ADVERTISEMENT
home / xSEO
शिवजयंती निमित्त 3 उत्स्फूर्त भाषणे | Shivjayanti Speech in Marathi

शिवजयंती निमित्त 3 उत्स्फूर्त भाषणे | Shivjayanti Speech in Marathi

जय भवानी जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आणि पराक्रम आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे. भारतातील सर्वात नीडर आणि साहसी राजांच्या श्रेणीमध्ये त्यांचं नाव सर्वात आधी घेतलं जातं. 19 फ्रेबुवारी रोजी मराठी कुटुंबात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचं पूर्ण नाव शिवाजी भोसले होतं. त्यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा जंगी स्वरूपात साजरा केला जातो. या दिवशी सर्वजण एकमेंकाना शिवजयंतीच्या शुभेच्छा, शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा (chhatrapati shivaji maharaj quotes in marathi), शिवाजी महाराजांचे विचार (shivaji maharaj thoughts), शुभेच्छा संदेश (shivaji maharaj quotes), व्हॉटसअॅप स्टेटस (shivaji maharaj status in marathi), शिवाजी महाराज घोषवाक्य (shivaji maharaj slogan in marathi), शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा (Shivaji Jayanti Wishes In Marathi) नक्कीच शेअर करतात.

मग शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात तुम्हाला भाषण द्यायचं असल्यास खालील भाषणं नक्कीच उपयोगी पडतील.

(भाषण क्र.1) शिवजयंती निमित्त भाषण | Shivjayanti Speech in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज हे एक साहसी, बुद्धीमान, शौर्यवीर आणि दयाळू शासक होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1627 साली मराठा कुटुंबात महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपतींचे वडील शहाजी राजे आणि जिजामाता होत्या. राजमाता जिजाई यांनाी छत्रपतींना उत्तम शासक आणि योद्धा होण्यासाठी घडवलं. लहानपणी शिवाजी महाराज त्यांच्या वयाच्या मुलांना एकत्र जमा करून नेता बनून युद्ध करणे आणि किल्ला जिंकण्याचा खेळ खेळत असत. त्यांचे गुरू होते दादाजी कोंडदेव.

युवावस्थेत येताच त्यांनी लहानपणीचा खेळ खरा करत खऱ्या शत्रूवर आक्रमण करून किल्ले जिंकण्यास सुरूवात केली. जसं शिवाजी महाराजांनी पुरंदर आणि तोरणासारख्या किल्ल्यावर आपला अधिकार मिळवला. तसं त्याचं नाव आणि कार्य संपूर्ण दक्षिणेत पसरलं. ही बातमी आगीप्रमाणे आग्रा आणि दिल्लीपर्यंत पोचली. अत्याचारी असणारे सर्व शासक त्यांचं फक्त नाव ऐकून घाबरू लागले.

ADVERTISEMENT

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आतंकित झालेला विजापूरचा राजा आदिलशाहने त्यांना बंदी न बनवता आल्यामुळे महाराजांचे वडील शहाजी राजांना कैद केलं. हे कळताच महाराज संतापले. त्यांनी नीती आणि साहस यांच्या साहाय्याने छापेमारी करून लवकरच वडिलांना कैदेतून मुक्त केलं. तेव्हा विजापूरच्या राजाने शिवाजी महाराजांना जीवंत किंवा मुर्दा पकडून आणण्याचा आदेश देत आपल्या सेनापती अफजल खानला पाठवलं. त्याने बंधुभाव आणि सामंजस्याचं खोटं नाटक करत शिवाजींना मिठी मारून मारण्याचा प्रयत्न केला. पण समजूतदार महाराजांनी आपल्या हातात लपवलेल्या वाघनखांमुळे अफजल खानचं मारला गेला. यामुळे त्याच्या सेनेने आपल्या सेनापतीला मेलेलं पाहून तिकडून पळ काढला.

छत्रपती शिवाजी महाराज हे एक भारतीय शासक होते. ज्यांनी मराठी साम्राज्य उभं केलं. त्यामुळे महाराजांना एक अग्रगण्य वीर आणि अमर स्वातंत्र्य सेनानी म्हटलं जातं. वीर शिवाजी राष्ट्रीयतेचं जीवंत प्रतीक होते.

बहुगुणी प्रतिभावान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महाराष्ट्रात 19 फेब्रुवारीला साजरी केली जाते पण अनेक संघटना शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हिंदू कॅलेंडप्रमाणे येणाऱ्या तिथी अनुसार साजरा करतात. त्यांच्या वीरतेमुळे त्यांना एक महान राष्ट्रपुरूषाच्या रूपात ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 मध्ये तीन आठवड्यांच्या आजारपणानंतर रायगडावर झाला.

पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही आपल्यासोबत आहेत आणि राहतील. जय भवानी जय शिवाजी. शिवजयंतीची हार्दिक शुभेच्छा.

ADVERTISEMENT

(भाषण क्र.2) शिवजयंती साठी भाषण | 2nd Shivjayanti Speech in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज हे वडील शहाजी राजे आणि माता जिजाबाई यांचे पुत्र होते. त्यांचा जन्म पुण्याजवळील शिवनेरी गडावर झाला. देशाला विदेशी आणि सत्तापिपासू शासकांनी घेरलेलं असताना संपूर्ण भारतात एक सार्वभौम स्वतंत्र शासन स्थापित करण्याचा प्रयत्न छत्रपतींनी केला. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांकडे एक वीर योद्धा आणि अमर स्वातंत्र्य-सेनानी म्हणून पाहिलं जातं. जय भवानी जय शिवाजी, शिवजयंतीच्या शुभेच्छा.

छत्रपती शिवाजी महाराजाचं बालपण राजमाता जिजाऊंच्या मार्गदर्शनात व्यतीत झालं. राजमाता जिजाई धार्मिक स्वभावाच्या असूनही गुण-स्वभाव आणि व्यवहारात वीरांगना नारी होत्या. याच कारणामुळे त्यांनी बाल शिवाजींची जडणघडण रामायण, महाभारत आणि इतर भारतीय वीरात्मांच्या वीररसयुक्त कहाण्या ऐकून आणि शिक्षण देऊन केलं. दादोजी कोंडदेवाकडून त्यांनी सामायिक युद्ध आणि इतर संरक्षक कलांमध्ये नैपुण्य मिळवलं. धर्म, संस्कृती आणि राजकारणाबाबत उच्च शिक्षणही त्यांना दिलं. त्या काळात संत रामदेवांच्या संपर्कात आल्याने शिवाजी महाराज पूर्णतः राष्ट्रप्रेमी, कर्तव्यतत्पर आणि कर्मठ योद्धा बनले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह हा सन 14 मे 1640 साली सईबाई निंबाळकर यांच्याशी लाल महल पुणे येथे पार पडला. त्यांच्या मुलाचं नाव संभाजी होतं. संभाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र आणि उत्तराधिकारी होतो. ज्यांनी सन 1680 ते 1689 या काळात राज्य केलं. मात्र शंभूराज्यांमध्ये आपल्या पित्याप्रमाणे कर्मठ आणि दृढ संकल्पाच अभाव होता. संभीजींच्या पत्नीचं नाव येसूबाई होतं. त्यांचे पुत्र आणि उत्तराधिकारी राजाराम होते.

(भाषण क्र.3) शिवजयंती निमित्त भाषण | Shivjayanti Speech in Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम जेवढा गौरवावा तेवढा कमीच आहे. आज महाराष्ट्रात छत्रपतींना शिवाजी महाराजांना दैवत मानलं जातं. त्यांच्यावर अनेक कथा, कादंबऱ्या, शेर-शायरी आणि पोवाडे आहेत. तसंच खालीलप्रमाणे त्यांचं वीरत्व सांगणाऱ्या चारोळ्या लिहील्या गेल्या आहेत.

ADVERTISEMENT

“विजेसारखी तलवार चालवून गेला, 

कुलदैवत श्री राजा शिवछत्रपती तुम्ही.”

निधडया छातीने हिंदुस्थान हालवून गेला, 

वाघनख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला, 

ADVERTISEMENT

मूठभर मावळयांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला

 स्वर्गात गेल्यावर देवांनी 

ज्याला झुकून मुजरा केला 

असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला.”

ADVERTISEMENT

“ शिवरायांचे आठवावे रूप

 शिवरायांचा आठवावा प्रताप 

शिवरायांचा आठवावा साक्षेप 

भूमंडळी … हिंदवी स्वराज्याचे 

ADVERTISEMENT

संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.”

“ झंझाविला भगव्याचा समान तुम्ही, 

जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,

 घडविले श्री चे स्वराज्य तुम्ही, 

ADVERTISEMENT

ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे.’

मग तुम्हीही या शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांवर भाषण करण्यासाठी वरील भाषणांचा उपयोग करू शकता. सोबत शिवाजी महाराज जयंती कोट्स, स्टेटस आणि शुभेच्छा नक्की शेअर करा.

18 Feb 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT