मेकअपचा ट्रेंड सतत बदलत असतो. पूर्वी डोळ्यांना फक्त काळ्या रंगाचे आय लायनर अथवा काजळ लावले जायचे. त्यानंतर त्यामध्ये करड्या, चॉकलेटी अशा रंगाची भर पडली. मागील काही दिवसांपासून तर कलरफुल आय लायनर लावण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. ब्लू, ग्रीन, पर्पल प्रमाणेच सध्या गोल्डन आयनर लावण्याकडेही अनेकींचा कल असतो. बोल्ड आणि ग्लॅमरस लुकमध्ये गोल्डन आयनर अधिकच भर टाकतं. कारण गोल्डन ही अशी एक शेड आहे ज्यामुळे तुमच्या लुकमध्ये पटकन बदल होतो. नाइट पार्टीज अथवा एखाद्या खास कार्यक्रमासाठी तुम्ही हा लुक नक्कीच करू शकता. एवंढच नाही एकच नाही तर विविध प्रकारे तुम्ही गोल्डन आय लायनर वापरू शकता. यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स
गोल्डन पेन्सिलने लावा आय लायनर
सुरुवातीच्या काळात तुम्ही गोल्डन आय पेन्सिलने आय लायनर लावू शकता. यामुळे तुमच्या लुकमध्ये एक छान स्पाइस निर्माण होईल. यासाठी तुम्हाला फक्त गोल्डन रंगाच्या आय पेन्सिलने तुमच्या पापण्यांच्या वरच्या दिशेने एक पातळ रेघ ओढायची आहे. फक्त लक्षात ठेवा या आय लायनरसोबत दुसरा कोणताही रंग मिक्स करू नका हवं तर तुम्ही यासोबत मस्कारा नक्कीच वापरू शकता. आजकाल बाजारात विविध रंगाच्या आय पेन्सिल मिळतात. त्यामुळे हा लुक करणं तुमच्यासाठी नक्कीच सोपं होईल.
गोल्डन पावडरने करा आय मेकअप
शिमर लुकसाठी तुम्ही गोल्डन पावडरचा वापर करू शकता. आजकाल आय मेकअपमध्येही विविध रंगाच्या डस्ट मिळतात. यातील गोल्डन रंगाचा वापर करून एक छान ग्लॅमसर लुक तुम्हाला मिळेल. यासाठी आय शॅडो ब्रश पाण्याने ओला करा आणि त्यावर गोल्डन डस्ट घ्या. या ब्रशच्या मदतीने तुम्ही तुमच्या पापण्यांच्यावर गोल्डन लाइन काढू शकता.
स्मज लुक
गोल्डन आय लायनरचा वापर करून तुम्हाला अगदी साधा आणि सॉफ्ट लुक हवा असेल तर स्मज लुक ट्राय करा. यासाठी हलक्या रंगाची आय शॅडो डोळ्यांवर लावून घ्या. त्यानंतर ओल्या केलेल्या आय शॅडो ब्रशने तुमच्या पापण्यांच्या वर गोल्डन आय लायनर लावा. त्यानंतर कोरड्या ब्रशने तुमची आय लायनर स्मज करा.
जेल आय लायनर
आय शॅडोचा वापर न करता तुम्हाला तुमच्या डोळ्यांना सुंदर करायचं असेल तर गोल्डन जेल आय लायनर नक्की वापरा. जेल आय लायनरने तुम्ही विंग्ड लुक डोळ्यांना देऊ शकता. मात्र लक्षात ठेवा आय लायनर पापण्यांवर पातळ आणि मागचा स्ट्रोक मात्र जाडसर ठेवा. विशेष म्हणजे तुम्ही जेल आय लायनरसोबत ब्लू, ग्रीन, पर्पल असे रंग मिक्स मॅच करू शकता. ज्यामुळे ट्रेंडी लुक तुम्हाला करता येईल.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक