Advertisement

Weight Loss

वजन कमी करण्याचे उपाय जाणून घ्या (Weight Loss Tips In Marathi)

Dipali NaphadeDipali Naphade  |  Nov 21, 2018
Weight Loss Tips In Marathi

Advertisement

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढणं खरं तर फारच कठीण होऊन बसलं आहे मात्र अशक्य नक्कीच नाही. कारण शरीरापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. शरीरावर थोडीफार चरबी नक्कीच वाईट दिसत नाही. मात्र ही चरबी वाढायला लागली की, तुम्हाला स्वतःला कळतं की, हे आता हाताबाहेर जात आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, तुम्ही प्रयत्न करू शकत नाही. जराही आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. कारण तुम्हाला हवी असलेली फिगर पुन्हा परत मिळवण्यासाठी हाच आत्मविश्वास कामी येतो. आम्ही तुम्हाला वेट लॉस अर्थात वजनशी संबंधित प्रत्येक लहान-सहान गोष्ट सांगणार आहोत ज्याने तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल. जाणून घेऊया वजन कमी करण्याचे उपाय (weight loss tips in marathi).

जाडेपणा नक्की काय असतो ? (What Exactly Is Weight Gain In Marathi)

जाडेपणा (Obesity) म्हणजे शरीरामध्ये गरजेपेक्षा जास्त फॅट अर्थात चरबी साचायला लागते. त्यामुळे शरीरावर अतिशय वाईट परिणाम होत असतो. हेच नाही तर अनेक रोगांनाही आपण आमंत्रण देत असतो. एका जागी बसून राहिल्याने, चुकीची जगण्याची पद्धत किंवा शारीरिक व्यायाम कमी करणाऱ्या लोकांना सर्वात जास्त या समस्येला सामोरं जावं लागतं.

तुम्हाला खरंच जाडेपणा सतावत आहे का ? (Effects Of Gaining Weight In Marathi)

तुम्हाला तुमचं शरीर बेढब होत आहे याची जाणीव होत आहे का? तुम्ही लवकर थकत आहात किंवा स्वतःला अनफिट असल्यासारखं वाटत आहे का? असं असेल तर तुम्हाला नक्कीच जाडेपणा असल्याची समस्या आहे. तर दुसऱ्या बाजूला नोकरदार महिलांना कळतही नाही की, त्यांना ही समस्या आहे आणि त्या कधी ओव्हरवेट झाल्या. मेडिकल सायन्सदेखील नेहमी हाच सल्ला देत आले आहे की, वजनवाढ ही सर्व समस्यांची मुख्य दोर आहे. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणं अतिशय गरजेचं आहे. मात्र हेदेखील तितकंच खरं आहे की, बरेचसे लोक वजन वाढल्यानंतरच स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करतात. तसंही महिलांवर पुरुषांपेक्षा वजन वाढण्याचे परिणाम जास्त दिसून येतात. वजन वाढल्यामुळे पुरुषांच्या केवळ शरीरावर परिणाम होतो मात्र महिलांना शारीरिक आणि मानसिक या दोन्ही समस्यांचा सामना करावा लागतो.

वजनवाढीची तपासणी अशी करावी (Check Your Weight In Marathi)

वजनवाढ अथवा जाडी हा काही खूप मोठा आजार नाही. मात्र, एक स्वस्थ आणि चांगल्या शरीराची ही निशाणी नक्कीच नाही. वेळीच याबाबत हातपाय उचलले तर याच्या दुष्परिणांपासून तुम्ही दूर राहू शकता. तुम्ही किती फिट आहाता हे जाणून घेण्यासाठी, बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) काढून घेणं हा चांगला पर्याय आहे. यामधून तुम्ही किती फिट आहात आणि किती वजन कमी करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे. त्यासाठी वजन कमी करण्याचे उपाय (vajan kami karnyache upay) हे जाणून घेऊ शकता.

BMI (बी.एम. आय) म्हणजे काय ? (What Is BMI)

बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) तुमच्या शरीरामध्ये किती जास्त चरबी आहे याची माहिती देते. बीएमआय हे व्यक्तीच्या उंची आणि वजनानुसार तुम्हाला जाणवून देते. कोणत्याही व्यक्तीला सुरुवातीला तपासून त्या व्यक्तीचं वजन कमी करायला हवं की नको हे डॉक्टर त्याच्या शरीराचे बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) बघूनच निर्णय घेत असतात. यातून तुम्ही किती फिट आहात हे कळतं. उदाहरणार्थ भारतीय लोकांसाठी त्यांचं बीएमआय २२.९ पेक्षा अधिक असता कामा नये. बऱ्याच महिला या ओव्हरवेट झाल्यानंतरच स्वतःकडे लक्ष द्यायला सुरुवात करतात. त्यामुळे आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि दैनंदिन सवयींसह नेहमी बीएमआय तपासणीदेखील करून घ्यायला हवी.

BMI (बी.एम.आय) चार्ट (BMI Chart)

बीएमआय (18.5 पेक्षा कमी)  —- सामान्यपेक्षा कमी वजन

बीएमआय (18.5 – 24.9)   —- सामान्य वजन

बीएमआय (25 – 29.9)     —– अधिक वजन

बीएमआय (29.9 पेक्षा जास्त) —- जाडेपणा

असं काढू शकता बीएमआय (BMI)

बीएमआय हे तुम्हाला कोणत्याही व्यक्तीच्या उंचीच्या दुप्पट गुणून त्याच्या वजनाला (किलोग्रॅम) भागून तुम्ही जाणून घेऊ शकता.  

बॉडी मास इंडेक्स = वजन (किलोमध्ये)/ उंची (मीटर मध्ये) याचा गुणाकार

उदाहरणार्थ

असं समजा की, जर तुमचं वजन ६० किलो आहे आणि उंची १६० सेंटिमीटर आहे अर्थात १.६ मीटर आहे तर तुमचं बीएमआय असेल –  60/2.56= 23.4

तुमची कंबर किती आहे हे पाहून कळू शकतं तुम्ही ओव्हरवेट आहात का?

तुम्ही ओव्हरवेट आहात की नाही? या प्रश्नाचं उत्तर तुमच्या कमरेचं मोजमाप काढूनदेखील कळू शकतं.

सामान्य : 32 इंचापेक्षा कमी

जास्त : 32 ते 35 इंच

बहुत जास्त : 35 इंचापेक्षा जास्त

yoga-for-weight-loss-in-marathi

वजन कमी करण्यासाठी योग (Weight Loss Tips In Marathi By Doing Yoga)

वजन कमी करण्यासाठी योग हा रामबाण उपाय आहे. जर तुम्ही डायटिंग, जिम आणि इतर सगळे प्रयत्न करून थकला असाल तर तुम्ही योग नक्की करा. फिट आणि हेल्दी राहण्यासाठी योगसारखा दुसरा कोणताही उपाय नाही. वास्तविक, योग केवळ वजनच कमी करत नाही तर, व्यक्तीमधील आत्मविश्वासदेखील वाढवतो. योगाची सर्वात महत्त्वाची आणि विशेष गोष्ट ही आहे की, तुमच्या शरीरावर कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत आणि तुमच्या शरीरावर साचलेली अधिक चरबी काढून टाकण्यासाठी याची मदत होते. वजन कमी करण्यासाठी उत्कृष्ट आणि सोप्या योगाच्या पद्धती आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

वजन कमी करण्याचे उपाय आहे हे डिटॉक्स ड्रिंक्स (Weight Loss Drinks In Marathi)

परफेक्ट आणि फिट दिसण्यासाठी व्याायाम करण्याच्या प्रयत्नात प्रत्येकजण असतो. मात्र बऱ्याचदा खूप प्रयत्न करूनही काही लोकांना यामध्ये अपयश मिळतं आणि काही लोकांकडे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी अजिबात वेळही नसतो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही काही स्लिमिंग डिटॉक्स ड्रिंक्स तुम्हाला सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या व्यस्त आयुष्यातही अगदी सहजपणाने हे फॉलो करू शकता. यामुळे तुमच्या शरीरातील पाणीदेखील कमी होणार नाही आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये फरक जाणवू लागेल. तर कसली वाट पाहात आहात? या ड्रिंक्सपैकी जे ड्रिंक तुम्हाला आवडेल त्याचा नक्की अनुभव घ्या.- लेमन मिंट ड्रिंक

– अलोवेरा मॅजिक ड्रिंक

– मल्टी टास्किंग स्लिमिंग ड्रिंक

– टर्मरिक ड्रिंक

 baba-ramdev-diet-chart-for-weight-loss-in-marathi

वजन कमी करण्यासाठी कसं असायला हवं खाणं?

वजन वाढण्याचं मुख्य कारण असतं ते म्हणजे आपल्या खाण्याच्या सवयी. आपल्या खाण्यामध्ये जास्त कॅलरीचं खाणं असल्यास, वजन वाढणं साहजिकच आहे. जास्त तळलेले, फास्ट फूड, गोड, जास्त मीठ असलेले खाणे खाल्ल्यास, शरीरात वाजवीपेक्षा जास्त कॅलरी जमा होते आणि कोणत्याही शारीरिक अॅक्टिव्हिटी न करता या कॅलरीज बर्न करणं शक्य नसतं. त्यामुळे याचं रूपांतर वजन वाढण्यामध्ये होतं. तुम्ही विचार केलात तर, तुमच्या शरीरात प्रत्येक दिवशी किती कॅलरीची आवश्यकता आहे तितक्याच कॅलरीचं सेवन केल्यास, तुमचं वजन वाढणार नाही. वजन कमी करण्याचे उपाय (vajan kami karnyasathi upay) म्हणून तुम्ही याचा विचार करा.

वाचा – या कारणांसाठी आहेत डाळींब खाण्याचे फायदे

कॅलरी म्हणजे काय ?

एखाद्या माणसाला जिवंत राहण्यासाठी उर्जेची गरज भासते आणि ही ऊर्जा कॅलरीतून मोजली जाते. आपल्याला रोजच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंमधून मेटाबॉलिजममधून ही कॅलरी प्राप्त होते. याच ऊर्जेचा वापर आपण मेहनतीचे काम करण्यासाठीदेखील वापरतो. कॅलरीच तुमचं शरीर चालवणारं इंधन आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

रोज किती कॅलरी तुम्ही घेत आहात, याची काळजी घ्या

बऱ्याचदा वजन घटवण्यासाठी आपण डायटिंग करतो मात्र आपण जे खात आहोत त्यात नक्की किती कॅलरी आहेत हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करत नाही. आपल्या शरीराला रोज किती कॅलरीजची आवश्यकता आहे हे जर तुम्हाला कळलं तर, तुम्ही तुमचं वजन सहजरित्या कमी करू शकता. रोज तुम्ही किती कॅलरी घेता याचं मोजमाप करण्यासाठी तुमच्या मोबाईलवर कॅलरी काऊंट अॅपदेखील वापरू शकता आणि फिट राहू शकता.

बाबा रामदेव वजन कमी करण्यासाठी उपाय (Vajan Kami Karnyache Upay)

तुम्हाला कोणत्याही साईड इफेक्टशिवाय वजन कमी करायचं असेल तर तुमच्या दैनंदिन जीवनात योग गुरु बाबा रामदेव यांचा डाएट प्लॅन नक्की समाविष्ट करून घ्या. प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगळी असते. एकच डाएट प्लॅन सगळ्यांसाठी असू शकेल असं नाही. तुम्हाला हवं तसं डाएट चार्टमध्ये तुम्ही बदल करू शकता. बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार तुम्ही दिवसभर केवळ गरम पाणी पित राहिलात तर तुमचं वजन ३ ते ५ किलो कमी होतं.

वजन कमी करण्यासाठी डाएट चार्ट (Weight Loss Diet Chart In Marathi)

सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवा की, सकाळचा नाश्ता पोटभर करावा. दुपारी त्याच्या अर्ध आणि रात्री तर कमी जेवावं. वजन कमी करण्यासाठी उपाय (vajan kami karnyasathi gharguti upay) म्हणून सकाळ, दुपार आणि रात्रीचं जेवण कसं असावं हे जाणून घेऊया –

सकाळचा ब्रेकफास्ट –

सकाळी उठल्यावर १ ग्लास गरम पाणी

६ वाजता – मेथीच्या दाण्याचे पाणी

७ वा ८ वाजता – मोड आलेले मूग, चणे किंवा सलाड/दलिया/ओट्स + लस्सी/ताक/ज्युस + फळ

दुपारचं जेवण –

१२ ते २ दरम्यान – १ वाटी आमटी + 1 पातळ पोळी + हिरवी भाजी + काकडी आणि टॉमेटो सलाड

रात्रीचं जेवण –

७ वाजता –  एक ग्लास लिंबू पाणी (मीठ आणि साखरेशिवाय)

८ वा ९ वाजता  – १ प्रोटीन वा ड्रायफ्रूट्सचा लाडू किंवा मीठ वा साखरेशिवाय एक वाटी दही

सूचना – डाएटदरम्यान तुमच्या शरीरातील पाणी अजिबात कमी होऊ देऊ नका. त्यासाठी तुम्ही तुमचं शरीर नेहमी हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही जितकं पाणी पिणार तितकंच तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजम जास्त होणार. मात्र याचा अर्थ असा नाही की, अति पाणी प्यावं. आपल्या शरीरातील वजनाप्रमाणे १० ने भागल्यास त्यातून २ वजा केल्यास, जितकी संख्या येते तितकं लीटर पाणी पोटात जाणं आवश्यक आहे. उहाहरण द्यायचं झालं तर समजा, तुमचं वजन ७० किलो आहे आणि त्याला १० ने भागल्यास, ७ येणार त्यामधून २ वजा केल्यास, ५ संख्या येते. त्यामुळे तुम्ही रोज ५ लीटर पाणी प्यायला हवं. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी प्यायल्यामुळे चरबी कमी होते.

वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे (Ayurvedic Weight Loss Tips In Marathi)

जर वजन घटवण्यासाठी तुम्ही अथक प्रयत्न करत असाल मात्र काहीच फरक पडत नसेल तर तुम्ही बाजारामध्ये वजन कमी करण्यासाठी मिळणाऱ्या काही औषधांचा उपयोग करू शकता. मात्र त्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला आयुर्वेदिक औषध घ्यायचं असल्यास, तुम्ही पतंजलिच्या वेड लॉस मेडिसिनचा वापर करू शकता. हे पूर्णतः आयुर्वेदिक आणि देशी औषध आहे. इथे आम्ही तुम्हाला पतंजलिच्या काही वेट लॉस उत्पादनांबद्दल अर्थात औषधांबद्दल सांगणार आहोत, यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यात मदत मिळेल. काही दिवस याचा वापर केल्यानंतर शरीरामध्ये तुम्हाला बदल दिसतील. तुमच्या जवळच्या पतंजलि दुकानामधून हे औषध तुम्हाला मिळू शकेल.

दिव्य मेदोहर वटी ( बारीक होण्यासाठी औषध )

दिव्य मेदोहर वटी घेतल्यानंतर तुमच्या शरीरातील चरबी हळूहळू कमी होऊ लागते. पतंजलिचे हे आयुर्वेदिक औषध चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. या औषधामध्ये मुख्यत्वे त्रिफला आणि गुग्गल असते, ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि पचनक्रिया सुधारते. केवळ हेच नाही तर हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठीदेखील याची मदत होते. मेहोहर वटी एक हर्बल मेडिसिन आहे ज्यामुळे वजन कमी करण्याव्यतिरिक्त शरीराला ऊर्जादेखील मिळते. गरोदर महिलांनी डिलिव्हरीनंतर हे औषध घेतल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकते.

दिव्य मेदोहर वटी औषधाचे सेवन कसे करावे –

वजन कमी करण्यासाठी पतंजलिचं हे औषध तुम्ही जेवण जेवल्यानंतर किंवा जेवण खाण्याच्या आधी घ्यावं. जेवायच्या आधी औषध घ्यायचं असल्यास, कमीत कमी अर्धा तास आधी घ्यावं आणि जेवण जेवल्यानंतर घ्यायचं असल्यास, कमीत कमी १ तासानंतर हे औषध घ्यावं. गरम पाण्याबरोबर हे औषध घेतल्यास, याचा जास्त चांगला परिणाम होतो.

दिव्य मेदोहर वटी औषधाची किंमत – 80 रुपये

याशिवाय वजन कमी करण्यासाठी पतंजलिची अजूनही काही उत्पादने आहेत –

– आवळा ज्यूस

– गुग्गुल

त्रिफला चूर्ण

– दिव्य गोधन अर्क

– दिव्य पेय हर्बल टी

– अलोवेरा ज्युस

वजन कमी करण्याचे उपाय आणि पद्धती (Different Ways Of Weight Loss Tips In Marathi)

वजन कमी करण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही ते तेव्हाच कमी होईल जेव्हा तुमचं रूटीन ठीक असेल. त्यामुळे तुमची इच्छा असल्यास, तुम्ही तुमचं वजन नैसर्गिकरित्यादेखील सहज आणि वेगाने कमी करू शकता. त्यासाठी या उपायांना तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग करून घेण्याची गरज आहे. या टीप्स रोज फॉलो केल्यास, तुमचे वजन घटण्यासाठी वेळ लागणार नाही. जाणून घेऊया काय आहेत वजन कमी करण्याचे उपाय (vajan kami karnyache upay) –

1. जेवण्यापूर्वी सूप प्या

2. हेल्दी ब्रेकफास्ट करा

3. थोड्याथोड्या वेळाने खात राहा

4. जेवणात मिरचीचा उपयोग करा

5. रात्री ग्रीन टी प्या

6. उदास न राहता हसत राहा

7. साखरेपासून लांब राहा

8. निळ्या रंगाच्या प्लेटमधून जेवण खा

9. उजेडात नाही तर अंधारात झोपा

10. झोप पूर्ण होऊ द्या

11. रात्री जेवल्यानंतर अर्धा तास चाला

12. दिवसभर हलका व्यायाम करणं आवश्यक आहे.

लवकर वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Weight Loss Tips At Home In Marathi)

बहुतांशवेळा वजन वाढलेल्या लोकांना जिम जाण्याचा अथवा रोज ५ किलोमीटर धावण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र प्रत्येकाला इतका वेळ काढणं शक्य नसतं. मात्र याचा अर्थ हा नाही की, तुम्हाला वेळ नाही हे सांगून सर्व काही टाळण्याचा एक बहाणा मिळाला. जिम अथवा बाहेर केल्या जाणाऱ्या व्यायामानेच वजन घटते असं नाही. त्यासाठी वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय (vajan kami karnyasathi gharguti upay) पद्धतीही आहेत, ज्यामुळं वजन कमी होऊ शकतं. पाहुया कसं –

गरम पाणी प्यायला सुरुवात करा

उन्हाळा असो वा हिवाळी नेहमी गरम पाणी प्यावं. सकाळी सकाळी उपाशीपोटी मध घालून गरम पाणी प्यायल्यास, मेटाबॉलिजम वाढतं आणि त्यामुळं वजन कमी होण्यास मदत होते. मात्र खाल्ल्यानंतर साधारण अर्धा वा एक तासानेच पाणी प्यायला हवं हे लक्षात ठेवा.

जिन्यांचा वापर जास्त करावा

तुम्ही तुमच्या घराचे जिने दिवसातून १० वेळा चढून उतरलात तरीही तुमचं वजन कमी व्हायला मदत होईल. घरी असाल तर गच्चीत जाण्याची कोणतीही संधी सोडू नका. जिन्यांचा चढ – उतार तुमच्यासाठी एक योग्य व्यायाम आहे. ऑफिसमध्ये जाताना लिफ्टऐवजी जिन्यांनी चढ-उतार करण्याचा प्रयत्न करा. याचा चांगला परिणाम होतो.

भरपूर झोपा

तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर, भरपूर झोपा. झोपेच्या वेळी तुमच्या शरीराचा थकवा आणि ताण मिटतो. वजन घटवण्याच्या प्रक्रियेत भरपूर झोप हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तुमच्या हंगर हार्मोन्सनादेखील झोप स्थिर करते, ज्यामुळे तुमची भूक नियंत्रणामध्ये राहाते.

cumin water benefits

जिऱ्याचं पाणी

वजन कमी करण्यासाठी जिरे हे रामबाण औषध आहे. एक चमचा जिरे तुम्ही रोज खाल्ल्यास, तीनपट वेगाने तुमचं वजन कमी होतं. एका संशोधनातून वजन कमी करण्यासाठी जिरे महत्त्वपूर्ण असल्याचं सिद्ध झालं आहे. हे केवळ जास्त कॅलरीच बर्न करत नाही तर, मेटाबॉलिजमचा रेट वाढवून पचनक्रियादेखील नीट करतं.

दिवसभरात १ लिंबू गरजेचं

लिंबामध्ये विविध विटामिन्स आणि मिनरल्स असल्याचं म्हटलं जातं आणि रोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्यानं खूप फायदे होतात. पाण्यात लिंबू पिळून पाणी प्यायल्यास, विटामिन सी, पोटॅशियम आणि फायबर मिळतं. लिंबू खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाते आणि वजन कमी होते. त्यामुळे दिवसभरात कमीत कमी १ लिंबू आपल्या शरीरात जाणं गरजेचं आहे. यापेक्षा जास्त लिंबू खाऊ नये.

घरी करण्यात येणारे व्यायाम (Weight Loss Exercise In Marathi)

आजकाल तर घरी व्यायाम करणंदेखील सोपं झालं आहे. तुम्ही गुगलवर Exercise to loss weight at home video सर्च केल्यास, अनेक व्हिडिओ दिसतील ज्यांच्या मदतीने तुम्ही रोज घरच्या घरी वजन कमी करण्यासाठी व्यायाम करू शकता. विश्वास ठेवा बऱ्याच लोकांनी हे व्हिडिओ पाहून आपलं वजन कमी केलं आहे. आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याच्या काही सोप्या पद्धती सांगणार आहोत, ज्या तुम्ही रोज फॉलो करू शकता –

– जंप स्क्वेट एक्सरसाइज

– लेग लिफ्ट एक्सरसाइज

– दोरीउडी (Skipping)

– पुश- अप एक्सरसाइज

– उठाबशा

– डान्स

– झुम्बा

एरोबिक्स

वजन घटवण्यासाठी नेहमी विचारण्यात येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं (FAQ’s)

काही लोक वजन वाढल्यामुळे खूपच तणावात असतात, मात्र त्यांना शारीरिक कोणताही व्यायाम नसतो. कारण त्यांना वजन घटवण्याची योग्य माहिती नसते. तर काही लोक असे असताता जे वजन कमी करायचा प्रयत्न तर करत असतात पण तरीही खूप कन्फ्यूज्ड असतात. हे योग्य आहे का? हे नॉर्मल आहे का? हे चुकीचं तर नाही ना? नक्की याचा अर्थ काय आहे? हे काही प्रश्न असतात जे नेहमी आपल्याला सतवत असतात. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी सोशल वेबसाईटवर वजन घटवण्यासंदर्भात काही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहोत. तुम्ही ते जाणून घ्यावं –

1. व्यायाम करण्यासाठी अथवा जिमला जाण्यासाठी वेळ नसेल तर वजन घटवण्यासाठी काय करायला हवं ?

जिमला जायचा अथवा व्यायाम करण्याचा वेळ नसेल तर तुमच्या जगण्याच्या सवयी बदला. ज्या कामामध्ये शारीरिक व्यायाम होत असेल असं काम निवडा. तसंच स्वतःच्या कॅलरीज घेण्यावर नियंत्रण ठेवा. कॅलरी इनटेक कमी असणारे खाण्याचे पदार्थ तुमच्या जेवणात समाविष्ट करून घ्या.

2. भात खाल्ल्याने वजन वाढतं का ?

खूप लोकांच्या म्हणण्यानुसार, भात खाल्ल्याने वजन वाढतं मात्र असं काही नाही. भात खाल्ल्याने ना वजन वाढत ना सोडल्याने वजन कमी होत. १ वाटी भातामध्ये २ पोळ्यांमध्ये असणारी कॅलरीपेक्षा कमी कॅलरी असते. भातमध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.

3. पीसीओडी (PCOD) अथवा पीसीओएस (PCOS) असल्यास, महिलांचं वजन वेगाने वाढतं का ?

पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम अर्थात पीसीओएस ही महिलांना होणारी समस्या आहे, जी फक्त फर्टिलिटीच कमी नाही करत तर, चेहऱ्यावर केस, पुळ्या, तणाव आणि वजन हे सर्वच वाढवते. संशोधनात ही गोष्ट समोर आली आहे की, आपलं वजन कमी करून या सगळ्यापासून महिला सुटका मिळवू शकतात. पीएसओएससह वजन कमी करायचं असल्यास, नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे.

4. रोज व्यायाम केल्यानंतर वजन कमी होत नाही, त्यामागे काय कारण आहे ?

डायटिंग आणि व्यायाम करूनच तुमचं वजन कमी होईल असं नाही. वजन कमी होण्यासाठी बाधा येण्याची अनेक कारणं असतात. तुम्हाला जर डिप्रेशन, मधुमेह वा मायग्रेन असेल तर त्याच्या औषधांमुळेही तुमचं वजन कमी होण्यात बाधा येते. तसंच जास्त मेहनत केल्यास, भूक वाढते आणि त्यामुळे अति खाल्लं जातं.

5. खाणं सोडल्याने किंवा खाण्याची इच्छा नसताना किंवा कमी खाण्यामुळे वजन वाढतं का ?

लोकांना वाटतं की, ते जास्त खात नाहीत तरीही वजन वाढत आहे. पण ते बघत नाहीत की, ते कमी खातात मात्र जे काही खात आहेत, त्यामुळे वजन वाढत आहे. उदाहरणार्थ प्रोटीनऐवजी कार्बोहायड्रेट जास्त खात आहेत. खाणं खाऊन वजन वाढत नाही तर खाणं चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यामुळं तुमच्या वजनावर परिमाण होत असतो. तुम्ही जेवा मात्र व्यवस्थित आणि वेळेवर जेवा.

खाण्याची योग्य वेळ –

ब्रेकफास्ट – सकाळी ७ ते ८ दरम्यान

लंच – दुपारी १२ ते २ दरम्यान

डिनर- रात्री ७ ते ९ दरम्यान

 You May Like These:

आराम मिळण्यासाठी करा मायग्रेन घरगुती उपाय (Migraine Treatment In Marathi)