आपल्याकडे घरात वेगवेगळ्या चाव्या (Keys) असतात. घराची चावी, गाडीची चावी, कपाटाची चावी, ड्रॉव्हर्सच्या चाव्या. या चावी ठेवण्यासाठी आपण घरात एक विशिष्ट जागा ठरवतो. त्यामुळे कधी आपल्याला सतत गोष्टी शोधाव्या लागत नाहीत. घर, गाडी या चाव्या ठेवण्याचे एक विशिष्ट ठिकाण असते, कारण या चावी आपल्याला रोज वापराव्या लागतात. कारण चुकूनही चावी हरवली की पूर्ण घर डोक्यावर घेतलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का? चाव्या वेगळ्या ठिकाणी ठेवल्यास, अथवा योग्य ठिकाणी न ठेवल्यास, तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हो हे खरं आहे, वास्तुशास्त्रानुसार घराच्या चाव्या ठेवण्याची योग्य दिशा असते. त्यामुळे याचे काही नियम असतात, याचे तुम्ही पालन केल्यास, तुम्हाला नक्कीच त्रास होणार नाही. तसंच यामुळे सकारात्मकता आयुष्यात येण्यास मदत मिळते. कदाचित तुम्ही आतापर्यंत वेगळ्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने चाव्या ठेवत आला असाल आणि यामुळे तुमच्या आयुष्यात जर काही त्रासांना तुम्हाला सामोरे जावं लागत असेल तर तुम्हाला आता याबाबत त्रास सहन करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या नेहमीच्या चाव्या कुठे ठेवायला हव्यात याबाबत काही महत्त्वाच्या वास्तु टिप्स खास तुमच्यासाठी.
दिशेची काळजी घ्या
अशा अनेक चाव्या असतात, ज्याच्या रोज उपयोग होतो, उदाहरणार्थ दुकानाची चावी अथवा कोणत्याही गाडीची चावी अथवा रोज ऑफिसला जाताना घर लॉक करावं लागत असेल तर घराची चावी. या चाव्या आपल्याला नेहमी आपल्यासह ठेवाव्या लागतात. त्यामुळे अशा चावी जेव्हा तुम्हाला घरात ठेवायच्या असतील तेव्हा तुम्ही नेहमी उत्तर – पश्चिम दिशेला अर्थात वायव्य दिशेला ठेवायला हव्यात. तर संपत्तीसंबंधित अर्थात कपाटाशी अथवा तुमच्या मिळतीशी जोडलेली चावी असेल तर तुम्ही नैऋत्य दिशेला ठेवायला हवेत. या दिशेला त्या चाव्या तुम्ही ठेऊ शकता, जी मिळकत तुम्हाला विकायची नाही. तुम्ही कधीही आग्नेय दिशेला चाव्या ठेऊ नयेत.
पूजेच्या ठिकाणी चाव्या ठेऊ नयेत
काही जणांना बाहेरून आल्यानंतर पूजेच्या ठिकाणी अर्थात देव्हाऱ्यात चाव्या ठेवण्याची सवय असते. देव्हाऱ्यात चावी ठेवल्यास, आपल्याला ती लक्षात ठेवणे सोपे जाईल असा अनेकांचा विचार असतो. पण असं कऱणे अजिबात योग्य नाही. वास्तविक आपण चाव्या धूत नाही. या चाव्यांना आपण कसाही हात लागतो. त्यामुळे देव्हाऱ्यात अशा खराब झालेल्या चाव्या ठेवणं योग्य नाही. तसंच स्वयंपाकघरात चाव्या ठेवणंही योग्य मानले जात नाही. कारण स्वयंपाकघर आणि देव्हारा ही दोन्ही स्थाने शुद्ध मानली जातात. त्यामुळे या खराब असणाऱ्या चाव्या या ठिकाणी ठेऊ नयेत.
लॉबीमध्ये चाव्या ठेवा
चाव्या या सहसा मेटलच्या असतात आणि तुम्ही घरात अशा ठिकाणी चाव्या ठेवाव्यात, जिथे तुम्हाला चावी सहज मिळणे शक्य आहे. अशी जागा म्हणजे लॉबी. लॉबी असणाऱ्या पश्चिम दिशेला तुम्ही चाव्या ठेवाव्या. कधीही चावी ड्रॉईंग रूममध्ये ठेऊ नका. बाहेरून येणाऱ्या लोकांची नजर सहज त्या चाव्यांवर जाते आणि त्या चाव्यांना नजर लागते. त्यामुळे तुम्ही सहसा ड्रॉईंग रूममध्ये चाव्या ठेऊ नका.
या गोष्टी लक्षात ठेवा
जेव्हा तुम्ही घरात चावी ठेवणार असाल तेव्हा तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अशा कोणत्या गोष्टी आहेत ते घ्या जाणून –
- काही लोक आपल्या चावी ठेवण्यासाठी जी चैन वापरतात, त्यावर देवाचे फोटो असतात. पण असे अजिबात करू नका. तुमच्या चाव्या ठेवण्यासाठी देवाचे फोटो वापरू नका. कारण चाव्यांना आपण कसलेही घाणेरडे हात लावतो, त्यामुळे देवाला सहसा असे हात लावणे वास्तुशास्त्रात योग्य समजण्यात येत नाही
- जेव्हा तुम्ही घरात चावी ठेवता, तेव्हा अशा चाव्या लटकविण्यासाठी तुम्ही की-हँगरचा वापर करावा. की – हँगर विकत घेताना ही प्लास्टिकचा नाही याची नक्की काळजी घ्या. वास्तुशास्त्रानुसार, लाकडाचा हँगर अधिक चांगला मानला जातो. याशिवाय कोणत्याही की – हँगरवर आरसा असू देऊ नये
तुम्हीदेखील चाव्या ठेवण्याची योग्य दिशा निवडा आणि वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही तुमच्या घरातील योग्य दिशेला चावी ठेवा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक