ADVERTISEMENT
home / आरोग्य
how-many-days-after-ovulation-can-you-get-pregnant-details-in-marathi

मासिक पाळीनंतर कोणत्या 4 दिवसात राहू शकता गरोदर, जाणून घ्या ओव्ह्युलेशन कालावधी

आई होणे (To Become Mother) हा प्रत्येक महिलेसाठी सर्वोच्च आनंद आहे. आई होण्यासाठी महिलांना अनेक तयारी करावी लागते. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक तयारी करणेही गरजेचे आहे. त्याचसह आपले शरीर व्यवस्थित राहण्यासाठी त्याचीही तयारी करावी लागते. बाळ होण्यासाठी अर्थात कन्सिव्ह (Conceive) करण्यासाठी आजकाल अनेक महिलांना त्रासही होताना दिसतो. नॉर्मल गरोदर राहण्यासाठी नक्की कोणता दिवस योग्य असतो याबाबत अनेकांना माहीत नाही. निसर्गतः गरोदर राहायचे असेल तर महिलांच्या ओव्ह्युलेशन (Ovulation period) कालावधीवर हे अवलंबून असते. प्रत्येक महिलेचे ओव्ह्युलेशन हे वेगवेगळे असते आणि हे आपल्या मासिक पाळीवर अवलंबून असते. त्यामुळे बाळ हवे असेल आणि तुम्हाला गरोदर राहायचे असेल तर कन्सिव्ह करण्यसाठी योग्य दिवस आणि तारीख कोणती याबाबत महत्त्वाची माहिती घ्या जाणून. 

गरोदर राहण्यासाठी हे 4 दिवस आहेत महत्त्वाचे 

प्रत्येक महिलेच्या मासिक पाळीच्या सायकलमधील 4-5 दिवस असे असतात जे गरोदर राहण्यासाठी अधिक महत्त्वाचे आणि योग्य असतात. पण बरेचदा महिलांना आणि त्यांच्या जोडीदाराला याबाबत माहिती नसल्यामुळे गरोदर राहण्यास विलंब होतो. तुम्हाला माहीत असायला हवे की, महिलांचे ओव्ह्युलेशन हे 12 ते 24 तासादरम्यान असते. तर पुरूषांचे शुक्राणू (Sperms) हे 3-5 दिवसांपर्यंत जिवंत राहतात. अशावेळी महिलांना जर आपला ओव्ह्युलेशन कालावधी माहीत असेल तर गरोदर राहणे अधिक सोपे जाते.  

गरोदर राहण्याचा योग्य दिवस 

बाळ राहण्यासाठी अर्थात कन्सिव्ह करण्याचा योग्य कालावधी हा मासिक पाळीच्या 12-14 दिवस आधी सुरू होतो. उदाहरणार्थ जर एखाद्या महिलेचा मासिक पाळी येण्याचा कालावधी हा 28 दिवसांचा असेल तर तुम्ही तुमचा ओव्ह्युलेशन कालावधी नक्कीच जाणून घेऊ शकता. असे समजा की, एखाद्या महिलेची मासिक पाळी तारीख असेल 1 मे, तर तिची पुढील मासिक पाळी येईल 28 मे रोजी. त्याअर्थी या महिलेचा ओव्ह्युलेशन कालावधी असेल 14 मे. त्यामुळे गरोदर राहण्यासाठी तुम्हाला 11 ते 15 मे हा कालावधी योग्य आहे. तुम्ही या कालावधीत आपल्या जोडीदारासह सेक्स (Sex with Partner) केल्यास, तुम्हाला कन्सिव्ह करता येते. मात्र यासाठी तुमची मासिक पाळीची तारीख हे योग्य आणि निश्चित असायला हवी. ज्या महिलांची मासिक पाळी वेळेवर येत नाही त्यांच्यासाठी हा दिवस निश्चित करणे शक्य होत नाही. तुमची मासिक पाळी वेळेवर होत नसेल तर तुम्हाला डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा लागेल. 

मासिक पाळीनंतर कधी कन्सिव्ह होते

मासिक पाळीच्या 6 दिवसानंतर तुम्ही सेक्स केल्यास, तुम्ही गरोदर राहण्याची शक्यता अधिक आहे. उदाहरणार्थ समजा तुमच्या मासिक पाळीचा शेवटचा दिवस हा सोमवार आहे. तर तुम्हाला मंगळवारपासून पुढच्या सोमवारपर्यंत सेक्स केल्यास, गरोदर राहण्याची संभावना जास्त असते. मात्र तुम्ही कशा पद्धतीने सेक्स करता आणि एकमेकांना किती समजून घेता यावरही बाळ कन्सिव्ह होण्याची प्रक्रिया असते. त्यामुळे तुम्हालाही बाळ हवे असेल तर तुम्ही तुमचा ओव्ह्युलेशन कालावधी आधी समजून घ्या आणि त्यानंतर योग्य प्रयत्न केल्यास, तुम्हाला नक्कीच यश मिळेल. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

27 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT