ADVERTISEMENT
home / Festival
स्वातंत्र्य दिन शुभेच्छा | Happy Independence Day Quotes In Marathi

150+ स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence Day Quotes In Marathi

भारत माझा देश आहे, असं आपण गर्वाने म्हणत असतो. आपला देशाचा स्वातंत्र्यदिन हा आपल्यासाठी गर्वाचा दिवस आहे. तसंच हा दिवस म्हणजे एकता आणि उत्साहाचा दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 या भारताच्या स्वातंत्र्यदिनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहर लाल नेहरू यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या लाहोरी गेटवर तिरंगा फडकवला. हा दिवस प्रत्येक भारतीयाला एका नव्या सुरूवातीची आठवण करून देतो. याच दिवशी 200 वर्षांपासून अधिक काळ सुरू असलेल्या इंग्रजांच्या जाचातून सुटका करून आपण एका नव्या युगाची सुरूवात केली. भारताला हा सुवर्ण दिवस पाहण्यासाठी वीर सावरकरांसारखे विचार असलेल्या अनेक स्वातंत्रसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. स्वातंत्र्याचा हा संघर्ष बराच काळ सुरू होता. आजही आपल्या देशाचं डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या सैनिकांची आजही देशासाठी बलिदान देण्याची तयार आहे. भारतातील सर्व नागरिकही देशाप्रती वेळोवेळी असलेलं प्रेम जाहीर करत असतात. त्यात स्वातंत्र्यदिन असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांना या दिवसाबाबतचे कोटस, मेसेजेस आणि संदेश आवर्जून पाठवतो. मग ते फेसबुक असो इन्स्टाग्राम असो वा वॉट्सअप आपण प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Independence Day Quotes In Marathi) शेअर करत असतो. हेच लक्षात घेऊन आम्ही घेऊन आलो आहोत खास स्वातंत्र्यदिनी शेअर करता येतील. असे कोटस आणि संदेश खास तुमच्यासाठी.

स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Independence Day Quotes In Marathi)

Independence Day Quotes In Marathi

Independence Day Quotes In Marathi

स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व हे आपल्यासाठी कधीच कमी होणार नाही. त्यामुळे या दिवसासंबंधीचे कोटस (Independence Day Quotes In Marathi) शेअर करणं म्हणजे आपल्या मायभूमी आणि तिच्याप्रती असलेले प्रेम पुन्हा व्यक्त करणे होय. 

  • दे सलामी… या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.
  • दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए … स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच आपला जन्म झाला आहे.
  • देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल आणि मजबूतही राहील.
  • कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.
  • ज्या देशातील लोक एकमेकांना पाठी पिछाडण्याच्या शर्यतीत असतील तो देश पुढे कसा जाईल?
  • जी लोक दुसऱ्यांना जगण्याचं स्वातंत्र्य देत नाहीत त्यांनासुद्धा स्वातंत्र्याचा हक्क नाही.
  • जर चुकीला माफी नसेल तर स्वातंत्र्याला अर्थच काय

स्वातंत्र्य दिन शुभेच्छा (Independence Day Wishes In Marathi)

Independence Day Wishes In Marathi

Independence Day Wishes In Marathi

ADVERTISEMENT

प्रत्येक सणाप्रमाणेच भारतात स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा केला जातो. या दिवशीही प्रत्येकजण एकमेकांना शुभेच्छा (Independence Day Wishes In Marathi) देतात. या दिवशी देशभक्ती गाणीही ऐकू येत असतात.  अशाच काही स्वातंत्र्यदिनी देण्यासाठी खास शुभेच्छा (swatantra dinachya hardik shubhechha in marathi).

  • गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा…. शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा… जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा…स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.   
  • ना धर्माच्या नावावर जगा ना…ना धर्माच्या नावावर मरा… माणुसकी धर्म आहे या देशाचा…फक्त देशासाठी जगा…स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
  • सर्वांनी जपा एकमेकांचं सुख…तेव्हाच सुंदर होईल आपला देश.. हॅपी 15 ऑगस्ट.
  • देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…वंदे मातरम्.
  • देश आपला सोडो न कोणी..नातं आपलं तोडो न कोणी…हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे…ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला…स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर…देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर…
  • ‘वंदे मातरम्!
    सुजलां सुफलां मलयज शीतलां
    शस्यश्यामलां मातरम् ! वंदे मातरम् !
    शुभ्र ज्योत्स्ना-पुलकित-यामिनीम्
    फुल्ल-कुसुमित-द्रुमदल शोभिनीम्
    सुहासिनीं सुमधुर भाषिणीम्
    सुखदां वरदां मातरम् । वंदे मातरम् !’
  • जगभरात घुमतोय भारताचा नारा
    चमकतोय आकाशात तिरंगा आपला 
    स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
  • आता वाटतं की, देशाच्या नागरिकांना जागावं लागेल, शासनाचा दांडका पुन्हा फिरवावा लागेल, 
    आणि देशाला भ्रष्टाचारातून मुक्त करावं लागेल 
    स्वातंत्र दिन शुभेच्छा 
  • जिथे मानवतेला पहिला दर्जा दिला जातो 
    तो माझा भारत देश आहे
    स्वांतत्र्य दिन शुभेच्छा 
  • हे सैनिका तुझ्या पाठीमागे संपूर्ण देश उभा आहे, संपूर्ण जनतेला तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे. 
    वंदे मातरम्, भारत माता की जय

वाचा – प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

15 ऑगस्टसाठी स्टेटस (Independence Day Status In Marathi)

Independence Day Status In Marathi

Independence Day Status In Marathi

15 ऑगस्टला प्रत्येकाच्या सोशल मीडियावर एक तरी स्वातंत्र्यदिन स्पेशल स्टेटस ( Independence Day Status In Marathi) असतोच. म्हणूनच खास शेअर करत आहोत स्टेटस स्वातंत्र्यदिनासाठी. 

ADVERTISEMENT
  • विविधतेत एकता आहे आमची शान…म्हणूनच आहे आमचा भारत देश महान…जय हिंद, जय भारत.
  • सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी…ये गुलसिता हमारा…
  • टूथपेस्टमध्ये मीठ असो वा नसो पण रक्तात मात्र देशाचं मीठ असलंच पाहिजे.
  • माझी ओळख आहेस तू, जम्मूची जान आहेस तू, सीमेची आन आहेस तू, दिल्लीचं हृदय आहेस तू….हे माझ्या भारत देशा…वंदे मातरम्.
  • मी एक भारतीय आहे आणि हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे. वंदे मातरम्.
  • जगाला विचारू नका आमची काय व्यथा आहे… आमची फक्त एकच ओळख आहे…आम्ही आहोत फक्त भारतीय आणि तिच आमची खरी ओळख आहे.
  • ना बोलीने, ना वागण्याने, ना रंगांनी, ना ग्रीटिंगने.. तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा डायरेक्ट मनाने.
  • सदैव फडकत राहो तिरंगा आपुला…सर्व जगात प्रिय देश आपुला.
  • भारत एक सुवर्ण चिमणी आणि स्वातंत्र्य तिचे पंख आहेत.
  • मला नको धन मला नको तन 
    फक्त हवी शांतता आणि माझा वतन 
    जोपर्यंत जीवंत आहे देशासाठी राहीन
    जेव्हा मरेन तेव्हा तिरंग्याचा कफन ओढीन 
    स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
  • पोहायचं असेल तर ओढ्यात काय ठेवलं आहे 
    प्रेम करायचं असेल तर देशावर करा इतरांमध्ये काय ठेवलं आहे 
    जय हिंद जय भारत 
  • ना जगा धर्माच्या नावावर ना मरा धर्माच्या नावावर 
    माणुसकी हाच धर्म आहे जगा फक्त देशाच्या नावावर
  • संस्कार आणि संस्कृतीची भेटावी अशी 
    जे हिंदू-मुस्लिम एक व्हावे तसे 
    असेच मिळून मिसळून राहूया सदैव
    देशाला बळकट करूया एकत्र राहूया 
    स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

वाचा – Kojagiri Purnima Wishes In Marathi

देशप्रेमावरील सुविचार (Independence Day Marathi Quotes On Patriotism)

Independence Day Marathi Quotes On Patriotism

स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

देशावरील आपलं प्रेम व्यक्त करा, हे देशप्रेमावरील सुविचार (Independence Day Marathi Quotes On Patriotism) शेअर करून.  

  • ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता..’सत्यमेव जयते आहे आमचा नारा, जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारतदेश आमचा.
  • मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष, ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.
  • सुंदर आहे जगात सर्वात, नावंही किती वेगळं आहे, जिथे जातपात आणि भाषेपेक्षा, देशप्रेम महत्त्वाचं आहे, असा भारत देश आमचा आहे.
  • देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस, यातील काही थेंब नक्की जपून ठेवा हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.
  • जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो… मरण आलं तरी दुःख नाही…फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
  • देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी, म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.
  • मी मुस्लीम आहे, तू हिंदू आहेस,दोघंही आहोत माणसंच, आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण…माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा…एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.
  • जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा…भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
  • पुन्हा उडाली माझी झोप, जेव्हा मनात आला विचार, सीमेवर वाहिलेलं ते रक्त होतं माझ्या शांत झोपेसाठी.
  • काळ्या गोऱ्याचा भेद नाही 
    मनाशी आपलं नातं आहे 
    दुसरं काही नाही येतं आम्हाला 
    पण प्रेम निभावता येत आहे 
  • वाका आणि सलाम करा त्यांना 
    ज्यांच्यामुळे आज तुम्ही स्वतंत्र आहात 
    नशीबवान असतात ते ज्यांचं रक्त 
    देशाच्या कामी येतं 
    जय हिंद जय भारत
  • मी भारत देशाचा अविरत सन्मान करतो 
    इथल्या मातीचं मी गुणगान करतो 
    मला चिंता नाही स्वर्गात जाण्याची किंवा मोक्षाची 
    तिरंगा माझा कफन व्हावं हीच इच्छा आहे माझी
  • लहरेल तिरंगा आता साऱ्या आकाशावर 
    भारताचं नाव असेल सगळ्यांच्याच ओठावर
    घेऊ समोरच्याचा जीव आपल्या जीवाची बाजी लावून 
    जो वाईट नजरेने बघेल माझ्याच्या देशाच्या भूमीवर 

Also Read – Marathi Patriotic Songs

ADVERTISEMENT

स्वातंत्र्यदिनासाठी खास एसएमएस (Independence Day Message In Marathi)

Independence Day Message In Marathi

Independenc Independence Day Message In Marathi

15 ऑगस्टच्या निमित्ताने आपल्या मित्रमैत्रिणी आणि जवळच्या लोकांना पाठवा खास स्वातंत्र्यदिनाचे एसएमएस (Independence Day Message In Marathi) .

  • ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा, त्यांच्या चरणी ठेवू माथा. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (15 August Shubhechha In Marathi) वंदे मातरम्.
  • विविधतेत एकता आहे आमची शान, याचमुळे आहे माझा देश महान.
  • उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझ भारत देश घडविला.
  • देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.
  • देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण, कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो आम्ही भारतीय आहोत, जय हिंद.
  • बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
  • माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना. भारत मात की जय.
  • एकीने जन्म दिला…एकीने ओळख दिली…भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र…वंदे मातरम्.
  • नावात काय घेऊन बसलात आम्ही तर आमच्या वागणुकीतूनच जगाला ओळख पटवून देतो भारतमातेच्या लेकी.
  • ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी आयुष्य खूप छोटं आहे आपण जगणार फक्त देशासाठी. 
  • जे देशासाठी फासावर चढले आणि छातीवर गोळ्या झेलल्या 
    त्या शहीदांना आम्ही वंदन करतो 
    ज्यांनी देशापुढे आपल्या जीवनाला दुय्यम ठरवले 
    त्यांना आमचा सलाम….स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
  • जे आज आपल्यात नाहीत, परंतु आजही नावरूपाने आपल्यात आहेत, अशा साहसी सैनिकवीरांना सलाम
    जे आपल्या भारताची खरी शान आहेत, वंदे मातरम्
  • सलामी द्या आपल्या तिरंग्याला, जो आपली शान आहे 
    सदैव उंच रहावा तो, जोपर्यंत आपल्यात जान आहे 
    जय हिंद जय भारत….स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 
  • देशभक्तांमुळे देशाची आहे शान 
    देशभक्तांमुळे देशाचा आहे मान
    आम्ही त्या देशाची फुलं आहेत मित्रांनो 
    ज्या देशाच नाव आहे हिंदुस्तान 

स्वातंत्र्यसेनानींच्या प्रसिद्ध घोषणा (Slogans By Freedom Fighters)

Happy Independence Day Quotes In Marathi

Happy Independence Day Quotes In Marathi

ज्यांनी या भारतमातेला ब्रिटीशांच्या जुलूमातून आपले रक्त सांडून मुक्त केले. त्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन. पाहा त्यांनी भारतमातेबद्दल व्यक्त केलेले विचार (Slogans By Freedom Fighters). 

ADVERTISEMENT
  • स्वतः जगणं व राष्ट्र जगविणं हे आपलं कर्तव्य आहे त्याकरता हिंसा करावी लागली तरी ती पुण्यकारकच होय. – विनायक दामोदर सावरकर
  • एक देव एक देश एक आशा ।। एक जाती एक जीव एक आशा ।। – विनायक दामोदर सावरकर
  • उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. – विनायक दामोदर सावरकर
  • स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच. – लोकमान्य टिळक
  • जय जवान जय किसान – लाल बहादूर शास्त्री
  • जय हिंद – सुभाष चंद्र बोस
  • सत्यमेव जयते – मदन मोहन मालवीय
  • तुम मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा (तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो) – सुभाष चंद्र बोस
  • दुश्मनों की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद है आजादही रहेंगे –  चंद्रशेखर आजाद
  • सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मैं है – रामप्रसाद बिस्मिल

वाचा – मराठी देशभक्तीपर चित्रपट

स्वातंत्र्यदिनासाठी चारोळ्या आणि शायरी (Independence Day Shayari In Marathi)

Independence Day Shayari In Marathi

Independence Day Shayari In Marathi

देशाप्रती भावना व्यक्त करताना आपण त्या चारोळ्यातूनही व्यक्त करू शकतो. स्वातंत्र्यदिनासाठी काही खास चारोळ्या (Independence Day Shayari In Marathi).

  • विचारांचं स्वातंत्र्य
    विश्वास शब्दांमध्ये
    अभिमान आत्म्याचा
    चला या स्वातंत्र्यदिनी सलाम करू या भारतदेशाला
  • बाकीचे विसरले असतील
    पण मी मात्र कधीच विसरणार नाही
    माझ्या देशाचा तिरंगा ध्वज
    सर्वात उंच फडकतो आहे
  • अभिमान आणि नशीब आहे की, भारत देशात जन्म मिळाला , इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भष्ट्राचारमुक्त भारत करूया.
  • स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज, सूर्य तळपतो प्रगतीचा, भारतभूच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा
  • जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहम्, यशोयुतां वंदे
  • मुक्त आमचे आकाश सारे, झुलती हिरवी रानेवने, स्वैर उडती पक्षी नभी, आनंद आज उरी नांदे.
  • तू माझी भारतभूमी मी तुझाच मावळा, मी भारतमातेचा माजी भारतमाता. जय हिंद
  • कधीच न संपणार आणि शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार प्रेम म्हणजे देशप्रेम.
  • प्रेम तर सगळेच करतात आपल्या प्रियकरावर सगळेच मरतात, कधी देशाला प्रियकर बनवून पाहा, सगळेच प्रेम करतील तुमच्यावर, भारत माता की जय.
  • ने मजसी ने परत मातृभूमीला…असा विरह ज्यांनी सहन केला, त्या सावकरांना शतशः प्रणाम, आपण भाग्यवान जो जन्म घेतला या स्वातंत्र्य मिळालेल्या देशात. चला एकजूट राहूया आणि देशाला जपूया.

हेही वाचा –

ADVERTISEMENT

प्रसिद्ध मराठी लेखकांचे प्रेरणादायी विचार

Independence Day Wishes in english

Independence Day Quotes 

Independence Day Quotes in Hindi

ADVERTISEMENT
12 Aug 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT