एखाद्या खास कार्यक्रमासाठी अथवा चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो येण्यासाठी महिन्यातून एकदा फेशिअल केलं जातं. बऱ्याचदा खास ग्लो येईल असे प्रॉडक्ट वापरूनही चेहऱ्यावर हवा तसा ग्लो येत नाही. त्यामुळे मग फेशिअल करूनही काहीच फायदा झालेला दिसत नाही. असं होण्यामागचं महत्त्वाचं कारण फेशिअल दरम्यान घेण्यात येणारी स्टीम असू शकते. फेशिअल करताना चेहऱ्यावरील पोअर्स मोकळे होऊन प्रॉडक्ट त्वचेत मुरण्यासाठी स्टीम दिली जाते. मात्र जर तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार स्टीम घेतली नाही तर तुमच्या त्वचेवर हवा तसा ग्लो येत नाही. यासाठी जाणून घ्या कोणत्या त्वचेसाठी कधी आणि कितीवेळ वाफ घ्यावी.
चेहऱ्यावर वाफ घेण्याचे फायदे (Vaf Ghenyache Fayde In Marathi)
कोरडी त्वचा –
जर तुमची त्वचा कोरड्या प्रकारची असेल तर त्वचेमधील तेलकटपणा कमी झाल्यामुळे तुमची त्वचा निस्तेज दिसते. अशा कोरड्या त्वचेवर जर फेशिअल करणार असाल तर जास्त वाफ घेणं मुळीच योग्य नाही. फेशिअल करताना कोरड्या त्वचेवर पाच मिनीट पेक्षा जास्त वाफ घेऊ नये. याचं कारण असं की स्टीममुळे तुमची त्वचा जास्त कोरडी होते. महिन्यातून एकदा फेशिअल करताना पाच मिनीटे तुम्ही स्टीम घेऊ शकता. मात्र त्वचेवर जास्त वाफ येणार नाही याची काळजी अवश्य घ्या.
घरच्या घरी करा गोल्ड फेशिअल, फॉलो करा या स्टेप्स
तेलकट त्वचा –
तेलकट त्वचेमध्ये सीबमची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असते ज्यामुळे त्वचेवर तेलकट थर जमा होतो. तेलकटपणामुळे त्वचेवर मोठ्या प्रमाणावर पिंपल्स निर्माण होतात. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर फेशिअल दरम्यान वाफ घेताना त्या पाण्यामध्ये तुम्ही एखादं अरोमा ऑईल अथवा इसेंशिअल ऑईल मिसळू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा जास्त तेलकटही होणार नाही जास्त कोरडी देखील होणार नाही.
तेलकट त्वचेसाठी हे आहेत बेस्ट वाईप्स (Best Wipes For Oily Skin In Marathi)
एजिंग त्वचा –
चाळीशीनंतर अथवा वयस्कर महिलांनी फेशिअल करताना योग्य प्रमाणात वाफल घेतली तर तुमच्या त्वचेवर लगेच टवटवीतपणा दिसू शकतो. फाईन लाईन्स कमी करण्यासाठी तुम्ही स्टीम घेण्यापूर्वी व्हिटॅमिन ए आणि ईच्या कॅप्सुल्स चेहऱ्यावर लावू शकता. ज्यामुळे स्टीमसोबत त्यातील तेल तुमच्या त्वचेत चांगलं मुरू शकतं. वाफ घेण्याच्या पाण्यामध्ये आयुर्वेदिक हर्ब्सचा वापर केल्यास त्वचेवर लवकर आणि खूप काळ टिकणारी चमक दिसू लागते.