ADVERTISEMENT
home / Budget Trips
Trekking Quotes In Marathi

100+ Trekking Quotes In Marathi | Travel Quotes In Marathi

बॅग पॅक करुन मस्त बाहेर हिंडायला तुम्हाला आवडतं? भारतात ट्रेकिंगसाठी अनेक ठिकाणे आहेत. तर आज आम्ही तुम्हाला थोडी- फार मदत करणार आहोत. बाहेर जाताना किंवा बाहेर फिरायला गेल्यावर एक वेगळीच एनर्जी आपल्यामध्ये असते. अशावेळी काही सकारात्मक विचार तुमच्या समोर कोणी मांडले तर त्या प्रवासाची आणखी मजा येते. कारण प्रत्येक प्रवास काहीतरी शिकवत असतो. अनेकांनी त्यांना बाहेर जाण्याचे प्लॅन केलेले असतात. पण काही कारणास्तव हे प्लॅन मागे पडतात. पण आता हे प्लॅन मागे पडू देऊ नका. कारण तुम्हाला तुमच्या आयुष्याची खरी किंमत ही प्रवासात कळते. शिवाय हाच प्रवास तुम्हाला अनेक अनुभव देतो. जे आयुष्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी तुम्हाला देतात. तुम्हालाही या प्रवासासाठी निघावे असे वाटत असेल आज आम्ही प्रवासात तुम्हाला अधिक आनंद आणि आत्मविश्वास देणारे असे काही कोट्स सांगणार आहोत जे तुम्ही तुमच्या सोशल मीडियासाठी हमखास वापरु शकता. हे असे कोट्स आहेत जे तुम्हाला तुमच्या प्रवासात आत्मविश्वास देतील. पण इतरांनाही नक्कीच प्रेरणा देतील. मग करायची सुरुवात.

Travel Quotes In Marathi | प्रवासाला गेल्यावर ठेवा हे कोट्स

Travel Quotes In Marathi
Travel Quotes In Marathi
 1. तुमच्याबद्दल लोक काय विचार करतात याकडे लक्ष देणे सोडून द्या, त्याऐवजी तुमचे लक्ष ध्येयाकडे केंद्रीत करा.
 2. आयुष्य हा एक प्रवास आहे. या प्रवासाला तुमच्या सुंदर आठवणींनी सजवणे जास्त महत्वाचे असते.
 3. आयुष्य म्हणजे अॅडव्हेंचर आहे… जर आयुष्यात ते नसेल तर तुमच्या आयुष्याला काही अर्थच नाही.
 4. आयुष्य खूप लहान आहे आणि जग खूप मोठे त्यामुळे.. फिरा आणि अनुभव साठवा.. कारण आयुष्यात तेच कामी येणार आहेत.
 5. मला आयुष्यातील सगळ्या गोष्टी मागे सारुन फक्त प्रवास करायचा आहे. अशा व्यक्तीसोबत ज्याला माझ्यासोबत यायचे आहेत.
 6. उन्हाळा नुसता घाम घेऊन येत नाही तर तो सुट्टीचे वेगवेगळे प्लॅन घेऊन येत असतो.
 7. आयुष्य एकच आहे ते नुसते पैसे कमावण्यात नाही तर तो छान फिरण्यातही घालवायला पाहिजे.
 8. प्लॅन बनतात ते मित्रांसोबत बाहेर फिरण्याचे… आयुष्य थोडे वेगळ्या पद्धतीने जगण्याचे
 9. जर तू सोबत आहेस तर मला कसली भीती .. आज जरुर कुछ तुफानी करते है
 10. मित्रांसोबत प्रवासाची मजा काही औरच असते कारण हा प्रवास तुम्हाला काय तरुण ठेवत असतो.
 11. हातात वाफाळलेला चहा… सोबत भजीची प्लेट तुमच्याशिवाय कोणताही डेस्टिनेशन मला वाटतो एकदम बेस्ट
 12. खूप झाली मैत्री आता यामध्ये जोडूया प्रवासाच्याही काही आठवणी
 13. तुमचे आयुष्य कंपासच्या काट्यावर चालू द्या, घड्याळाच्या काट्यावर नाही.
 14. तळलेल्या गरमगरम भजींचा खमंग वास तेव्हाच मजेशीर वाटतो.. जेव्हा हातात मस्त गरमागरम कॉफी आणि बाहेर पाऊस पडत असतो.
 15. प्रवासाची मजा तेव्हाच येते जब मिल बैठते हे सब यार आणि असतो एक पिकनिक स्पॉट
 16. नेहमी फक्त शाळा- घर, घर-शाळा असाच प्रवास केला आाता काहीतरी वेगळे करण्याची वेळ आली आहे.
 17. आयुष्य एक प्रवास आहे, स्पर्धा नव्हे.. तेव्हा फिरा आणि आयुष्य एन्जॉय करा.
 18. प्रवास तुमच्या आयुष्यात केवळ सकारात्मक विचार आणि प्रेम घेऊन येतो.
 19. मित्रांसोबतचा वेळ म्हणजे आयुष्यातील प्रवास..
 20. भरपूर दिवस झालेत तू आली नाहीस… तू येशील म्हणून मी कुठेही गेलो नाही.. आता तरी जाऊया या बाहेर

यशाची व्याख्या सांगणारे success quotes

वेळेवर आधारित स्टेटस, कोट्स, शायरी, सुविचार मराठी

Solo Travel Quotes In Marathi | सोलो ट्रॅव्हल कोट्स

Solo Travel Quotes In Marathi
Solo Travel Quotes In Marathi
 1. शांत स्वभावाचा माणूस हा कधीच कमजोर नसतो. कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काही नाही. पण या पाण्याचे रुपांतर पुरात झाले. तर भले भले डोंगरही फोडून निघतात.
 2. आयुष्यात माणसं दु:ख देऊ शकतात.. पण  निसर्ग नाही.
 3. मला माझ्या आयुष्यात काय हवं आहे… फक्त एक छानचा प्रवास आणि माझा वेळ
 4. प्रवास हे तुम्हाला लागलेलं चांगल व्यसन आहे हे कायम लक्षात असून द्या.
 5. नोकरी तुमचा खिसा भरते.. तर प्रवास तुमच्या आयुष्यात आठवणी
 6. प्रवास तुमच्यासाठी अॅडव्हेंचर तेव्हाच घेऊन येईल जेव्हा तुम्ही स्वत:वर प्रेम करायला शिकाल.
 7. माझे शिक्षण किती झाले हे मला विचारण्यापेक्षा मी किती प्रवास केला हे मला विचारा माझा बायोडेटा तुम्हाला कळेल.
 8. तुम्ही कधीही बाहेर गेला नाहीत तर तुम्हाला जग काय ते कधीच कळणार नाही.
 9. नीट शांतपणे आठवून पाहा तुम्हाला तुमचे मन ‘चला फिरायला’असेच सांगत असते.
 10. प्रवास ही एकमेव गोष्ट आहे जी तुम्हाला नवीन काहीतरी शिकवतेही आणि तुम्हाला तुमची नव्याने ओळख घडवतेही
 11. प्रवासात एकटे असलात म्हणून काय झालं… प्रवासातील आठवणी तुम्हाला कधीच एकटं सोडत नाही.
 12. माणूस एकटा जन्माला येतो.. एकटाच जातो.. पण सोबत आठवणींचा भला मोठा पेटारा कायम स्वत:सोबत ठेवतो.
 13. प्रिय, टूर… मी कायम तुझ्याच विचारात असते.तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात अजून कोणीही नाही.
 14. सगळेच धडे शाळेतून शिकायचे नसतात तर काही धडे निसर्गातून घेण्यासाठी घराबाहेर पडायचेही असते.
 15. इतरांची वाट पाहण्यापेक्षा एकला चलो रे म्हणत तुम्ही तुमच्या प्रवासाला निघा.
 16. एकट्याचा प्रवास बरा असतो कारण तो करताना फार विचार करावा लागत नाही.
 17. आयुष्यात काही प्रवास एकट्यानेच करावे कारण भविष्यात ते खूप कामी येतात.
 18. विचार कसला करायचा एकट्याने मस्त बाहेर पडायचे  आणि आपले आयुष्य सुखात घालवायचे.
 19. आयुष्यात कधीच कोणी एकटे नसते. कारण त्याच्या गाठीला त्याच्यासोबत त्याच्या प्रवासाच्या अनंत आठवणींचे गाठोडे असते.
 20. आयुष्यात प्रवासच तुम्हाला जन्मभराची साथ देते.

प्रेम प्रेमाची गंमत… प्रेमाची व्याख्या सांगणारे love quotes

ADVERTISEMENT

Trekking Caption For Instagram In Marathi | इन्स्टाग्राम ट्रेकिंग कॅप्शन

Trekking Quotes In Marathi
Trekking Quotes In Marathi

इन्स्टाग्रामसाठी हटके कॅप्शन ठेवूनही तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता.

 1. आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या यशाकडे…
 2. जर प्रवास मोफत असता, तर मी पुन्हा तुम्हाला कधीच दिसले नसते.
 3. आयुष्यात मला फक्त 6 महिन्यांच्या सुट्टीची गरज आहे. ती यासारख्या ठिकाणी जाण्यासाठी
 4. आपण प्रवास करतो दूर जाण्यासाठी नाही तर आयुष्य खऱ्या अर्थाने जगण्यासाठी
 5. आयुष्यात तुम्हाला जे हवं तेच करा तुम्हाला कधी उशीर होणार नाही.
 6.  प्रेमात… माझ्या प्रवासात.. आठवणीच्या हिंदोळ्यात
 7. आयुष्य जगण्याची खरी मजा प्रवासात आहे. आणि तो केलाच पाहिजे.
 8. प्रवास हा माणसाच्या आयुष्यातील असा काळ आहे जो शब्दात वर्णन करता येत नाही.
 9. आयुष्यातील अमूल्य वर्ष हातातून जाण्याआधी तुम्हाला प्रवास करता यायला हवा.
 10. आयुष्यात आणखी काय हवे… पाठीवर बॅग आणि हातात मॅप हेच तर हवे होते नेहमी
 11. प्रवास एक पुस्तक आहे आणि तुम्ही ते चाळायलाच हवे.
 12.  प्रवासाची तुलना कशाचीही होत नाही.. कारण तो तुम्हाला केवळ भरभरुन अनुभव देतो आणि काही नाही
 13. आयुष्याची खरी मजा म्हणजे प्रवास
 14. प्रवास नाही, आयुष्य नाही
 15. काम करा, पैसे कमवा आणि प्रवास करा… हेच आयुष्य आहे.
 16. आयुष्याचा खरा अर्थ प्रवास आहे जो प्रत्येकाने जगला पाहिजे.
 17. जगाच्या पाठीवर कुठेही जा, प्रवास तर तुम्हाला करायचाच आहे. मग तो असा का नसावा.
 18. आयुष्य असावे एखाद्या पक्षासारखे, मस्त उडत आपल्या आवडत्या ठिकाणी पोहोचता यावे असे
 19. निसर्गाच्या सानिध्यात.. सुखाच्या कुशीत.. एका मस्त प्रवासात
 20. सुख म्हणजे काय असतं असं कोणी विचारलं तर ते इथेच हिमालयाच्या कुशीत असतं

आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणात्मक संदेश (Good Morning Motivational Messages)

Inspirational Travel Quotes In Marathi | प्रेरणादायी ट्रॅव्हल कोट्स

Inspirational Travel Quotes
Travelling Quotes In Marathi
 1. चांगल्या गोष्टी आयुष्यात सहज मिळत नाही.
 2. चांगला प्रवास हा प्रेमासारखा असतो. ज्याचा कधीही अंत होत नाही.त्यामुळे भरपूर फिरा.
 3. आयुष्यात रिस्क ही घ्यायलाच हवी… तरच आयुष्याची खरी किंमत आणि महत्त्व कळते.
 4. आयुष्यात काही वेगळी करायची इच्छा असेल तर एकच करा ‘प्रवास’ करा.
 5. सारे प्रवासी घडीचे.. त्यामुळे प्रवास हा करायलाच हवा.
 6. आळस हा माणसाचा शत्रू आहे. तर काम या त्याच्या पायात घातलेल्या बेड्या… त्यातून बाहेर पडण्यासाठी तरी फक्त फिरा.
 7. तुम्हाला तुमचे पुस्तक जितके शिकवू शकत नाही.. तितका तुम्हाला तुमचा प्रवास शिकवू शकतो.
 8. आयुष्याची खरी मजा ही फक्त प्रवासात आहे. बाकी सगळ्या अंधश्रद्धा आहे.
 9. मला अशा क्षणांमध्ये जगायला आवडेल जिथे फक्त चांगल्या आठवणींची ठेवण असेल.
 10. प्रत्येक वळणावर प्रवास हा महत्वाचा असतो. कारण त्या शिवाय तुमच्या आयुष्याला काहीच अर्थ नसतो.
 11. प्रवास कराल तर जास्त जगाल.
 12. जितका लांबचा प्रवास कराल तितके तुम्ही तुम्हाला ओळखाल.
 13. एखादी रिस्क तुमचे आयुष्य धोक्यात घालू शकते. पण ती रिस्क न घेणे तुमचे आयुष्य अगदीच बोथट करुन टाकते.
 14. तुमची बकेट लिस्ट भरण्यात वेळ घालवू नका. त्यातील काही गोष्टी करण्याला आता प्राधान्य द्या.
 15. आयुष्य खूप सुंदर आहे.. फक्त तुम्ही बाहेर पडायला हवे.
 16. आणि मी माझ्याशीच म्हणते… आयुष्य किती सुंदर आहे.. ते एका किनाऱ्यावर आहे.
 17. आयुष्यातील 10 % गोष्टी या कदाचित लिखित असतात.. पण उरलेल्या 90% तुम्हाला घडवायच्या असतात.
 18. ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या नसतात ते आयुष्यात एकदा तरी करुनच पाहा.
 19. आयुष्य हा एक प्रवास आहे… जो तुम्ही करायलाच हवा.
 20. आयुष्य जगण्याचे उद्दिष्ट आहे प्रवास… कारण तोच नव्या अनुभवांची ओळख तुम्हाला करुन देतो

तुमच्यासाठी मराठीतील A TO Z उखाणे

Travel Status In Marathi | प्रवासासाठी खास स्टेटस

Travel Status In Marathi
Travel Status In Marathi
 1. प्रवासाचा आनंद तेव्हाच येतो. जेव्हा आपण एक झक्कास स्टेटस ठेवतो.
 2. जे मित्र एकत्र प्रवास करतात ते कायम एकत्र राहतात.
 3. जगण्यासाठी करायला हवा ‘प्रवास’
 4. आठवणी जमा करा आणि तुमच्या अस्तित्वाच्या खूणा मागे सोडत चला
 5. बाहेर पडा- फिरा- मजा करा- आयुष्य जगा.. हेच तर आयुष्य आहे.
 6. चांगले मित्र+ चांगले ठिकाण= एक चांगला अनुभव
 7. एका अशा प्रवासात जो माझे आयुष्य चांगले आणि समृद्ध करणारा आहे.
 8. एका गोष्टीला वयाचे बंधन नसते.. तो म्हणजे प्रवास
 9. देश इतका सुंदर आहे याचा कधी विचारच केला नव्हता.
 10. जेव्हा आयुष्यात अडचणी येतात तेव्हा बॅग भरो निकल पडो.
 11. आयुष्य कधीच सुंदर वाटलं नसतं जर मी प्रवास केला नसता.
 12. जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हाच तुम्ही स्वत:ला ओळखता.
 13. फोन बंद.. कारण मी आहे प्रवासात
 14. आयुष्याची खरी मजा घेण्यासाठी निघालो आहे.. कारण मी आता प्रवासात आहे.
 15. घरच्या जेवणाचा कंटाळा आला.. म्हटलं थोडा देश फिरुन काही वेगळे पदार्थ खाऊया.
 16. आयुष्यात सुख अनुभवायाचे होते आज त्याची प्रचिती आली.
 17. निसर्ग बोलावतो आहे.. आता जाणे गरजेचेच आहे.
 18. सकाळी एक फोन आला आणि मग काय निघालो मी या प्रवासाला
 19. आता मी परत येईल ती आयुष्याची खरी मजा घेऊन
 20. कधीच थांबू नका कारण अजून खरा प्रवास सुरु झाला नाहीए.
12 Jul 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT