ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
सतत एसीमध्ये बसून होतेय त्वचा कोरडी, वापरा घरगुती उपाय

सतत एसीमध्ये बसून होतेय त्वचा कोरडी, वापरा घरगुती उपाय

एसी (air condition or ac) चा सगळ्यात जास्त वापर हा उन्हाळ्यातच होत असतो. एसीमध्ये दिवसरात्र बसून काम करायला जरी बरं वाटत असलं तरीही सतत एसीच्या हवेमध्ये बसून त्वचेचे खूपच नुकसान होते याची तुम्हाला कल्पना आहे का? एसीमधून निघणारी थंड हवा ही त्वचेतील मुलायमपणा कमी करून त्वचा अधिक कोरडी आणि निस्तेज बनवते. पण तुम्हाला यापासून सुटका हवी असेल तर काही घरगुती उपाय आहेत. आम्ही लेखातून तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत. तुमचीही त्वचा सतत एसीमध्ये बसून कोरडी होत असेल तर तुम्ही हे सोपे उपाय नक्की वापरून पाहा.

दह्याचा करा वापर

दह्याचा करा वापर

Shutterstock

तासनतास एसीच्या हवेत राहिल्यास, त्वचा खूपच कोरडी होते. त्यामुळे त्वचेवर काळे डाग येऊ लागतात. असं असेल तेव्हा तुम्ही दह्याचा वापर करून त्वचेचा मसाज करू शकता. दह्यामध्ये अँटिबॅक्टेरियल, अँटिइन्फ्लेमेटरी गुण आढळतात, जे तुमच्या त्वचेमधील मुलायमपणा राखण्यास मदत करतात. दह्याचा वापर केल्याने चेहऱ्यावरील डाग आणि काळेपणाही दूर होतो. तसंच त्वचा अधिक मुलायम आणि चमकदार होण्यास मदत करते. चेहऱ्यावर केवळ 10 मिनिट्स मसाज करा आणि मग कोमट पाण्याने चेहरा धुवा. त्वचेचा कोरडेपणा निघून केलेला तुम्हाला दिसेल. दह्याचा वापर तुम्ही नियमितही करू शकता. जेणेकरून तुमची त्वचा अधिक मुलायम आणि मऊ राहील. 

ADVERTISEMENT

चमकदार आणि डागविरहित त्वचेसाठी वापरा दह्याचे फेशियल

जास्त पाणी प्या

जास्त पाणी प्या

Shutterstock

एसीमध्ये बसल्यामुळे तहान लागत नाही. पण असं करून अजिबात चालत नाही. एसीमध्ये तुम्ही पूर्ण दिवस राहिलात तरीही तुम्ही पाण्याचे सेवन करायलाच हवे. दिवसातून किमान 8 ग्लास पाणी हे पोटात जायलाच हवं. अन्यथा त्वचा कोरडी होते. त्यामुळे तुम्ही पाणी किमान 3 लीटर प्या आणि त्यामुळे चेहऱ्यावरील मऊपणा आणि त्वचा मऊ राहू शकेल. तसंच चेहऱ्यावरील चमकदारपणाही व्यवस्थित टिकविण्यासाठी पाणी पिणे गरजेचे आहे. 

ADVERTISEMENT

मध

मध

Shutterstock

मधामध्ये पोषक तत्व, अँटिऑक्सिडंट आढळतात. जे त्वचेला मॉईस्चराईज करण्यसााठी उपयुक्त ठरतात. मध त्वचेच्या आतपर्यंत जाऊन नैसर्गिक मुलायमपणा टिकवून ठेवते. चेहऱ्यावर एक चमचा मध लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. साधारण 10 मिनिट्स मसाज करा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ करा. मधाचा वापर करून चेहऱ्याचा कोरडेपणा कमी करा. 

डोळ्यांखाली झालेल्या काळ्या वर्तुळांपासून सुटका देईल मध

ADVERTISEMENT

नारळाचे तेल

नारळाचे तेल

Shutterstock

त्वचेचा मुलायमपणा राखण्यासाठी नारळाच्या तेलाचा वापर करू शकता. नारळाचे तेल वापरून त्वचा अधिक मऊ होते. मुलायम आणि चमकदार त्वचेसाठी नारळाच्या तेलाने तुम्ही सर्क्युलर मसाज करा आणि 10 मिनिट्सने चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. एसीमुळे कोरडी झालेली त्वचा मऊ करण्यासाठी हा सर्वात सोपा घरगुती उपाय आहे. 

 

ADVERTISEMENT

दुधाची मलई

एसीच्या थंड हवेळमुळे त्वचा निस्तेज आणि कोरडी होते. कोरड्या आणि निस्तेज त्वचेपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही घरातील दुधाच्या मलईचा वापर करू शकता. एक चमचा तिळाचे तेल घ्या. त्यात दुधाची साय मिक्स करा. ही पेस्ट तुम्ही चेहऱ्याला, मानेला आणि हाताला लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. साधारण 20 मिनिट्सने आपला चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा दूर होतो. 

दुधाची मलई वापरून मिळवा चमकदार त्वचा, चेहरा दिसेल अधिक सुंदर

बदामाच्या तेलाने करा मालिश

त्वचेचा कोरडेपणा दूर करण्यासाठी बदाम तेल आणि मध मिक्स करा. यानंतर हे मिश्रण चेहऱ्याला लावा आणि मालिश करा. 10 मिनिट्स तसंच ठेवा आणि मग स्वच्छ पाण्याने तोंड धुवा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा जाऊन त्वचेवर चमकदारपणा येतो. 

रोज रात्री चेहऱ्याला बदाम तेल लावण्याचे फायदे

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

25 May 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT