ADVERTISEMENT
home / Dad
How To Make Your Dad Happy

तुमच्या वडिलांना आनंदी ठेवण्याची गुरूकिल्ली (How To Make Your Dad Happy)

 

प्रत्येकालाच आपल्या वडिलांसोबतच नातं हे चांगल आणि आनंदी असावं असं वाटत असतं. बाबांसाठी कविता करावीशी वाटते. जेव्हा तुमचे वडील आनंदी असतात तेव्हा तुम्हालाही आनंद मिळतो. तुमच्या वडिलांना खूष करणंही सोपी गोष्ट नक्कीच नसते. खासकरून शालेय जीवनाच्या दिवसात नाही का? तर तारूण्यात आपल्यातले आणि त्यांच्यातले अंतर वाढतानाच दिसते. पण तुम्ही तुमच्या वागण्यात काही बदल केल्यास तुम्ही नक्कीच पुन्हा त्यांच्या जवळ जाऊ शकता आणि पुन्हा सुखी कुटुंब अनुभवू शकता.

बाबांसोबत वेळ घालवा (Spend Time With Him)

 

तुमच्या कामाच्या व्यापातून खास बाबांसाठी वेळ काढणं सोपं नाही पण जमवता येऊ शकता. जसं तुमचे बाबा लहानपणी तुमच्यासाठी काढत असतं. त्यांच्यासोबत वेळ घालवा. त्यांची विविध विषयांवरची मतं जाणून घ्या. यामुळे तुमचं नातं अजून छान होईल. दिवसातून एकदा तरी त्यांच्यासोबत जेवा. दिवसभरातल्या गोष्टी त्यांना सांगा. त्यांचा दिवस कसा गेला जाणून घ्या. घरातील महत्त्वाच्या गोष्टी आणि निर्णयांबाबत त्यांच्याशी बोला. कारण त्यांच्या अनुभवातून तुम्हाला नक्कीच चांगलं मार्गदर्शन मिळेल.

वादविवाद टाळा (Avoid Clashes)

Avoid Clashes With Father

 

उलट उत्तर देणं हे टाळण्यासारखं नसतं. खासकरून जेव्हा एखाद्या मुद्द्यावर तुमचं एकमत नसतं किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीची परवानगी अगदी लगेच हवी असते. पण स्वयंशिस्त पाळा आणि आपल्या वडिलांसोबत एखादा वादाचा प्रसंग आल्यास तो टाळा. राग आला तरी त्यावर नियंत्रण ठेवा, शांतपणे घ्या, दीर्घश्वास घ्या आणि स्वतःवर नियंत्रण मिळवा. पण बाबांना त्रास होईल असं काही करू नका. कारण तुम्हाला जेवढा त्रास होईल त्याच्या दुप्पट त्रास त्यांना होईल.

ADVERTISEMENT

happiness quotes in marathi

बाबांशी सल्लामसलत करा (Take Advice)

शाळा, कॉलेज किंवा ऑफिस असो किंवा एखाद्या गुंतवणुकीबाबत असो आपल्या वडिलांचा सल्ला घ्यायला विसरू नका. कारण त्यांचा अनुभव तुमच्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. त्यांची मत जाणून घ्या. तुम्ही केलेला विचार त्यांना सांगा. जरी त्यांना एखाद्या गोष्टीचा अनुभव नसला तरी ती गोष्ट कशी हाताळावी याबाबत ते नक्कीच काही सुचवू शकतील. तुम्ही अशाप्रकारे त्यांना विचारल्यावर ते नक्कीच खूष होतील.

प्रेम करा (Show Love)

प्रेम करा

आईवरचं प्रेम आपल्या कृतीतून बरेचदा आपण दाखवतो. पण बाबांच्या बाबतीत हे क्वचित होतं. पण फादर्स डे च्या शुभेच्छा आणि गिफ्ट पुरता हा दिवस मर्यादित न ठेवता. त्यांच्यावर तुमचं किती प्रेम आहे हे दाखवून द्या. त्यांना मिठी मारा, त्यांचा हात हातात घेऊन ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत ते सांगा. कारण स्पर्शाने बऱ्याच गोष्टी लवकर कळतात. त्यांना अगदीच आवडत नसल्यास आशिर्वाद घ्या.

ADVERTISEMENT

बाबांचा मूल्याची कदर करा (Care About His Values)

तुमच्या बाबांच्या मूल्याची कदर करायला शिका. त्यांनी शिकवलेल्या गोष्टी फॉलो करा. जे त्यांनी तुम्हाला लहानपणापासून शिकवलं आहे. ते पुढेही कायम ठेवा आणि तसंच वागायचा प्रयत्न करा. यामुळे त्यांना नक्कीच आनंद मिळेल. त्यांच्यासारखी वेळ पाळणे किंवा कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणा, अगदी त्यांच्यासारखं टापटीप राहणे हे सुद्धा त्यांना सुखावून जाईल.

घरकामात हातभार (Help In House Chores)

घरातील छोटी छोटी कामं करायचा आपण कधीकधी कंटाळा करतो. पण एकदा वडिलांनी सांगण्याआधी घराच्या बाबतीतलं एखादं काम करा. पाहा, त्यांना किती बरं वाटेल. घरातील जबाबदाऱ्या त्यांना न सांगता उचला आणि त्यांना आश्चर्यांचा सुखद धक्का द्या. अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनच आईवडिलांना जास्त आनंद मिळत असतो.

पुढाकार घ्या (Take Initiative)

वर सांगितल्याप्रमाणेच घरात ज्या गोष्टी लागणार आहेत किंवा करण्याची गरज आहे. ते बाबांनी सांगण्याआधी स्वतः पुढाकार घेऊन करा. त्याचा भार हलका करा. अगदी मोठ्या नाही पण छोट्या छोट्या गोष्टी करूनही तुम्ही पुढाकार घेऊ शकता. जसं त्यांच्यासोबत एखाद्या सणाची तयारी करणे. ते बाहेर पडताना त्यांना पाकिट, रूमाल किंवा इतर गोष्टी हातात देणे.

फोन आणि इंटरनेटचा वापर (Responsible Use Of Mobile And Internet)

पैश्यांचा जबाबदारीपूर्ण वापर

ADVERTISEMENT

आता तुम्ही म्हणाल याचा आणि बाबांच्या आनंदाचा काय संबंध. पण बदलत्या काळात या गोष्टीही नात्यांशी निगडीत ठरत आहेत. जोपर्यंत तुमचे बाबा तुमच्या फोन आणि इंटरनेटची बिलं भरत आहेत. तोपर्यंत त्याचा वापर समजूतदार आणि जबाबदारीने करा. वडिलांचे पैसे आहेत म्हणून या गोष्टींचा कसाही वापर करू नका.

भावंडाची काळजी घ्या (Take Care Of Your Siblings)

घरी आल्यानंतर बाबांना घरात शांत आणि आरामदायक वाटेल, याची काळजी घ्या. भांडणारी मुलं किंवा मस्ती करणारी मुलं पाहून कोणालाही आनंद वाटणार नाही. त्यामुळे तुमच्या लहान भावंडाची काळजी घ्या आणि मोठी भावंड असल्यास त्यांचं ऐका. एकमेकांना मदत करा. लहान भावंडाची जबाबदारी बाबांसोबत वाटून घ्या.

अभ्यासात चमकदार कामगिरी (Good Performance In Studies)

अभ्यासात चमकदार कामगिरी

आपल्या मुलाचं यश हे आईवडिलांना कित्येकपटीने आनंद देऊन जातं. अगदी त्यांना मिळालेल्या यशापेक्षा आपल्या मुलांच्या यशाचं त्यांना जास्त कौतुक असतं. त्यामुळे शालेय आणि कॉलेज जीवनात मन लावून अभ्यास करा आणि यश मिळवा. काही अडचण असल्यास मोकळेपणाने पालकांना सांगा. त्यांची मदत घ्या.

ADVERTISEMENT

शाळेतील चांगली वर्तवणूक (Best Behavior In School)

अभ्यासासोबत जर तुम्ही शाळेत चांगले विद्यार्थी म्हणून ओळखले जाल तर तुमच्या बाबांना नक्कीच आनंद होईल. कारण तुमच्यामुळे त्यांचंही नाव उंचावेल. तुमच्या शिक्षकांशी चांगलं वागा. शाळेत चांगलं वर्तन ठेवा. या गोष्टी कोणत्याही महागड्या गिफ्टपेक्षा वडिलांना प्रिय आहेत.

चांगला मित्रपरिवार (Good Friend Circle)

चांगला मित्रपरिवार

तुमच्या बाबांना दाखवून द्या की, तुम्ही समोरच्याला कसं चांगलं पारखू शकता. तुमच्या शाळेतील आणि इतर मित्रपरिवारामुळे हे तुमच्या वडिलांना नक्कीच कळेल. तुमच्या चांगल्या मित्रपरिवामुळे तुमच्या भविष्याबाबतीतली त्यांची चिंता दूर होईल. कधीही आपल्या मित्रांमुळे आईवडिलांना फसवू नका. 

वरील छोट्या छोट्या गोष्टींतून तुम्ही आपल्या वडिलांना आनंदी ठेवू शकता आणि त्यांचा आधारही होऊ शकता.

ADVERTISEMENT
26 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT