ADVERTISEMENT
home / Nail Art
nail care

आर्टिफिशीयल नेल्स लावताय, मग ही काळजी घ्यायला हवी

आर्टिफिशीयल नेल्स किंवा कृत्रिम नखे तुम्हाला स्टायलिश दिसण्यात मदत करू शकतात. हल्ली कृत्रिम नखे लावण्याचा ट्रेंड आहे. या नेल्सवर तुम्ही विविध प्रकारचे नेल आर्ट करू शकता. सुंदर ग्रूम केलेल्या नखांमुळे हातांचे सौंदर्य वाढते. जर तुमची खरी नखे नीट वाढत नसतील किंवा ती नाजूक असतील तर तुम्ही कृत्रिम नखांचा पर्याय वापरून बघू शकता. हल्ली विविध प्रकारची कृत्रिम नखे मिळतात. कृत्रिम नखे वापरणे हानीकारक नसले तरी, ती बोटांना लावणे आणि काढणे यामध्ये ऍसिड आणि इतर रसायनांशी आपला संपर्क येतो ज्यामुळे ऍलर्जी होऊ शकते. कृत्रिम नखे खराब झाली तर त्यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते किंवा बोटांच्या त्वचेला इतर समस्या होऊ शकतात. .

कृत्रिम नखांचे प्रकार जाणून घ्या 

Acrylic Nails
Acrylic Nails

कृत्रिम नखांचे प्रामुख्याने ऍक्रेलिक आणि जेल असे दोन प्रकार असतात. तसेच सिल्क हा तिसरा प्रकार अनेकदा खराब झालेली नखे दुरुस्त करण्यासाठी किंवा नखे ​​मजबूत करण्यासाठी वापरला जातो. सध्या ऍक्रेलिक हा प्लास्टिकसदृश प्रकार सर्वात लोकप्रिय पर्याय आहे. एका विशिष्ट प्रकारच्या पावडरमध्ये द्रव मिसळून नंतर हे मिश्रण चिकटवलेल्या कृत्रिम नखांच्या टोकावर ब्रशच्या साहाय्याने लावले जाते तेव्हा त्याचे एक कठीण कवच तयार होते.. तुम्हाला ऍक्रेलिक नखे लावायची असतील तर त्याआधी तुमची नैसर्गिक नखे फाईल करून पुरेशी खडबडीत बनवावी लागतील जेणे करून ऍक्रेलिक नखे त्यावर नीट बसतील. जेलची कृत्रिम नखे ऍक्रेलिकपेक्षा जास्त महाग असतात आणि जास्त काळ टिकतात. नेहमीच्या नेलपॉलिशप्रमाणे जेल तुमच्या नखांना लावा आणि नंतर जेल कडक करण्यासाठी नखे अल्ट्राव्हायोलेट (UV) प्रकाशाखाली ठेवा. याप्रकारे तुम्ही कृत्रिम नखे लावून घेऊ शकता. 

कृत्रिम नखांमुळे होऊ शकणाऱ्या समस्या 

ऍक्रेलिक नेल्स लावली तरी तुमची खरी नखे सतत वाढत असल्याने, तुम्हाला तुमचे क्यूटिकल आणि ऍक्रेलिक नखे यांच्यात एक गॅप दिसेल. ही गॅप भरण्यासाठी तुम्हाला दर 2-3 आठवड्यांनी नेल सलूनमध्ये परत जावे लागेल किंवा स्वतः फिलर लावावे लागेल. घरच्या घरी सुद्धा ऍक्रेलिक नखं काढता येऊ शकतात. परंतु फिलिंग आणि फाइलिंग करताना जी रसायने वापरली जातात त्यामुळे तुमची खरी नखे कमकुवत होऊ शकतात. तसेच तुम्हाला आधीपासूनच नखांना फंगल इन्फेक्शन असल्यास कृत्रिम नखांमुळे ते वाढू शकते. जेल सुकवताना UV लाइटमुळे त्वचेवर सुरकुत्या आणि डाग पडून त्वचेचे नुकसान होऊ शकते. अतिनील प्रकाशामुळे त्वचेचा कर्करोगही होऊ शकतो.  तसेच कृत्रिम नखे जोडण्यासाठी किंवा काढण्यासाठी वापरली जाणारी रसायने तुमच्या त्वचेला त्रास देऊ शकतात. तुम्हाला तुमच्या नखांभोवती लालसरपणा किंवा सूज दिसू शकते व इन्फेक्शन झाल्यास नखांमध्ये पस होऊ शकतो.

Acrylic Nails
Acrylic Nails

कृत्रिम नखे एखाद्या गोष्टीत अडकल्यास किंवा आपटली गेल्यास ती अर्धवट तुटू शकतात आणि त्या गॅपमधून  जंतू, यीस्ट किंवा फंगस प्रवेश करू शकतात आणि त्यांची त्या गॅपमध्ये वाढ होऊ शकते. यामुळे तुमच्या नखांना संसर्ग होऊ शकतो. 

ADVERTISEMENT

नखे कमकुवत होऊ शकतात 

ऍक्रेलिक किंवा जेल नखे काढण्यासाठी, आपल्याला बोटे ऍसिटोनमध्ये बुडवून ठेवावी लागतात.. हे रसायन तुमच्या खऱ्या नखांसाठी चांगले नाही कारण यामुळे आपली नखे खूप कोरडी होतात आणि त्वचेलाही त्रास होऊ शकतो. नैसर्गिक नखे पातळ, ठिसूळ आणि कमकुवत होऊ शकतात. जर तुम्हाला पूर्वी नेल फंगसचा त्रास झाला असेल तर कृत्रिम नखांपासून दूर रहा. LED लाइटसह जेल पॉलिश कडक करणारे सलून निवडा, ज्यामध्ये कमी प्रमाणात UV प्रकाश असेल. तसेच त्या लाईटखाली हात ठेवण्यापूर्वी तुमच्या हातांना ब्रॉड-स्पेक्ट्रम (UVA/UVB) सनस्क्रीन लावा. दर दोन महिन्यांनी कृत्रिम नखांपासून ब्रेक घ्या.

आर्टिफिशियल नेल्सची आवड असल्यास जरूर त्यांचा वापर करा पण त्याबरोबरच स्वतःच्या नैसर्गिक नखांचीही काळजी घ्या. नखं वाढवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय करून बघा.

Photo Credit- istockphoto

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
29 Mar 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT