ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
पैठणीपासून बनवा जॅकेट्स

दिसा एकदम रॉयल, वापरा पैठणी जॅकेट

‘पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा’ पैठणी साडीची ही ओळख आतापर्यंत सगळ्यांनाच आहे. साड्यांमध्ये पैठणीचा तोरा हा वेगळाच असतो. त्यामुळे कोणत्याही समारंभात पैठणी नेसली की तिचा लुक एकदम वेगळाच येतो. अशा या पैठणी साडीला डिझायनर लुक देऊन आणि त्यामध्ये विविधता आणली आहे. पैठणीमध्ये सध्या मुनिया, पिकॉक बॉर्डर, फ्लोरल बॉर्डर अशा साड्या पाहायला मिळतात. पैठणीचा हे रुप आता साडीमध्ये न राहता त्याचे रुपांतर आता वेगवेगळ्या डिझायनर पीसमध्ये झालेले आहे. खूप ठिकाणी हल्ली पैठणीचे जॅकेट हा प्रकार दिसू लागला आहे. पुरुष आणि स्त्री अशा दोघांसाठी जॅकेटचा हा प्रकार सध्या ट्रेंडमध्ये असून त्याची स्टायलिंग कशी करायची ते आता जाणून घेऊया.

पैठणी कोटी जॅकेट

पैठणी जॅकेट्स

खास मुलांसाठी तु्म्हाला पैठणी जॅकेट हवे असेल तर तुम्हाला असे मस्त जॅकेट शिवून मिळतात. त्यासाठी तुम्हाला पैठणी फाडायची गरज नाही. जेथे मेनूफॅक्चरींग चालते तिथे पैठणीचे खास कापड बनवले जाते. त्या कापडापासून जॅकेट बनवल्यामुळे ते अगदी परफेक्ट असतात. पुरुषांच्या कपड्यांमध्ये विविधता यावी यासाठी मुनिया, मोरांची जोडी, पोपट जोडी, ब्रोकेट असे कापड मिळते. त्यापासून स्लिव्हलेस कोटी जॅकेट मिळते. पुरुषांना खूप कमी पर्याय स्टायलिंगसाठी मिळतात. त्यामध्ये अधिक करुन कुडत्यावर घालण्यासाठी जॅकेट बनवले जाते. पण तुम्ही थोडे अधिक फॅशनेबल असाल तर तुम्हाला त्यामध्ये थोडी व्हरायटी आणून शिवून घेता येईल. यामध्ये तुम्हाला लाँग आणि शॉर्ट कोट शिवता येतील. ते देखील मुलांना घालता येतात. 

लेेडीज जॅकेट

 महिलांसाठी पैठणी हा म्हणजे जणू खजिनाच आहे. तुम्हाला मुलांना मॅच करणारे किंवा इंडो-वेस्टर्न ड्रेसवर घालण्यासाठी जॅकेट हवे असेल तर तुम्हाला बरीच विविधता मिळते. लग्नसराईसाठी साड्या बघताना पैठणी हमखास पाहिली जाते. छान गाऊन ड्रेसवर लुक आणायचा असेल किंवा एखाद्या साध्या ड्रेसला ट्रेंडी बनवायचे असेल तर तुम्ही असे मस्त जॅकेट शिवू शकता. पैठणीचे जॅकेट मुलींसाठी शिवताना तुम्हाला कोणत्याही स्टाईल्स करता येतात. तुम्ही जितके क्रिएटिव्ह असाल तर तुम्हाला देखील क्रिएटिव्हिटी वापरुन जॅकेट शिवता येऊ शकते. त्यामुळे तुम्हीही अगदी मस्त तुम्हाला हवे तसे जॅकेट्स घालू शकता.

मिनिमल दागिन्यांसह नवरीचा वेडिंग लुक, तरीही दिसाल आकर्षक

ADVERTISEMENT

खरी पैठणी असते महाग

पैठणी कापड

पैठणीचा मान जितका मोठा पैठणीची किंमत देखील जास्तच असते. त्यामुळे तुम्हाला हे जॅकेट  स्वस्तात मिळत नाही. तर त्यांची किंमत तुमच्या रोजच्या जॅकेटपेक्षा थोडी जास्त असते. पण असे जॅकेट म्हणजे एकदम रॉयल कारभार आहे. त्यामुळे तुमच्या वॉर्डरोबमध्ये असा एव्हरग्रीन पर्याय तुम्ही नक्कीच ठेवायला हवा. तो कायम छानच दिसतो. 

अशी घ्या काळजी

तुम्ही जर पैठणीचे जॅकेट बनवले असेल तर त्याची काळजी देखील तुम्हाला घेता यायला हवी. हे जॅकेट्स तुम्ही नीट ठेवायला हवे. साडीप्रमाणे त्याची घडी मोडावी लागत नाही. पण ते जॅकेट तुम्ही हँगरला अडकून ठेवले तर ते जास्त चांगले रागते. तुम्ही जॅकेट वापल्यानंतर त्याचे ड्राय क्लीन करा म्हणजे तुम्हाला त्याची स्वच्छता राखता येईल आणि ते जॅकेट जास्त दिवस टिकेल सुद्धा

आता पैठणी जॅकेटचा हा ट्रेंड तुम्ही नक्की फॉलो करा.  

11 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT