ADVERTISEMENT
home / Nail Care
रंगपंचमी आधी आणि नंतर अशी घ्या नखांची काळजी

रंगपंचमी आधी आणि नंतर अशी घ्या नखांची काळजी

भारतात होळीचा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यासाठीच जाणून घ्या होळी सणाची माहिती आणि होळी स्पेशल ‘खाद्यपदार्थ’ (Holi Information In Marathi). होळीचा सण रंग खेळत आनंद व्यक्त करत साजरा करायला कोणाला नाही आवडणार. कारण रंग म्हणजे आनंद आणि उत्साहाचं प्रतिक. म्हणूनच वाचा ही रंगपंचमीची माहिती आणि महत्त्व (Rangpanchami Information In Marathi) यंदा रंगपंचमीवर कोरोनाचे सावट जरी असले तरी नियमांचे पालन करत, नियोजनबद्ध आणि घरच्या घरी रंगपंचमी तुम्ही नक्कीच खेळू शकता. रंगपंचमीत एकमेकांच्या अंगावर अक्षरशः रंगाची उधळणच केली जाते. अशा वेळी रंग खेळताना तुम्ही तुमच्या त्वचा आणि केसांसोबतच नखांचीही तितकीच काळजी घ्यायला हवी. आपण रंग खेळण्यासाठी सर्वात जास्त हाताचा वापर करतो. त्यामुळे नकळत नखांमध्ये रंग बराच वेळ अडकून बसतात. हानिकारक रंग वापरल्यास नंतर नखांचा रंगच बदलून जातो. यासाठीच रंगपंचमी खेळण्याआधी आणि नंतर नखांची योग्य ती काळजी घ्यायला हवी. 

रंगपंचमी खेळण्याआधी काय काळजी घ्याल –

जर तुमच्या नखांमध्ये हानिकारक रंग अडकून राहावे असं तुम्हाला वाटत नसेल तर रंग खेळण्यापूर्वीच योग्य ती काळजी घ्या. 

  • नखांवर आधीच ट्रान्सपरंट नेलपॉलिश लावा. ज्यामुळे रंगपंचमीनंतर नेलपॉलिश रिमूव्ह कराल तेव्हा त्यासोबत त्यावर चिकटलेला होळीचा रंगही निघून जाईल. 
  • नखे खराब होऊ नयेत यासाठी तुम्ही नखांवर एखाद्या गडद शेडची नेलपॉलिशदेखील लावू शकता. कारण डार्क शेड असल्यामुळे होळीचे रंग तुमच्या नखांना खराब करणार नाहीत. 
  • शक्य असल्यास हातात ग्लोव्ह्ज घाला ज्यामुळे तुमच्या नखांमध्ये रंग जाणार नाहीत
  • हात आणि नखांना नारळाचे तेल लावून कव्हर करा. नारळाच्या तेलामुळे नखांवर एक सुरक्षित कवच निर्माण होईल. 

pexels

ADVERTISEMENT

रंगपंचमीनंतर नखांची कशी घ्याल काळजी –

रंगपंचमी खेळल्यावरही तुम्ही नखांची निगा राखायला हवी.

  • रंगपंचमीत रंग खेळण्यामुळे केमिकल्समुळे तुमची नखं निस्तेज, कमजोर होतात. अशी नखं लवकर तुटू शकतात.
  • यासाठीच नखं रंग खेळल्यानंतर काही वेळ पाण्यात बुडवून ठेवा. मात्र लक्षात ठेवा यासाठी कोमट पाण्याचा वापर न करता थंड पाणी वापरा. 
  • तुम्ही नखं स्वच्छ करण्यासाठी ती गुलाबपाण्यातही बुडवून ठेवू शकता. कारण यामुळे नखांवरचा रंग जाईलच शिवाय बोटं आणि नखं मऊ देखील होतील. 

pexels

होळीनंतर नखं स्वच्छ करण्यासाठी करा हे उपाय –

होळीत रंग खेळण्यामुळे तुमची नखं खराब झाली असतील तर ती स्वच्छ करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

ADVERTISEMENT
  • सर्वात आधी रिमूव्हरने नखांवरील नेलपॉलिश आणि रंग काढून टाका.
  • हाताची बोटं, नखांवर एखादं चांगलं स्क्रब लावा आणि हात स्वच्छ धुवा. 
  • मीठाच्या पाण्यात बोटे काही वेळ बुडवून ठेवा आणि स्वच्छ करा. यासाठी पाणी आणि लिंबाच्या रस एकत्र करून नखे करा स्वच्छ. लिंबातील सायट्रिक अॅसिडमुळे तुमची नखे स्वच्छ होतील. हा उपाय कमीत कमी दोन आठवडे करा. 
  • व्हिनेगरने नखे स्वच्छ करा कारण व्हिनेगरमुळे तुमची नखं मुळापासून स्वच्छ होतील
  • रंग काढण्यासाठी लगेच मेनिक्युअर करू नका कारण त्यामुळे नखांना योग्य तसा आराम मिळणार नाही. यासाठी एक आठवड्यानंतर मेनिक्युअर करा.
  • रंग काढून नखे स्वच्छ केल्यावर लगेच नखांवर नेलपॉलिश लावू नका. कारण यामुळे नखांना पुरेसे ऑक्सिजन मिळणार नाही. 
  • होळीनंतर खराब झालेल्या नखांची काळजी घेण्यासाठी नखांवर तुम्ही आमचूर पावडरही वापरू शकता. टुथब्रशच्या मदतीने आमचूर नखांना लावा आणि नखं चमकवा.
  • नखं स्वच्छ केल्यावर नखांना चांगले मॉईस्चराईझर लावण्यास मुळीच विसरू नका. 

होळी साजरी करताना प्रियजनांना द्या होळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि संदेश (Holi Wishes In Marathi) आणि रंगाची उधळण करत आप्तेष्टांना द्या रंगपंचमी शुभेच्छा संदेश (Rang Panchami Quotes In Marathi)

फोटोसौजन्य – pexels

24 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT