ADVERTISEMENT
home / Bridal Skincare
how to make turmeric paste for wedding in marathi

लग्नात हळदीच्या विधीसाठी कशी तयार करावी हळद

लग्नकार्यातील एक महत्त्वाचा विधी म्हणजे हळद समारंभ…आपल्याकडे जशी लग्नात उखाणे घेण्याची परंपरा आहे. तसंच लग्नाच्या आधी अथवा लग्नकार्यांच्या आदल्या दिवशी हळदीचा विधी केला जातो. लग्नाआधी वधूवरांना हळद लावणं भारतीय संस्कृतीमध्ये शुभ मानलं जातं. हळद लावण्यामुळे वधुवरांचे सौंदर्य खुलते, त्वचा निरोगी होते आणि मनालाही शांतता मिळते. पूर्वी घरातील नैसर्गिक हळकुंड कुटून त्यापासून हळद बनवली जात असते. मात्र काळानुसार आता ही पद्धत सोयीची नसल्यामुळे हळदीच्या तयार पावडरपासूनच हळदीचा लेप बनवला जातो. आजकाल हळदीमध्ये भेसळ असण्याची शक्यता असल्यामुळे वापण्यापूर्वी ती नीट तपासून घ्यावी. शिवाय हळदीसोबत इतर काही घटक लेपमध्ये वापरावेत ज्यामुळे वधुवरांला हळदीची अॅलर्जी होणार नाही.

असा तयार करा वधूवरांसाठी खास हळदीचा लेप

how to make turmeric paste for wedding in marathi

वधू अथवा वराला हळद लावण्यापूर्वी घरात खास हळद तयार केली जाते अथवा चांगल्या गुणवत्तेची हळद विकत घेतली जाते. त्यामुळे तुम्ही जर काळानुसार हळदीची तयार पावडर वापरणार असाल तर असा तयार करा हळदीचा लेप.

  • हळदीचा लेप तयार करण्यासाठी तुम्ही हळदीच्या पावडरमध्ये बेसन, गुलाबजल, चंदन पावडर, काकडीचा रस अथवा दूध, दही  मिसळू शकता.
  • एका मोठ्या बाऊलमध्ये हे सर्व साहित्य घ्या आणि त्यानुसार हळदीचा लेप तयार करा.
  • बेसन, चंदनपावडरमुळे त्वचेला थंडावा मिळतो.
  • हळद उष्ण असल्यामुळे त्यात गुलाबपाणी, दूध अथवा दही मिसळल्यास चांगला फायदा होतो.
  • त्यामुळे या सर्व घटकांपासून बनवलेली हळद वधूवरांसाठी लाभदायक ठरते.

हळदीच्या दुधाचे फायदे वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य, करून घ्या फायदा

हळदीचा वधूवरांवर काय होतो परिणाम 

भारतीय पंरपरेनुसार पिवळा रंग हा शुभकार्यासाठी अतिशय लाभदायक मानला जातो. यासाठीच लग्नातील वधूवरांचे वस्त्रदेखील पिवळेच असते. शिवाय भारतात हळद पवित्र मानली जाते ज्यामुळे लग्नात वधूवरांना हळद लावण्याची परंपरा पडली असावी.तसंच

ADVERTISEMENT
  • हळद अॅंटि बॅक्टेरिअल, अॅंटि बायोटिक असल्यामुळे हळदीमुळे त्वचा मुळापासून स्वच्छ होते आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.
  • हळद आरोग्यासाठी लाभदायक असल्यामुळे लग्न कार्यात वधूवरांना हळद लावण्याची पद्धत आहे
  • ज्यांची त्वचा अती संवेदनशील अथवा तेलकट असते ज्यांना मात्र हळदीचा लेप लावताना विशेष काळजी घ्यावी लागते.कारण हळद ही उष्ण असते शिवाय हळद लावताना ती गालावर अथवा चेहऱ्यावर रगडून लावतात अशाने त्वचेचं नुकसान होऊ शकतं.अशा वेळी हळदीचा लेप लावताना त्यामध्ये हळद कमी प्रमाणात मिसळावी. ज्यात प्रमाणात चंदन पावडर, बेसन असेल तर त्रास कमी होतो. 
  • अती संवेदनशील त्वचेच्या लोकांवी हळदीचा लेप आधी हात-पायावर लावून पाहावा त्रास झाला नाही तरच चेहऱ्यावर हळद लावावी. 
01 Dec 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT