Advertisement

नातीगोती

80+ Marathi Ukhane For Marriage | मराठी उखाणे खास सणांसाठी

Aaditi DatarAaditi Datar  |  Oct 21, 2021
marathi ukhane

Advertisement

नाव घे… नाव घे… लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर महाराष्ट्रीयन स्त्रियांमध्ये मजेशीर परंपरा आहे ती उखाणे घेण्याची. नाव घे म्हणून प्रत्येकीला लग्नानंतर तर सातत्याने आग्रह केला जातो. लग्न ठरल्यावर तर होणाऱ्या नववधूला पहिला सल्ला दिला जातो तो मराठी उखाणे (marathi ukhane) पाठ करण्याचा. मग शोध सुरू होतो तो उखाण्यांचा आणि उखाणे पाठ करण्याचा. उखाण्यांची महाराष्ट्रातील परंपरा किती जुनी आहे, याबाबत जरी माहिती नसली तरी आजही उखाणे घेण्याची मजेशीर परंपरा सुरूच आहे. यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी खास महिलांसाठी मराठी उखाणे (Marathi Ukhane For Female), विनोदी उखाणे (Funny Marathi Ukhane), लग्नाचे उखाणे (Marathi Ukhane For Marriage), रोमँटिक मराठी उखाणे (Romantic Marathi Ukhane), सत्यनारायण पूजा उखाणे (Satyanarayan Pooja Ukhane), मकरसंक्रांती सणासाठी खास उखाणे (Makar Sankranti Ukhane In Marathi), हळदीकुंकू उखाणे (Ukhane In Marathi For Haldi Kunku), बारश्यासाठी उखाणे (Marathi Ukhane For Baby Naming Ceremony).

Marathi Ukhane For Female | महिलांसाठी मराठी उखाणे

Marathi Ukhane for Female

Marathi Ukhane For Female

नववधूला तर सर्रास उखाणा (modern marathi ukhane for female) घेण्याचा आग्रह केला जातो. नववधू नवीन घरात प्रवेश करताना तिला उखाण्याचा आजही आग्रह केला जातो. दारात नणंद आणि सासरच्यांकडून तिला गृहप्रवेश करताना थांबवून उखाणा (Marathi Ukhane For Female) घेण्यास सांगितला जातो. 

 • कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,
  …. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून. 
 • यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब
  …. चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब.
 • गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
  …….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी. 
 • वर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,
  ….. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.
 • बारीक मणी घरभर पसरले,
  …… साठी माहेर विसरले. 
 • पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,
  ….. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता.
 • लग्नात लागतात हार आणि तुरे,
  …. च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे. 
 • चंदनी पानात मुग्ध कळी हसली,
  …. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली. 
 • रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
  …. रावांचं नाव घेते सोडा माझी वाट. 
 • परसात अंगण, अंगणात तुळस,
  …. नाव घ्यायचा मला नाही आळस.
 • रूक्मिणीने केला पण कृष्णाला वरीन,
  …. च्या साथीने आदर्श संसार करीन. 
 • हो-नाही म्हणता म्हणता लग्न जुळले एकदाचे,
  …. मुळे मिळाले मला सौख्य आयुष्यभराचे. 
 • इंग्रजीत म्हणतात मून,
  …. चंं नाव घेते …. ची सून. 
 • सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात.
  …. रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट. 
 • आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,
  …. चं नाव घेते कुंकू लावून. 
 • चांदीच्या ताटात गाजराचा हलवा.
  ….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा. 
 • चांदीचे जोडवे पतीची खूण,
  …. रावांचे नाव घेते …. ची सून. 
 • आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा,
  …. चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा. 
 • आदेश भाऊंचा कार्यक्रम आहे होम मिनिस्टर,
  याचं नाव घेते करून मॅरीज रजिस्टर. 
 • बकुळीचे फुल सुकले तरी जात नाही सुगंध।
  …..रावांसाठी माहेर सोडले तरी तुटत नाहीत ऋणानुबंध.
 • वरळी वांद्रे लिंक सी फेस आहे मुंबईची शान
  .. रावांचे नाव घेते राखते तुमचा मान..!
 • अक्षता पडताच..अंतरपाट होतो दूर,
  …. रावांच्या मुळे सौभाग्यवती झाले..सांगतात सनईचे सूर..!

Marathi Ukhane For Male | पुरूषांसाठी मराठी उखाणे

Marathi Ukhane for Male

Marathi Ukhane For Male

जसा आग्रह स्त्रियांना केला जातो. तसाच आग्रह केला जातो पुरूषांना. लाजत काजत का होईना पण पुरूषही मराठी उखाणे (marathi ukhane for male) घेतातच. काही पुरूष तर उखाणे घेण्यातही तरबेज असतात आणि आवडीने उखाणे घेतात. पाहूया पुरूषांसाठी खास मराठी उखाणे

 • फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,
  …. च्या नादाने झालो मी बेभान.
 • कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध,
  …… च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद.
 • परातीत परात चांदीची परात,
  …. लेक आणली मी …. च्या घरात.
 • …. माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल,
  तुमच्या येण्याने झाला दिवस एकदम स्पेशल. 
 • द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
  …. चे नाव घेतो ऐका देऊन कान. 
 • संतांच्या अभंगात आहे अमृतवाणी,
  माझी …. म्हणते मधुर गाणी. 
 • श्रावणात पडतो रोज पारिजातकाचा सडा,
  आमच्या ….. आवडतो गरमगरम बटाटेवडा. 
 • पाच बोटातून होते कलेची निर्मिती,
  …. वर जडली माझी प्रीती. 
 • खेळत होतो पब्जी आला ब्लू झोन,
  आमच्या हिचं नाव घेतो गेट टू द सेफ झोन. 
 • ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली,
  तू माझी देवसेना नं मी तुझा बाहुबली. 
 • वादळ आलं,
  पाऊस आला,
  मग आला पूर… हिचं नाव घेतो,
  भरून तिच्या भांगेत सिंदूर. 
 • केसर दुथात टाकलं काजू,
  बदाम, जायफळ,
  हिचं नाव घेतो,
  वेळ न घालवता वायफळ. 
 • तू पुण्याची मिसळ,
  मी मुंबईचा वडापाव,
  लग्नाला हो म्हणायला हिने खाल्ला जास्तच भाव.
 • चांगली बायको मिळावी म्हणून फिरलो गल्ली ते दिल्ली पण हिच्याकडेच होती माझ्या हृदयाची किल्ली. 
 • अलिबाबाने गुफा उघडली म्हणून खुल जा सिम सिम,
  हिचं नाव घेतो आता पडतोय पाऊस रिमझिम. 
 • काट्यात काटा गुलाबाचा काटा,
  हिचं नाव घेतो गुलाबजाम खाता खाता. 
 • अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा,
  …. ला घास भरवतो वरणभात तूपाचा. 
 • आंबा गोड, ऊस गोड,
  त्याहीपेक्षा अमृत गोड,
  …..चे नाव आहे अमृतापेक्षाही गोड. 
 • काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,
  …..चं नाव येतं मात्र माझ्या हृदयातून. 
 • हा दिवस आहे आमच्याकरिता खास,
  …. ला देतो गुलाबजामचा घास

Funny Marathi Ukhane | मराठी विनोदी उखाणे

Funny Marathi Ukhane

Funny Marathi Ukhane

सध्या उखाण्यांमध्ये विनोदी उखाणे घेण्याची खूपच क्रेझ आहे. हे मजेशीर उखाणे गंभीर वातावरणाला लगेच विनोदी करतात आणि उपस्थितांना हसू येतंच येतं. असेच काही मजेशीर उखाणे (Funny Marathi Ukhane). 

 • समुद्राच्या काठावर मऊ मऊ वाळू,
  …. राव दिसतात साधे पण आतून एकदम चालू.
 • पुरणपोळीत तूप असावे ताजे अन साजूक,
  ….. आहेत आमचे फार नाजूक.
 • भल्या पहाटे करावी देवाची पूजा,
  ….. रावांच्या जीवावर करते मी मजा. 
 • बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड,
  …. रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड. 
 • मटणाचा केला रस्सा, चिकन केले फ्राय,
  …. भाव देत नाही किती केले ट्राय.
 • खोक्यात खोका अगरबत्तीचा खोका,
  ती माझी मांजर आणि मी तिचा बोका.
 • मोबाईलवर एफएम ऐकते कानात हेडफोन लावून,
  … रावांना मिस कॉल देते एक रूपया बॅलन्स ठेवून. 
 • साखरेचे पोते सुईने उसवले,
  …. ने मला पावडर लावून फसविले. 
 • आला आला उन्हाळा, संगे घामाच्या या धारा,
  …. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा. 
 • साताऱ्याचे पेढे नाशिकचा चिवडा,
  …. राव मला तुम्ही जन्मोजन्मी निवडा. 
 • हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू,
  मी आहे लंबू आणि …. किती टिंगू. 
 • केळीचं पान टरटर फाटतं,
  …. ह्याचं नाव घ्यायला मला कसंतरी वाटतं.
 • त्यांचा नि माझा संसार होईल सुकर,
  जेव्हा मी चिरेन भाजी आणि हे लावतील कुकर.  
 • ही पण आहे सुंदर ती पण आहे छान.
  कोणाकोणावर प्रेम करू मी आहे परेशान. 
 • लग्नानंतर फ्रिडम गेलं जिकडे जा बायको मागे पळते,
  तुम्ही काय हसता राव, ज्याची जळते त्यालाच कळते.
 • कॉलेजमध्ये असताना होते मी याची दिवानी,
  याचं नाव घेते आता खाऊन चिकन बिर्यानी.  
 • काल होती फ्रायडे नाईट,
  करून आले मी पार्टी,
  यांनी दिलं मला लिंबूपाणी,
  कारण नवरा माझा स्मार्टी.
 • Ind Pak Match मध्ये हा म्हणत असतो Mauka Mauka,
  याचं लक्ष वेधून घ्यायला मी मारते उखाण्याचा Chauka. 
 • घरच्यांनी हो म्हटल्यावर आम्ही लगेच केला रोका,
  आता मी त्याची मांजर आणि तो माझा बोका.
 • Shinchan चा कुत्रा आहे shiro,
  याचं नाव घेते मारून त्याच्या हृदयावर arrow.

Marathi Ukhane For Marriage | लग्नाचे उखाणे

Marathi Ukhane For Marriage

Marathi Ukhane For Marriage

उखाण्याची खासियत म्हणजे लग्नातील प्रत्येक विधीसाठी उखाणा (ukhane in marathi) आहे. मग ते लग्न लागताना असो वा मंगळसूत्र घातल्यावर असो वा लग्नविधींच्या वेळी असो. पाहूया असेच काही उखाणे (Marathi Ukhane For Marriage).

 • पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,
  ….. रावांचे नाव घेऊन आशिर्वाद मागते.
 • गळ्यात मंगळसूत्र, मंगळसूत्रात डोरलं,
  ….. रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं.
 • घातली मी वरमाला हसले …. राव गाली,
  थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.
 • वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,
  …. रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.
 • मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा,
  …. बरोबर संसार करीन सुखाचा.
 • चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
  …. चं नाव घेते देवापुढे.
 • गावठी गुलाबाला सुगंध सुवास,
  …. रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.
 • हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,
  …. रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.
 • मंगळसुत्राच्या दोन वाट्या सासर आणी माहेर,
  …. यांनी केला मला सौभाग्याचा आहेर.
 • सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण,
  ………. रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.
 • नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे,
  …….रावांना शेवटी अहोच म्हणायचे.
 • कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट…. नाव घेते बांधते……… च्या लग्नाची गाठ.
 • वाट जीवनाची झाली सुखद आनंदी
  …. च्या सवे चालते मी सप्तपदी… !!
 • चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,
  —– रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.
 • लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र,
  ……….चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.
 • सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात
  ..सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात
  ..सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात
  .. रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..!
 • हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा,
  …. रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..!
 • शेल्या शेल्याची बांधली गाठ,
  …….नाव मला तोंडपाठ.
 • नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते
  ….. च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते

Romantic Marathi Ukhane List | रोमँटिक मराठी उखाणे

Romantic Marathi Ukhane

Romantic Marathi Ukhane List

लग्नाला अनेक वर्ष झाल्यावरही एकमेकांप्रती असलेलं प्रेम जाहीर करण्यासाठी अनेकदा उखाणे घेतले जातात. असेच काही रोमँटिक मराठी उखाणे ( Romantic Marathi Ukhane ) खास तुमच्यासाठी.

 • लग्नाचा वाढदिवस करू साजरा,
  …. तुला आणला मोगऱ्याचा गजरा.
 • प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून सापडणार नाही,
  …. सारखा हिरा.
 • काश्मीरमध्ये म्हणजे भारताचे नंदनवन,
  …. च्या साह्याने सुखी झाले जीवन.
 • यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो बासरी,
  …. सोबत सुखी आहे सासरी.
 • फुलासंगे मातीस सुवास लागे,
  …. रावांचे आणि माझे जन्मोजन्मीचे धागे.
 • दही,साखर, तूप,
  ….. राव मला आवडतात खूप.
 • मंद आहे वारा संथ चाले होडी,
  परमेश्वर सुखी ठेवो …. आणि माझी जोडी.
 • शनिवार-रविवार सुट्टीचा वीकेंड,
  …. चं नाव घेते आमच्या प्रेमाला नाही कधी एंड.
 • धरला यांनी हात वाटली मला भीती,
  हळूच म्हणाले …. राव अशीच असते प्रीती.
 • एका वर्षात असतात महिने बारा,
  …. च्या नावात समावलाय आनंद सारा.
 • यांचं आणि माझं नातं घट्ट आहे,
  जसं फेव्हीकॉल आणि ग्लू.
  आमच्या अॅनिव्हर्सरीच्या डेट मात्र यांना नसतो क्ल्यू.
 • तसा मला काही शौक नाही पाहायचा क्रिकेट,
  पण बघता बघता याच्या प्रेमात पडली माझी विकेट.
 • सूर हवा तर ताल हवा.. ताल हवा तर सूर हवा.. रावांचे नांव घ्यायला वेळ कशाला हवा…?
 • मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार,
  ….च्या स्पर्शाने उमटले झंकार..!
 • पर्जन्याच्या आगमनाने ओलीचिंब होते धरती,
  ….रावांच्या जीवनरथाची मी झाले सारथी..!
 • झाली प्रभात..विहंग उडाले गात,
  …. रावांच्या जीवनाला.माझी अखंड लाभो साथ..!

Satyanarayan Pooja Ukhane In Marathi | सत्यनारायण पूजा मराठी उखाणे

Satyanarayan Pooja Ukhane

Satyanarayan Pooja Ukhane

लग्नानंतर पहिली सत्यनारायणाची पूजा असली की उखाणे घेणं आलंच. त्यासाठीच हे खास सत्यनारायण पूजा उखाणे (Satyanarayan Pooja Ukhane). 

 • पूजेपुढे ठेवल्या फळांच्या राशी 
  …… रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी 
 • सत्यनारायणाच्या पूजेपुढे मांडले, प्रसादाचे ताट 
  ……यांच्या साथीने मिळाली आयुष्याला नवी वाट
 • मंथरेमुळे घडले रामायण,
  ….. चे नाव घेते आज घरी आहे सत्यनारायण
 • ठाण्यातल्या गडकरीला लागलंय मोरूची मावशी 
  ……चे नाव घेते सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी 
 • चांदीच्या तबकात तुपाच्या फुलवाती 
  ….रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी 
 • आजच्या पूजेला फुलांच्या राशी, 
  …..च नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी 
 • भिल्लीणीच्या रूपात शंकरापुढे आली गिरीजा 
  …..च्या सोबत आज पहिली सत्यनारायणाची पूजा
 • दारावर लावले झेंडूचे तोरण 
  …..चे नाव घेते सत्यनारायणाचे कारण 
 • चांदीच्या ताटात ठेवले लाडू
  …..चे नाव घेते सत्यनारायणापुढे 
 • घरात भरल्या अठरा धान्याच्या राशी 
  ……चं नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी 
 • आईवडील आहेत प्रेमळ, सासूसासरे आहेत हौशी,
  …. चं नाव घेते बारशाच्या दिवशी.
 • जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण
  …..नाव घेते गृहप्रवेशाचे, मंगळागौरीचे, सत्यनारायणाचे, डोहाळेजेवणाचे, कुठलेही असो कारण.
 • ….. सोहळ्याला सर्वजण झाले आनंदाने जॉईन.
  …..माझा हीरो मी त्याची हिरॉईन

वाचा – अक्षय तृतीया शुभेच्छा मेसेज (Happy Akshaya Tritiya Messages In Marathi)

Makar Sankranti Best Ukhane In Marathi | मकरसंक्रांतीच्या सणासाठी खास उखाणे

Makar Sankranti Ukhane In Marathi

Makar Sankranti Best Ukhane In Marathi

बरेचदा लग्नानंतर येणार पहिला सण असतो मकरसंक्रांत. लग्नाच्या पहिल्या वर्षी हा सण नववधूला खास हलव्याचे दागिने घालून हळदीकूंकू ठेवून साजरा केला जातो. या मकरसंक्रांतीच्या दिवशी घेण्यासाठी काही खास उखाणे (marathi ukhane).

 • तिळगुळाच्या संक्रातीला, जमतो स्वादिष्ट मेळा,
  …. नाव घ्यायची हीच तर खरी वेळा.
 • सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ,
  …. नाव घेऊन संक्रांतीला वाटते तिळगूळ.
 • गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी,
  …. चे नाव घेते तिळसंक्रांतीच्या दिवशी.
 • तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात,
  …. चं नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.
 • पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते,
  चातकपक्षाची काया,
  ….रावांच्यामुळे मिळाली आईवडीलांच्या रुपात सासू सासऱ्यांची माया ..!
 • ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,
  ….. चे नाव घेते …. च्या दिवशी.
 • दत्तदिगंबराला औदुंबराची सावली,
  पूजेच्या दिवशी नाव घेते,
  ……. रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.

Ukhane In Marathi For Haldi Kunku | हळदीकुंकवासाठी खास उखाणे

Ukhane In Marathi For Haldi Kunku

Ukhane In Marathi For Haldi Kunku

आपल्याकडे लग्नानंतरच्या पहिल्या हळदीकुंकवाला हमखास येणाऱ्या बायकांकडून उखाण्यासाठी आग्रह होतोच. यासाठी पाहा खास हळदीकुंकवाचे उखाणे (Ukhane In Marathi For Haldi Kunku).

 • सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी,
  ….. चे नाव घेते, हळदी-कुकुंवाच्या वेळी.
 • जात होते फुलांला,पदर अडकला वेलीला, एवढे महत्त्व कशाला
  ….च्या नावाला.
 • लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव,बदलावा लागतो स्वभाव,
  ……….. च्या घरी मिळेल माझ्या कलागुणांना वाव.
 • नीलवर्ण आकाशात चंद्रासवे रोहिणी
  …..च्या जीवनात….ही गृहिणी.
 • अथांग वाहे सागर संथ चालते होडी परमेश्वर सुखी ठेवो
  …..नी माझी जोडी.
 • नाकात नथ..पायात जोडवी..पैठणी नेसले लक्ष्मीसारखी….कानात कुड्या….हातात पाटल्या..बांगड्यामध्येच किणकिणती….वेणीत खोपा….नऊवारी साडी….कपाळी चंद्रकोर कोरलेली….भांगात कुंकू….हातात तोडे….गळ्यात चंद्रहार मनी शोभतो….साक्षात लक्ष्मीच लक्ष्मीचे स्वागत करते….आणि …. नाव घेऊन लक्ष्मीपूजन करते!
 • मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी,
  …….नाव घेते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी

Barshache Ukhane In Marathi | बारश्याचे उखाणे

Barshache Ukhane In Marathi
Barshache Ukhane In Marathi

प्रत्येक आईला बाळाच्या बारश्याच्या दिवशीही नाव घेण्याचा आग्रह केला जातो. या दिवसासाठी खास उखाणे (Marathi Ukhane For Baby Naming Ceremony) .

 • बाळाच्या हसऱ्या प्रवेशाने आनंदले घर,
  ……. रावांच्या संसारात पडली नवी भर.
 • दशरथ राजाने केला पुत्रासाठी नवस,
  आज …. च्या मुलाच्या बारशाच्या दिवस.
 • मावळला सूर्य उगवला शशी,
  …. चं नाव घेते बारश्याच्या दिवशी.
 • शिवाजीसारखा पुत्र धन्य जिजाऊची कुशी,
  …. चं नाव घेते बारश्याच्या दिवशी.
 • हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
  …. चं नाव घेते ….च्या बारशाच्या दिवशी.
 • हिरवं लिंबू गारसं,
  …. रावांच्या बाळाचं आज बारसं.
 • बनारसी शालूला आहेत जरतारी काठ,
  …. च्या मुलीच्या बारशाचा केला मोठा थाट.
 • नाटकांत नाटक गाजलं वस्त्रहरण,
  …. चं नाव घेते बारशाचं कारण.
 • कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी-कुंकवाच्या राशी,
  …. चं नाव घेते …. च्या बारशाच्या दिवशी.
 • दोन शिंपले एक मोती,
  दोन वाती एक ज्योती,
  दोघांची नावे घ्यायची,
  आमच्या जीवनात आला तिसरा साथी.

उखाणे सौजन्य – इन्स्टाग्राम, फेसबुक, विकीपीडिया आणि गुगल.
हेही वाचा –
लग्नासाठी शॉपिंग करताय, मग या ‘15’ गोष्टी जरूर लक्षात ठेवा
भन्नाट मराठी जोक्स आणि मीम्स ज्यांनी तुम्हाला खूप हसवले
Womens Day Quotes in Hindi
महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं
नागपंचमीचं बदलतं महत्त्व (Nag Panchami Information In Marathi)