परफेक्ट लुक मिळण्यासाठी योग्य मेकअप टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे. कारण छोट्याशा चुकीमुळेही तुमचा लुक बिघडू शकतो. मग ती साधी कॉम्पॅक्ट पावडर लावताना केलेली एखादी चूक का असेना. म्हणूनच कॉम्पॅक पावडर कशी लावावी हे प्रत्येकीला माहीत असायला हवं. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत, परफेक्ट लुकसाठी कसा करावा कॉम्पॅक्ट पावडरचा वापर करताना कोणत्या स्टेप्स फॉलो कराव्या. तसंच जाणून घ्या चेहऱ्यावर असतील वांग तर असा करा मेकअप | Face Makeup For Freckles In Marathi, Best Cruelty Free Makeup Brands In Marathi | बेस्ट विगन आणि क्रुअल्टी फ्री मेकअप ब्रॅंड, उन्हाळ्यात मेकअप कसा करावा | Tips For Summer Makeup In Marathi…
सर्वात आधी चेहरा स्वच्छ आणि मॉइस्चराइझ करा
कोणतेही मेकअप प्रॉडक्ट वापरताना सर्वात आधी चेहरा स्वच्छ करून मॉइस्चराईध करणं गरजेचं आहे. यासाठी नेहमी तुमच्या स्कीन केअर रूटीनमध्ये क्लिझिंग आणि मॉइस्चराइझिंग असायला हवं. यासाठी चेहरा स्वच्छ करा आणि चेहऱ्यावर चांगलं मॉइस्चराइझिंग क्रीम लावा.
कन्सीलर आणि फाऊंडेशनचा योग्य वापर
जर तुम्ही फक्त कॉम्पॅक्ट पावडर लावणार असाल तर ही स्टेप वगळली तरी चालेल. पण जर तुम्हाला परफेक्ट लुक हवा असेल तर योग्य पद्धतीने कन्सीलर आणि फाऊंडेशन चेहऱ्यावर लावून घ्या. ज्यामुळे तुमचा मेकअप बेस तयार होईल. कन्सीलरमुळे तुमचे डार्क सर्कल्स, चेहऱ्यावरील काळे डाग, पिगमेंटेशन लपवलं जाईल आणि फाऊंडेशनमुळे स्कीन टोन एकसारखा होईल.
कॉम्पॅक्ट पावडर लावताना…
स्कीन टोननुसार तुमच्यासाठी योग्य कॉम्पॅक्ट निवडा आणि एखाद्या छान फ्लपी पावडर ब्रशने ती चेहऱ्यावर लावा.
- ब्रशला पावडर लावल्यावर ती आधी झाडून ध्या आणि मगच ब्रश त्वचेवरून फिरवा.
- कॉम्पॅक्ट नेहमी चेहऱ्याच्या मधून लावण्यास सुरुवात करावी. शिवाय मान आणि संपूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित ब्लेंड करावी.
- कॉम्पॅक्ट लावताना मानेवर ती नीट लागली आहे का याची काळजी घ्या. नाहीतर तुमचा लुक विचित्र दिसू शकतो.
- कॉम्पॅक्ट लावताना तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार ती लावा. थोडक्यात तेलकट त्वचेसाठी संपूर्ण चेहऱ्यावर एकसमान मात्र कोरड्या त्वचेसाठी फक्त टी झोन आणि डोळ्यांच्या खाली असा वापर करा.
- जर तुम्ही टू इन वन कॉम्पॅक्ट वापरणार असाल तर चेहऱ्यावर आधी प्रायमर आणि फाऊंडेशन लावा आणि कॉम्पॅक्टचा वापर सेटिंग पावडरप्रमाणे करा.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक