बऱ्याचदा आयुष्यात सर्व काही निरर्थक वाटायला लागतं. त्यावेळी सर्वात जास्त गरज असते ती आपल्या आजूबाजूला चांगल्या माणसांची आणि चांगल्या प्रेरणादायी विचारांची. कारण माणूस हा असा प्राणी आहे ज्याचं संपूर्ण जग हे विचारांवर चालू असतं. आपण आपल्या आजूबाजूला जशी माणसं पाहतो किंवा त्या माणसांमध्ये वावरतो तसंच आपले विचारही असतात. त्यामुळेच मराठीमधील एक उक्ती आहे, जशी संगत तसा विचार त्याप्रमाणे आपण वागत असतो. त्यामुळे मुळात चांगली संगत असेल तर विचारही चांगले राहतात हे महत्त्वाचं आहे. बरेचदा माणसाच्या आयुष्यात वेगवेगळे चढउतार येत असतात. अशावेळी खचून जाणं हे साहजिकच आहे. पण अशावेळी मनाची समजून घालत आपल्याला असे प्रेरणादायी विचार मराठी हे जगण्याला अधिक बळ देत असतात. शिवाय संकटाचा सामना करण्याची ताकद देत असतात. असे मराठीमध्ये कोणते प्रेरणादायी विचार आहेत आणि त्याचं आपल्या आयुष्यात नेमकं काय स्थान आहे हे आपण जाणून घेऊया.
वास्तविक आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो की, आयुष्यात प्रेरणादायी विचारांची अशी वेगळी गरज काय आहे? पण खरं सांगू का मैत्रिणींनो. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी वाईट परिस्थिती येतेच. मग ती शारीरिक असो, भावनिक असो वा आर्थिक असो. प्रत्येक माणूस या परिस्थितीतून जातोच. या जगात असा एकही माणूस नाही ज्याला कधी दुःखाचा सामना करावा लागला नाही. त्यामुळे असे प्रेरणादायी विचार मराठी आपल्याला जगायला बळ देतात आणि अशा परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मदत करत असतात. या विचारांनी आपल्याला जगायला आणि त्या संकटांचा सामना करायचं बळ मिळतं. काही लोकांना हे फक्त संवाद वाटतात पण हे खरं आहे की, त्या परिस्थितीतून जात असताना अशी वाक्यच असतात जी पुन्हा यातून उभं राहण्यासाठी बळ देत असतात. ती एक प्रकारे आपलं आयुष्य बुस्ट करत असतात. अर्थात आपल्या आयुष्याची गाडी पुढे ढकलायला मदत करत असतात.
वाचा - यशाची व्याख्या सांगणारे सक्सेस कोट्स (Best Success Quotes In Marathi)
बऱ्याचदा अशी परिस्थिती येत असते की, संकटं ही एकामागून एक येत असतात. अशा वेळी स्वतःला कसं सांभाळायचं हे कळत नसतं. कोणी काही सांगितलेलं पटतही नसतं. सतत स्वतःला दोष देत माणसं जगायला लागतात. पण अशा वेळी खरं तर परिस्थिती काहीही असो स्वतःला कमी लेखणं सोडा. कारण तसं करत राहिल्यास, तुमचा आत्मविश्वास कमी होऊन काहीही करण्याची उमेद राहात नाही. शिवाय सतत स्वतःला कमी लेखत राहिल्यामुळे पुढे काय करायचं आहे हे विचार करण्याची क्षमताही कमी होते. त्यामुळे अशावेळी स्वतःला बढावा देण्यासाठी, प्रेरणा देण्यासाठी स्वतःला कमी लेखणं सोडून द्या.
कोणत्याही वाईट गोष्टीसाठी काही माणसं स्वतःला सतत दोष राहतात. त्यामुळे सतत त्याच गोष्टीचा विचार त्यांच्या मनात येतो. या विचारांमुळे सर्वच गोष्टी चुकीच्या ठरतात. कारण कोणतीही गोष्टी करायला जाण्याआधी आपण हा निर्णय चुकीचा घेतला असणार असंच या व्यक्तींच्या मनामध्ये येत राहतं. त्यामुळे स्वतःच स्वतःला गृहीत धरणं सोडा. तुम्ही जितकं स्वतःला अशा गोष्टींमध्ये गृहीत धरणार तितकं लोकही तुम्हालाच दोष देणार. त्यामुळे नक्की परिस्थिती काय होती आणि आपण काय केलं किंवा समोरच्या व्यक्ती कशा वागल्या याचा सारासार विचार तुम्ही करायला हवा.
आपल्यापेक्षा दुसरी व्यक्ती कशी सरस आहे हे सतत शोधू नका. कारण प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. त्यामुळे आपलं महत्त्व स्वतः जपा. मुळात कधीही दुसऱ्यांशी तुलना करणं चांगलं नाही. त्यामुळे तुम्ही जर हे करत असाल तर यामध्ये तुमचंच नुकसान आहे.
कोणत्याही गोष्टीवर रडत बसणं हा उपाय कधीच असू शकत नाही. त्यामुळे आपल्याबरोबरच हे का घडलं किंवा अजून काहीतरी सतत विचार करून रडणं टाळा. बऱ्याचदा काही गोष्टीवर काहीच उपाय नसतो हे आपल्याला जाणवतं. त्यामुळे असं जेव्हा आपल्याला कळतं तेव्हादेखील रडू नका. कारण कितीही रडून त्यावर तोडगा तर निघणार नाही. त्यामुळे त्यावर दुःख करत बसण्यात आणि ते उगाळण्यात काहीही अर्थ नाही.
वाचा - मैत्रिणीचं लग्न ठरलंय ? मग तुमच्या मनात हे विचार हमखास येणार
कोणतीही गोष्ट बिघडते तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला निर्णय चुकलेला असतो. त्यामुळे त्यासाठी कोणाला दोष देत बसू नका. दुसऱ्यांना दोष दिल्याने काहीही बदलणार नसतं. वेळ निघून गेलेली असते आणि निर्णयही घेतलेला असतो. त्यामुळे आपल्याला हे माहीत असायला हवं की, जो काही निर्णय घेतला गेला आहे तो सर्वस्वी आपला आहे. त्यामुळे काही झालं तरी चुकतो तो फक्त आपला निर्णय असतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ ही म्हण अर्थातच आपण सगळेच लहानपणापासून ऐकतो. पण तसं वागणारी माणसंही आहेत. तुम्हाला जर खरंच कर्तृत्व गाजवायचं असेल तर मेहनतीशिवाय पर्याय नाही. केवळ नशीबावर अवलंबून राहणं योग्य नाही. कारण जर तुम्ही फक्त नशीबावर अवलंबून राहिलात तर तुम्हाला कधीच एका उंचीवर पोहचता येणार नाही.
आपण काहीतरी वेगळं करत असू आणि समोरचा माणूस स्तुती करत असेल तर आपल्यावर जळणाऱ्या वक्तींची संख्या खूप जास्त प्रमाणात असते. पण त्यासाठी त्या व्यक्तीचा तिरस्कार कधीही करू नका. कारण त्या व्यक्तीकडे ही गोष्ट समजून घेण्याची तितकी ताकद नसते आणि मुळात आपल्याला त्या पातळीला उतरण्याची काहीच गरज नाही हे समजणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. कारण ती समोरची व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट समजते तेव्हाच जळू शकते. त्यामुळे तुम्ही सरस आहात आणि तुमच्या कामात योग्य आहात हेच सिद्ध होतं. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून पुढे जाणंच जास्त योग्य आहे.
सोशल मीडिया स्टेटससाठी आध्यात्मिक सुविचार
तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी जर खूप प्रयत्न करावे लागत असतील तर हरू नका. ते प्रयत्न करत राहा. तुम्हाला सतत संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण संघर्षातूनच माणूस शिकत असतो. त्याला स्वतःला निर्णय घ्यायची आणि होणाऱ्या परिणामांची जाणीव ही संघर्षातूनच होत असते. आयतं कमावून ठेवलेलं किंवा संघर्षाशिवाय एखादी गोष्ट मिळाली तर त्याची माणसाला किंमत नसते. त्यामुळे संघर्ष हा अशाच व्यक्तींच्या वाट्याला येतो जो त्यातून बाहेर पडण्याची हिंमत ठेवतो. संघर्षाकडे नेहमी सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे.
खरं तर संकटात आपण डगमगून जातो. पण प्रत्येक संकटाबरोबर एक संधी तुम्हाला आयुष्यात चालून येत असते. त्यामुळे डगमगून न जाता तुम्ही त्या संकटात धीराने उभं राहून संधीचं सोनं करायला हवं. आपली विचारशक्ती शाबूत ठेऊन कितीही संकट आलं तरीही परिस्थितीचा सामना करत उभं राहिलं पाहिजे. जेणेकरून या संकटातून बाहेर येऊन तुम्ही आलेल्या संधीचा खूपच चांगला फायदा करून घेऊ शकता. ज्याला साधारणतः आयुष्यात दुसरी संधी असं म्हटलं जातं आणि सहसा अशी संधी आली की, आयुष्याला नक्कीच कलाटणी मिळत असते.
प्रत्येकाला आयुष्यात स्वप्न पडत असतात. पण झोपल्यावर पडणारी स्वप्न वेगळी आणि उघडया डोळ्यांनी पाहायची स्वप्न वेगळी. कारण उघड्या डोळयांनी पाहिलेल्या स्वप्नांना एक दिशा असते आणि अशीच स्वप्न असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत आणि तुम्हाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन पोहचवतात. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक प्रेरणादायी वाक्य नक्कीच आहे. कारण प्रत्येक माणसाचं स्वप्न मोठं व्हायचं नाव कमावण्याचं असतं. पण यश त्यालाच मिळतं जो या स्वप्नांच्या मागे न झोपता अर्थात खऱ्या अर्थाने मेहनत करून लागतो.
वाचा - वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा
हे वाक्य नेहमीच जगायला बळ देतं. कारण निंदकाचे घर असावे शेजारी असं मराठीमध्ये म्हटलं जातं आणि ते खरंच आहे. आपले पाय नेहमी जमिनीवर राहायला हवे असतील तर आपल्यातले दोष सांगणाऱ्या व्यक्ती आपल्या आजूबाजूला हव्या हे नक्की. त्यामुळे त्यांना आपल्या गुणवत्तेवर जितकी शंका घ्यायची असेल घेऊ द्या. त्यामुळे अधिक जोमाने आपल्याला हव्या त्या योग्य गोष्टी करायला आपल्याला बळ मिळतं हे नेहमी लक्षात ठेवा.
प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधीतरी अपयशाला सामोरं जाव लागतंच. पण अपयश आलं आहे म्हणून खचून न जाता, जिद्दीने ते अपयश परतवायची ताकद ठेवा. कितीही मोठं अपयश असो त्यातून जिद्दीने बाहेर येणं गरजेचं आहे. हे सतत स्वतःला समजावत राहिल्यास, तुम्ही पुन्हा एकदा नव्याने उभं तर राहताच. शिवाय तुम्हाला तुमच्यामधील असलेली जिद्द आणि चिकाटीची जाणीवही नव्याने होते.
बऱ्याचदा सतत काही ना काहीतरी आपल्या मनाविरुद्ध घटना आयुष्यात घडत राहतात. पण त्याने खचून जाणं योग्य नाही. कारण जसा रोज सूर्यास्तानंतर सूर्योदय होत असतो. तसंच वाईट दिवस सरतात आणि चांगले दिवस येणार असतात. हा केवळ प्रेरणादायी विचारच नाही तर हे लोकांचे अनुभवही असतात. आयुष्य कायमस्वरूपी एकसारखं राहत नाही. तर प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदुःखाच्या सारीपाटाचा खेळ हा चालू राहतोच. जेव्हा वाटतं की, सर्व संपलं आहे तेव्हा स्वतःलाच हे समजावत राहणं गरजेचं आहे की, काळ्याकुट्टा रात्रीनंतर सूर्य हा उगवणारच आहे.
वाचा - महिला दिनाचे महत्त्व
हे शंभर टक्के प्रेरणादायी वाक्य आहे. कारण ज्यांना स्वतःवर विश्वास असतो. ते दुसरे किती बलशाली आहेत याचा अजिबात विचार करत नाहीत. कारण त्यांना आपण काय करतो याकडे जास्त लक्ष द्यायचं असतं. स्वतःचं आयुष्य जास्त महत्त्वाचं. हा विचार प्रत्येकानेच अंगी बाळगायला हवा.
ज्यांना आपल्या कामात आनंद मिळतो त्या व्यक्ती सुखी असतात. कारण इतर गोष्टींमध्ये नाक खुपसत राहण्यापेक्षा आपण भले आणि आपलं काम भले यामध्ये कधीच कोणाचं नुकसान होत नसतं. शिवाय काम हीच पूजा असं म्हटलं जातं. त्यामुळे आपल्या जीवनात कायम समृद्धी राहते.
आपल्या आयुष्यात लेखकांच्या विचारांचेही खूप महत्त्व असते. आपल्या मराठी साहित्यामध्ये अनेक प्रसिद्ध लेखक होऊन गेले आहेत. त्यांचे प्रेरणादायी विचार आपल्याला नेहमीच प्रभावित करतात. असेच काही विचार -
व. पु. काळे हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध लेखक. व. पु. काळे यांचे प्रेरणादायी विचार आजच्या तरूण पिढीसाठीही उपयुक्त आहेत.
- खऱ्या विद्यार्थ्याला सुट्टी कधीच नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते
- मैत्रीचे धागे हे कोळ्यापेक्षाही बारीक असतात, पण लोखंडाच्या तारेपेक्षाही मजबूत असतात. तुटले तर श्वासानेही तुटतील, नाहीतर वज्राघातानेही तुटणार नाहीत
- कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर कमीत जास्तीत जास्त कसं नसावं यालातरी नक्कीच महत्त्व आहे
- खरं तर सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की, त्याचे सर्टिफिकेट होते
- आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे. माणसाला माणूस जोडत गेलं पाहिजे
महात्मा ज्योतिबा फुले हे अत्यंत महान होते. ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती आपल्याला इंटरनेटवर वाचायला मिळतेच. पण महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार ही तितकेच कणखर आणि महान होते.
1. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते - महात्मा ज्योतिबा फुले
2. नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.
3. केस कापणे हा नाव्ह्याचा धर्म नाही धंदा आहे, चामाड्यांना शिवणे हा चांभाराचा धर्म नाही धंदा आहे तसेच पूजा पाठ करणे हा ब्राम्हणांचा धर्म नसून धंदाच आहे
4. भारतात तोपर्यंत राष्ट्रीय भावना बळकट होणार नाही जोपर्यंत खाणे पिणे आणि वैवाहिक संबंधांवर जातीचे बंधन तसंच आहे
5. समाजातील खालच्या वर्गाची तोपर्यंत बुद्धिमत्ता,नैतिकता, प्रगती आणि समृद्धी चा विकास होणार नाही जोपर्यंत त्यांना शिक्षण दिले जात नाही.
- जुन्यात आपण रंगतो. स्मृतीची पानं उलटायला बोटांना डोळयातलं पाणी लागते. मग त्या स्मृती सुखाच्या असोत वा दुःखाच्या!
- चोरीमध्ये वाईट काहीच नसतं, तुम्ही काय चोरता आहात यावर ते अवलंबून आहे. तुम्ही एखाद्याचं मन चोरलं तर त्यात वाईट काय आहे?
- जगात काय बोलत आहात, यापेक्षा कोण बोलत आहात याला जास्त महत्त्व आहे
- परिस्थिती हा अश्रूंचा कारखाना आहे
- भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली ‘माणसं’ दाखवतो
- समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्याासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो
फोटो सौजन्य - Shutterstock, Instagram
You might like these:
Happy Birthday Wishes In Marathi
Marathi Ukhane For Female & Male
Happy Anniversary Wishes For Every Relationship In Marathi
Shivaji Maharaj Quotes In Marathi