाची स्वच्छता करणे व  एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे.

FAQ- भुवयांच्या वाढीसंदर्भात नेहेमी पडणारे काही प्रश्न 

भुवया जाड होणे शक्य आहे का?

हे बऱ्याच घटकांवर अवलंबून आहे. जर तुमच्या भुवया ग्रूमिंगमुळे किंवा औषधोपचाराने हाताळता येण्याजोग्या वैद्यकीय समस्येमुळे विरळ झाल्या असतील तर तिथले केस पुन्हा दाट होऊ शकतात. परंतु तुमच्या भुवया नैसर्गिकरित्या विरळ असल्यास दाट भुवया वाढणे नेहमीच शक्य नसते. 

ADVERTISEMENT

भुवया परत वाढण्यास किती वेळ लागतो?

या प्रश्नाचे एकच ठोस उत्तर देता येत नाही. संपूर्ण गेलेल्या भुवया ६ महिन्यांत वाढू शकतात. भुवयांचे केस परत वाढण्यास लागणाऱ्या वेळेवर इतर घटक देखील परिणाम करू शकतात, जसे की वय, औषधे व भुवयांचे केस जाण्याचे कारण कोणते आहे. 

व्हॅसलीन भुवया वाढण्यास मदत करते का?

दुर्दैवाने, व्हॅसलीनमधील कोणतेही घटक दाट किंवा जाड भुवया वाढण्यास चालना देतील याचा कोणताही पुरावा नाही.पण व्हॅसलीन खूप मॉइश्चरायझिंग आहे आणि प्रत्यक्षात भुवया दाटआणि जाड दिसण्यास मदत करू शकतात. 

ADVERTISEMENT

भुवयांवर एरंडेल तेलाचे परिणाम दिसण्यासाठी किती वेळ लागतो?

एरंडेल तेल दररोज लावल्याने तुम्हाला पुन्हा जाड आणि दाट भुवया वाढण्यास मदत होईल. यासाठी काही वेळ लागेल पण बहुतेक तुम्हाला 5 ते 6 आठवड्यांच्या आत परिणाम दिसू लागतात. एरंडेल तेल हे केसांच्या वाढीच्या सर्वोत्कृष्ट सीरमपैकी एक आहे जे तुमच्या भुवया आणि पापण्यांना जलद वाढण्यास मदत करते.

विरळ व बारीक भुवया असतील तर त्यावर काय उपाय आहे? 

विरळ व बारीक भुवया दाट दिसण्यासाठी ब्रो पावडर हा एक उत्तम उपाय आहे. भुवयांना ब्रो पावडर लावल्याने भुवया नैसर्गिकरित्या दाट दिसतात. ज्या भागात थोडासा अतिरिक्त रंग आवश्यक आहे, तिथे खास डिझाइन केलेली ब्रो पेन्सिल लावू शकता. 

ADVERTISEMENT

अधिक वाचा – पहिल्यांदाच करणार असाल आयब्रो थ्रेडिंग तर लक्षात ठेवा

17 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT