ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
जाणून घ्या पोहण्याआधी काय खायला हवं, ज्यामुळे नाही येणार थकवा

जाणून घ्या पोहण्याआधी काय खायला हवं, ज्यामुळे नाही येणार थकवा

उन्हाळा असो वा पावसाळा पाण्यात पोहण्यासाठी मजा काही वेगळीच असते. पोहणं हा सर्वांसाठी एक उत्तम व्यायाम असल्यामुळे आजकाल बरेच लोक स्विमिंगच्या क्लासला जातात. लहानपणापासून मुलांना स्विमिंग यावं यासाठी त्यांनाही पोहण्याच्या क्लासमध्ये घातलं जातं. दिवसभर थकल्यावर थकवा दूर करण्यासाठी सोसायटी अथवा क्लबच्या स्विमिंग पूलमध्ये सराव चिल केलं जातं. पावसाळी पिकनिकला गेल्यावर रिसॉर्टच्या स्विमिंग पूल, धबधबे, तलाव, नद्यांमध्ये पोहण्याचा आस्वाद घेतला जातो. यासाठी पोहण्याचे फायदे वाचाल तर थक्क व्हाल (Swimming Benefits In Marathi). एवढंच नाही गरोदर महिलांसाठीदेखील पोहणं हा एक चांगला व्यायाम आहे. यासाठी जाणून घ्या गरोदरपणात करायचे व्यायाम | Pregnancy Madhe Karayche Vyayam. पोहण्याआधी प्रत्येकाला Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे माहीत असायला हवे. मात्र लक्षात ठेवा पोहण्यातून मोठ्या प्रमाणावर शारीरिक हालचाल होत असल्यामुळे पाण्यात गेल्यावर स्टॅमिना टिकवणं अनेकांना कठीण जातं. यासाठीच पोहण्याआधी खायला हवेत हे काही पदार्थ ज्यामुळे तुम्हाला मिळेल योग्य प्रमाणात शारीरिक ऊर्जा…

पोहण्याआधी काय खावं

स्विमिंग करण्याआधी आपण स्विमिंग सूट, स्कीन केअर, हेअर केअरकडे लक्ष देतो. मात्र यासोबतच पाण्यात उतरण्यापूर्वी तुम्ही काय आहार घेता हे महत्त्वाचं आहे.

  • स्विमिंगला जाण्यापूर्वी तुम्ही कार्ब्स घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे स्विमिंग झाल्यावर तुमच्या आहारात प्रोटीन्स असतील याची काळजी घ्या. पोहण्याआधी काही लोक प्रोटीनयुक्त पदार्थ खातात मात्र याची गरज तुम्हाला पोहण्यानंतर जास्त असते. 
  • स्विमिंग करण्यापूर्वी तुम्ही हेव्ही जेवण करता कामा नये, कारण यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो.
  • स्विमिंग करण्यापूर्वी तुमच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण मुबलक असायला हवं. ज्यामुळे तुम्ही डिहायड्रेट होणार नाही.यासाठी पोहण्याआधी पाणी, सूप, सरबत, डिटॉक्स वॉटर, नारळपाणी, लिंबू पाणी, हेल्द ड्रिंक्स घ्या.
  • पोहण्याआधी तुम्ही दूध, दही असे कॅल्शिअम आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यास काहीच हरकत नाही. 

स्विमिंगला जाण्यापूर्वी खावे हे पदार्थ 

स्विमिंगला जाताना कधीच उपाशी पोटी जाऊ नये. भरपूर जेवण न करता काही हलके आणि पौष्टिक पदार्थ तुम्ही यावेळी खाऊ शकता.

केळी – 

केळं हे असं एक फळ आहे ज्यामुळे तुम्हाला त्वरीत एनर्जी मिळते. कारण यामध्ये पोटॅशिअम अधिक असतं, शिवाय कार्बोहायड्रेटपण भरपूर असतात. म्हणूनच केळ्याला सूपरफूड अथवा पॉवर हाऊस म्हटलं जातं. स्विमिंगला तुम्ही मजा अथवा व्यायाम अशा कोणत्याही कारणासाठी जाणार असाल तरी तुम्हाला पोहल्यानंतर शारीरिक थकवा नक्कीच येणार यासाठी जाण्यापूर्वी तुमच्या अंगातील शक्ती वाढण्यासाठी केळं जरूर खा.

ADVERTISEMENT

सफरचंद – 

निरोगी राहण्यासाठी दररोज एक सफरचंद खाण्याचा तज्ञ्ज सल्ला देतात. कारण सफरचंदामध्ये तुमच्या शरीराचे पोषण करणारे अनेक घटक असतात. पण एवढंच नाही स्विमिंग सारखे व्यायाम करण्यापूर्वी एनर्जी टिकण्यासाठी तुम्ही सफरचंद खाऊ शकता. कारण यातून तुमच्या शरीराला पुरेसे कार्ब्स मिळतात आणि तुम्ही पटकन फ्रेश होता. 

सॅंडविच – 

स्विमिंग करण्यापूर्वी शरीराला कार्ब्स मिळण्यासाठी काय खावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, हेव्ही अन्नपदार्थ खाण्यापेक्षा एखादं लाइट सॅंडविच खा. कारण ब्रेडमधून तुम्हाला योग्य प्रमाणात कार्ब्स मिळतील. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

24 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT