ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
Five beauty products that every woman should have in Marathi

पाच ब्युटी प्रॉडक्ट्स जे प्रत्येक महिलेकडे असायलाच हवे

त्वचेवर सतत बाहेरील धुळ, माती, प्रदूषणाचा परिणाम होत असतो. जसं बाहेरील वातावरण बदलतं तसा त्वचेवर त्याचा चांगला वाईट परिणाम होत असतो. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते तर उन्हाळ्यात त्वचा काळवंडते. वयाची तिशी गाठताच आजकाल एजिंगच्या खुणा, जुनाट व्रण, फाईन लाईन्स, सुरकुत्या त्वचेवर दिसू लागतात. कामाचा ताण आणि चिंता काळजीमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे जमा होतात. म्हणूनच नियमित स्कीन केअर रूटिन त्वचेसाठी फार गरजेचं आहे. यासाठी प्रत्येक स्त्रीकडे हे पाच ब्युटी प्रॉडक्ट असायलाच हवे. यासोबत जाणून घ्या निरोगी त्वचेसाठी ब्युटी टिप्स (Beauty Tips For Skin In Marathi), संवेदनशील त्वचेसाठी ब्युटी टिप्स (Sensitive Skin Care Tips) आणि Best Cruelty Free Makeup Brands In Marathi | बेस्ट विगन आणि क्रुअल्टी फ्री मेकअप ब्रॅंड

फेशवॉश

त्वचा स्वच्छ आणि नितळ राहण्यासाठी अंघोळ करताना फक्त चेहरा धुणं पुरेसं नाही. यासाठी तुम्ही दिवसातून कमीत कमी दोन वेळा त्वचेवर एखादं चांगलं क्लिझर अथवा फेसवॉश वापरायला हवा. मात्र फेशवॉश अथवा क्लिंझर्सची निवड करण्यापूर्वी तो तुमच्या स्कीन टाइपला सूट करणारा आहे का हे आधीच तपासा. आजकाल त्वचेच्या प्रकारानुसार विविध प्रकारचे फेशवॉश बाजारात सहज मिळतात.

फेस स्क्रब 

फेश वॉश आणि क्लिंझर्सप्रमाणे आठवड्यातून एक ते दोन वेळा चेहऱ्यावर चांगला स्क्रब लावणं गरजेचं आहे.  त्वचा एक्सफोलिएट करण्यासाठी स्क्रबर फायद्याचे ठरतात. कारण यामुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होते. त्वचेचे बंद झालेले पोअर्स मोकळे होतात आणि त्वचेला पुरेसा ऑस्किजन मिळतो. ज्यामुळे त्वचा पुन्हा टवटवीत दिसू लागते. 

मॉइस्चराइझर

त्वचा स्वच्छ करताना त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जातं. ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज पडण्याची शक्यता असते. कोरड्या त्वचेवर वेळेआधीच एजिंगच्या खुणा दिसू लागतात. यासाठी त्वचेवर लगेच चांगलं मॉइस्चराइझर वापरायला हवं. मॉइस्चराइझरमुळे त्वचा मऊ आणि हायड्रेट राहण्यास मदत होते. तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार मॉइस्चराइझरची निवड करू शकता. तसंच ऋतूमानानुसारही मॉइस्चराइझरमध्ये आवश्यक बदल करायला हवेत.

ADVERTISEMENT

सनस्क्रीन

लोकांचा असा समज आहे की सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात अथवा दुपारी घराबाहेर पडताना वापरावं. मात्र असं मुळीच नाही तुम्हाला घरात असतानाही सनस्क्रीन लावण्यास काहीच हरकत नाही आणि प्रत्येक ऋतूमध्ये त्वचेला सनस्क्रीनची गरज असू शकते.  यासाठी त्वचेचं जास्तीत जास्त संरक्षण करणारं म्हणजे एसपीएफ 50 पेक्षा जास्त असलेलं सनस्क्रीन असायला हवं.

अंडर आय क्रीम

डोळ्यांखालील त्वचा मऊ आणि एकसमान दिसण्यासाठी तुम्ही नियमित चांगलं अंडर आय क्रीम वापरायला हवं. कारण जर तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळं निर्माण झाली तर सगळ्यांचं तिकडे पटकन लक्ष जातं. तुमच्या सौंदर्यात याची बाधा निर्माण होते. चिरतरूण राहण्यासाठी नियमित अंडर आय क्रीम वापरणं तुमच्या नक्कीच फायद्याचं ठरेल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

07 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT