ADVERTISEMENT
home / Family Trips
tips to follow while traveling with old age people in marathi

घरातील वयस्कर लोकांसोबत प्रवास करताना या गोष्टी ठेवा लक्षात

आजकाल हम दो हमारा एक अशी विभक्त कुटुंबरचना दिसून येते. मात्र आजही अनेक जण एकत्र कुटुंबात राहतात. एकत्र कुटुंबात राहण्याची मजाच काही वेगळी आहे. आई -वडील, आजी- आजोबा आणि मुलं असं एकत्र कुटुंब असेल तर घरातील लोकांसाठी विरंगुळा म्हणून वर्षातून एक अथवा दोन फॅमिली पिकनिक आयोजित केली जाते. पिकनिकसाठी अथवा इतर कामांसाठी जर तुम्ही घरातील वृद्ध, वयस्कर लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी आधीच माहीत असायला हव्या. कारण लहान मुलांप्रमाणेच वयस्कर लोकांची प्रवासात विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी या टिप्स जरूर फॉलो करा. आणि शेअर करा हे 100+ Trekking Quotes In Marathi | Travel Quotes In Marathi

हेल्थ चेकअप करणे महत्त्वाचे

घरातील वयस्कर लोकांना बाहेर फिरण्यासाठी अथवा प्रवासाला नेण्यापूर्वी त्यांची तब्येत तपासणे गरजेचं आहे.  कारण वयानुसार त्यांना रक्तदाब, मधुमेह अथवा इतर आरोग्य समस्या असू शकतात. प्रवासात तुम्हाला त्यांची तब्येत बिघडल्यामुळे अडथळा नको असेल तर प्रवासाला जाण्यापूर्वी त्यांचे हेल्थ चेकअप करून घ्या. ज्यामुळे योग्य औषधे सोबत घेणे सोयीचे ठरेल. शिवाय त्यांचे हेल्थ चेकअप केल्यामुळे तुम्ही प्रवास करायचा की नाही याबाबत योग्य निर्णय वेळीच घेऊ शकाल. 

तिकीट आरक्षण अवश्य करा

आजकाल कुठेही प्रवास करण्यासाठी तिकीट आरक्षण केले जाते. जर तुम्ही घरातील वयस्कर लोकांसोबत प्रवास करणार असाल तर तुम्हाला रिजर्व्हेशन करणं खूप गरजेचं आहे. कारण जर तिकीट कन्फर्म नसेल तर त्यामुळे तुमच्यासोबत तुमच्या वयस्कर आईवडिलांची तारांबळ होऊ शकते.  सिनिअर सिटिझन्ससाठी विशेष आरक्षण सेवा तुम्हाला मिळू शकते. शक्य असल्यास वयस्कर लोकांना सार्वजनिक वाहतुकीने नेणे टाळा. त्यापेक्षा विमान अथवा गाडीने प्रवास करणं तुमच्यासाठी सोयीचं ठरेल.

खाद्यपदार्थ जवळ बाळगा

लहान मुलांसोबत प्रवास करताना जसं तुम्हाला त्यांचे खाण्याचे पदार्थ, पाणी जवळ ठेवणं गरजेचं असतं. तसंच वयस्कर माणसं सोबत असतील तर त्यांच्यासाठी योग्य खाण्याचे पदार्थ, शुद्ध पाणी जवळ ठेवा. कारण बाहेरील दूषित पदार्थ आणि पाणी त्यांच्या आरोग्यासाठी मुळीच योग्य नाहीत. अशा वेळी सुका खाऊ, फळं, ड्रायफ्रूट सोबत ठेवणं फायद्याचं ठरू शकतं. आईवडिलांसोबत पाहा ही नाशिक पर्यटन स्थळे (Nashik Tourist Places In Marathi)

ADVERTISEMENT
tips to follow while traveling with old age people in marathi

कोरोनाचे नियम पाळा 

कोरोनाच्या काळात प्रवास करताना सर्वांनीच नियम पाळणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्यासोबत लहान मुलं अथवा वयस्कर माणसं प्रवास करत असतील तर तुम्ही कोरोना संबधित सर्व नियम आवर्जून पाळायला हवेत. मास्क घालणं, सुरक्षित अंतर ठेवणं, सॅनिटाईझर, पीसेफ जवळ असणं खूप गरजेचं आहे. कारण लहान मुलं आणि वयस्कर लोकांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे प्रवास करताना या गोष्टी तुम्ही नेहमी पाळायला हव्या.

प्रवासासाठी सोयीचे ठिकाण निवडा

वयस्कर लोकांसोबत प्रवास करताना तुम्ही कुठे जात आहात हे ठरवणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही ट्रेन, बस अथवा गाडी, विमानाने प्रवास करा मात्र तो त्यांच्यासाठी आरामदायक असेल याची काळजी घ्या. वयस्कर लोकांसोबत फिरायला जाताना डोंगर माथ्यावर, अॅडवेंचर ठिकाणी जाणं टाळा. यासोबतच जाणून घ्या भारतात एकट्या प्रवाश्यांसाठी उत्तम ठिकाणे (Places For Solo Travelers In India In Marathi)

02 Feb 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT