ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
beauty-hacks-during-periods-to-take-care-of-skin-in-marathi

मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या त्वचेच्या समस्येसाठी 5 सोप्या टिप्स

मासिक पाळीमध्ये (Menstrual Cycle) महिलांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते पण त्यातही सर्वात जास्त सहन करावी लागणारी समस्या म्हणजे चेहऱ्यावर येणाऱ्या पुळ्या. मासिक पाळीदरम्यान अनेक महिलांना चेहऱ्यावर पुळ्या येतात. त्वचेवर येणारे अॅक्ने हे अतिशय त्रासदायक ठरतात. या दरम्यान हार्मोन्सचा चढउतारही खूप असतो आणि त्यामुळेच अनेक महिलांना या दिवसात काहीही करू नये असं वाटतं. साधारण पाळी येण्याच्या आधीपासून ते पाळी येऊन गेल्यानंतर असा 10 दिवसांचा कालावधी असतो, जेव्हा चेहरा निस्तेज दिसतो. इतकंच नाही तर काही महिलांची त्वचा ही अधिक कोरडी होते अथवा अधिक तेलकट (Oily Skin) होते. यामुळे चेहऱ्यावर अॅक्नेही येतात.  पण याच दरम्यान एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल तर मात्र पंचाईत होते. कारण असा चेहरा घेऊन जाणं कोणालाच आवडत नाही. हार्मोनमधील बदल तर आपण थांबवू शकत नाही. मात्र काही सोप्या टिप्सचा वापर करून मासिक पाळीच्या दिवसात आपण त्वचेवरील ही समस्या थांबविण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो. काहीत आहेत या टिप्स घ्या जाणून. 

मासिक पाळीदरम्यान त्वचा का खराब होते?

मासिक पाळीदरम्यान आपल्याला खूप भूक लागते, सतत काहीतरी खावंसं वाटतं आणि आपल्याकडून उलटसुलट खाल्लंही जातं. यामुळे त्वचा तेलकट अथवा कोरडी होते आणि त्यामुळे चेहऱ्यावर पुळ्या येतात. आपल्या शरीरातील अस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रोन हे हार्मोन्स कमी जासत् होतात आणि त्यामुळेच त्वचेवर ब्रेकआऊट्स होतात. हा बदल साधारण 10 दिवस राहातो. यावरील उपाय आणि सोप्या टिप्स जाणून घ्या. 

1. त्वचा खूप कोरडी होत असल्यास वापरा पेट्रोलियम जेली 

ज्या महिलांची त्वचा कोरडी होते आणि ज्यांना फ्लेकी त्वचेची समस्या असते त्यांनी नियमित वापरल्या जाणाऱ्या मॉईस्चराईजच्या ऐवजी पेट्रोलियम जेलीचा वापर करावा. त्वचेच्या अनेक समस्यांवर याचा चांगला परिणाम होतो. विशेषतः गालाचा कोरडेपणा जाण्यासाठी तुम्ही पेट्रोलियम जेलीचा (Petroleum Jelly) वापर करावा. तुम्ही झोपण्यापूर्वी याचा वापर करा आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला त्वचेवरील कोरडेपणा कमी झालेला दिसून येईल. यासह तुम्ही हातापायावरही याचा उपयोग करू शकता. हातापायवरील कोरडेपणाही यामुळे कमी होईल. 

2. तेलकट त्वचा असल्यास, कोरफड जेल वा ग्रीन टी चा करा वापर

मासिक पाळीच्या दिवसात तुमची त्वचा अधिक तेलकट होत असेल तर तुम्ही ग्रीन टी चा वापर करा. ग्रीन टी थंड करून तुम्ही चेहऱ्याला लावा आणि मग थोड्या वेळाने चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरील तेल शोषून घेतले जाते. तसंच तुम्ही कोरफड जेलचाही वापर करू शखता. यामुळे तुमची त्वचा मॉईस्चराईज होते. हे दोन्ही तेलकट त्वचा असणाऱ्या महिलांसाठी वरदान ठरते. यामुळे अॅक्ने येण्याची शक्यताही राहात नाही. 

ADVERTISEMENT

3. अरोमाथेरपी आणि आंघोळ 

मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी पॅडमुळे अथवा सतत येणाऱ्या क्रॅम्प्समुळेही आपल्याला अधिक त्रास होत असतो. यासाठी तुम्ही सिरोनाचे सॅनिटरी पॅड्स अथवा मेन्स्ट्रूअल कप्स वापरू शकता. ज्यामुळे हा त्रास कमी होईल. पण चेहऱ्यावरील पुळ्या कमी करण्यासाठी तुम्ही इसेन्शियल ऑईलची मदत घ्या. रोझ हिप इसेन्शियल ऑईल, ऑर्गेनिक हार्वेस्टचे इसेन्सियल ऑईल कॉम्बो ज्यामध्ये रोझ – लवेंडर, टी ट्री इसेन्शियल ऑईल, रोझमेरी इसेन्शियल ऑईलचा समावेश आहे. याचा उपयोग करून घेऊ शकता. आंघोळीला जे पाणी घेणार असाल त्यामध्ये एक – एक थेंब इसेन्शियल ऑईल मिक्स करा आणि कोमट पाण्याने आंघोळ करा. यामुळे तुम्ही ताजेतवानेही राहाल आणि तुमचा मूड चांगला राहील. शिवाय अॅक्ने समस्याही दूर होईल. 

4. मेकअपचा वापर करू नका 

मासिक पाळी दरम्यान त्वचेला खूपच त्रास होत असतो. त्यामुळे तुम्ही या काळात जास्त मेकअप करू नका. यामुळे त्वचेमध्ये अधिक ब्रेकआऊट्स होऊ शकतात. तुम्ही नैसर्गिक मेकअप करा अथवा मेकअपशिवाय राहा. आपल्या चेहऱ्यावर या काळात ऑर्गेनिक उत्पादनांचा वापर करा. मासिक पाळी दरम्यान काही महिलांना अधिक घाम येतो त्यामुळे त्वचेचे पोर्स बंद होतील असा मेकअप करू नका. असं असेल तर मेकअप आणि घाम याचे एकत्रिकरण होऊन त्वचा अधिक खराब होते. 

चेहऱ्याचे क्लिंन्झिंग आणि मसाज 

तुम्हाला काळजी घ्यायची आहे की, मासिक पाळीदरम्यान चेहऱ्यावर ब्लोटिंग अधिक होते. त्यामुळे तुम्ही चेहऱ्यावर मसाज करा. चेहऱ्याची रोज स्वच्छता करा आणि कोणत्याही मॉईस्चराईंजिंग लोशन अथवा फेस ऑईलच्या मदतीने तुम्ही चेहऱ्याला कमीत कमी 5 मिनिट्स हलक्या हाताने मसाज करा. यासाठी तुम्ही क्लिन्झिंग बामचा वापर करा. ज्यामुळे चेहऱ्याची क्लिंन्झिंग आणि मसाज दोन्ही होईल. चेहऱ्याच्या लिंफेटिक नोड्स काढून टाकण्यास हे मदत करते आणि तुमच्या चेहऱ्याची ब्लोटिंगदेखील कमी होते. 

या टिप्स अत्यंत सोप्या आहेत आणि तुम्हाला वर सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीची अलर्जी तर नाही ना हे पाहूनच त्याचा वापर करा. आपल्या त्वचेचा हे योग्य वाटत असेल तर त्याच उत्पादनांचा वापर करून तुम्ही त्वचेची समस्या घालवू शकता. 

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

17 Mar 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT