ADVERTISEMENT
home / Planning
पैसे वाचवायचे असतील तर ब्राईडने या गोष्टी टाळाव्यात

पैसे वाचवायचे असतील तर ब्राईडने या गोष्टी टाळाव्यात

स्वत: च्या लग्नात करावा तितका थाट हा कमीच असतो. प्रत्येक मुलीला सगळे काही आपल्याकडे असावे अस या काळात वाटते. पण असे करताना कधी कधी फारच अनाठायी खर्च होतात. घेतलेली कोणतीही वस्तू ही वापरली जात नाही. त्यामुळे सरतेशेवटी पैसे वाया गेले असे वाटू लागते. लग्न म्हटले की, प्रत्येकाचे एक बजेट असते. नवरीसाठी बजेट नेहमीच जास्त असले तरी देखील काही गोष्टी करायच्या नसताना देखील केल्या जातात. याचा परिणाम पैसे वाया तर जात नाहीत ना असे वाटू लागते. तुमचेही लग्न ठरले आहे आणि तुमच्या लग्न खरेदीला सुरुवात झाली असेल तर तुम्ही ब्राईड म्हणून खरेदी करताना काय चुका टाळायला हव्यात आणि पैसे वाचवायला हवेत ते जाणून घेऊया

प्रिय बहिणीच्या लग्नासाठी भावाने नक्कीच कराव्या ‘या’ गोष्टी

भारंभार खरेदी टाळा करा यादी

लग्न ठरण्याचा आनंद हा आपल्याला इतका झालेला असतो की, इतक्या दिवसात मनात साठवून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी आपण आताच घेऊन टाकायच्या असा निर्णय घेतो. त्यामुळे होतं असं की, भारंभार गोष्टी खरेदी केल्या जातात. पण याच गोष्टीमुळे खूप जास्त खर्च होतो हे काही आपल्याला कळत नाही. हाच खर्च तुम्हाला टाळायचा असेल तर तुम्ही एक तास काढा शांत बसा आणि लग्नासाठी नेमके कोणकोणते कार्यक्रम होणार आहेत याची एक यादी करा. कारण ती यादी केल्यानंतरच तुम्हाला कळू शकेल की, तुम्हाला कोणत्या कार्यक्रमासाठी कोणते आऊटफिट लागणार आहेत. त्यानुसार त्यावर लागणारी ज्वेलरी, चपला हे सगळे काही तुम्ही घ्या. त्याचा एक सेटच तुम्ही तयार करा. असा सेट केल्यानंतरच तुम्हाला कळेल की, तुम्हाला काय घ्यायचे आहे आणि काय नाही.

खरेदीला उपस्थित राहा

खूप मुली खरेदी सुरु झाली की, आपल्या वेगळ्यात झोनमध्ये निघून जातात. जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी त्या बाहेर पडतात. त्यामुळे त्यांना हवी असलेली खरेदी करताना घरातल्यांनाही अडथळा निर्माण होतो. शक्य असेल त्यावेळी तुम्ही सगळ्या खरेदीला उपस्थित राहा. तुम्ही जोडीदारासोबत तुमची खरेदी करा.  पण खरेदीच्यावेळी तुम्ही उपस्थित राहा. कारण त्यामुळे इतर गोंधळ निर्माण होत नाही.

उदा. खूप वेळा ब्राईड या खरेदीकडे लक्ष देत नाहीत. अगदी टेलर आणि ब्लाऊज फिटींगलाही जात नाही. त्यामुळे होतं असं की,  कार्यक्रमांच्या दिवशी फिटींगलाही अडथळा निर्माण होतो. ब्राईड यांचे स्ट्रेसमुळे वजन कमी जास्त होत असते. त्यामुळे लग्नाचे कपडे वरचेवर घालणेही गरजेचे असते. खूप जण या काळात डाएट करतात. त्या डाएटमुळेही वजन कमी जास्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही कपड्यांची निवड करताना उपस्थित राहायलाच हवे. 

ADVERTISEMENT

घरात लग्नकार्य आहे? मग पूर्वतयारीसाठी तुम्ही हे वाचायलाच हवे (Wedding Planning Tips In Marathi)

गरजेच्या गोष्टी ठरवा

लग्न म्हटले की, संगीत, मेंदी असे काही वेगवेगळे कार्यक्रम येतात. त्यामुळे या सगळ्या कार्यक्रमांसाठी वेगवेगळी तयारी करावी लागते. हल्ली तर प्री वेडींग शूटचाही मोठा घाट असतो. अशावेळी प्रत्येक कपडे नवीन घेण्यापेक्षा तुम्ही आहे त्या कपड्यांमध्ये किंवा रेेंटेड कपडे घेऊनही हे शूट करु शकता. खूप कपड्यांची खरेदी केल्यामुळे फोटो चांगले येतीलच असे नाही. त्यामुळे फोटोग्राफरशी योग्य सल्ला घेऊन तुम्ही  त्याची खरेदी करा. मेंदी डिझाईन्स त्याचा खर्च या संदर्भात रेट फिक्स करुन घ्या. त्यामुळे तुमची आयत्यावेळी घाई होणार नाही.


आता पैसे वाचवायचे असतील तर या गोष्टी लक्षात ठेवा. 

लग्नात जोडप्याला देण्यासाठी ’10’ गिफ्ट्स आयडियाज, ज्या आहेत स्वस्त आणि मस्त (Gift Ideas For Couple In Marathi)

ADVERTISEMENT

 

09 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT