ADVERTISEMENT
home / आरोग्य
back pain after delivery

डिलिव्हरीनंतर कंबरदुखीचा त्रास होत असेल तर हे उपाय करा 

बाळंतपण म्हणजे स्त्रियांचा दुसरा जन्मच असतो असे म्हटले जाते ते खोटे नाही. कारण गर्भधारणा आणि प्रसूतीमुळे स्त्रियांच्या आयुष्यात खूप मोठे बदल होतात. या काळात स्त्रियांच्या आयुष्यात मानसिक आणि शारीरिक बदल होतात. प्रसूतीनंतर अनेक स्त्रियांना पाठदुखी, कंबरदुखीचा त्रास होतो तर काहींना प्रसूतीनंतरच्या नैराश्यातून (Postpartum Depression) जावे लागते. तसेच गर्भावस्थेत सुद्धा अनेक स्त्रियांना पाठ किंवा ओटीपोटात वेदना होतात. या सर्व वेदना वेगवेगळ्या प्रकारच्या कोक्सीक्स वेदना आहेत, त्यापैकी एक म्हणजे माकडहाडातील वेदना होय. गर्भधारणेदरम्यान माकडहाडात वेदना होणे हे पूर्णपणे सामान्य आहे, कारण हे स्पष्ट आहे की जसजशी गर्भधारणा पुढे जाते आणि बाळाची वाढ होते, तसतसे आपल्या मणक्याच्या शेवटी असलेल्या टेल बोनवर अधिकाधिक दाब पडतो. गर्भाशयात  उजवीकडे मागे हा दाब जाणवतो. ही वेदना प्रसूतीच्या महिन्यापर्यंत होते परंतु काही महिलांना प्रसूतीनंतरही ही वेदना होते, जी प्रदीर्घ प्रसूती वेदना किंवा इतर कारणांमुळे असू शकते. बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी हे घरातील जुन्याजाणत्यांना माहित असतेच. तरीही जाणून घ्या असे काही उपाय ज्यांच्या मदतीने तुम्ही या दुखण्यापासून आराम मिळवू शकता.

का होते टेलबोन पेन 

टेलबोन हे तुमच्या मणक्याचे हाड असते. गर्भधारणेदरम्यान, गर्भात बाळ वाढत असताना यामुळे तुमच्या शरीराच्या खालच्या भागात मणक्यावर दाब वाढतो आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या टेलबोनमध्ये वेदना होतात. प्रसूतीनंतर बराच वेळ बसून राहिल्याने, बद्धकोष्ठता आणि आतडी रिकामी झाल्यामुळे माकडहाडात वेदना होतात. प्रसूतीनंतर टेलबोन मध्ये वेदना होणे ही एक सामान्य समस्या आहे, विशेषत: ज्या स्त्रियांचे पेल्विक फ्लोअर कमकुवत आहे त्यांना प्रसूतीनंतर कंबरदुखीचा जास्त त्रास होतो. 

Back Pain After Delivery
Back Pain After Delivery

कंबरदुखीची लक्षणे 

कंबरदुखीचा त्रास होताना पुढील लक्षणे जाणवतात. 

  •  मणक्याच्या शेवटच्या भागात हळूहळू वेदना वाढणे.
  •  नितंबात कधी तीक्ष्ण तर कधी सौम्य वेदना होतात. 
  • पाठीच्या खालच्या भागात सतत वेदना होणे. 
  • उठताना,बसताना तीव्र वेदना होणे किंवा उद्भवणे. 
  •  पुढे वाकल्यास किंवा डावी -उजवीकडे वाकल्यास वेदना कमी होणे. 
  •  बद्धकोष्ठतेच्या वेळी हा त्रास वाढणे. 
  • शारीरिक हालचालींनंतर वेदना कमी होणे. 

कंबरदुखीचा जास्त त्रास होत असल्यास हे उपाय करा 

कंबरदुखीमुळे तुम्ही हैराण झाला असाल तर तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. बसताना नितंबाखाली उशी ठेवा. खुर्चीवर बसताना मागे उशी ठेवून टेकून बसा. तुमच्या कोअर मसल्सना एंगेज ठेवण्यासाठी दीर्घश्वसन करा. पोटातून हळूहळू दीर्घ श्वास घ्या.  जर तुम्हाला बराच काळ हा त्रास होत असेल तर पुढील स्टेप्स फॉलो करा-

ADVERTISEMENT
Back Pain After Delivery
Back Pain After Delivery
  • पालथे झोपून या भागावर कोल्ड कॉम्प्रेस करा. आईसपॅकच्या मदतीने किंवा बर्फ कापडात गुंडाळून त्याने जिथे वेदना होत आहेत तो भाग शेकून बघा. हा उपाय एक तासानंतर पुन्हा करा. 
  • स्ट्रेचिंग करून बघा. साध्या स्ट्रेचेसच्या मदतीने, कोक्सीक्स स्नायूंवर आलेला ताण आणि ताठरपणा कमी होण्यास मदत होऊ शकेल. या भागातील स्नायूंवरील ताण कमी झाल्यास वेदना कमी होतील 
  • तुम्हाला शक्य असल्यास वाईड लेग पोझिशनमध्ये डीप स्क्वॅट्स करण्याचा प्रयत्न करा. व्यायामाच्या मदतीने कोअर मसल्स सक्रिय करा व बसताना योग्य पोश्चर मेंटेन करा. 

प्रसूतीनंतर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास होत असल्यास वेदनांचा धोका कमी करण्यासाठी सायकलिंग टाळा. तसेच एकाच ठिकाणी जास्त वेळ बसू नका. तसेच धडपडू नका. तुमच्या आजूबाजूला जमिनीवर अशी कोणतीही वस्तू ठेवू नका ज्यामध्ये पाय अडकून तुम्ही पडू शकाल.तसेच पायऱ्या चढताना देखील काळजी घ्या. असे कुठलेही काम करू नका ज्यामुळे तुमच्या मणक्याला जबर धक्का लागेल. प्रसूतीनंतर ही काळजी घ्या जेणेकरून कंबरदुखीचा त्रास वाढणार नाही. 

Photo Credit – istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

01 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT