ADVERTISEMENT
home / लाईफस्टाईल
Tulsi Vivah Wishes In Marathi

50+ Tulsi Vivah Wishes, Status And SMS In Marathi | तुळशी विवाह शुभेच्छा

दिवाळीचे चार दिवस मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरे केल्यानंतर काही दिवस तरी त्या आनंदातून बाहेर पडायची मुळीच इच्छा होत नाही. दिवाळी सणाची माहिती जाणून घेतल्यानंतर त्याचा आनंद अधिक द्विगुणित होते. त्यानंतर आनंदाचा येणारा क्षण म्हणजे तुळशी विवाह. तुळशी विवाहाची मजा ही वेगळीच असते. यंदा तुळशी विवाहाचा प्रारंभ हा 15 नोव्हेंबरपासून होत आहे. 19 नोव्हेंबरला तुळसी विवाहाची समाप्ती होणार आहे. या काळात तुम्ही तुलसी विवाह करु शकता.  या खास दिवसासाठी तुम्ही तुळशी विवाह शुभेच्छा (Tulsi Vivah Wishes In Marathi), तुळशी विवाह स्टेटस (Tulsi Vivah Status In Marathi), तुळशी विवाह SMS (Tulsi Vivah Sms Marathi), आणि तुळशी विवाह चारोळ्या (Tulsi Vivah Charolya) नक्की शेअर करा.

Tulsi Vivah Wishes In Marathi | तुळशी विवाह शुभेच्छा

Tulsi Vivah Wishes In Marathi
Tulsi Vivah Wishes In Marathi

तुळशी विवाहाची संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर या दिवसाचे पावित्र्य राखत  तुम्ही Tulsi Vivah Wishes In Marathi तुळशी विवाह शुभेच्छा संदेश पाठवायला हव्यात त्यामुळे तुमचा आणि इतरांचा दिवसही अतिशय मंगलमयी होईल. या शिवाय दिवाळीत येणाऱ्या लक्ष्मीपूजनाचा विधी वाचून तशी मनोभावे पूजा करा.

 1.  आनंदाचे, मांगल्याचे पावन पर्व तुळशी विवाहाचे
  तुळशी विवाहाच्या मंगलमयी शुभेच्छा!
 2.  ज्या अंगणात तुळस आहे,
  तिथे देवी-देवतांचा वास आहे,
  ज्या घरात ही तुळस आहे
  ते घर स्वर्गासमान आहे,
  तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
 3.  तुळशीचे पान
  एक त्रैलोक्य समान,
  उठोनिया प्रात: काली
  करुया तिला वंदन
  आणि राखूया तिचा मान
  तुलसी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
 4. नमस्तुलसि कल्याणी
  नमो विष्णुप्रिये शुभे
  नमो मोक्षप्रदे देवी
  नम: सम्तप्रदायिके
  तुलसी विवाहाच्या शुभेच्छा!
   
 5. तुळशीविना ज्याचे घर
  ते तव जाणावे अघोर
  तुळशीच्या लग्नाचा हार्दिक शुभेच्छा!
 6. तुळशीविना घराला घरपण नाही
  तुळशीविना अगंणाला शोभा नाही
  जिच्या असण्याने मिळतो सर्वांना ऑक्सिजन
  त्या तुळशीचा विवाह साजरा करुया सर्वजण
  तुळशी विवाहाच्या शुभेच्छा

7. सण आनंदाचा, सण मांगल्याचा
सण सौख्याचा सण तुळशी विवाह पर्वाचा
तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!

8. आज सजली तुळस
नेसून हिरवा शालू
अंगणात उभारला आज तुळशी विवाहाचा पर्व
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

ADVERTISEMENT

9. पृथ्वीतलावर आहे आज फारच मांगल्याचा दिवस
आज सुरु झाला आहे तुळशी विवाह पर्वाचा दिवस
तुम्हा सगळ्यांना तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

10. तुळशी विवाहाच्या आनंदाने सारे जमूया एकत्र
मांडव घालून घेऊया या दिवसाचा आनंद
चला वाटूया अक्षता या खास क्षणासाठी
सजवूया तुळशीला लावूनी कुंकूवाचा टिळा मस्तकी
(Tulsi Vivah Wishes In Marathi)

वाचा – त्रिपुरारी पौर्णिमेची संपूर्ण माहिती

Tulsi Vivah Status In Marathi | तुळशी विवाह स्टेटस

Tulsi Vivah Status In Marathi
Tulsi Vivah Status In Marathi

हल्ली स्टेटस ठेवायला सगळ्यांनाच आवडते जर तुलसी विवाहाचे निमत्त साधत तुम्ही Tulsi Vivah Status In Marathi | तुळशी विवाह स्टेटस ठेवण्याचा विचार करत असाल तर खास तुमच्यासाठी हे निवडक स्टेटस

ADVERTISEMENT
 1.  पवित्र हा दिन आला
  तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
 2.  तुळशीच्या पावन लग्नाने
  येऊ द्या आनंद तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
 3. तुळस लावली अंगणी
  आज आहे तिचा विवाह
  येताय ना लग्नाला, आज आहे फक्त आनंदी आनंद
  तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
 4.  आज आनंदी आनंद झाला
  तुळशी विवाहाचा दिन हा जवळ आला
  तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
 5.  चला वाटूया पेढे आणि गाऊया मंगलमयी मंगलाष्टके
  कारण आज आहे आपल्या लाडक्या तुळशीचे लग्न
  तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
 6. अंगणात असेल तुळस तर तुम्हाला मिळेल आनंद
  आज आहे तिच्या लग्नाचा आनंद
  त्यामुळे साजरा करुया तुळशी विवाहाचा दिवस
  तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
 7.  तुळशीच्या लग्नाचा पावन दिवस आला,
  तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा
 8.  तुळशी विवाहाच्या शुभ प्रसंगी येवो सगळ्यांच्या जीवनात आनंद
  चला साजरा करुया तुळशी विवाह
 9.  तुळशी विवाहाचा प्रसंग हा आला
  तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
 10.  पतिव्रता आहे तुळशीचा गुण
  तुम्हालाही लाभावा, जोडीदारामध्ये तुम्हालाही मिळावी त्याची साथ
  तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

Tulsi Vivah Sms Marathi | तुळशी विवाह SMS

Tulsi Vivah Sms Marathi
Tulsi Vivah Sms Marathi

तुळशी विवाहच्या दिवशी तुमच्या जवळच्या व्यक्तिला ज्यांच्याकडे अद्यापही स्मार्ट फोन नाही अशांना तुम्ही खास तुळशी विवाह SMS पाठवू शकता. 

 1.  दिवस उजाडला तुळशी विवाहाचा
  आनंदाचा आणि मांगल्याचा
  तुम्हा सगळ्यांना तुळशीच्या लग्नाचा हार्दिक शुभेच्छा!
 2.  हळद लागली, तुळस सजली
  विवाहासाठी तयार झाली,
  तुलसी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
 3.  तुळशी विवाहाचा दिवस आला
  सगळ्यांच्या मनी आनंदी आला
  तुलसी विवाहाच्या शुभेच्छा!
 4.  तुलसी विवाहाचा दिवस हा आला
  आनंदाचा क्षण आला
  तुलसी विवाहाच्या शुभेच्छा!
 5.  पावन तुळशीच्या लग्नाने करुया दिवसाची सुरुवात
  तुळसी विवाह दिवसाच्या शुभेच्छा!
 6. पतिव्रतेची आठवण करुन देणारा आहे
  आजचा मंगलमयी दिवस
  प्रत्येकाला व्हावी याची आठवण
  तुलसी विवाहाच्या शुभेच्छा!
 7.  तुलसी विवाहाचा क्षण हा आला
  आमच्या मनी आनंद दाटला,
  तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
 8.  पवित्र तुळशीच्या, पवित्र लग्नाच्या
  मंगलमयी शुभेच्छा!
 9. तुळशीच्या लग्नाचा पावन हा दिवस आला
  तुम्हा सगळ्यांना तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
 10. तुळशी विवाहाच्या पावन दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

Tulsi Vivah Charolya | तुळशी विवाह चारोळ्या

तुळशी विवाह शुभेच्छा
तुळशी विवाह शुभेच्छा

तुळशी विवाह शुभेच्छा (Tulsi Vivah Wishes In Marathi) थोड्या वेगळ्या स्वरुपात म्हणजे चारोळ्याच्या स्वरुपात पाठवायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी खास तुळशी विवाह चारोळ्या देखील निवडल्या आहेत. त्या पाठवूनही तुम्ही हा आनंद साजरा करु शकता.

 1.  उसाचे मांडव सजवू आपण
  विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण
  तुम्हीही व्हा आमच्या आनंदात सामील
  मोठ्या थाटात तुळशी विवाह करुया आपण
  तुळशी विवाहाच्या शुभेच्छा
 2.  अंगणात उभारला विवाहमंडप
  त्यात सजली उस आणि झेंडुच्या फुलांची आरास
  तुळशी विवाह साजरी करुया आपण
  कारण आज आहे तुळशी विवाहाचा दिवस
 3.  सारे आप्तेष्ट,
  मित्रमंडळी झाली मग्न
  कारण सर्व मिळून
  साजरे करणार तुळशीचे लग्न
  तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
 4.  अंगणात तुळस आणि शिखरावर कळस
  हिच आहे महाराष्ट्राची खरी ओळख
  कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर
  हिच आहे सौभाग्याची ओळख
  माणसात जपतो माणुसकी आणि नात्यात जपतो नाती
  हीच आमच्या सणांची ओळख
  तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
 5.  शीतल छाया भूतल व्यापक तू कैसी
  मंजिरीची बहू आवड कमळारमणासी
  तवदल विरहीत विष्णू राहे उपाशी
  विशेष महिना तुझा शुभ कार्तिकी मासी
  तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
 6.  वृन्दा वृदांवनी विश्वपूजिता विश्वपावनी||
  पुष्पसारा नन्दनीच तुलसी कृष्ण जीवनी||
  एतं भांमाष्टक चैव स्त्रोतम नामर्थ संयुक्तम
  य: पाठेत तां चं सम्पूज सैश्रमेघ फललंमेता
  तुलसीविवाहाच्या सगळ्यांना शुभेच्छा!
 7.  उत्सव मांगल्याचा, पावित्र्याचा
  एक आनंददायी क्षण
  तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!
 8.  हिंदू धर्मात अतिशय पवित्र अशा मानणाऱ्या
  तुलसीविवाहाच्या सोहळ्याला होतेय आजपासून सुरुवात
  तुम्हा सर्वांना तुळसीविवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
 9.  तुलसी विवाह क्षण आनंदाचा,
  मांगल्याचा आणि पवित्र दिवसाचा
  तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा!
 10. नाते जन्मोजन्मीचे असे आहे हे मंगलमय नाते
  तुळसीचे आपल्या सगळ्यांशी असे
  तुम्हा सगळ्यांना तुळशी विवाहाच्या शुभेच्छा!

आता तुळशी विवाहाच्या या शुभप्रसंगी तुम्ही या शुभेच्छा संदेश पाठवू शकता आणि हा दिवस आनंदी घालवू शकता. मग आजपासून सुरू होणाऱ्या तुळशी विवाह समारंभांना तुम्ही तुळशी विवाह शुभेच्छा (Tulsi Vivah Wishes In Marathi), तुळशी विवाह स्टेटस (Tulsi Vivah Status In Marathi), तुळशी विवाह SMS (Tulsi Vivah Sms Marathi), आणि तुळशी विवाह चारोळ्या (Tulsi Vivah Charolya) नक्की शेअर करा.

18 Oct 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT