ADVERTISEMENT
home / मेकअप
तुमच्या त्वचेसाठी योग्य कन्सिलर कसं निवडाल (How To Use Concealer In Marathi)

तुमच्या त्वचेसाठी योग्य कन्सिलर कसं निवडाल (How To Use Concealer In Marathi)

मेकअप करताना लागणारं कन्सिलर हे एक महत्वाचं साधन आहे. तुमचं मेकअप कीट कन्सिसलशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. जे उत्तम मेकअप करू शकतात अशा लोकांना कन्सिलर कसं वापरावं, ते कुठून विकत घ्यावं आणि कोणत्या टोनचं कन्सिलर असावं अशा अनेक गोष्टी माहित असतात. पण नव्याने मेकअप करायला शिकताना आपल्याला या सर्व गोष्टी अगदी पहिल्यापासून शिकून घ्याव्या लागतात. यासाठी अगदी कन्सिलर म्हणजे काय इथपासून कन्सिलच्या निरनिराळ्या प्रकारापर्यंत सर्व माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

कन्सिलरचे प्रकार

तुमच्या त्वचेसाठी तुम्ही कोणत्या प्रकारच्या फॉर्ममधलं कन्सिलर खरेदी कराल

तुमच्या स्कीन टोनप्रमाणे योग्य कन्सिलर कसे निवडाल

ADVERTISEMENT

काही महत्वाच्या टीप्स

100 रु ते 500 रु किंमतीमध्ये उपलब्ध असलेलं कन्सिलर

500 रु ते 1000 रु किंमतीमध्ये उपलब्ध असलेलं कन्सिलर

1000 ते 2000 या किंमतीमध्ये उपलब्ध असलेलं कन्सिलर

ADVERTISEMENT

कन्सिलर म्हणजे नेमकं काय? (What is Concealer)

कन्सिलर हे असं एक मेकअपचं साहित्य आहे जे तुम्ही मेकअप बेससाठी वापरू शकता. कन्सिलरमुळे तुमच्या चेहऱ्याचा टोन एकसमान दिसण्यास मदत होते. दोन प्रकारची कन्सिलर बाजारात उपलब्ध असतात. पहिला प्रकार हा कलर करेक्टिंग करण्यासाठी वापरला जातो. ज्यामध्ये चेहऱ्यावरील पिगमेंटच्या रंगांचे कलर उपलब्ध असतात. जसे की यलो, ऑरेंज, लव्हेंडर, ग्रीन अशा रंगात हे कन्सिलर मिळू शकतं.तर दुसऱ्या प्रकारचं कन्सिलर हे ब्लेमिश कव्हरिंग असतं ज्यामध्ये निरनिराळ्या टोनचे प्रकार उपलब्ध असतात.

concealer 3

कन्सिलर आणि फाऊंडेशनमध्ये नेमका काय फरक असतो? (Difference Between A Concealer & A Foundation)

कन्सिलरपेक्षा फाऊंडेशन हे थोडं पातळ स्वरुपाचं उत्पादन आहे. या दोघांमधील रंगद्रव्य जरी समान असली तरी फाऊंडेशन नेहमी कन्सिलरपेक्षा पातळच असतं. ही दोन्ही सौदर्य उत्पादनं निरनिराळ्या स्वरुपात बाजारात उपलब्ध असतात. कन्सिलर हे केवळ चेहऱ्याची त्वचा एकसमान दिसण्यासाठी वापरण्यात येतं.

कन्सिलर तुम्ही चेहऱ्यावर कोणत्या भागावर लावू शकता? (Where Should You Put Concealer On Your Face?)

बऱ्याचदा कन्सिलर हे डोळ्याच्या खालील त्वचेवर आणि तुमच्या चेहऱ्यावरील महत्वाच्या भागावर लावण्यात येतं. जसं की भुवयांच्या मधला भाग, नाकाच्या शेंड्यावर, कपाळ आणि हनुवटीवर अशा ठिकाणी कन्सिलर लावलं जातं. तसंच चेहऱ्यावरील ज्या भागावर लाल अथवा काळसर डाग अथवा पिगमेंटेशन असतील त्या भागावरदेखील तुम्ही कन्सिलर लावू शकता.

ADVERTISEMENT

concealer 1

कन्सिलरचे प्रकार (Types of Concealers)

आधीच सांगितल्याप्रमाणे कन्सिलरचे दोन प्रकार असतात त्यामुळे तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेनूसार या कन्सिलरची निवड करु शकता. कन्सिलरच्या दोन प्रकारांमध्ये एक कलर करेक्टिंग आणि दुसरं ब्लेमिश कव्हरिंग असे प्रकार मार्केटमध्ये उपलब्ध असतात.  खरंतर या दोन्ही प्रकारांपैकी नेमक्या कोणत्या प्रकारचं कन्सिलर लावावं हे तुमच्या त्वचेवरील समस्यांवर अवलंबून आहे.

कलर करेंक्टिंग कन्सिलर (Colour Correcting Concealers)

कलर करेंक्टिंग या प्रकारचे कन्सिलर हे मुख्यतः निरनिराळ्या रंगद्रव्यांच्या शेड्समध्ये उपलब्ध असतं. ज्यामुळे तुमच्या त्वचेवरील डाग अथवा समस्या झाकून टाकता येतात.

ग्रीन-  चेहऱ्यावरील लालसरपणा कमी करण्यासाठी

ADVERTISEMENT

पर्पल-  चेहऱ्यावरील पिवळसर डाग कमी करण्यासाठी

पिंक- चेहऱ्यावरील तपकिरी रंगाचे डाग कमी करण्यासाठी. तसंच डाग सर्कल आणि पिगमेंटेशनसाठी तर हे कन्सिलर अगदी योग्य असतं.

ऑरेंज- जर तुमच्या डोळ्यांवरील अथवा पापण्यांवरील रक्तवाहिन्या् दिसत असतील तर तो निळसर भाग झाकण्यासाठी ऑरेंज कलरच कन्सिलर वापरणं नक्कीच फायदेशीर ठरेल.

पिच- जर तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर रक्तवाहिन्या दिसत असतील तर हा निळसरपणा झाकण्यासाठी पिच कलरच कन्सिलर वापरणं खूपच योग्य असू शकेल.

ADVERTISEMENT

यलो- चेहऱ्यावरील लालसर भाग अथवा सुर्यप्रकाशामुळे झालेलं टॅनींग लपविण्यासाठी यलो कलरचं कन्सिलर वापरावं

वाचा – घरच्या घरी करा असा मेकअप जो तुम्हाला देईल प्रोफेशनल लुक

ब्लेमिंश कव्हरिंग कन्सिलर (Blemish Covering Concealers)

ब्लेमिश कव्हरींग कन्सिलर या प्रकारात त्वचेच्या विविध शेड्समध्ये कन्सिलर मिळू शकतात.

तुमच्या त्वचेसाठी तुम्ही कोणत्या प्रकारच्या फॉर्ममधलं कन्सिलर खरेदी कराल? (Concealer Formulations For Your Skin Type)

स्टिक कन्सिलर (Stick Concealers)

स्टिक कन्सिलर हे सेमी जेल आणि पावडर फार्ममध्ये उपलब्ध असतं. या प्रकारचं कन्सिलर हे कोरड्या आणि संवेदनशील त्वचेवर फारच परिणामकारक ठरतं. हे कन्सिलर वापरताना ते जेल फॉरमॅटमध्ये असतं आणि सुकल्यावर मात्र ते पुन्हा पावडर मॅट फॉर्म्युलामध्ये दिसू लागतं. तेलकट त्वचेवरदेखील हे कन्सिलर लावता येतं मात्र ते लावताना पावडरसोबत व्यवस्थित लावलं पाहिजे. कन्सिलरचं हे फॉर्म्युलेशन इतर प्रकारांपेक्षा अधिक प्रमाणात वापरलं जातं.

ADVERTISEMENT

लिक्वीड कन्सिलर (Liquid Concealers)

हा एक कन्सिलरचा अगदी उत्तम फॉर्म आहे. कोणत्याही त्वचा प्रकारावर हे कन्सिलर लावता येते. लॉंग लास्टींग फिनीशसाठी तुम्ही लिक्विड कन्सिलर पावडरसोबत सेट करू शकता. बऱ्याचदा हे कन्सिलर ब्लेमीश इफेक्ट आणि चेहऱ्यावरील डाग लपविण्यासाठी वापरतात. उत्तम पद्धतीने ब्लेंड केल्यास त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक चांगला ग्लो येतो. चेहऱ्यावर हे कन्सिलर वापरणे अगदी सोपे असतं. शिवाय यामुळे फार नुकसानदेखील होत नाही.

क्रीम कन्सिलर (Cream Concealers)

इतर दोन फॉर्म्युलापेक्षा क्रीम फॉर्म्युल्यामधील कन्सिलर हे जास्त पिंगमेंटेड असते. बऱ्याचदा हे कन्सिलर डोळ्यांच्या खालील भागासाठी अथवा चेहऱ्यावरील एखादा अति डागाळलेला भाग लपविण्यासाठी वापरण्यात येतं. चेहऱ्याच्या मोठ्या डागांवर हे कन्सिलर लावता येतं. मात्र तेलकट त्वचा असलेल्या अथवा सुरकुतलेल्या चेहऱ्यावर हे कन्सिलर न लावण्याचा सल्ला दिला जातो.

तुमच्या स्कीन टोनप्रमाणे योग्य कन्सिलर कसे निवडाल (How To Pick The Right Concealer According To Your Skin Tone?)

चेहऱ्यावरील निरनिराळ्या भागांवर लावण्यासाठी निरनिराळ्या प्रकारची कन्सिलर बाजारात उपलब्ध असतात. त्यामुळे चेहऱ्याच्या टोननुसार कन्सिलर निवडणं थोडं कठीण असते.

ब्युटी एक्सपर्ट च्या सल्लानुसार जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांच्या खालील भागासाठी अथवा चेहऱ्यावरील हाय पॉईंटसाठी एखादं कन्सिलर निवडायचं असेल तर तुमच्या चेहऱ्याच्या टोनच्या दोन शेड फिक्या रंगाची शेड निवडा. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या खालील गडदपणा कमी दिसेल शिवाय चेहऱ्यावरील हाय पॉईंटदेखील उठून दिसतील. मात्र हे कन्सिलर तुम्ही फाऊंडेशन लावण्याआधी लावायला हवं. ज्यामुळे तुम्हाला त्याचा एक चांगला परिणाम दिसू शकेल.

ADVERTISEMENT

ब्लेमिशेस, मार्क्स, स्कार्सस, अॅक्नेसाठी तुमच्या त्वचेला अगदी मिळतं जुळत्या रंगाचं कन्सिलर लावायला हवं. यासाठी तुम्ही एक साधी टेस्ट करू शकता. यासाठी प्रथम तुमच्या या त्वचा समस्येवर थोडं कन्सिलर लावून बघा ते व्यवस्थित ब्लेंड होत असेल तर ते तुमच्या त्वचेच्या शेडला मॅच होत आहे असं समजा. हे कन्सिलर तुमच्या मेकअपचा बेस लावून झाल्यावर गरज असेल तरच लावायचं असतं. जर तुम्हाला चेहऱ्यावरील रक्तवाहिन्यांमुळे दिसणारे हिरवे अथवा निळे डाग लपविण्यासाठी एखादे कन्सिलर निवडायचे असेल तर यासाठी तुम्ही तुमच्या मनगटाजवळील रक्तवाहिन्यांच्या भागावर या कन्सिलरची टेस्ट करा.

काही महत्वाच्या टीप्स (Concealer Hacks)

जर तुम्ही योग्य असलेलं कन्सिलर निवडलं असेल पण जर तुम्हाला कलर करेक्शन कसं करावे याचं ज्ञान नसेल तर यासाठी आमच्या या टीप्स् तुम्हाला खूप उपयोगी ठरतील

1. कोणते कन्सिलर कधी वापरावे

जर तुम्हाला तुमच्या डोळ्याच्या खालील भाग झाकायचा असेल तर फाऊंडेशन लावण्यापूर्वी फिक्या रंगाचे कन्सिलर लावा. कारण यासाठी नुसते फाऊंडेशन लावलं तर तुमच्या चेहऱ्यावर थर दिसण्याची शक्यता असते.

2. नॅचरल लाईट कलरसाठी काय कराल

मेकअप करताना इतर साहित्याप्रमाणे नॅचरल लाईट कलर कन्सिलर वापरल्यामुळे ते तुमच्या त्वचेसोबत सहज ब्लेंड होते. यासाठी कन्सिलर निवडताना नॅचरल लाईट कलरची निवड करा.

ADVERTISEMENT

3. डोळ्याखाली एक त्रिकोण काढा

डार्क सर्कल्स कन्सिलरने झाकण्यासाठी त्या भागावर एक उलट त्रिकोण काढा. या शेपमुळे तुम्हाला डार्क सर्कल झाकणे अधिक सोपे जाईल. जर तुम्हाला तुमची आयशॅडो दिवसभर तशीच राहावी असं वाटत असेल तर थोडसं कन्सिलर तुमच्या पापण्यांवर डॅब करा आणि नंतर पावडरने सेट करा. परफेक्ट बेस तयार करण्यासाठी ही एक छान युक्ती आहे.

5. पिंपल्ससाठी हिरव्या रंगाचे कन्सिलर वापरा

मेकअप करताना चेहऱ्यावरील लालसर मुरुमं झाकण्यासाठी आधी त्यावर ग्रीन कन्सिलर लावा आणि व्यवस्थित ब्लेंड करा. त्यानंतर पुन्हा तुमच्या त्वचेच्या रंगाशी मिळतं जुळतं कन्सिलर लावा ज्यामुळे तुमचा चेहरा एकसमान दिसू लागेल.

6. चेहऱ्याशिवाय आणखी या काही भागांवर तुम्ही कन्सिलर लावू शकता

जर तुमच्या हातावर, छातीवर अथवा पाठीवरदेखील काळे डाग असतील तर स्टाईलिश कपडे घालणं मुश्किल होतं. अशावेळी हे डाग तात्पुरते लपविण्यासाठी तुम्ही त्या भागावर त्वचेशी रंगाशी साधर्म्य असणारं एखादं कन्सिलर लावून त्यावर पावडर लावू शकता.

concealing

ADVERTISEMENT

7. तुमच्या ओठांचा कलर उठून दिसण्यासाठी कन्सिलरचा वापर करा

लिपस्टिक लावण्यापूर्वी तुमच्या ओठांवर थोडंस कन्सिलर डॅब करा. ज्यामुळे तुमच्या लिपस्टिकचा रंग व्यवस्थित दिसेल शिवाय ती जास्त वेळ ओठांवर राहिल.

8. हलक्या रंगाच्या कन्सिलरने डोळ्यांचा मेकअप ब्राईट करा

तुमच्या डोळ्यांच्या आतील कोपऱ्यावर, पापण्यांच्या मध्यभागावर आणि डोळ्याच्या बाहेरील कोपऱ्यावर हलक्या रंगाचं कन्सिलर लावा आणि डोळ्यावर व्यवस्थित ब्लेंड करा. ज्यामुळे मेकअप केल्यावर तुमचे डोळे आकर्षक दिसतील.

9. कन्सिलरने डोळ्याचा पफीनेस झाकून टाका

चिमूटभर आयक्रीममध्ये थोडसं कन्सिलर आणि हायलायटर मिसळा. डोळ्याखाली, बो-बोन्सवर हे मिश्रण डॅब करा आणि चांगल्या पद्धतीने ब्लेंड करा. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांखालील पफीनेस कमी होईल.

10. कन्सिलरने पातळ ओठांवर ओव्हरलाईन काढा

तुमच्या ओठांवर स्पंजच्या सहाय्याने  थोडंस कन्सिलर डॅब करा. हे कन्सिलर तुमच्या त्वचेशी साधर्म्य असलेलं असेल याची काळजी घ्या. त्यानंतर लिप लाईनरने आऊटलाईन काढून तुमचा लिप कलर त्यामध्ये भरा. कन्सिलरच्या बेसमुळे तुमचे ओठ आकर्षक दिसू लागतील.

ADVERTISEMENT

11. पाऊट पोझसाठी ओठांना कन्सिलर लावा

लिप कलर लावण्याआधी ओठांच्या मध्यभागी हलक्या रंगाचं कन्सिलर डॅब करा. ज्यामुळे लिपस्टिक लावल्यावर पाऊट करताना तुमचे ओठ अधिक सुंदर दिसतील.

12. कन्सिलरच्या सहाय्याने टींटेड मॉश्चराईझर घरीच तयार करा

हातावर थोडं कन्सिलर आणि डे क्रीम मिक्स करा. ज्यामुळे तुम्हाला तुम्ही तयार केलेली टींटेड क्रीम मिळेल. यामध्ये  थोडं थोडं मॉश्चराईझर मिसळून तुम्ही या क्रीममधील फिनीशींग आणि पिंगमेंटेंशनवर गरजेनुसार कंट्रोल ठेऊ शकता.

13. नेहमी दोन निरनिराळ्या प्रकारची कन्सिलर जवळ बाळगा

मेकअप करताना नेहमी स्वतःकडे दोन वेगवेगळ्या प्रकारची कन्सिलर जवळ ठेवा.त्यापैकी एक म्हणजे हाय कव्हरेज कन्सिलर आणि दुसरं म्हणजे शीर अथवा  लिक्वीड अथवा क्रीम कन्सिलर. कारण लक्षात ठेवा दररोज तुमच्या त्वचेची गरज ही निरनिराळी असू शकते.

आम्ही शेअर केलेला हा व्हिडिओ देखील तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल

ADVERTISEMENT

बाजारात अनेक उत्पादनं उपलब्ध असतात. त्यामुळे नवीन लोकांना नेमकं काय घ्यावं याबाबत संभ्रम निर्माण होतो. यासाठी एखादं कन्सिलर खरेदी करण्यापूर्वी आम्ही बजेटनुसार सूचवलेले हे काही कन्सिलर अवश्य पहा. आम्ही तुमच्या बजेटनुसार हे कन्सिलर निवडले आहेत. ज्यामध्ये शंभर रुपयांपासून दोन हजार किंमतीच्या कन्सिलरचा समावेश आहे.

100 रु ते 500 रु किंमतीमध्ये उपलब्ध असलेलं कन्सिलर (Concealer Under Rs 500)

1. Miss Claire Full Coverage Makeup + Concealer

हे कन्सिलर डार्क सर्कल, ब्लेमीश आणि डार्क स्पॉट्स यासाठी उत्तम ठरेल. तसंच हे कन्सिलर हाय कव्हरेज आणि लाईटवेट फॉर्म्युला मधील आहे. ज्यामुळे हे कन्सिलर टच-अप न करतादेखील दिवसभर टिकू शकते.

हे कन्सिलर तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता. किंमत Rs. 275

2. Nicka K HD Concealer

अत्यंत कमी किंमतीतील या कन्सिलरमध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या शेडस् मिळू शकतात. चेहरा एकसमान दिसण्यासाठी हे कन्सिलर तुम्हाला उपयुक्त ठरू शकेल. शिवाय हे कन्सिलर लाईट क्रीमी ट्रेक्चरचं असून फुल कव्हरेज फॉर्म्युल्यामध्ये उपलब्ध आहे.

ADVERTISEMENT

हे कन्सिलर तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता. किंमत Rs. 383

3. Wet n Wild Photo Focus Correcting Palette – Color Commentary

कलर करेक्टींगसाठी लागणाऱ्या सर्व रंगांमध्ये हे कन्सिलर एका पॅलेट उपलब्ध असतं. यामध्ये ग्रीन, लव्हेंडर रंगासोबतच व्हाईट आणि अनेत स्कीन टोनदेखील असतात. त्यामुळे हे पॅलेट खरेदी करणं खरंच खूप उपयुक्त ठरेल.

हे कन्सिलर तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता. किंमत Rs. 450

4. Maybelline New York Fit Me Concealer

बऱ्याच जणींना हे लिक्वीड कन्सिलर फार आवडतं. या उत्पादनाचा सर्वात महत्वाचा उपयोग म्हणजे बिल्डेबल कव्हरेजमुळे ते केकी दिसत नाही. तसच नॅचलर कव्हरेजमुळे त्वचेला ऑक्सिजनचादेखील योग्य प्रमाणात पुरवठा होतो.

ADVERTISEMENT

हे कन्सिलर तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता. किंमत Rs. 475

500 रु ते 1000 रु किंमतीमध्ये उपलब्ध असलेलं कन्सिलर (Concealer Under Rs 1000)

1. Make Up For Life 5 Color Concealer Corrector

जर तुम्हाला कन्सिलरची एखादी पॅलेटच खरेदी करायची असेल तर हा पर्याय अतिशय उपयुक्त ठरेल. कारण यामध्ये तुम्हाला हलक्या रंगांपासून गडद रंगापर्यंत अनेक शेड्स या एकाच पॅलेटमध्ये  मिळु शकतात. हे कन्सिलर हाय कव्हरेजसह क्रीमी फॉर्म्युलामध्ये उपलब्ध आहे.

हे कन्सिलर तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता. किंमत Rs. 500

2. L.A. Girl Pro Conceal HD

या मध्ये जवळजवळ सर्वचे कन्सिलर शेड्स उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या स्कीन टोननुसार यामधील कन्सिलरची निवड करू शकता. शिवाय यामुळे तुम्हाला त्वचा एकसमान दिसण्यासाठी, डार्क सर्कल्स कव्हर करण्यासाठी आणि डोळ्याजवळील फाईन लाईन्स लपविण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो. बिल्डेबल फॉर्म्युलामध्ये असल्यामुळे हे कन्सिलर सहज ब्लेंड होऊ शकतं.

ADVERTISEMENT

हे कन्सिलर तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता. किंमत Rs. 506

3. Maybelline New York Instant Age Rewind Concealer

हे कन्सिलर डार्क सर्कल्स आणि फाईन लाईन्ससाठी फार उत्तम आहे. रेडीयंट लुकसाठी देखील या कन्सिलरचा चांगला परिणाम होऊ शकतो.

हे कन्सिलर तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता. किंमत Rs. 620

4. L’Oreal Paris True Match Le Crayon Correcteur

या क्रीमी कन्सिलरच्या पॅनमध्ये फार शेड्स उपलब्ध नसतात. पण यामुळे तुम्हाला चेहऱ्यावरील अगदी छोट्या छोट्या समस्यादेखील नक्कीच लपवता येऊ शकतात.

ADVERTISEMENT

हे कन्सिलर तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता. किंमत Rs. 750

5. NYX Professional Makeup Wonder Stick

तुमच्या ट्रॅव्हल कीटमध्ये ही आयडल कन्सिलर स्टीक नक्कीच असायला हवी. कारण यामध्ये एका बाजूने तुम्हाला कांऊटर कलर तर एका बाजूने कन्सिलर कलर उपलब्ध असतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला कव्हरेज आणि काऊंटरींग अशा दोन्ही गोष्टींची गरज असते तेव्हा ही स्टीक कमाल ठरू शकते.

हे कन्सिलर तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता. किंमत Rs. 835

1000 ते 2000 या किंमतीमध्ये उपलब्ध असलेलं कन्सिलर (Concealer Under Rs 2000)

1. Inglot AMC Cream Concealer

या कन्सिलरमुळे तुमच्या त्वचेला एक सॉफ्ट इफेक्ट येतो. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई चादेखील समावेश आहे. यातील क्रीमी रिच फॉर्म्युलामुळे मेकअप करताना खूप चांगला परिणाम दिसून येतो.

ADVERTISEMENT

हे कन्सिलर तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता. किंमत Rs. 1100

2. Makeup Revolution Ultra Base Corrector Palette

आठ विविध प्रकारच्या कारणांसाठी आठ प्रकारचे कन्सिलर यात उपलब्ध आहेत. त्यामुळे या कन्सिलर्समुळेतुम्हाला मेकअप करण्यासाठी एक चांगला इफेक्ट नक्कीच मिळु शकतो.

हे कन्सिलर तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता. किंमत Rs. 1215

3. Elizabeth Arden Ceramide Lift And Firm Concealer

या हाय कव्हरेज कन्सिलरमुळे तुम्हाला फाईन लाईन्स आणि डार्क सर्कल्स लपविण्यासाठी खूप चांगला फायदा होतो.

ADVERTISEMENT

हे कन्सिलर तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता. किंमत Rs. 1490

4. Kiko Milano Colour Correction Face Fixing Powder

तुम्ही हे कन्सिलर पावडरप्रमाणे सेट करू शकता. हे एक प्रकारचे कॉम्पॅक्ट आहे ज्यामध्ये चार वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सिलर कलर्सचा वापर केला गेला आहे.

हे उत्पादन तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता. किंमत Rs. 1600

5. Smashbox Color Correcting Stick

हे कन्सिलर वापरण्यास अगदी सोपं असून लाईटवेट कव्हरेज देतं. तुमचा मेकअप या कन्सिलरमुळे अगदी नैचरल वाटू शकतो.

ADVERTISEMENT

ही स्टीक तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता. किंमत Rs. 1800

6. M.A.C Studio Finish SPF 35 Concealer

हे कन्सिलर Emollient-based असून क्रीमी फॉर्ममध्ये उपलब्ध असतं. ज्यामध्ये SPF 35 चा देखील समावेश आहे. शिवाय हे कन्सिलर जास्त वेळ टिकतं. यातील व्हिटॅमिन ए  आणि ई मुळे चेहऱ्याला चांगल्या प्रकारचं पोषणदेखील मिळतं.

हे कन्सिलर तुम्ही या ठिकाणी खरेदी करु शकता. किंमत Rs. 1900

आम्ही तुम्हाला विविध कन्सिलरचे पर्याय दिले आहेत यापैकी कोणतं कन्सिलर तुमच्या साठी गरजेचं आहे आणि तुमच्या त्वचेसाठी योग्य आहे ते तुम्ही विचारपूर्वक निवडू शकता. शिवाय मेकअप करताना आम्ही दिलेल्या अनेक टीप्सचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.

ADVERTISEMENT

अधिक वाचा: 

‘या’ लाईफ चेजिंग मेकअप टीप्स तुम्हाला माहित असायलाच हव्या

स्वतःचा मेकओव्हर स्वतः करा, ‘ह्या’ खास मेकअप टीप्सने 

ह्या’ 5 स्कीन केअर प्रोडक्ट्सशिवाय अपूर्ण आहे तुमचं ब्युटी रुटीन               

ADVERTISEMENT
14 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT