ADVERTISEMENT
home / Diet
indian spices to help you in your weight loss

वजन कमी करण्यासाठी आहारातून घ्या हे गरम मसाले

आरोग्य उत्तम राहण्यासाठी फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. कारण ज्यांची शरीर प्रकृती चांगली नसते त्यांच्या पाठी सतत आजारपणे लागतात. निरोगी राहण्यासाठी आणि फिटनेस राखण्यासाठी सर्वात आधी वजन नियंत्रित असायला हवं. वजन कमी करण्यासाठी लोक जीम लावतात, योगाचा क्लास लावतात. पण फक्त व्यायामानेच तुमचे वजन कमी होते असं नाही. कारण यासाठी तुमचा आहारदेखील पोषक आणि पूरक असायला हवा. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करून थकला असाल तर आहारात या गरम मसाल्यांचा समावेश करा. कारण काही गरम मसालेही तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. 

वजन कमी करण्यासाठी खा हे गरम मसाले

भारतीय खाद्यसंस्कृीत विविध प्रकारचे मसाले वापरले जातात. मग तो लाल मिरची पासून बनवलेला लाल मसाला असो वा विविध प्रकारच्या मसाल्याच्या पदार्थांपासून बनवलेला गरम मसाला. यासाठीच जाणून घ्या कोणते मसाले तुमचे वजन कमी करू शकतात.

काळीमिरी (Black Pepper)

Black Pepper

भारतीय स्वयंपाकात काळीमिरी वापरली जातेच. काळीमिरी तुमचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. कारण त्यामुळे तुमच्या मेटाबॉलिझम वाढते आणि तुमचे वजन नियंत्रणात राहते. यासाठी स्वयंपाकात काळीमिरी कुटून टाका अथवा सकाळी कोमट पाण्यासोबत एक ते दोन काळीमिरी चावून खा. ज्यामुळे तुमचे वजन कमी होईल. जेवणात स्वाद वाढवण्यासह काळीमिरी चे फायदे (Black Pepper Benefits In Marathi)

मेथी (Fenugreek Seeds)

मेथीचे दाणेही मसाल्याचाच एक पदार्थ आहेत. मेथीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे जर तुम्ही घावणे, डोसे अशा पदार्थांमध्ये बॅटर तयार करताना चारसते पाच मेथीचे दाणे वापरले तर तुमच्या शरीराला पुरेसे फायबर्स मिळतात. यासाठी तुम्ही मेथीचे लाडू खाऊ शकता. ज्यामुळे तुमची भूक नियंत्रणात राहते आणि तुमचे वजन कमी होते. शिवाय शरीराला उष्णता आणि उर्जा दोन्ही मिळते. यासाठीच नियमित मेथीच्या दाण्याचा वापर आहारात करा. वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी मेथीचे फायदे (Benefits Of Fenugreek Seeds In Marathi)

ADVERTISEMENT

जिरे (Cumin Seeds)

Cumin Seeds

स्वयंपाक करताना फोडणीसाठी तुम्ही जिरे वापरता. शिवाय काही पदार्थांमध्ये जिऱ्याची पूडही वापरली जाते. मात्र आजवर याचा वापर तुम्ही चवीसाठी केला असेल आता वजन कमी करण्यासाठी आहारात जिरे वापरा. जिऱ्यामुळे तुमच्या शरीरातील इन्सुलीन नियंत्रित राहते. कोलेस्ट्ऱॉल वाढू नये यासाठीही जिरे फायदेशीर आहे. एवढंच नाही वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही जिऱ्याची पाणी सकाळी उठल्यावर प्यायला हवं. जिऱ्याचे हे फायदे जाणून तुम्ही व्हाल आश्चर्यचकीत (Cumin Seeds Benefits In Marathi)

बडिसोप (Fennel seeds)

बडिसोपचा वापर मुखवास म्हणून जेवल्यानंतर केला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का बडिसोपमुळे तुमची भुक नियंत्रणात राहू शकते. यासाठी सकाळी उठल्यावर बडिसोप खा. यातील व्हिटॅमिन्समुळे तुमच्या शरीराचे पोषण होतेच शिवाय खाल्लेले अन्न व्यवस्थित पचते. ज्यामुळे तुमचे वजन जास्त प्रमाणात वाढत नाही. 

हळद (Turmeric)

हळदीमध्ये अनेक गुणकारी घटक असतात. ज्यामुळे आयुर्वेदामध्ये हळदीचा वापर औषधाप्रमाणे केला जातो. हळदीमुळे तुमच्या शरीराचा दाह कमी होतो. यात तुमच्या शरीराला डिटॉक्स करणारे गुणधर्म असतात. यासाठी शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात हळदीचा वापर जरूर करा. नियमित हळदीचे दूध पिणे यासाठी फायदेशीर ठरेल. हळदीच्या दुधाचे फायदे वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य, करून घ्या फायदा

22 Sep 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT