ADVERTISEMENT
home / मेकअप
summer makeup tips for office going women

उन्हाळ्यात ऑफिसला जाताना असा करा मेकअप

उन्हाळ्यात घामाच्या धारा आणि चिकटपणा यामुळे मेकअप करणं नकोसं होतं. मात्र ज्या महिला ऑफिसला जातात त्यांना दिवसभर फ्रेश दिसावं लागतं.  ऑफिस मिटींग, प्रेझेंटेशन, कंटाळवाणा प्रवास या दरम्यान तुमचा आत्मविश्वास मेकअपमुळे कायम टिकतो. आजकाल वास्तविक अनेक मेकपअ प्रॉडक्ट हे वॉटरप्रूफ असतात. पण मे महिन्याचा उन्हाळा तुमच्या चेहऱ्यावरील ग्लो मेकअपनंतरही कमी करू शकतो. यासाठी या काळात असा मेकअप करा ज्यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश दिसाल, फॉलो करा या सोप्या टिप्स यासोबतच जाणून घ्या उन्हाळ्यात मेकअप कसा करावा | Tips For Summer Makeup In Marathi

फाऊंडेशनचा वापर टाळा

मेकअप म्हटलं की सर्वात आधी समोर येतं ते म्हणजे फाऊंडेशन. पण उन्हाळ्यात मेकअप करताना फाऊंडेशनचा वापर जाणिवपूर्वक टाळायला हवा. या काळात तुम्ही एखादं टिंटेड मॉईस्चराईझर वापरू शकता. ज्यामुळे तुमची त्वचा एकसमान दिसेल आणि मऊदेखील राहील. आजकाल टिंटेड सनस्क्रीनही मिळतात फाऊंडेशनला ते चांगले पर्याय ठरतात. शिवाय त्यामुळे तुमच्या त्वचेचं रक्षणही होतं.

अति मेकअप करू नका

नॅचरल अथवा नो मेकअपचा ट्रेंड सध्या आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तुम्ही हा ट्रेंड नक्कीच फॉलो करू शकता. कारण अति मेकअप केल्यामुळे तुमच्या त्वचेची छिद्रे बंद होतात. असं झालं तर तुमची त्वचा अति तेलकट होते. त्वचेवर पिंपल्स वाढतात.  घामामुळे मेकअपचा लेअर खराब झाला तर चेहरा पॅची वाटू लागतो. यासाठी कमीत कमी मेकअप करण्यावर भर द्या.

लिपस्टिक ऐवजी लिपबाम वापरा

हिवाळ्याप्रमाणेच उन्हाळ्यातही तुमचे ओठ फुटतात. वातावरणातील उष्णता तुमच्या नाजूक ओठांचे नुकसान करते. अशा वेळी लॉंग लास्टिंग अथवा मॅट फिनिशच्या लिपस्टिक मेकअपसाठी वापरणं त्रासदायक ठरू शकतं. शिवाय घामाच्या धारा चेहऱ्यावर वाहू लागतात तेव्हा डार्क शेडच्या लिपस्टिकही नकोशा वाटतात. यासाठी ओठांची काळजी घेण्यासाठी आणि हलका मेकअप करण्यासाठी तुम्ही ओठांवर टिंटेड लिब बाम वापरू शकता. 

ADVERTISEMENT

ब्लश आणि हायलायटर प्रॉडक्ट टाळा

उन्हाळ्यात शक्य असल्यास ब्लश अथवा हायलायटर असे प्रॉडक्ट जास्त वापरू नये. कारण घाम आल्यावर असा शिमर लुक मुळीच चांगला दिसत नाही. बऱ्याचदा घामामुळे इतर मेकअप निघून जातो आणि हायलायलर अथवा ब्लश चेहऱ्यावर चमकत बसतं. यासाठी ऑफिसला जाताना अशा प्रकारचा मेकअप करणं टाळलेलं बरं.

हेअर स्टाईलदेखील महत्त्वाची

ऑफिसमध्ये छान टवटवीत दिसण्यासाठी मेकअपसोबत तुमची हेअरस्टाईलदेखील साजेशी असावी. ओपन हेअरस्टाईल, कर्ल्स या दिवसांमध्ये घामामुळे लगेच खराब होतात. शिवाय असा हेअर स्टाईलमुळे तुम्हाला खूप गरम होऊ शकतं. यासाठी केस वर बांधून ठेवता येतील अशी एखादी सोयीस्कर हेअर स्टाईल तुम्ही उन्हाळ्यात ऑफिसला जाताना करू शकता.

बॅगमध्ये मिस्ट ठेवा

टोनर अथवा मिस्ट या दिवसांमध्ये तुमच्या बॅगेत असायलाच हवं. कारण मेकअपनंतर अथवा दिवसभरात कधीही घाम आल्यावर चेहऱ्यावर मिस्ट लावून तुम्ही स्वतःला फ्रेश करू शकता. यासाठी मिस्ट अथवा गुलाबपाण्याचा छोटा स्प्रे तुमच्या जवळ बाळगा. ज्यामुळे तुमची त्वचा सतत हायड्रेट राहील आणि तुम्हाला ताजंतवानं वाटू लागेल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
04 May 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT