ADVERTISEMENT
home / घर आणि बगीचा
significance of tulsi plant in shravan in marathi

श्रावणात दारी कोणती तुळस लावावी, राम तुळस की कृष्ण तुळस

तुळस ही वनस्पती धार्मिक आणि औषधी अशा दोन्ही कारणांसाठी महत्त्वाची आहे. भारतीय संस्कृतीमध्ये दिवसाची सुरूवातच तुळशीच्या पूजेने केली जाते. यासाठी प्रत्येकाच्या घरी छोटं तरी तुळशी वृंदावन असावं असं घरातील थोरामोठ्यांकडून सांगण्यात येतं. तुळशीच्या रोपाला धार्मिक आणि वैद्यकीय महत्त्व असल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घराच्या सुखशांती येण्यासाठीही दारी तुळशीचे रोप लावलं जातं. पण यासाठी श्रावणात घरात तुळस लावावी असं सांगण्यात येतं. यासाठी जाणून घ्या श्रावणात तुळस लावण्याचे फायदे आणि कोणती तुळस श्रावणात लावावी… यासोबत वाचा तुळशीचे फायदे आणि माहिती जाणून घ्या (Tulsi Benefits In Marathi), 50+ Tulsi Vivah Wishes, Status And SMS In Marathi | तुळशी विवाह शुभेच्छा, जाणून घ्या तुळशीच्या रोपाविषयी या ‘7’ गोष्टी (Tulsi Facts In Marathi)

श्रावणात तुळस लावण्याचे महत्त्व

हिंदू धर्मात तुळशीला लक्ष्मी मातेचं रूप मानलं जातं. ज्यांच्या घरी तुळशीचं रोप असतं त्या घरी लक्ष्मी नारायण वास करतात असं समजलं जातं. म्हणूनच घरोघरी सकाळी तुळशीची पूजा केली जाते आणि तुळशीला नियमित जल वाहण्याची पद्धत आहे. सायंकाळी घरात सुख समृद्धी यावी यासाठी तुळशीसमोर नियमित दिवा लावला जातो. अनेकांच्या घरी मोठं तुळशी वृंदावन असतं तर पण एखाद्याचं घर लहान असेल तर त्याच्या घराच्या दारी, अंगणात अथवा बाल्कनीत छोटं तरी तुळशीचं रोप कुंडीत लावलेलंं असतं.  श्रावणात तर अनेक धार्मिक पूजा पाठ घरोघरी केले जातात. कारण श्रावणात अनेक सणवार असतात.  त्यामुळे या काळात घरात नवीन तुळशीचे रोप लावणं शुभ मानलं जातं. श्रावणात तुळस लावल्यास तुमच्या घरावर लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते असं सांगण्यात येतं. 

घरात कोणती तुळस लावावी

तुळशीचे मुख्यतः दोन प्रकार असतात. एका प्रकाराला राम तुळस असं म्हणतात तर दुसऱ्या प्रकाराला कृष्ण तुळस असं म्हटलं जातं. राम तुळशीची पाने आणि खोड हिरव्या रंगाचे असून ही तुळस भगवान श्रीरामाला प्रिय आहे असं मानलं जातं म्हणून तिला राम तुळस असं म्हणतात. तर कृष्ण तुळशीची पाने काळसर रंगाची असून ती श्रीकृष्णाला प्रिय असल्यामुळे तिला कृष्ण तुळस असं म्हटलं जातं. दोन्ही प्रकारच्या तुळस या धार्मिक आणि आयुर्वेदिक कार्यासाठी वापरल्या जातात. त्यामुळे घरात दोन्ही प्रकारच्या तुळस लावण्यास काहीच हरकत नाही. साधारणपणे तुळस नेहमी गुरूवारी लावावी असं सांगण्यात येतं. मात्र  संपूर्ण श्रावण महिना धार्मिक विधींसाठी शुभ मानला जात असल्यामुळे या महिन्यात कधीही तुळस दारी लावण्यास काहीच हरकत नाही. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
25 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT