ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
khun-saree-blouse-designs-in-marathi

खण साड्यांसाठी खास ब्लाऊज डिझाईन्स | Khun Saree Blouse Designs In Marathi

कोणत्याही महिलेच्या वॉर्डरोबमध्ये साडी नाही असं नक्कीच होणार नाही. साड्यांचे वेगवेगळे प्रकार आपल्याकडे असतातच. पण सध्या सर्वाधिक ट्रेंड्समध्ये आहेत त्या म्हणजे खणाच्या साड्या. अगदी तरूणाईपासून ते अभिनेत्रींपर्यंत खणाच्या साड्यांनी सर्वांनाच भुरळ पाडली आहे. या खणाच्या साड्यांसाठी आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन्सचे ब्लाऊज अधिक उठावदार दिसतात. खणाचे ब्लाऊज नेमके कसे असतात? (What Is Khun Blouse), त्यांच्या विविध डिझाईन्सबाबत तुम्हाला जर माहिती नसेल. तर आम्ही तुमच्यासाठी खास खणाच्या साड्यांवरील खणाचे ब्लाऊज डिझाईनची माहिती घेऊन आलो आहोत. तुम्हीही तुमच्या घरातील कार्यक्रमांना खणाची साडी नेसणार असाल तर तुम्हालाही नक्कीच या खण ब्लाऊज डिझाईनचा उपयोग करून घेता येईल. चला तर मग जाणून घेऊया याची अधिक माहिती. 

नथ पॅटर्न खणाचे ब्लाऊज (Nath Khun Saree Blouse) 

खणाचे ब्लाऊज
Instagram खणाचे ब्लाऊज

नथ हा खरं तर आपल्या महाराष्ट्रीयन परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. नथीचा नखरा आपल्याला नेहमीच सर्व कार्यक्रमात मिरवायला आवडतो. नथीचे अनेक डिझाईन्स आपण नाकात घालत असतो. पण नथीचा खणाचा ब्लाऊज हा खणाच्या साडीची शोभा अधिक वाढवतो. ब्लाऊजच्या हातावर अथवा पाठीवर संपूर्ण नथीचे हँडमेड डिझाईन काढून हा खणाचा ब्लाऊज शिवला जातो. कोणत्याही खणाच्या साडीवर विशेषतः गडद रंगाच्या खणाच्या साडीवर हा नथ पॅटर्न ब्लाऊज अधिक शोभून दिसतो. सहसा खणाच्या साडीमध्ये फिकट रंगाची साडी मिळतच नाही. पण तरीही जर अधिक गडद रंग असेल आणि त्या साडीसह मिसमॅच नथ पॅटर्न खणाचा ब्लाऊज तुम्ही घातलात तर कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही स्वतःकडे नक्कीच लक्ष केंद्रित करून घेऊ शकता. 

पारंपरिक खणाचे ब्लाऊज (Traditional Khun Blouse) 

खण साडी ब्लाऊज डिझाईन
Instagram

कोणत्याही गोष्टीची पारंपरिकता आपण जपतोच. मग खणाची साडी साडी  असो अथवा पारंपरिक पैठणी.  साडी कशी नेसावी याची माहिती आपल्याला असतेच. जेव्हा आपण पारंपरिक खणाची साडी नेसायला घेतो तेव्हा त्यासह आपल्याला पारंपरिक खणाचा ब्लाऊजच अधिक उठावदार आणि आकर्षक दिसून येतो. पारंपरिक खणाच्या ब्लाऊजवर तुम्ही तुम्हाला हवे तसं कोरीव काम करून घेऊ शकता. मात्र मुळात खणाचा प्लेन ब्लाऊज ठेवला तर अधिक उठावदार दिसतो. तुम्ही जर पारंपरिक खणाची नऊवारी साडी नेसणार असाल तर त्यावर नक्कीच पारंपरिक खणाच्या ब्लाऊजचा वापर करा. 

ट्रेंडी खण साडी ब्लाऊज डिझाईन (Trendy Khun Blouse)

ट्रेंडी खणाचे ब्लाऊज
Instagram

प्रत्येक वेळी पारंपरिक ब्लाऊजचा आपण साड्यांवर वापर करत नाही. तर सध्याचा कोणता ट्रेंड चालू आहे त्यानुसार आपण ब्लाऊजचे डिझाईन्स ठरवत असतो आणि खणाचे ब्लाऊजही यासाठी अपवाद नाही. ट्रेंडी तरीही अत्यंत सुंदर दिसणारे असे खणाच्या ब्लाऊजचे डिझाईन्स तुम्ही खणाच्या साडीसाठी तयार करू शकता. खणाच्या साडीमध्येही वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्यावर तुम्ही ट्रेंडी आणि नव्या स्टाईलचे ब्लाऊज घालून तुमच्या खणाच्या साडीला अधिक आकर्षकता देऊ शकता. 

ADVERTISEMENT

ब्रोकेड खण ब्लाऊज डिझाईन (Brocade Khun Blouse) 

खणाचे ब्लाऊज
Instagram

आजकाल सणासमारंभाला ब्रोकेड ब्लाऊज जास्त प्रमाणात घातलेले दिसून येतात. खणाच्या ब्लाऊजमध्येही तुम्हाला ब्रोकेड खण ब्लाऊज डिझाईन पाहायला मिळतात. यामध्ये गडद रंग असल्याने आणि अधिक चांगले आकर्षक डिझाईन्स असल्यामुळे खणाच्या साडीला यामुळे अधिक उठाव येतो आणि त्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमामध्ये तुमच्या साडीची तर शोभा वाढतेच पण त्याहीपेक्षा तुम्ही केंद्रस्थानी अधिक उठून दिसता. गडद गुलाबी, गडद वांगी रंग, गडद हिरवा (Bottle Green), लाल अशा रंगाच्या या ब्लाऊजमुळे तुमचा रंगही अधिक खुलून दिसतो. याशिवाय तुम्ही जर खणाच्या साडीच्या रंगाच्या विरूद्ध रंग अर्थात मिसमॅच केले तर अधिक सुंदर दिसते. 

इकत खणाचे ब्लाऊज (Ikkat Khun blouse)

खण साडी ब्लाऊज डिझाईन
Instagram

इकत (Ikkat) ब्लाऊजचा सध्या ट्रेंड आहे. खणाच्या साडीवर असे इकत खणाचे ब्लाऊज डिझाईन अत्यंत सुंदर दिसतात. मुळात हे कॉटनचे असल्यामुळे साडीला अधिक शोभा आणतात आणि तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसातही कोणत्याही लग्न अथवा मुंजीच्या समारंभाला जायचे असल्यास, असे ब्लाऊज अधिक सोयीस्कर ठरतात. इकत खणाचे ब्लाऊज तुमच्या पारंपरिक साड्यांचीही शोभा वाढवतात. तसंच तुम्ही तुमच्या साडीच्या रंगानुसार याची निवड करावी. तुम्हाला मिक्समॅच करायचे असल्याही तुम्ही याचा वापर करू शकता. तसंच यावर ऑक्सिडाईज्ड दागिन्यांचा वापर केल्यास, तुम्ही अधिक आकर्षक दिसता. 

बॅकलेस खण ब्लाऊज डिझाईन (Khun Backless Blouse)

खणाचे ब्लाऊज
Instagram

प्रत्येक महिलेच्या वॉर्डरोबमध्ये बॅकलेस ब्लाऊज हा असतोच. तुम्हाला खणाच्या साडीवर कशा डिझाईन्सचा ब्लाऊज शिवायचा आहे असा जर प्रश्न असेल. तर तुम्ही बॅकलेस ब्लाऊज (Backless Blouse) हा पर्याय नक्कीच निवडू शकता. खणाचा बॅकलेस ब्लाऊज आणि त्यातही स्लिव्हलेस ब्लाऊज तुम्ही डिझाईन करून शिऊन घेतला तर अतिशय सुंदर दिसेल. तुम्ही जर बारीक असाल आणि खणाची साडी नेसणार असाल तर तुमच्यासाठी हा पर्याय अत्यंत आकर्षक आणि मादकही ठरू शकतो.

कॉलर डिझाईन खणाचे ब्लाऊज (Khun Collar Blouse) 

khun saree blouse design
Instagram – खण ब्लाऊज डिझाईन

काही जणींना पाठ अथवा गळा दिसलेला अजिबात आवडत नाही. त्यामुळे अनेकदा कॉलर ब्लाऊज शिऊन घेतले जातात. पण डिझाईन म्हणून आणि फॅशन म्हणूनही तुम्ही कॉलर डिझाईन खणाचा ब्लाऊज शिऊन घेऊ शकता. खणाच्या साडीवर ही एक वेगळी फॅशन म्हणून तुम्ही याचा वापर करावा. मात्र कॉलर ब्लाऊज शिवताना याचे हात संपूर्ण ठेवावेत. जेणेकरून ही स्टाईल तुम्हाला अधिक आकर्षक दिसण्यास मदत करते.

ADVERTISEMENT

बलून खण ब्लाऊज डिझाईन (Balloon Khun Blouse) 

खणाचे ब्लाऊज
Instagram

 महाराष्ट्रीयन घरांमध्ये लहानपणी बऱ्याच मुलींना फुग्याच्या हाताचे फ्रॉक (Balloon Frocks) शिवले जातात. पण खणाच्या साडीसाठी तुम्ही असा बलून ब्लाऊजदेखील शिऊ शकता. खण साडी ब्लाऊज डिझाईन अत्यंत सुंदर दिसते. विशेषतः बारीक मुलींसाठी हा ब्लाऊज अधिक सुंदर दिसतो. बारीक मुलींचे हात अधिक उठावदार दिसावे म्हणून बलून ब्लाऊज शिवले जातात. खणाची साडी नेसायची जर तुम्ही ठरवली असेल आणि पारंपरिक लुक करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही बलून खण ब्लाऊज डिझाईन हा पर्याय नक्की निवडू शकता. तसंच यावर तुम्ही हेअरस्टाईल करून गजरा घातलात तर तुमचा लुक पूर्ण होतो. 

सरस्वती खण साडी ब्लाऊज डिझाईन (Saraswati Khun Blouse) 

खणाचे ब्लाऊज
Instagram

आपण हल्ली अनेक ठिकाणी साड्यांवर सरस्वती काढलेली पाहतो. अशा सरस्वती डिझाईन्स साडीसाठी तशाच डिझाईन्सचा अर्थात सरस्वती डिझाईन्सचा ब्लाऊज उठावदार दिसतो. खणाच्या साडीवर पांढऱ्या रंगाच्या डिझाईन्स ही अधिक शोभून दिसते. गडद रंग आणि त्यावर पांढऱ्या रंगाची सरस्वती नक्कीच सर्वांचे लक्ष वेधून घेते. तुम्हीही सरस्वती डिझाईन्सची खणाची साडी घेतली असेल तर पाठीवर सुंदर अशी सरस्वतीची डिझाईन तुम्ही बनवून घ्या. मात्र ही डिझाईन्स तयार करताना अर्थात ब्लाऊज शिवताना लक्षात ठेवा की, तुमच्या ब्लाऊजची पाठ ही पूर्णपणे बंद असावी. जेणेकरून सरस्वतीचे डिझाईन शोभून दिसेल. 

गाठीच्या डिझाईनमधील खणाचे ब्लाऊज (Knotted Khun Blouse)

खण साडी ब्लाऊज डिझाईन
Instagram

ब्लाऊज म्हटलं की त्यामध्ये काहीतरी वेगळी व्हरायटी आणि वेगळे डिझाईन्स असावे असे कितीतरी जणांना वाटते. खणाच्या साडीवर तुम्ही नॉट ब्लाऊज अर्थात गाठीच्या डिझाईनमधील खणाचे ब्लाऊज ट्राय करू शकता. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही ब्लाऊजच्या मागच्या बाजूचा गळा मोठा ठेऊन त्याला खाली नॉट अर्थात गाठ ठेवा. हे दिसायला अत्यंत सुंदर दिसते. साडीचा रंग गडद असेल आणि तुमचा रंग गोरा, सावळा असेल तर तुम्हाला ही स्टाईल अधिक सुंदर आणि आकर्षक दिसते. तसंच तुमचा कमनीय बांधा असेल तर तुम्ही नक्कीच ही स्टाईल ट्राय करायला हवी. 

हॉल्टर नेक खणाचे ब्लाऊज (Halter neck khun blouse) 

खणाचे ब्लाऊज
Instagram

हॉल्टर नेक हा ब्लाऊजचा अजून एक सुंदर प्रकार आहे. तुमच्या खणाच्या साडीसाठी हॉल्टर नेक ब्लाऊजचे पर्यायही चांगले आहेत. तुम्हाला जर ब्लाऊजमध्ये तोचतोचपणा नको असेल तर तुम्ही खणाच्या पारंपरिक साडीवर हॉल्टर नेक खणाचे ब्लाऊज नक्की शिऊन घेऊ शकता. हॉल्टर नेकमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन्सदेखील मिळू शकतात. हॉल्टर नेकमध्येदेखील तुम्ही केवळ एकाच प्रकारचे डिझाईन न वापरता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन मिळू शकते. त्यामुळे एखाद्या पार्टीसाठी अथवा घरातील कोणत्याही कार्यक्रमासाठी तुम्हाला खणाच्या साडीवर ट्रेंडी आणि फॅशनेबल ब्लाऊज घालायचा असेल तर हॉल्टर नेक खणाच्या ब्लाऊजचा तुम्ही विचार करू शकता. 

ADVERTISEMENT

मल्टीकलर खण साडी ब्लाऊज डिझाईन (Multicolour Khun Blouse)

खणाचे ब्लाऊज
Instagram

कोणत्याही साडीवर तुम्हाला मल्टीकलर आणि मिक्समॅच ब्लाऊज अधिक शोभून दिसतो. मल्टीकलर खण साडी ब्लाऊज डिझाईनही असाच चांगला पर्याय आहे. खणाची साडी तुम्ही नेसणार असाल तर त्यावर मल्टीकलर ब्लाऊजही अधिक सुंदर दिसतो. मल्टीकलर ब्लाऊजमुळे साडीची शोभा अधिक वाढते. तसंच तुमच्या साडीला अधिक चांगला लुक मिळवून देण्यासाठी मल्टीकलर ब्लाऊज अधिक चांगला दिसतो. मल्टीकलर ब्लाऊजचा गळा तुम्ही अधिक मोठा ठेवल्यास तुमच्या व्यक्तीमत्त्वाला शोभून दिसेल. 

खणाचे ब्लाऊज डिझाईन्स तुम्हाला हवे असतील तर तुम्ही नक्की आमचा लेख वाचा. तुम्हाला आमचा लेख कसा वाटला हे सांगा आणि शेअर, लाईक करा.

09 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT