ADVERTISEMENT
home / पालकत्व
लहान मुलं घरी एकटी असतील तर या गोष्टी ठेवा लक्षात

लहान मुलं घरी एकटी असतील तर या गोष्टी ठेवा लक्षात

मुलांचे संगोपन ही एक मोठी जबाबदारी आहे. मुलांचे योग्य संगोपन करण्यासाठी आजकाल आईवडील दोघांनाही करिअरसाठी घराबाहेर जावं लागतं. कारण मुलांना सांभाळण्यासोबत त्याचे शिक्षण आणि इतर गोष्टींसाठी पुरेसे पैसे आईवडील दोघांनाही कमावावे लागतात. लहान असताना मुलं पाळणाघरात अथवा शेजारी, नातेवाईंकांकडे राहू शकतात. पण मुलं जरा मोठी झाली की ती घरीच एकटं राहण्याचा हट्ट करतात. अडचणीच्या वेळी मुलांना सवय असावी म्हणून काही पालक मुलांना एकटं घरी राहू देतात. पण जर तुमची लहान मुलं घरी एकटी असतील तर त्यांना या सेफ्टी टिप्स जरूर शिकवा. ज्यामुळे ती प्रसंगी धीट आणि सावध राहून स्वतःचं संरक्षण करू शकतील. तसंच वाचा लहान मुलांची केस गळती: कारणे, उपाय, टिप्स | Hair Loss In Children In Marathi, लहान मुलांचे जुलाब उपाय | Remedies For Baby Diarrhea In Marathi

लहान मुलांना घरी एकटं ठेवताना 

जर कधी तरी अथवा एखाद्या अडचणीच्या वेळी पहिल्यांदाच तुम्ही मुलांना घरी एकटं ठेवत असाल. तर त्यापूर्वी मुलांना या सेफ्टी टिप्स जरूर शिकवा.

  • मुलांना तुमचा फोन नं पाठ करायला लावा. ज्यामुळे अडचणीच्या वेळी मुलं तुम्हाला फोन लावून तुमच्याशी संपर्क करू शकतात. अशा वेळी आणखी एखादा जवळच्या व्यक्तीचा फोन नं घरातील डायरीत लिहून ठेवणं फायद्याचं ठरेल. जी व्यक्ती घराजवळ राहणारी असेल आणि तुमच्या विश्वासातील असेल. 
  • घरात मुलं एकटी असतील तर त्यांच्या जेवणाची नीट व्यवस्था करा. घरात खाऊ आणि तयार जेवण मुबलक असेल तर भुक लागल्यावर मुलं शेगडी अथवा इतर स्फोटक गोष्टी वापरण्याचे धाडस करणार नाहीत. 
  • घराबाहेर पडताना गॅसचे मेन स्वीच बंद करा. वीजेची उपकरणे जसं की, मिक्सर, वॉशिंगमशीन स्वीच बोर्डपासून काढून दूर ठेवा. 
  • घरातील चाकू, सुरी, नेलकटर अशा धारदार वस्तू मुलांच्या हाताजवळ येणार नाहीत अशा ठिकाणी ठेवा.
  • मुलांना घराबाहेर पडण्यापूर्वी होमवर्क, पेटिंग, क्राफ्टिंग अशा अॅक्टिव्हिटी करण्यास सांगा. ज्यामुळे मुलं दिवसभर त्या अॅक्टिव्हिटीजमध्ये दंग राहतील आणि त्यांना इतर गोष्टी करण्यास वेळ मिळणार नाही.
  • घरी आल्यावर मुलांशी संवाद साधा, ज्यामुळे मुलं घरी एकटी असताना नेमकं काय काय करतात या गोष्टी तुम्हाला समजतील. मुलं जर पालकांसोबत मोकळेपणाने बोलत असतील तर ती एकांतात चुकीच्या गोष्टी करणार नाहीत. 
  • घराबाहेर पडताना घर नीट लॉक करा आणि मुलांना आतून कधी आणि कसे लॉक उघडावे हे शिकवा. पण त्यासोबतच अज्ञात व्यक्तीसोबत न बोलण्याचा आणि त्यांना घरात न घेण्याचे शिकवा.
  • मुलं जर घरी एकटीच असणार असतील तर घरात आधुनिक सुरक्षेची साधने जसे की सेफ्टी डिजिलट लॉक, इंटरकॉम, सीसीटिव्ही अशा गोष्टी बसवून घ्या. ज्यामुळे तुम्ही मोबाईलवरून घरातील गोष्टी हाताळू शकता.
  • घराबाहेर असतानाही मुलांसोबत फोनवर सतत संपर्कात राहा ज्यामुळे मुलांना एकटं राहण्याची भीती वाटणार नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

28 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT