हळदीच्या दुधाचे फायदे (Turmeric Milk Benefits In Marathi) अनेक आहेत. आरोग्य आणि सौंदर्य या दोन्हीसाठी दूध हळद पिण्याचे फायदे होतात. रोजच्या आरोग्याच्या तक्रारीपासून हळदीचे दूध तुम्हाला दूर ठेवण्यास मदत करते. अनादी काळापासून हळदीच्या दुधाचे फायदे सांगण्यात आले आहेत. अगदी आयुर्वेदातही याचा उल्लेख आहे. घसा खवखवणे, घशाला आलेली सूज, सर्दी, कोरडा खोकला यासारख्या सामान्य आजारांवर दूध हळद पिण्याचे फायदे मिळतात. पण नेहमी आपल्याला प्रश्न पडतो की आपल्याला आई लहानपणापासून अगदी मोठेपणीही हळदीचे दूध पी असं का सांगते. आजारी पडल्यानंतर हळद नेहमीच आरोग्यासाठी चांगले समजण्यात येते. या लेखातूनही आम्ही तुम्हाला हळदीच्या दुधाचे फायदे नक्की काय होतात, ते सांगणार आहोत. यासोबतच तुम्ही गीर गायीच्या दुधाचे फायदेही नक्की वाचा.
हळदीचे दूध हे नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. अगदी लहानपणापासून आपल्याला आई दूध हळद पिण्यासाठी देते. पण तेव्हा त्याचे नक्की काय फायदे असतात हे कळत नाही. त्याचे नक्की काय फायदे आहेत ते आपण स्पष्टीकरणासह पाहू.
जेव्हा सर्दी आणि खोकला होतो तेव्हा संपूर्ण अंग दुखू लागतं आणि डोक्यामध्ये खूप दुखू लागतं पण प्रत्येकवेळी आपण डॉक्टरांकडे धावत जात नाही. साधं सर्दी पडसं असेल तर हळदीच्या दुधाचा फायदा आपल्याला होता. हळदीचे दूध प्यायल्याने शरीर रोगाशी लढते आणि पुन्हा एकदा तुमच्या शरीरात प्रतिकारशक्ती वाढून तुम्हाला सर्दी खोकल्यातून बरे करण्याचे काम करते. अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुण वाढवण्याचे काम हळदीचे दूध करते. त्यामुळेच सर्दी आणि खोकल्यापासून बचाव करण्यासाठी हळदीच्या दुधाचा फायदा होतो.
हळदीमध्ये आढळणाऱ्या करक्युमिनमुळे हळदीच्या दुधाचे फायदे वाढतात. याशिवाय यामध्ये जास्त प्रमाणात अँटी इन्फ्लेमेटरी गुणही आहे आणि हळदीचे दूध हे कॅल्शिमययुक्त असून यामुळे हाडांना मजबूती मिळते. करक्युमिन आणि कॅल्शियमचे मिश्रण हे शरीरातील हाडांना अधिक मजबूती मिळवून देतात. त्यामुळेच सांधेदुखी आणि हाडांशी संबंधित काही आजार असतील तर हळदीचे दूध नियमित पिणे योग्य ठरते. तुम्ही नियमित प्यायल्यास, तुम्हाला स्वतःला याचा परिणाम दिसून येईल. ऑस्टियोपोरोसिस आणि अन्य सांधेदुखी समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकता.
सध्याच्या काळात कोरोनाची लक्षणे (Corona Symptoms In Marathi) दिसताच प्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. प्रतिकारशक्ती अधिक वाढविण्यासाठी अँटिऑक्सिडंटचे सेवन करणे गरजेचे आहे. हळदीच्या दुधातून अँटिऑक्सिडंट्स मिळतात आणि हळदीच्या दुधाचे फायदे म्हणून तुम्ही प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नियमित सेवन करू शकता. हे शरीरातील इन्फेक्शन आणि अन्य आजारांशी लढण्यासाठीही फायदेशीर ठरते. तसंच तुमच्या शरीराला आतूनही निरोगी ठेवण्यास याची मदत मिळते.
हळदीच्या दुधाचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे यात अँटीइन्फ्लेमेटरी, अँटिबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुण असतात. या घटकांमुळे तुम्हाला आजारांशी लढण्यास मदत मिळते. धावताना पडल्यास, अचानक अपघात अथवा सर्जरी झाली असेल तर तुम्ही नियमित दूध हळद प्यावे. औषधांसह तुम्ही हळदीच्या दुधाचे सेवन करणेही तितकेच गरजेचे आहे. शरीरावरील जखम लवकर भरण्यास यामुळे मदत होते. हळद ही अँटिसेप्टिक असल्याने शरीराला लवकर फायदा होतो.
एक ग्लास हळदीचे दूध प्यायलाने तुम्हाला हळदीच्या दुधाचे फायदे मिळू शकता. तुमच्या लिव्हरमधील सर्व घाण काढून टाकण्यास याची मदत मिळते. त्यामुळे तुम्ही अधिक तजेलदार दिसू लागतात. एका शोधानुसार, हळदीमध्ये असणारे करक्युमिन शरीरातील एंडोथेलियल फंक्शन सुधारण्यासाठी मदत करते. त्यामुळे रक्तप्रवाह चांगला होतो. रक्त शुद्ध राहते आणि शरीराला शुद्ध रक्ताचा पुरवठा होत राहिल्याने तुमची त्वचाही अत्यंत चमकदार राहाते.
हळदीच्या दुधाने शरीराशी निगडीत अनेक आजार दूर होण्यास मदत मिळते. मासिक पाळीच्या वेळी हळदीच्या दुधाचे सेवन करणे चांगले ठरते. मासिक पाळीच्या वेळी पोटात, पायात गोळा येणे हे साहजिक असते. अशावेळी हळदीच्या दुधाने महिलांना अधिक चांगले वाटते. तसंच गरोदर महिलांसाठीही हळदीचे दूध पिणे चांगले ठरते. बाळासाठी अंगावरील दूध वाढविण्यास आणि बाळाला पोटात सुरक्षित ठेवण्यासाठीही गरोदर महिला दिवसातून एकदा याचा वापर करून घेऊ शकतात.
हळदीच्या दुधाचे फायदे हे आरोग्य आणि बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी होतात. पण सौंदर्यासाठीही याचा उपयोग होतो. हळदीच्या दुधामध्ये असणारे मायक्रोबियल आणि अँटिइन्फ्लेमेट्रीमुळे याचा लाभ मिळतो. तुमची त्वचा अधिक चमकदार आणि तजेलदार होते. तसंच चेहऱ्यावरील मुरूमं जाण्यास आणि सुरकुत्या हटविण्यासही याचा फायदा मिळतो. रोज हळदीचे दूध प्यायल्याने चेहरा उजळतो. हळदीमध्ये करक्युमिन असल्याने त्यामध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. यामुळे चेहऱ्यावर येणारी मुरूमं नष्ट होण्यास मदत मिळते आणि त्वचेवरील काळे डाग निघून जातात. रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्याने चांगली झोपही लागते. त्यामुळे त्वचा अधिक चमकदार दिसते. त्यामुळेच अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्येही हळदीचा वापर केला जातो. सौंदर्य वाढविण्यासाठी याचा उपयोग होतो.
मासिक पाळीचा त्रास अनेक महिलांना असतो. अशावेळी नक्की काय करायचं आणि काही नाही हेदखील कळत नाही. विशेषतः पोटात दुखणे आणि पोटातून सतत कळा येणे हा त्रास अत्यंत कॉमन आहे. हळद हे आयुर्वेदिक औषध म्हणूनही वापरले जाते. मासिक पाळीच्या दिवसात तुम्ही हळदीच्या दुधाचा फायदा करून घेऊ शकता. नियमित तुम्ही हळदीचे दूध प्यायल्यास मासिक पाळीचा त्रास कमी होतो. पोटातील दुखणेही कमी होते.
आजकालच्या जीवनशैलीमुळे अनेकांना खूपच लहान वयात मधुमेहसारख्या आजारांना सामोरं जावं लागतं. सतत चहा कॉफीचं सेवन करून शरीरातील साखर वाढविण्यापेक्षा दिवसातून एक वेळा तुम्ही हळदीच्या दुधाचे सेवन करा. हळदीच्या दुधाचा फायदा मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी नक्कीच होतो. तुम्ही याचा व्यवस्थित वापर करून घ्या.
केसांसाठीही हळदीच्या दुधाचा फायदा होतो. हळदीचे दूध केसांना मुळापासून पोषण देते. तसंच केसांमध्ये येत असणारी खाज, पातळ केस आणि सूज यासारख्या समस्यांपासूनही सुटका मिळते. यामुळे फंगल इन्फेक्शनही निघून जाते. केसगळती होत असल्यास, तुम्ही नियमत दूध हळद प्यावे. याशिवाय हे केसांना अधिक चांगली मजबूती देण्यासही उपयोगी ठरते. हळदीमध्ये असणारे अँटिसेप्टिक आणि अँटिइन्फ्लेमेटरी गुणधर्म केसांना अधिक चांगली मजबूती मिळवून देतात. हळद दूध पिण्याने केसातील कोंडा कमी होण्यासही मदत मिळते.
हळद दूध पिण्याचे फायदे जसे आहेत, तसंच कोणतीही गोष्ट अति करू नये असं सांगितले जाते. हळद दूध पिण्याचे नुकसान देखील आहे.
सूचना – ज्यांना कोणतीही अलर्जी असेल अथवा कोणताही त्रास असेल अशा व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हळदीचे दूध प्यावे.
दिवसातून एक ग्लास हळदीचे दूध पिणे लाभदायक ठरते. कारण यामध्ये अँटिमायक्रोबियल, अँटीइन्फ्लेमेट्री गुण असतात. साधारण तुम्ही 4 आठवडे अर्थात एक महिना नियमित हळदीचे दूध प्यायलात तर त्याचे फायदे दिसायला सुरूवात होते.
सर्वात पहिले दूध उकळून घ्या. त्यानंतर त्यात चिमूटभर हळद मिक्स करा. तुम्ही साखरेशिवायही हे हळदीचे दूध पिऊ शकता. तुम्हाला गोडवा हवा असेल तर तुम्ही साखर अथवा गूळ मिक्स करा. हळदीचे दूध सहसा गरम अथवा कोमट प्यावे. थंड करून पिऊ नये.
अर्धा कप दूध अर्थात 120 एमएल दूध असेल तर अगदी लहान चमचा हळद पावडर घालवा. कप लहान असेल तर अगदी चिमूटभर हळदही दुधात चालते.
हळदीच्या दुधाचे फायदे अनेक आहेत. तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. तुम्हीही नियमित हळदीचे दूध प्या आणि आपले आरोग्य चांगले राखा.