ADVERTISEMENT
home / फॅशन
sequins blouse styling ideas with saree in marathi

साडीसोबत सीक्वेन्सचं ब्लाऊज मॅच करताय,या गोष्टी ठेवा लक्षात

सीक्वेन्सच्या आऊटफिट्सचा ट्रेंड असला तरी ही स्टाइल काही खास प्रसंगी करण्यासाठीच आहे. पार्टी, रिसेप्शन, ग्लॅम लुक इव्हेंटसाठी हा लुक अगदी परफेक्ट ठरतो. पण त्यासाठी तुम्ही तुमच्या ऑल ओव्हर लुककडे नीट लक्ष द्यायला हवं. काही वर्षांपासून फॅशन इंडस्ट्रीमध्ये अनेक प्रयोग केले जात आहेत. बऱ्याचदा या प्रयोगाचा एक भाग म्हणून, ट्रेंड म्हणून वेस्टर्न आणि एथनिक लुक मिस्कमॅच केला जातो. सीक्वेन्स ड्रेस, वनपीस, पंजाबी सूटसोबत सीक्वेन्स साडी देखील रात्रीच्या कार्यक्रमात खुलून दिसते. मात्र जर एखाद्या कार्यक्रमासाठी तुम्ही सीक्वेन्स ब्लाऊज इतर साड्यांसोबत मॅच करायचा विचार करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहीत असायलाच हव्या. तसंच साडीची फॅशन करताना जाणून घ्या अस्सल मराठमोळे साडी कोट्स (Saree Quotes In Marathi), नऊवारी साडी कोट्स मराठीमध्ये | Nauvari Saree Quotes In Marathi, खण साड्यांसाठी खास ब्लाऊज डिझाईन्स | Khun Saree Blouse Designs In Marathi

मॅचिंग रंगाचं सीक्वेन्स ब्लाऊज 

जर तुम्हाला सीक्वेन्स लुक परफेक्ट हवा असेल तर नेहमी मॅचिंग सीक्वेन्स ब्लाऊज वापरा. साडीसोबत मॅचिंग रंगाचे ब्लाऊज कॅरी केल्यामुळे तुमचा ओव्हर ऑल लुक छान दिसेल. मात्र लक्षात ठेवा नाईट पार्टीसाठी असा लुक करावा दागिने आणि मेकअप थोडा कमीच ठेवा. या लुकवर जास्त ग्लॅमरस मेकअप आणि खूप दागिने घातल्यामुळे तुमचा लुक खराब दिसू शकतो.

फंक्शनची वेळ महत्त्वाची

सीक्वेन्सची फॅशन बऱ्याचदा रात्रीच्या कार्यक्रमांसाठी केली जाते. पण तुम्ही कधी कधी दिवसादेखील ही स्टाइल करू शकता. मात्र तुम्ही कोणत्या वेळी कार्यक्रमाला जाणार आहात यावर काही गोष्टी बदलू शकतात. जसं की दिवसा तुम्ही स्लीव्जलेस सीक्वेन्स ब्लाऊज वापरू शकता. शिवाय प्रिंटेड साड्यांवर दिवसा असं ब्लाऊज खुलून दिसेल, मात्र रात्रीच्या वेळी प्लेन साड्याच जास्त उठून दिसतात. शिवाय दिवसा स्टाइल करताना ब्लाऊजवर सीक्वेन्स कमीत कमी असतील याची काळजी घ्या. 

साडी ड्रेपिंग स्टाईल

सीक्वेन्स ब्लाऊजवर एखादी साडी कॅरी करताना ती कशी ड्रेप केली आहे हे खूप महत्त्वाचं आहे. अशा ब्लाऊजवर पुढून पिन अप केलेल्या पदर पद्धतीने नेसलेल्या साड्या जास्त खुलून दिसतात. पदर मोकळा सोडलेल्या साडीमध्येही सीक्वेन्स ब्लाऊज छान दिसतात. त्यामुळे तुम्ही ब्लाऊजनुसार तुमच्या साडी ड्रेपिंगमध्ये बदल करायला हवेत.

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

12 Jul 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT