साडी कितीही जुनी झाली तरी ती फेकून द्यायची इच्छा कधीच होत नाही. म्हणजे एखादी साडी आता काढून टाकायची असा विचार आपल्या आईने जरी केला तरी किमान ४ ते ५ महिने ती साडी आई पुन्हा एकदा कपाटात जपून ठेवते. प्रत्येक साडीशी महिलांच्या आठवणी जोडलेल्या असतात. त्यामुळे अनेकदा अशा साड्या कपाटात तशाच पडून राहतात. त्या साड्या तशाच पडू न देता त्याच साड्यांना जर पुन्हा नवा लुक देता आला तर ? हो आता त्यासाठी या साड्या फाडाव्या लागतील. पण हमखास ही साडी पुन्हा काही वर्ष का असेना नव्या रुपात वापरली जाईल. जर तुमच्या कपाटातही महाग आणि आवडीच्या साड्या असतील तर त्यांना बाहेर काढा आणि आम्ही दाखवलेल्या काही लेटेस्ट फॅशनपैकी ड्रेस शिवा. जुन्या साडी पासून नवीन ड्रेस साडीचे ड्रेस डिझाईन (Sadicha Dress Design) ट्राय करा आणि या नव्या ड्रेससोबत #sareereused म्हणत एक छान फोटो काढा.
हेवी दुपट्टा (Use With A Suit As Heavy Dupatta)
सौजन्य : Instagram
एखादी हेव्ही साडीचा सुंदर काठ असेल आणि तुम्ही ती नेसत नसाल तर तुम्ही त्या साड्यांपासून मस्त दुपट्टे शिवू शकता. एखाद्या प्लेन ड्रेसवर कोणत्याही साडीचा दुपट्टा शिवला की, तो अधिक चांगला उठून दिसतो. दुपट्टा साधारण 1 ते 1.5 मीटर इतका ठेवा. म्हणजे तुम्हाला त्याच्या खाली काठाला काही लेस किंवा डिझाईन्स लावता येतील. हे दुपट्टे कायम ट्रेंडमध्ये असल्यामुळे तुम्ही त्याचा उपयोग पुढील कितीही वर्षांसाठी करु शकता.
साडीचा कुर्ता (Kurta From Saree)
सौजन्य: Instagram
साडीपासून कुर्ता शिवायचा विचार असेल तर तुम्हाला मस्त वेगवेगळ्या पॅटर्नचे कुर्ते शिवता येतात. आता तुम्ही कोणत्या प्रकारातील कुर्ता शिवणार यावर तुमची डिझाईन अवलंबून आहे. अनारकली किंवा फ्लोई ड्रेससाठी तुम्हाला शिफॉनसाडी उत्तम आहे. अशा साड्यांवर तुम्हाला एखादा मस्त असे अस्तर लावून ड्रेस करता येईल. याशिवाय तुम्ही साडीपासून ट्रेडिशनल प्रकारातील साडीचे कुर्ते निवडू शकता.
क्रॉप टॉप आणि लेहंगा (Crop Top And Lehenga)
सौजन्य : Instagram
महारसाडीपासून काहीतरी लेटेस्ट असं तुम्हाला काही शिवायचं असेल तर तुम्ही छान क्रॉप टॉप आणि लेहंगा असे देखील शिवू शकता. खूप जणांना अशापद्धतीचे क्रॉप टॉप छान दिसतात. ते तुम्ही छान एखाद्या लग्नसमारंभासाठी घालू शकता. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्स निवडता येतील. सॉफ्ट सिल्क, पैठणी, कांजिवरम अशा कोणत्याही साड्यांच्या प्रकारांपासून तुम्ही क्रॉप टॉप आणि लेहंगा निवडू शकता. जे तुम्हाला नक्कीच उठून दिसतील.
लेहंगा चोळी (Lehenga Choli)
सौजन्य: Instagram
लग्नसमारंभ म्हटला की लग्नात लेहंगा चोळी अगदी हमखास घातली जाते. लग्नात नवरी व्यतिरिक्त ब्राईट्सनाही असे कपडे धालायला खूप आवडतात. तुम्ही जितके पाहाल तितके पॅटर्न तुम्हाला यात मिळू शकतात. पण घरी असलेली एखादी जुन्या पण गडद आणि उठावदार साडी तुम्ही यासाठी निवडा. कारण शिलाईचा विचार करता तुम्ही पॅटर्न ही तसाच द्यायला हवा. त्यामुळे उत्तम आणि लेटेस्ट अशा डिझाईन्सचे लेहंगे शिवा. पदराचा उपयोग चोळीसाठी आणि बाकीचा उपयोग ओढणी आणि लेहंग्यासाठी करा. थोडा लेटेस्ट टच येण्यासाठी तुम्ही ऑफ शोल्डर, सिंग्लेट, बॅकलेस अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवू शकता.
साडीपासून लांब ड्रेस (Floor-Length Dresses For Weddings)
सौजन्य : Instagram
साडीचे गाऊन हे सुद्धा खूप छान दिसतात. पण लग्नात तुम्ही अगदी टिपिकल गाऊन शिवू नका. या साड्यांपासून तुम्ही छान हेव्ही गाऊन बनवा. पैठणी, इरकल,पेशवाई अशा कोणत्याही साड्यांपासून ते तयार होतात. पैठणीचा गाऊन शिवायचा विचार करत असाल तर पैठणीची खरी ओळख असते तिचा पदर. कारण तिच्यावर जरतारीचा मोर असतो. त्याचा योग्य वापर करुन तुम्हाला गाऊनचा पॅटर्न तयार करता येऊ शकतो. खाली दाखवलेला अगदी साध्या पद्धतीचा गाऊन आहे.
शॉर्ट ड्रेस (Short Dresses From Saree)
सौजन्य: Instagram
साडीपासून शिवलेला हा प्रकार एकदम छान आहे. ज्यांना शॉर्ट ड्रेस घालण्याची हौस असेल त्यांना जुन्या साडीतून शिवण्यासारखा हा चांगला पर्याय आहे. अशा पॅटर्नचा ड्रेस बनवण्यासाठी तुम्हाला कॉटन सिल्क मटेरिअलमधल्या मोठ्या काठाची साडी लागेल. आता या दाखवलेल्या पॅटर्नप्रमाणे बाह्या मोठ्या, फ्रंटला राऊंडनेक आणि मागे राऊंड डिपनेक आणि पोठली वर्क करु शकता. हा पॅटर्न शिवायला सोपा आहे. याला थोडा घेर देण्यासाठी कंबरेपासून खाली असलेल्या भागाला जास्त चुण्या ठेवण्यास सांगा. जर तुम्हाला बॉक्स प्लेटस आवडत असतील तर त्यात व्हरायटीही आणू शकता.
टिप: मोठ्या काठाच्या साड्या कांजीवरम प्रकारांमध्ये अधिक असतात असा ड्रेस शिवायचे ठरवत असाल तर साडी प्लेन हवी. आणि समजा घरात प्लेन साडी असल्यास तुम्ही काठ विकत आणूनही हा प्रकार शिवू शकता. एका साडीत एक फुल साईज आणि लहान मुलीचा ड्रेस सहज होऊ शकतो.
पलाझो पँटस पॅटर्न (Palazzo Pants Pattern)
सौजन्य : Instagram
पलाझो पँट्स हा सध्याचा ट्रेंड आहे. हा ट्रेंड फॉलो करायचा असेल तर साड्या या देखील उत्तम पर्याय आहे तुम्ही तुमच्या सुळसुळीत साड्यांचा उपयोग करुन पलाझो पँटस शिवू शकता. हे पलाझो पँटस तुम्हाला कोणत्याही टॉपवर किंवा तुमच्या स्टाईलनुसार तुम्हाला घालता येतील. साड्यांपासून पलाझो शिवताना तुम्हाला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे तुम्हाला त्यामध्ये अस्तर लावायचे आहे.
कुडता अँड स्कर्ट कॉम्बो (Kurta And Skirt Combo)
सौजन्य: Instagram
सध्या कुडता आणि स्कर्ट असा कॉम्बोदेखील फारच हिट आहे. तुम्हाला जर एखाद्या हळदी समारंभासाठी किंवा लग्नासाठी थोडा वेगळा लुक हवा असेल तर तुम्ही मस्त अशा प्रकारे कुडता अँड स्कर्ट कॉम्बो शिवू शकता. जे तुम्हाला नक्कीच वेगळे दिसू शकतील. जुन्या साडी पासून ड्रेस कुडता आणि स्कर्ट शिवताना तुम्हाला कुडत्याचा कपडा सिल्कचा असू द्या. म्हणजे कुडत्याची फिटींग चांगली येईल. आणि स्कर्ट जर तुम्हाला थोडा घेरदार हवा असेल तर तशा पद्धतीने तुम्ही त्याची निवड असू द्या म्हणजे तुम्हाला ते अधिक चांगल्या पद्धतीने शिवता येतील.
लहानमुलींसाठी लाँग जॅकेट (Long Jacket for Girls)
सौजन्य: Instagram
तुमच्या मुलींसोबत तुम्हाला कॉम्बिनेशन असं काही करायचं असेल तर तुम्ही जॅकेट्स शिवू शकता.जॅकेटस ही अशी गोष्ट आहे की, मुलींकडे कितीही असली तरी ती हवीच असते. साडीचा काठ जर सुंदर असेल तर अशा काठाचा उपयोग करत जॅकेटला लावा. साड्यांचा उपयोग करुन लेहंगा शिवायचा नसेल तर अशांनी मस्त असे वेगवेगळ्या पॅटर्नचे साडीचे जॅकेट शिवा. ते अधिक चांगले दिसतील. हे असे जॅकेट्स घालून तुम्हाला इंडो-वेस्टर्न लुक करता येईल.
अत्यंत महत्वाची गोष्ट : प्रत्येक पॅटर्न तुमच्या मनाप्रमाणे हवा असा वाटत असेल तर ते शिवण्यायोग्य टेलर आधी शोधा. वर दाखवलेल्या पॅटर्नवरुन तुम्हाला तुमच्या काही क्रिएटिव्ह आयडियाज लावायच्या आहेत. काही ठिकाणी तुम्ही गळ्यामध्ये व्हरायटी आणा. स्टँड काॅलर, डीप नेक,डोरी असे काही एक्सपेरीमेंट करायला काहीच हरकत नाही.
साडी पासून पंजाबी ड्रेस (Salwar Suits Made From Sarees)
सौजन्य: Instagram
साडीपासून सुंदर पंजाबी ड्रेसही शिवता येते. तुम्हाला नेमका कोणता ड्रेस शिवायचा आहे त्यानुसार तुम्ही त्याचा पॅटर्न ठरवू शकता. कांजिवरम साड्या, सिल्क साड्यांचा ड्रेस हा अधिक सुंदर दिसतो. असे ड्रेस तुम्हाला कोणत्याही कार्यक्रमाला घालता येतात. त्यामुळे तुम्ही साडीपासून मस्त तुमच्या आवडीचा ड्रेस शिवा. जर तुम्हाला दुपट्टा हवा असेल तर तुम्ही वेगळा दुपट्टाही निवडू शकता.
स्ट्रेट फिट पँटस (Straight Fit Pants)
सौजन्य: Instagram
सिगरेट पँटस किंवा स्ट्रेट फिट पँटस तुम्हाला आवडत असेल तर सिल्क साडयांपासून बनवलेल्या सिगरेट पँटस चांगल्या दिसतात. प्लेन कुडती आणि त्यावर स्ट्रेट फिट पँट चांगल्या दिसू शकतात. आता साडीपासून बनवताना मेहनतही आहेच. पदरावरील डिझाईन्स तुम्हाला आवडली असेल आणि तिचा उपयोग कसा करायचा ते देखील कळायला हवे. जर प्रिटेंट पँटस असतील तर कुडता प्लेन असावा इतके भान ठेवा. साड्यांपासून शिवलेल्या या स्ट्रेट फिट पँटस ट्रेंडी आणि तितक्याच चांगल्या दिसतात.
हे काही प्रकार साड्यांपासून तुम्ही नक्की शिवा आणि तुम्हाला काही पॅटर्न आवडत असतील तर ते आम्हाला देखील नक्की कळवा
अधिक वाचा
जाणून घ्या वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार
संक्रातीला नेसता येतील अशा काळ्या साड्या
साडी नेसताना कधीही करु नका या चुका
सिल्क साडी कशी धुवायची जाणून घ्या