ADVERTISEMENT
home / Make Up Trends and Ideas
फाऊंडेशन आणि कन्सिलरची शेड निवडताना काय घ्यावी काळजी

फाऊंडेशन आणि कन्सिलरची शेड निवडताना काय घ्यावी काळजी

मेकअपचा बेस तयार करण्यासाठी फाऊंडेशन आणि कन्सिलरचा वापर केला जातो हे तुम्हाला माहीतच असेल. कारण या दोन्ही प्रॉडक्टमुळे तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, व्रण, अॅक्ने लपवता येतात. बाजारात विविध प्रकारचे फाऊंडेशन आणि कन्सिलर मिळतात. त्यामध्ये लिक्विड, स्टिक, पावडर आणि क्रिम असे प्रामुख्याने चार प्रकार असतात. तुम्ही तुमच्या स्किन टोन आणि त्वचेच्या प्रकारानुसार त्याची निवड करता. तुम्हाला कसं कव्हरेज हवं यावरही तुम्ही कोणतं फाऊंडेशन आणि कन्सिलर निवडावं हे ठरत असतं. तुमच्या त्वचेसाठी कोणतं प्रॉडक्ट चांगलं आहे याबाबत आम्ही वेळोवेळी तुम्हाला  नेहमीच योग्य ती माहिती पूरवत असतो. मात्र अनेक महिलांना हा प्रश्न पडतो की फाऊंडेशन आणि कन्सिलरचा प्रकार आणि ब्रॅंड ठरवल्यानंतर ते दोन्ही एकाच शेडचे असावेत का ? यासाठीच आज याबाबत थोडी अधिक माहिती जाणून घेऊ या.

Shutterstock

फाऊंडेशन आणि कन्सिलरची शेड एकच असावी का

तुम्हाला फाऊंडेशन आणि कन्सिलर का लावायचं आहे यावर या प्रश्नाचं उत्तर अवलंबून आहे. डोळ्यांच्या खालील भाग उजळ करण्यासाठी, ओठांकडील भाग, नाकाजवळचा भाग एकसमान दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या स्किन टोनपेक्षा एक अथवा दोन शेड लाईट टोनचं कन्सिलर निवडू शकता. मात्र जर तुम्ही कन्सिलरचा वापर तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग लपवण्यासाठी करणार असाल तर तुम्ही तुमच्या फाऊंडेशनला मॅच होणारी कन्सिलरची शेड निवडू शकता. पण लक्षात ठेवा कन्सिलरने तुम्हाला जास्त कव्हरेज मिळणार नाही यासाठी तुम्हाला तुमची त्वचा एकसमान करण्यासाठी योग्य शेडच्या  फाऊंडेशनचा वापर करावा लागेलच. कारण तुमच्या चेहऱ्यावरील डाग, व्रण  अथवा पिंपल्स लपवण्यासाठी फाऊंडेशन एक छान प्रॉडक्ट आहे. काही फाऊंडेशनमध्ये यासाठी मॉईस्चराईझर आणि सनप्रोटेक्शन करणारे घटकही वापरले जातात. ज्यामुळे तुम्ही असे फाऊंडेशन दररोज वापरू शकता. 

ADVERTISEMENT

जेव्हा तुम्हाला फाऊंडेशन आणि कन्सिलर एकत्र वापरायचं असेल तेव्हा तुम्ही तुमच्या फाऊंडेशनला मॅच होणारी कन्सिलरची शेड नक्कीच निवडू शकता. तुमच्या एव्हाना लक्षात आलंच असेल की फाऊंडेशनच्या अनंत शेड बाजारात मिळतात पण त्या प्रमाणात कन्सिलर मात्र कमी शेडमध्ये उपलब्ध असतात. बऱ्याचदा कन्सिलर तुम्हाला फक्त लाईट, मिडीयम अथवा डीप अशा शेडमध्येच मिळू शकतात. म्हणूनच अशावेळी तुमच्या फाऊंडेशनला मिळतीजुळती शेड निवडण्याचा प्रयत्न करा. याबाबत जास्त काळजी करू नका कारण कन्सिलर तुमच्या फाऊंडेशनसोबत सहज ब्लेंड होईल. त्यामुळे तुम्ही दोन वेगळ्या शेड वापरल्या आहेत हे कोणाच्या लक्षातही येणार नाही. 

जर तु्म्ही कन्सिलरऐवजी कलर करेक्टर वापरणार असाल तर ते निवडताना तुम्हाला तुमचा अंडरटोन लक्षात ठेवावा लागेल. म्हणजे समजा जर तुमचा अंडर आयकडचा भाग जांबळट असेल तर यलो टोनचे कन्सिलर निवडा, जर तो भाग निळसर असेल तर पिच टोनचे कन्सिलर बेस्ट ठरेल, शिवाय जर तुमच्या डोळ्यांखालील भाग चॉकलेटी असेल तर तुम्हाला ऑरेंज रंगाचे कन्सिलर निवडावे लागेल. 

Shutterstock

ADVERTISEMENT

सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही तुमच्या मेकअप प्रॉडक्टची कोणती शेड निवडायची हे सर्वस्वी तुमच्या मेकअप करण्यामागील हेतूवर अवलंबून आहे. आधीच सांगतल्याप्रमाणे तुम्हाला फक्त चेहऱ्यावर काही ठिकाणी कलर करेक्ट करण्यासाठी कन्सिलर वापरायचे असेल तर तुमच्या स्किन टोनपेक्षा दोन शेड लाईट कन्सिलर निवडा. जर तुम्हाला पूर्ण चेहऱ्यावरील डाग लपवायचे असतील तर तुमच्या फाऊंडेशनला मिळतीजुळती असणारी कन्सिलरची शेड निवडणे उत्तम राहील आणि जर तुम्हाला हेवी मेकअपच नको असेल तर सरळ फाऊंडेशन न वापरता फक्त दोन शेडच्या कन्सिलरचा वापर करा. तुम्हाला यातील नेमकं काय हवं ते ओळखा आणि हवी ती शेड निवडा. 

 

तुमचा मेकअप लुक कम्पीट करण्यासाठी मायग्लॅमची लिपस्टिक नक्की निवडा. यासाठी तुम्हाला  मायग्लॅमच्या #TheGreatGlammSurvey मध्ये सहभागी व्हावं लागेल. मायग्लॅमचा सर्व्हे पूर्ण केल्यावर तुम्हाला @MyGlgamm मिळेल 1000 रू. पर्यंत ब्युटी बेनिफिट्स आणि लिट लिक्विड मॅट कलेक्शनमधील एक लिपस्टिक चक्क मोफत

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

तुमच्या त्वचेसाठी योग्य कन्सिलर कसं निवडाल (How To Use Concealer In Marathi)

मेकअपने असा कव्हर करा तुमचा टॅटू, नाही दिसणार नामोनिशाण

चेहऱ्यावर सुरकुत्या असतील तर असा करा मेकअप

21 Oct 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT