लग्न समारंभ आले की, कोणत्या प्रकारातील कपडे घ्यायचे हे कळत नाही. कारण प्रत्येकाला लग्नात हटके दिसायचे असते. लग्न स्वत:चे नसले तरी देखील साईडर्स म्हणून लग्नात चांगले दिसण्यासाठी प्रत्येक जण हटके ड्रेस निवडतात. असे काही हटके पॅटर्न तुम्हालाही हवे असतील तर तुम्ही सध्याच्या ट्रेंडनुसार काही हटके अस इंडो-वेस्टर्न पॅटर्न निवडा. जे तुम्हाला अधिक चांगले दिसतील.फार हेव्ही रेंजमध्ये नसले तरी देखील असे ड्रेस चारचौघात चांगलाच भाव खाऊन जातात. जाणून घेऊया असेेच काही ड्रेसचे हटके पॅटर्न आणि त्यांच्या किंमतींचा अंदाज
जुन्या साडीचे ड्रेस डिझाईन आणि हटके पॅटर्न्स (Old Sadicha Dress Design In Marathi)
गरारा जॅकेट ड्रेस
गरारा हा सध्या फारच ट्रेंडमध्ये आहे. मस्त घोळदार गरारा पँटस त्यावर चोळी आणि जॅकेट असलेले असे हे आऊटफिट दिसायला नेहमीच बेस्ट दिसते. यामध्ये चोळवर वर्क केलेले असते.चोळी थोडी भरलेली असल्यामुळे जॅकेट्स आणि पँट्स या प्लेन असतात. हे जॅकेट्स फुल हँड किंवा लाँग स्लिव्हजमध्ये मिळतात. त्यामुळे हे जॅकेट्स दिसायला फारच सुंदर दिसतात. गरारा पँटस घालताना कधीही तुमची उंची ही थोडी जास्त दिसायला हवी. यासाठीच तुम्ही त्या खाली व्यवस्थित हिल्स असलेले शूज घाला म्हणजे तुम्हाला तो ड्रेस अधिक चांगल्या पद्धतीने उठून दिसेल. साखरपुडा, रिसेप्शन अशा ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचे गरारा जॅकेट्स ड्रेस घालता येतात. ते तुम्ही आवर्जून घाला. या ड्रेसचा जास्ती जास्त भाग हा झाकल्यामुळे तुम्हाला खूप हेव्ही ज्वेलरी घालण्याची गरज भासत नाही.
Cotton and Handloom Blouse Designs: कॉटन आणि हॅंडलूम ब्लाऊजच्या हटके डिझाईन्स
पेपलम शरारा पँट्स
प्लम टॉप नावाचा एक प्रकार तुम्ही सध्या नक्कीच पाहिला असेल. प्लम टॉपमध्ये चोळीच्या खाली प्लेट्स केलेल्या असतात. ज्यामुळे टॉपची उंची ही थोडी बेंबीच्या खाली जाते. या अशा प्रकारच्या कपड्यांवर शरारा पँटस या चांगल्या दिसतात. जर तुम्हाला प्लम ड्रेस घालायता असेल तर तुम्ही तो लग्नामध्ये किंवा रिस्पेशन पार्टी, संगीत अशा कार्यक्रमात अगदी हमखास घालायला हवा. कारण असे कपडे दिसायला चांगले दिसतात. यामध्ये मुख्यत्वे चोळी भरलेली असते. पँट्स या थोड्या कमी भरलेल्या असतात. त्यामुळे त्या छान दिसतात.
हे नवे ट्रेंड बिनधास्त करा फॉलो, मांड्या अजिबात दिसणार नाहीत जाड
क्रॉप टॉप शरारा पँट्स
क्रॉप टॉप हे फार फॅन्सी असतात. असे क्रॉप टॉप फुल पँट्स म्हणजेच घेरदार लेहंगा किंवा शरारा पँट्स वर चांगले दिसतात.असे कपडे घालताना तुम्ही चोळीच्या छोट्या आकारासाठी कर्म्फटेबल असायला हवे. तुम्ही जर असे कपडे घालताना क्रॉप टॉपमध्ये तुम्ही विविधता शोधा. म्हणजे असे ड्रेस अधिक फॅन्सी दिसतात. क्रॉप टॉप फार छोटा असेल तर तुम्ही त्यामध्ये जॅकेट घालायला अजिबात विसरु नका.
वेस्टर्न ड्रेप साडी
लग्नसमारंभ असेल आणि साडी नसेल असे मुळीच होत नाही. खूप जणांना साडी ही प्रत्येक ठिकाणी नेसावीशी वाटते. पण जर तुम्हाला थोडी हटके साडी नेसायची असेल तर तुम्ही वेस्टर्न प्रकारातील साडी निवडा असा साडी या दिसायला चांगल्या दिसतात. या साड्यांचे ब्लाऊज भरजरी असतात. त्यामध्ये तुम्हाला बरीच विविधता मिळते. त्यामुळे हा प्रकार सुद्धा खूप चांगला दिसतो.
स्ट्रेट फिट पँट विथ साडी ड्रेप
स्ट्रेट फिट पँट आणि त्यावर साडी हा एक मस्त वेगळा ट्रेंड आहे. हा ट्रेंड तर तुम्ही अगदी हमखास फॉलो करायला हवा असा आहे. यामध्ये तुम्हाला पँटलाच साडी ड्रेप करायचा पर्याय मिळतो. जो एकदम छान उठून दिसतो. ही साडी थोडा वेगळाच स्वॅग दाखवते. त्यामुळे तुम्ही अशी साडी अगदी हमखास नेसायला हवा. यावर फॅन्सी ब्लाऊज छान उठून दिसतात. यामध्ये चांगले रंग निवडा. तुम्हाला ते नक्कीच आवडतील
आता लग्नाच्या पार्टीसाठी असे ड्रेस अगदी हमखास घाला. तुम्ही या समारंभात नक्कीच उठून दिसाल.