ADVERTISEMENT
home / xSEO
Gruhpravesh Ukhane

(Best 50) गृहप्रवेश उखाणे | Gruhpravesh Ukhane Marathi

लग्न झाल्यावर जेव्हा नवरानवरी पहिल्यांदा घरात येतात तेव्हा गृहप्रवेशाचा विधी केला जातो. सासरची मंडळी नवरानवरीला दारात अडवून नवरा आणि नवरी दोघांनाही उखाणे घेण्यास सांगण्यात येतात. त्यानंतर दारातील माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी नव्या नवरीचा गृहप्रवेश होतो. बऱ्याचदा नवीन वास्तू घेतल्यावरही शुभमुहूर्तावर गृहप्रवेश केला जातो. अशा प्रसंगीही घरात प्रवेश करताना त्या घराच्या घरमालक आणि मालकिणीला उखाणा घ्यावा लागतो. उखाणा म्हणजे पतीचे नाव एका विशिष्ट पद्धतीने घेणे. ज्यात कविता, चारोळी अशा सुंदर मांडणी केलेली असते. पूर्वी पत्नी पतीचे नाव समाजात उघडपणे घेत नसत. म्हणूनच उखाण्यातून इतर लोकांना आपल्या पतीचे नाव सांगण्याची पद्धत होती. पूर्वीच्या काही रूढी परंपरा आजही जशाच्या तशा पाळल्या जातात. आजकाल हौस अथवा मौज, मनोरंजन म्हणूनही उखाणा घेण्याची पद्धत आहे. पूर्वी फक्त पत्नीच पतीचे नाव उखाण्यात घेत असे पण आजकाल पतीदेखील पत्नीचे नाव उखाण्यातून घेतात. यासाठीच लग्नानंतर नववधू सासरी जाताना अथवा नव्या घरात प्रवेश करताना घेऊ शकेल असे काही गृहप्रवेश उखाणे – Gruhpravesh Ukhane In Marathi आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. यासोबत वाचा 70 मंगळागौर उखाणे, मंगळागौर पूजेसाठी खास उखाणे | Mangalagaur Ukhane, 80+ Marathi Ukhane For Marriage | मराठी उखाणे खास सणांसाठी, मराठी उखाणे नवरीसाठी (Marathi Ukhane For Bride)

गृहप्रवेश उखाणे | Gruhpravesh Ukhane for New Home

गृहप्रवेश उखाणे | Gruhpravesh Ukhane for New Home

स्वतःचे नवे घर हे अनेकांचे स्वप्न असते. तुमचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं असेल तर नव्या घरी जाताना नक्की घ्या हे गृहप्रवेश उखाणे – Gruhpravesh Ukhane

1. दत्तगुरूंच्या रूपात दिसतात मला ब्रम्हा, विष्णू  आणि महेश,…. रावांचे नाव घेत करते गृहप्रवेश

2. … ची लेक मी झाली आता… ची सून, …. रावांचे नाव घेत करते गृहप्रवेश

ADVERTISEMENT

3. मंगळसूत्राच्या वाट्या म्हणजे सासर आणि माहेर, …. रावच आहेच माझा गृहप्रवेशाचा आहेर

4. लग्न झाले आता बहरू दे आमच्या संसाराची वेल,… रावांचे नाव घेते वाजवून नव्या घराची बेल

5.शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, …. रावांचे नाव घेते नव्या घरी सर्वांचा मान राखून

6. चांदीच्या ताटात भरवला पुरणपोळीचा घास, …. रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी खास

ADVERTISEMENT

7. श्रीमहालक्ष्मीच्या गळ्यात कोल्हापुरी ठुशी, …. रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी

8. नव्या कामाची सुरूवात जशी श्रीगणेशापासून,…. रावाचे नाव घेते नव्या घरात बसून

9. जमले सगळी नातीगोती आमच्या या नव्या घरात, रावांचे नाव घेते आनंदाच्या भरात

10. आर्शीवादाचे दान घेते तुम्हा सर्वांसमोर वाकून, … रावांचे नाव घेते नव्या घरात तुमच्या सर्वांचा मान राखून

ADVERTISEMENT

मराठी उखाणे नवरी साठी गृहप्रवेश | Gruhpravesh Ukhane for Bride

मराठी उखाणे नवरी साठी गृहप्रवेश | Gruhpravesh Ukhane for Bride

लग्नानंतर नवरा नवरीचा गृहप्रवेश हा खास विधी केला जातो. यासाठीच नववधूंना सासरच्या घरी जाताना हे  मराठी उखाणे नवरी साठी गृहप्रवेश – Gruhpravesh Ukhane नक्कीच घेता येतील. 

1. नव्या घराच्या दारावर लावले आहे श्रीगणेशाचे चित्र, …. रावांमुळे मिळाले मला सौभाग्याचे मानपत्र

2.  माहेरी जपली मी नाती आणि गोती, …. रावांचे नाव घेत जोडते आता यात नवे मोती

3. आईवडील आहेत प्रेमळ आणि सासू सासरे आहेत हौशी, …. रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी

ADVERTISEMENT

4. संसाररूपी दिव्यात लावली मी प्रेमरूपी वात,… रावांचे नाव घेत करते सहजीवनाला सुरूवात

5. सह्याद्रीच्या कड्याकपारीत झाडी घनदाट, …. रावांचे नाव घेते सोडा आता माझी वाट

6.  मराठीत आहेत खूप सुंदर सुंदर म्हणी,…. रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या क्षणी

7. लग्न झाल्यावर मुलीने सासरी जाणं आहे समाजाची रीत, …. रावांचे नाव घेत सांगते त्यांच्यावर आहे माझी माझी खरी प्रीत

ADVERTISEMENT

8. संसाररूपी वेलीला फुलले कोवळे कोवळे कोंब,…. रावांचे नाव घेते सखे थोडावेळ थांब

9. मंगळसूत्र आहे सौभाग्याचा दागिना खरा, … रावांचे नाव घेत जपते मराठी परंपरा

10. चांदीच्या वाटीत ठेवला बदामाचा शिरा, …. रावांचे नाव घेत सांगते तेच माझा खरा दागिना

Best उखाणे गृहप्रवेश | Best Gruhpravesh Ukhane in Marathi

Best उखाणे गृहप्रवेश | Best Gruhpravesh Ukhane in Marathi

गृहप्रवेश करताना नेमका कोणता उखाणा घ्यावा असे विचार तुमच्या मनात सुरू असतील तर नक्की वाचा हे गृहप्रवेश उखाणे – Gruhpravesh Ukhane

ADVERTISEMENT

1. कुळस्वामिनीला स्मरून करते वंदन तुम्हा सर्वांना, …. रावांचे नाव घेत मागते आर्शीवाद द्या आम्हाला 

2…. च्या घरी कधी जाणार याची लागली होती चाहुल, …. रावांचे नाव घेते टाकत नव्या घरी पाऊल

3.शुभमुहूर्तावर लागले लग्न, धुमधडाक्यात आली वरात,…रावांचे नाव घेते टाकत पहिले पाऊल घरात

4. त्यांना आवडते क्रिकेट आणि मला आवडतो हॉकीचा खेळ, …. रावांचे नाव घेते जवळ आली गृहप्रवेशाची वेळ

ADVERTISEMENT

5…. ची लेक झाली…. ची सून,… रावांचे नाव घेते गृहप्रवेश करून

6. जमले सर्व नातेवाईक, लग्न लागले दारात,… रावांचे नाव घेते, मला आता येऊ द्या घरात

7. मासेमारीसाठी समुद्रावर जमला नौका, … रावांचे नाव घेते सर्वजण नीट ऐका

8.थोरामोठ्यांच्या आर्शीवादाने लागले लग्न, मामाने केला आहेर,… रावांसाठी मी सोडले माझे प्रेमाचे माहेर

ADVERTISEMENT

9. सोन्याच्या कलशाखाली ठेवली चांदीची परात, …. रावांचे नाव घेत करते प्रवेश नव्या घरात

10. उंबरठ्यावरील माप पायाच्या स्पर्शाने लवंडते, …. रावाचे नाव घेत गृहप्रवेश करते. 

महिलांसाठी गृहप्रवेशासाठी उखाणे मराठी | Marathi Ukhane for Female Gruhpravesh 

महिलांसाठी गृहप्रवेशासाठी उखाणे मराठी | Marathi Ukhane for Female Gruhpravesh

आजकाल महिला असो वा पुरूष दोघांनाही लग्नानंतर अथवा नव्या घरात जाताना उखाणा घ्यावा लागतो. म्हणूनच तुमच्यासाठी खास महिलांसाठी गृहप्रवेशासाठी उखाणे – Marathi Ukhane for Female Gruhpravesh 

1. रेशमी पैठणीवर शोभते कोल्हापुरी ठुशी, ….. रावांचे नाव घेते गृहप्रवेशीच्या दिवशी

ADVERTISEMENT

2. हंड्यावर ठेवले हंडे, त्यावर ठेवली परात, …. रावांचे नाव घेते करत प्रवेश नव्या घरात

3. रुखवतीत ठेवले होते खोबऱ्याचे काप, …. रावांचे नाव घेते ओलांडून नव्या घराचे माप

4. चांदीच्या ताटात जिलेभीची रास, गृहप्रवेशाच्या दिवशी …. रावांना भरवते मी प्रेमाचा घास 

5. नव्या दिशा नव्या आशांसह करते नव्या घरी पदार्पण, …. रावांसाठी करेन संपूर्ण जीवन अर्पण

ADVERTISEMENT

6. पैठणीवर शोभते मोरांची जोडी,… रावांमुळे आली माझ्या जीवनाला गोडी

7. रोज देवापुढे लावत होते चांदीचा दिवा, …. रावांचे नाव घेत सांगते जन्मोजन्मी हाच जोडीदार हवा

8. लग्नानंतर आर्शीवादासाठी थोरामोठ्यांसमोर वाकले,… रावांचे नाव घेत संसारात पाऊल टाकले

9. सर्वांसमोर वाकून करते नमस्कार जोडते दोन्ही हात, … रावांचे नाव घेते आता सोडा माझी वाट

ADVERTISEMENT

10 हिरव्याकंच शालूला जरीचा काठ,… रावांचे नाव घेते सोडा माझी वाट

नवीन घरासाठी गृहप्रवेश उखाणे | New Gruhpravesh Ukhane in Marathi

नवीन घरासाठी गृहप्रवेश उखाणे | New Gruhpravesh Ukhane in Marathi

नव्या घरी जाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. हा आनंद शतगुणित करण्यासाठी वास्तू शांतला घ्या हे गृहप्रवेश उखाणे – Gruhpravesh Ukhane

1. उंबरठ्यावरचे माप लक्ष्मीच्या पायांनी ओलांडते, … रावाच्या जीवनात भाग्याने प्रवेश करते.

2.आईवडिलांनी वाढवले, मामांनी घडवले, … रावांचे नाव घ्यायला सख्यांनी अडवले

ADVERTISEMENT

3. धान्याचे माप काठोकाठ भरले, …. रावांचे नाव घेत सौभाग्यवती झाले

4. रूपेरी सागराची चंदेरी लाट… रावांचे नाव घेते सोडा माझी वाट

5. लग्नात आंदणात मिळाली चांदीची परात,… रावांचे नाव घेत येते नव्या घरात

6. विवाह म्हणजे सुरूवात नव्या जीवनाची, … रावांचे नाव घेते जाणीव ठेवत कर्तव्यांची 

ADVERTISEMENT

7. ताजमहल बनवण्यासाठी कारागीर होते कुशल,… रावांचे नाव घेत गृहप्रवेशासाठी स्पेशल

8. शंकराच्या पिंडीवर वाहल्या बेलफुलाच्या राशी, … रावांचे नाव घेते गृहप्रवेशीच्या दिवशी

9. शालुत पदर सांभाळताना नववधू मी बावरते, …. रावांचे नाव घेत नव्या घरातील स्वप्न रंगवते

10. रात्रीच्या अंधारात आकाशात चमकतात तारे,…. रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे

ADVERTISEMENT

आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेले गृहप्रवेश उखाणे – Gruhpravesh Ukhane In Marathi, गृहप्रवेश उखाणे – Gruhpravesh Ukhane, महिलांसाठी गृहप्रवेशासाठी उखाणे – Marathi Ukhane for Female Gruhpravesh  तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कंमेट मध्ये जरूर सांगा.

03 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT