ADVERTISEMENT
home / त्वचेची काळजी
How To Use Loofah Properly

चुकीच्या पद्धतीने लूफा वापरल्यास होऊ शकतो त्वचेला त्रास

 जसे आदिम माणसाला स्वच्छतेचे महत्व पटले तेव्हापासून माणूस शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी विविध गोष्टींचा उपयोग करू लागला.  जुन्या काळी लोक शरीर स्वच्छ करण्यासाठी नैसर्गिक गोष्टी वापरत असत. मग नवनवे शोध लागले आणि आता लोक शरीरावरील घाण व त्वचेच्या मृतपेशी साफ करण्यासाठी लूफाचा वापर करू लागले आहेत. बॉडी वॉशसोबत वापरल्याने लूफावर फेस तयार होतो आणि नंतर तो त्वचेला चोळण्याने त्वचा अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ करता येते. जर तुम्ही दररोज अंघोळ करताना लूफाचा वापर केला तर तो तुमच्या त्वचेला पॉलिश करतो आणि त्वचा चमकू लागते. लूफा वापरल्यानंतर त्वचा कोरडी होत नाही. पण लूफा वापरण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत आणि म्हणूनच लूफा योग्यप्रकारे वापरायला हवा नाहीतर त्यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. 

फायबर आणि प्लॅस्टिकचा लूफा ठरू शकतो त्वचेसाठी धोकादायक 

फायबर आणि प्लॅस्टिकपासून बनवलेल्या मऊ दिसणार्‍या लूफाने आंघोळ करणे त्वचेसाठी धोकादायक ठरू शकते. जर तुम्ही आंघोळ करताना लूफा वापरत असाल तर काळजी घ्या. कारण जीवाणू ओल्या लूफामध्ये वाढतात. आपण लूफा वापरतो कारण तो शरीरातील साचलेली घाण आणि मृत त्वचा पेशी काढून टाकण्यास मदत करतो. या मृत पेशी लूफामध्ये जमा होतात आणि जर लूफा पूर्णपणे कोरडा झाला नाही, त्यात जंतूंची वाढ होते. जंतू असलेला लूफा वापरल्यास त्वचेला संसर्ग होण्याचा धोका असतो. 

How To Use Loofah Properly
How To Use Loofah Properly

लूफाच्या घर्षणामुळे त्वचेचे होऊ शकते नुकसान 

आंघोळ केल्यावर त्वचा अधिक स्वच्छ आणि सुंदर दिसते, पण लूफाच्या घर्षणामुळे नाजूक त्वचेचे नुकसान होऊ शकते. ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी लूफा वापरू नये अन्यथा आंघोळ केल्यावर तुमची त्वचा सोलवटली जाऊ शकते. 

लूफाचा वापर कसा करावा 

लूफा वापरताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की लूफा नेहमी ओला करूनच वापरायला हवा. कोरडा असताना लूफा त्वचेवर घासला तर त्वचेवर पुरळ उठू शकते. म्हणून लूफा वापरण्यापूर्वी तो पूर्णपणे ओला करा. यानंतर, त्यावर बॉडीवॉश लावा आणि त्यात फेस तयार करा. जेव्हा लूफाला योग्य प्रकारे फेस येतो, तेव्हा तो आपल्या शरीरावर गोलाकार पद्धतीने घासून घ्या व नंतर आपले हात आणि लूफा स्वच्छ धुवून ठेवा. लूफा ठेवताना अशा ठिकाणी ठेवा जिथे तो पूर्णपणे सुकून कोरडा होईल. 

ADVERTISEMENT

लूफा वापरताना ही खबरदारी घ्या 

बर्‍याचदा लोक घाईघाईत लूफा वापरल्यानंतर साफ न करता तसाच ठेवून देतात. ज्यामुळे बॅक्टेरिया किंवा फंगल इन्फेक्शनसारख्या समस्या उद्भवू शकतात. लूफा त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्याचे काम करतो आणि जेव्हा आपण लूफा वापरतो तेव्हा या पेशी त्वचेतून काढून टाकल्या जातात, परंतु त्या लूफामध्येच राहतात. असा लूफा तुम्ही  स्वच्छ न करता आणि न धुता वापरला तर हानीकारण जंतू त्वचेवर जमा होतात आणि त्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रत्येक वेळी आंघोळ केल्यानंतर लूफा स्वच्छ धुवा आणि स्वच्छ ठिकाणी ठेवा जिथे तो पूर्णपणे सुकेल. तसेच आठवड्यातून एकदा लूफा धुण्यासाठी अँटीबॅक्टेरियल साबण वापरा.

How To Use Loofah Properly
How To Use Loofah Properly

दर महिन्याला लूफा बदला 

लूफा प्लास्टिकचा बनलेला असल्याने त्याचे काही दुष्परिणाम होतात. जर तुम्ही नियमितपणे  लूफा वापरत असाल तर तो दर महिन्याला बदला. प्रत्येक वेळी आंघोळ करताना त्याचा वापर केल्यामुळे, त्याचे प्लास्टिक कडक होऊ लागते, ज्यामुळे त्वचेवर ओरखडे येऊ शकतात किंवा त्वचेवर पुरळ किंवा खाज येण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे दर महिन्याला लूफा बदलत राहा. तसेच तुमचा लूफा इतरांना वापरायला देऊ नका. 

लूफा वापरताना ही काळजी घ्या. 

Photo Credit- istock

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

28 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT