दिवाळीसाठी घरोघरी फराळ, मिठाई घरोघरी बनवली जाते. दिवाळी पार्टी असो वा दिवाळीसाठी कोणाकडे गेट टुगेदर प्रत्येक ठिकाणी सतत गोडाचे पदार्थ असतात. दिवाळीनंतरही घरात उरलेला फराळ संपवला जातो. दिवाळीत असे सतत गोडाचे पदार्थ खाण्यामुळे हळू हळू वजन वाढू लागतं. फराळ आणि गोड पदार्थ खाऊन अचानक वाढलेलं वजन पटकन कमी होत नाही. त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. यासाठी व्यायामासोबत आहारावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. दिवाळीत वाढलेलं वजन कमी करण्यासाठी Detox Drink देखील नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. यासाठी घरीच बनवा हे डिटॉक्स ड्रिंक्स…
लिंबू आणि पुदिना
लिंबामध्ये व्हिटमिन सी भरपूर प्रमाणात असतं. शिवाय लिंबू आणि पुदिनामध्ये औषधी गुणधर्म भरपूर असतात. यासाठीच पोट आणि वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि पुदिनाचं डिटॉक्स ड्रिंक नक्कीच फायद्याचं ठरेलय यासाठीच एका ग्लासात पुदिनाची पाने क्रश करून घ्या, त्यात लिंबाचा रस आणि पाणी मिसळा आणि दिवसभरात दोनदा हे डिटॉक्स ड्रिंक प्या.
डाळिंबाचा रस
डाळिंब हे शरीरासाठी पोषक असतंच पण डाळिंबाचा रस पिण्याने तुमचे वजन कमी होऊ शकतं हे तुम्हाला माहीत आहे का. दिवाळीनंतर वाढलेलं वजन कमी करण्यासाठी डाळिंबाचा रस पिऊ शकता. यासाठी डाळिंबाचे दाणे मिक्समधून ब्लेंड करा आणि फ्रेश ज्युस प्या.
संत्री आणि गाजर
सकाळी उपाशीपोटी संत्री आणि गाजराचा रस पिण्याने तुमचे पोटही भरेल आणि वजनही नियंत्रणात राहिल. यासाठी ज्युसरमध्ये संत्री, गाजर आणि थोडा आल्याचा तुकडा ब्लेंड करून घ्या. रस गाळून घ्या त्यात मीठ आणि लिंबू पिळा आणि रस प्या.
पार्टी मेकअपनंतर स्कीन डिटॉक्स करण्यासाठी फॉलो करा या सोप्या स्टेप्स
दालचिनीचे पाणी
वजन कमी करण्यासाठी दालचिनीचे पाणी खूप फायदेशीर आहे. कारण या पाण्यामुळे मेटाबॉलिझम सुधारते. यामुळे तुमच्या पोटातील चरबी जळते आणि वजन कमी होते. दररोज सकाळी कोमट पाण्यात दालचिनी पावडर मिसळा आणि हे पाणी प्या. ज्यामुळे तुमच्या शरीरातून दुषित पदार्थ बाहेर टाकण्यास चांगली मदत होईल.
आठवड्यातून एकदा डिटॉक्स केले तरी वजन होईल कमी
काकडी आणि पुदिना
काकडीमध्ये भरपूर पाणी असते त्यामुळे काकडीचा रस अथवा ज्युस पिण्याने शरीराला थंडावा मिळतो. त्याचप्रमाणे काकडीच्या रसामुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. या रसात पुदिना टाकल्यामुळे आणखी चांगला फायदा होतो. यासाठी पाण्यात काकडीचे तुकडे आणि पुदिना टाकून ठेवा आणि दिवसभरात हे पाणी प्या.