ADVERTISEMENT
home / मनोरंजन
हिना खानचा दिलखेचक अंदाज, अंगद बेदीसोबत दिले बोल्ड सीन्स

हिना खानचा दिलखेचक अंदाज, अंगद बेदीसोबत दिले बोल्ड सीन्स

हिना खानला खरी ओळख मिळाली ती ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेतील अक्षरा या भूमिकेतून… टेलीव्हिजनवरील आदर्श सूनेच्या या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. मात्र या भूमिकत अडकून न राहता मग हिना खानने अभिनयातील विविध पैलू प्रेक्षकांसमोर मांडण्यास सुरूवात केली. कधी हॉट आणि बोल्ड फोटोशूट तर कधी एखाद्या मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत तिने तिची आदर्श सुनेची प्रतिमा मोडून काढली. आता हिना खान एका नव्या अवतारात प्रेक्षकांसमोर आली आहे. अंगद बेदीसोबत तिचं नवं गाणं प्रेक्षकांसमोर येत आहे. या म्युझिक व्हिडिओमधील दिलखेचक आणि बोल्ड फोटो सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

या अभिनेत्याला व्हायचे आहे रस्ते कॉन्ट्रॅक्टर,भन्नाट पोस्ट होतेय व्हायरल

हिना खान आणि अंगद बेदीचा रोमॅंटिक अंदाज

हिना खान आणि अंगद बेदी यांचा ‘मै भी बर्बाद’ गाणं प्रदर्शित झालं आहे. मात्र हे गाणं प्रदर्शित होण्याआधीच या गाण्याची चर्चा सुरू झाली होती. याचं कारण होतं हिना खानने अंगद बेदीसोबत शेअर केलेले बोल्ड फोटो. या गाण्यातील दोघांचा फर्स्ट लुक प्रेक्षकांना भुरळ घालत होता. त्यामुळे हिना खानच्या या नव्या अवताराची सर्वत्र चर्चा सुरू झाली. हिना खानने या गाण्यासंदर्भात दिलेल्या एका मुलाखतीत तिचा अनुभव शेअर केला, “मै भी बर्बाद एक हटके आणि युनिक प्रोजेक्ट आहे. मला प्रेक्षकांनी नेहमीच वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहिलं आहे. मात्र हा अल्बम नेहमीपेक्षा खूपच वेगळा आहे. मला वाटतं की एक अभिनेत्री म्हणून मी माझ्या भूमिकेत समरस होईल असा लुक आणि अभिनय करायला हवा. त्यानुसार मी या भूमिकेसाठी बोल्ड सीन्स दिले आहेत”

प्रेम आणि धोक्याची कहाणी

हिना खानने गाणं प्रदर्शित होण्याआधी त्याची झलक इन्स्टाग्रामवर प्रदर्शित केली होती. ज्या पोस्टला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. हिना खानचा या गाण्यामधील अंदाज हा नेहमीपेक्षा जास्त बोल्ड आणि हॉट आहे. त्यामुळे तिचा हा नवा अवतार चाहत्यांना खूपच आवडला आहे. हिनासोबत अंगददेखील एका वेगळ्या लुकमध्ये प्रेक्षकांसमोर आला आहेत. या गाण्यात अंगद बेदीच्या अंगावरील टॅटू चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. या गाण्यात प्रेम आणि प्रेमातील धोक्याची कहाणी दाखवण्यात आलेली आहे. ज्यामुळे यात प्रेम, अॅक्शन, धोका आणि गुन्हा असं मिश्रण असणार आहे. बघता बघता हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. मै भी बर्बाद गाणं यासर देसाईने गायलं असून गौरव दासगुप्ताने त्याला संगीत दिलं आहे. या गाण्याचे बोल कुंवर जुनैजाने लिहीले आहेत. सध्या या गाण्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे. 

ADVERTISEMENT

लवकरच करण जोहरचा ‘स्टुडंट ऑफ द इयर’ अभिनेता अडकणार लग्नबंधनात

Bigg Boss मराठी : मीरा जगन्नाथ होऊ पाहतेय का निकी तांबोळी

24 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT