ADVERTISEMENT
home / Combination Skin
झेंडूच्या फुलापासून तयार करा हे होममेड फेसमास्क, त्वचा दिसेल चमकदार

झेंडूच्या फुलापासून तयार करा हे होममेड फेसमास्क, त्वचा दिसेल चमकदार

आपली त्वचा सुंदर आणि चिरतरूण दिसावी असं प्रत्येकीलाच वाटत असतं. शिवाय आता सणासुदीच्या दिवसांना सुरूवात झाली आहे. दसरा दिवाळी म्हटलं की नटणं-थटणं आलंच. या वर्षी सणासुदीवर कोरोनाचं सावट असलं तरी घरच्या घरी सण साजरं करणं आपल्या हातात नक्कीच आहे. नवरात्रीत अथवा दिवाळीत पूजेसाठी वापरण्यात येणारी झेडूंची फुले त्वचेसाठी अतिशय उत्तम असतात. यासाठीच आम्ही तुमच्यासाठी झेंडूच्या फुलांचे खास फेसमास्क शेअर करत आहोत. हे फेसमास्क लावून तुम्ही सणासुदीला तुमची त्वचा सुंदर आणि चमकदार करू शकता. शिवाय हे फेसमास्क तुम्हाला स्वतःच घरच्या घरी करता येतील.

Instagram

झेडूंची फुले त्वचेसाठी का आहेत फायदेशीर –

झेंडूच्या  फुलांमध्ये अॅंटि बॅक्टेरिअल, अॅंटि इनफ्लैमटरी घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेला थंडावा मिळतो. यातील व्हिटॅमिन ए, बी आणि डी मुळे त्वचा सैल न पडता घट्ट राहते. ज्यामुळे तुमच्या एजिंगच्या खुणा कमी होतात. झेंडूमध्ये क्लिंझिंग आणि जखमा  भरून काढणारे घटक असल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जर एक्ने अथवा पिंपल्स असतील तर त्यावर चांगले उपचार केले जातात. आम्ही दिलेल्या या फेसमास्कमुळे तुमच्या त्वचेतील कोलेजीनला चालना मिळेल तसंच त्वचा मऊ, मुलायम आणि चमकदारदेखील होईल. 

ADVERTISEMENT

नॉर्मल त्वचेसाठी झेंडूच्या फुलांचा फेसमास्क

या फेसमास्कमध्ये झेंडूच्या फुलांसोबतच बेसन आणि दूध वापरण्यात आलं आहे. त्यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ आणि चमकदार दिसू लागेल.

साहित्य –

  • एक चमचा झेंडूच्या फुलांची पेस्ट
  • एक चमचा बेसन
  • एक चमचा दूध

फेसमास्क तयार करण्याची पद्धत –

  • सर्व साहित्य एकत्र करा आणि फेसमास्क तयार करा
  • चेहरा आणि मानेवर हा फेसमास्क लावा
  • सुकल्यावर कोमट पाण्याने धुवा

ADVERTISEMENT

Instagram

कोरड्या त्वचेसाठी झेंडूच्या फुलांचा फेसमास्क –

या फेसमास्कमध्ये दूध आणि मधासोबत झेंडूच्या फुलांचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ आणि हायड्रेट राहते. मधामध्ये एंटी एजिंग गुणधर्म असल्यामुळे यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊ शकतात.

साहित्य –

  • एक चमचा झेडूंच्या फुलांची पेस्ट
  • एक चमचा दूध
  • अर्धा चमचा मध

फेसमास्क तयार करण्याची पद्धत –

ADVERTISEMENT
  • सर्व साहित्य एकत्र करून एक छान फेसमास्क तयार करा
  • फेसमास्क चेहरा आणि मानेवर लावा
  • सुकल्यावर सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करत तो काढून टाका 
  • कोमट पाण्याने चेहरा धुवा 

तेलकट त्वचेसाठी झेंडूच्या फुलांचा फेसमास्क –

या फेसमास्कमध्ये झेंडूच्या  फुलांची पेस्ट, दही, लिंबाचा रस वापरण्यात आला आहेत. दह्यामध्ये त्वचा हायड्रेट ठेवण्याचे आणि डेडस्कीन काढून टाकण्याचे  गुणधर्म असतात. शिवाय झेंडूची फुलांमध्ये अॅंटि बॅक्टेरिअल, अॅंटि इनफ्लैमटरी तुमच्या त्वचेचं बॅक्टेरिआपासून संरक्षण करतात. 

साहित्य –

  • एक चमचा झेंडूच्या फुलांची पेस्ट
  • एक चमचा दही
  • एक चमचा लिंबाचा रस
  • एक चमचा गुलाबपाणी

फेसमास्क तयार करण्याची पद्धत –

  • सर्व घटक एकत्र करा आणि त्याची जाडसर पेस्ट तयार करा
  • फेसमास्क चेहरा आणि मानेवर एकसमान लावा
  • सुकल्यावर कोमट पाण्याने धुवून टाका

ADVERTISEMENT

Shutterstock

कॉम्बिनेशन त्वचेसाठी झेंडूच्या फुलाचा फेसमास्क –

झेंडू्च्या फुलांसोबत या फेसमास्कमध्ये दही आणि चंदनाची पावडर वापरण्यात आली आहे. ज्यामुळे तुमची त्वचा तजेलदार आणि फ्रेश दिसेल.

साहित्य –

  • एक चमचा झेंडूच्या फुलांचा पेस्ट
  • अर्धा चमचा योगर्ट अथवा घट्ट दही
  • अर्धा चमचा चंदन पावडर

फेसमास्क तयार करण्याची पद्धत –

ADVERTISEMENT
  • सर्व घटक एकत्र करून एक छान पेस्ट तयार करा
  • चेहरा आणि मानेवर ही पेस्ट एकसमान लावा
  • सुकल्यावर कोमट पाण्याने चेहरा धुवून टाका

संवेदनशील त्वचेसाठी झेंडूच्या फुलांचा फेसमास्क –

झेंडूच्या फुलांमधील आणि कोरफड या दोन्हीमध्ये अॅंटि बॅक्टेरिअल घटक असतात यासाठीच तुमच्या खास त्वचेसाठी यात या दोन्ही घटकांचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुमच्या त्वचेचं पिंपल्स, अॅलर्जी, खास, कोरडेपणापासून रक्षण होतं.

साहित्य –

  • एक चमचा झेंडूची फुलं
  • एक चमचा कोरफडाचा गर
  • एक चमचा बेसन

फेसमास्क तयारा करण्याची पद्धत –

  • सर्व साहित्य एकजीव करा आणि त्यापासून एक पेस्ट तयार करा
  • हा फेसमास्क चेहरा आणि मानेवर एकसारखा लावा
  • कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून टाका

हे फेसमास्क तुम्हाला कसे वाटले आणि त्याचा तुमच्या त्वचेवर काय परिणाम झाला हे आम्हाला कंमेट बॉक्समध्ये अवश्य कळवा. शिवाय सणासुदीला मस्त तयार झाल्यावर तुमचा लुक कम्प्लिट करण्ययासाठी वापरा मायग्लॅमच्या या नव्या लिपस्टिक कलेक्शनमधील खास लिपस्टिक

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

नवरात्रीसाठी यावर्षी ट्राय करा अरेबिक स्मोकी आय लुक

मिल्क पावडरने मिळवा नितळ त्वचा (Milk Powder For Face In Marathi)

ADVERTISEMENT

चंदनाच्या फेसपॅकने करा त्वचा अधिक चमकदार

14 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT