ADVERTISEMENT
home / Nail Care
नखं वाढवण्यासाठी नक्की वापरा ‘हे’ सोपे घरगुती उपाय (How to Grow Nails Faster in Marathi)

नखं वाढवण्यासाठी नक्की वापरा ‘हे’ सोपे घरगुती उपाय (How to Grow Nails Faster in Marathi)

लांब आणि सुंदर नख प्रत्येक मुलीला आवडतात. व्यवस्थित सेट केलेली आणि नेलपॉलिश लावलेली नख ही हाताची शोभा आहे असंच मानलं जातं. तसंच नखं चांगली असणं ही तुमचं शरीर स्वस्थ असल्याचं चिन्हदेखील आहे. मात्र आपल्यापैकी काही मुलींना नखं नीट वाढवण्यासाठी खूपच त्रास होत असतो. बऱ्याचदा स्वयंपाकघरात काम करताना किंवा शरीरात व्यवस्थित ऊर्जा नसल्यास, नख कमजोर होतात आणि तुटून जातात, त्यानंंतर ती वाढण्यासाठीदेखील कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे तुमचे हात सुंदर दिसण्यासाठी तुम्हाला खूपच प्रयत्न करावे लागतात. पण आता या सगळ्यासह तडजोड करायची तुम्हाला काहीच गरज नाही. कारण आम्ही तुम्हाला नखे वाढवण्यासाठी उपाय सांगणार आहोत. घरगुती उपाय काय करता येतील पाहूया तसंच नखांची काळजी कशी घ्यायची याची पद्धत आणि नखं कशी साफ ठेवयाची याचे घरगुती उपायदेखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

नखं वाढवण्याचे १० घरगुती उपाय (Tips To Grow Nails Faster)

1. नारळाचं तेल तुमची केवळ त्वचा आणि केसंच नाही तर नखांसाठीदेखील फायदेशीर असतं. त्यासाठी पाव कप नारळ तेल घ्यावं त्यात पाव कप मध आणि ४ थेंब रोझमेरी तेल घालून मिक्स करावं. हे मिश्रण थोडं गरम करून घ्यावं. त्यानंतर नखं १५ ते २० मिनिट्स या तेलामध्ये बुडवून बसावं. आठवड्यातून असं २ वेळा केल्यास, नख वेगाने वाढतात आणि मजबूतही होतात.

2. दूध आणि अंडं हे दोन्ही पदार्थ हाडं मजबूत करतात. त्यामुळे याचं सेवन करणं शरीरासाठी फायदेशीर असतंच पण त्यासह तुम्ही याचा वापर नखांची मजबूती वाढवण्यासाठीदेखील करू शकता. यासाठी तुम्हाला केवळ एका अंड्याचा सफेद भाग दुधामध्ये घालून फेटायचं आहे आणि यामध्ये ५ मिनिट्स तुमची नखं बुडवून ठेवा. आठवड्यातून २-३ वेळा असं केल्यामुळे तुमच्या नखांंना मजबूती मिळेल आणि वेगाने नखं वाढतील.

3. लसणाचा वापर केवळ खाण्यासाठीच नाही तर नखांचं पोषण आणि वाढीसाठीदेखील होऊ शकतो. लसणाची पेस्ट आठवड्यातून दोन वेळा नखांवर लावल्यामुळे नखांना आवश्यक असणारं पोषण मिळतं.

ADVERTISEMENT

4. नखं वाढण्यासाठी विटामिन सी खूपच फायदेशीर असतं. संत्र्यामध्ये विटामिन सी चं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. त्यासाठी तुम्ही ताज्या संत्र्याच्या रसामध्ये कमीत कमी १० मिनिट्स नखं बुडवून ठेवावी. त्यानंतर अगदी हलक्या गरम पाण्याने नखं धुऊन त्यावर मॉईस्चरायजर लावावे.

5. त्याचप्रमाणे १ चमचा लिंबू रसामध्ये ३ चमचे ऑलिव्ह ऑईल घालून थोडं गरम करून घ्यावं. त्यानंतर १० मिनिट्स नखं यामध्ये बुडवून ठेवावीत. तुम्ही रोज जरी हे करू शकत असाल तर लिंबाचे तुकडे नखांवर घासावेत. असं केल्यास, नखं पटकन वाढतात. 

Nails-2

6. नखांची चांगली वाढ होण्यासाठी मोहरीच्या तेलाचं मालिशदेखील चांगलं असतं. आठवड्यातून एक दिवस १५ ते २० मिनिट्स नखांचे मालिश करावे. असं केल्यास, नखांची वाढ लवकर होते.

ADVERTISEMENT

7. बदामाचे तेलदेखील फायदेशीर असते. तसंच बदामाचं तेल नखांवर लावून मसाज केल्यास, ब्लड सर्क्युलेशनदेखील वाढतं. त्यामुळे नखं वाढण्यास मदत होते. त्यासाठी रात्री रोज बदाम तेल लावून नखांचा मसाज करावा.

8. अर्धा कप टोमॅटोच्या रसात २ चमचे ऑलिव्ह ऑईल घालून आपल्या नखांवर १० मिनिट्स लावून ठेवावे. दिवसातून दोन वेळा असं करावं.

9. नखं चांगली वाढण्यासाठी टूथपेस्टचा वापरही करण्यात येतो. यासाठी तुम्हाला टूथपेस्ट तुमच्या नखांवर घासावी लागेल. टूथपेस्ट घासल्यामुळे नखांवर पिवळेपणा निघून जाईल.

10. एक चमचा लसूण वाटून घ्यावी त्यात एक चमचा अॅप्पल सायडर व्हिनेगर घालावं. हे मिश्रण तुमच्या नखांवर १० मिनिट्स लावून ठेवावं. त्यानंतर पाण्याने हात साफ करावे.

ADVERTISEMENT

Nails-1

वाचा – कमकुवत नखांसाठी घरगुती उपचार देखील

अशी घ्यावी नखांची काळजी (Nail Care Tips In Marathi)

बऱ्याच वेळा आपण घरगुती उपायांना आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट करू शकत नाही. पण नखांची काळजी घेणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी काही गरजेच्या गोष्टी…

1. नखांना रोज नेलपॉलिश लावू नका. असं केल्यामुळे नखं पिवळी पडण्याबरोबरच कमजोर होतात आणि लवकर तुटतात.

2. नेलपॉलिश काढण्यासाठी नखांवर कुरतडू नका. केवळ चांगल्या दर्जाच्या रिमूव्हरनेच नेलपॉलिश साफ करा. त्याशिवाय नेलपॉलिश साफ केल्यानंतर लगेच दुसरं नेलपॉलिश लावू नका. नखांनाही काही काळ श्वास घ्यायला वेळ द्या.

ADVERTISEMENT

3. कपडे धुणे, भाज्या कापणे, भांडी घासणे यासारख्या कामांमध्ये नखं कमजोर होतात आणि लगेच तुटतात. हार्ड साबण आणि पावडर या दोन्हीमुळेदेखील नखांना नुकसान पोचते. त्यामुळे ग्लव्ह्ज घालून काम करणं सोयीस्कर ठरेल.

4. नखांना वेळोवेळी ट्रीम करत राहायला हवं. केवळ नेलकटरच्या मदतीनेच नखं कापावीत. घाईघाईत चाकू वा कात्रीचा वापर करण्याची चूक करू नये. त्याने केवळ नखांना आकारच बिघडतो असं नाही तर, तुम्हाला जखम होण्याचीही भीती असते.

5. नख वेळोवेळी साफ करावीत आणि धूळ अथवा मातीपासून संपर्कात येण्यापासून स्वतःला वाचवावं

6. तुम्हाला नख चावण्याची सवय असल्यास, ही सवय लवकरात लवकर सुटेल याकडे लक्ष द्या.

ADVERTISEMENT

Nails-6

खराब नख साफ करण्याच्या पद्धती (How To Clean Nails In Marathi)

बऱ्याचदा आपण नखं तर वाढवतो मात्र त्यांना साफ करताना नाकी नऊ येतात. परिणामी आपल्या नखांमध्ये किटाणू होतात, जे शरीरात जाऊन आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. नखं साफ करण्यासाठी सारखंसारखं पार्लरमध्ये जाऊन मेनीक्युअर करण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्ही घरीदेखील तुमच्या लांब नखांची काळजी घेऊन साफ करू शकता.

त्यासाठी तुम्ही पेपर फायलरने नखांमधील साचलेली घाण हलक्या हाताने साफ करावे. त्यानंतर गरम पाण्यात हात घालून नखांना टूथब्रश अथवा नेलब्रशच्या मदतीने स्क्रब करावे. त्यानंतर हाताला साबण लावून चांगले हात धुवावे आणि टॉवेलने नीट पुसून हात सुकवावे. आता एका बाऊलमध्ये गरम पाणी घेऊन कमीत कमी ५ मिनिट्स नखं बुडवून ठेवावीत. त्यानंतर हात बाहेर काढून पुन्हा एकदा नीट साफ करावेत. आता हात सुकवून त्यावर मॉईस्चरायजर लावावे.

nails-3

सतत नेलपेंट लावल्यामुळे नखांना होऊ शकतात हे त्रास

नखं वाढवण्यासाठी कोणते अन्न खावे (Foods For Healthy Nails)

नखं स्वस्थ, चमकदार आणि लांब ठेवण्यासाठी तुमचं खाणं – पिणं अगदी योग्य असणं गरजेचं आहे. त्यासाठी शरीरामध्ये विटामिन्सची आवश्यकता असते.

ADVERTISEMENT

1. विटामिन ए शरीरातील हाडं, दात आणि नखांना मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यासाठी द्राक्ष, दूध, गाजर, पालक, सफरचंद, अंड अथवा मासे तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता.

2. नखांच्या वाढीसाठी विटामिन बी९ देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. त्यासाठी तुमच्या आहारामध्ये विटामिन बी९ ची मात्रा वाढवण्याची गरज आहे. भाजी, अंड, बीट आणि आंबट फळांसारख्या खाद्यपदार्थांपासून विटामिन बी९ मिळवू शकता.

3. नखं मजबूत करण्यासाठी शरीराला विटामिन सी अत्यंत गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही ब्लूबेरी, संत्रं, लिंबू, टॉमेटो, मोहरी आणि स्ट्रॉबेरी यांचा खाण्यात समावेश करावा.

4. विटामिन एच चे मुख्य काम आपले केस आणि त्वचेचे सेल्स सुरक्षित ठेवणं आहे. चांगल्या नखांसाठी रोज केळं आणि एवोकाडो आपल्या जेवणामध्ये समाविष्ट करून घ्यावं.

ADVERTISEMENT

Nails collage 5238244
नखांसाठी ५ उत्कृष्ट नेलपॉलिश ब्रँड (Best Nail Paint Brand)

नखं चांगली राहतील आणि लवकर तुटणार नाहीत यासाठी कोणतंही स्वस्त नेलपॉलिश लावण्याऐवजी तुम्ही नेहमी चांगल्या ब्रँडचे नेलपॉलिश वापरावं. आम्ही तुम्हाला नेलपॉलिशचे काही चांगले ब्रँड्स सांगणार आहोत, ज्याचा तुम्ही वापर करू शकता.

1. कलरबार (Colorbar)

कलरबार ब्रँड हा मेकअप उत्पदानांच्या दर्जासाठी ओळखला जातो. या ब्रँडचे नेलपॉलिश तुम्ही तुमच्या नखांवर लावण्यासाठी वापरू शकता. याची किंमत थोडी जास्त असते मात्र तुमच्या नखांना कोणत्याही प्रकारचं नुकसान यामुळे पोहचत नाही. मात्र रोज – रोज नखांना नेलपॉलिश लावल्यास, अतिशयोक्ती करणं चांगलं नाही.

तुमची आवडती कलरबार नेलपॉलिश शेड खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा.

2. लॅक्मे (Lakme)

मेकअप प्रोडक्ट्सच्या दुनियेत लॅक्मे हा एक नावाजलेला ब्रँड आहे. या ब्रँडमध्ये तुम्हाला विविध नेलपॉलिश कलर्स मिळतील. तसंच हे नेलपॉलिश नखांवर बराच काळ टिकून राहतं. हे साफ करण्यासाठी चांगल्या कंपनीचं नेलपॉलिश रिमूव्हरंच वापरावं.

ADVERTISEMENT

तुमची आवडती लॅक्मे नेलपॉलिश शेड खरेदी करण्यासाठी इथे  क्लिक करा.

3. लोटस हर्बल (Lotus Herbal)

लोटस हे उत्पादन सर्व उत्पादनांमध्ये आयुर्वेदिक आणि हर्बल केअरसाठी ओळखलं जातं. याच्या कॉस्मेटिक उत्पादनांमध्येदेखील त्वचा आणि नखांना कोणतेही नुकसान पोहचणार नाही याची काळजी घेण्यात येते. याचं उत्पादन जास्त महाग नसतं.

तुमची आवडती लोटस हर्बल नेलपॉलिश शेड खरेदी करण्यासाठी इथे  क्लिक करा.

4. लाॅरिअल पॅरिस (L’Oréal Paris)

तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटेल की, लॉरिअल ब्रॅंड गेल्या १०९ वर्षांपासून पर्सनल केअरमध्ये कार्यरत आहे. कदाचित याचं नेलपॉलिश खरेदी करणं तुम्हाला थोडं महाग वाटू शकतं. मात्र, दर्जाच्या दृष्टीने तुम्हाला हा ब्रँड घेतल्यानंतर कधीही निराशा येणार नाही.

ADVERTISEMENT

तुमची आवडती लॉरअल पॅरिस नेलपॉलिश शेड खरेदी करण्यासाठी इथे  क्लिक करा.

5. मेबेलिन न्यूयाॅर्क (Maybelline New York)

कॉस्मेटिक उत्पादनांच्या जगात मेबेलिन न्यूयॉर्कदेखील एक मोठा ब्रँड आहे. याच्या नेलपॉलिश रेंजमध्ये तुम्हाला बरेच शेड्स मिळतील.

तुमची आवडती मेबेलिन न्यूयॉर्क नेलपॉलिश शेड खरेदी करण्यासाठी इथे  क्लिक करा.

 Nails-4

ADVERTISEMENT

वाचा: नेल आर्ट डिझाइन कल्पना

नखं बघून ओळखा आजार (Identify Diseases By Nails)

तुम्हाला माहीत आहे का तुमच्या नखांचा रंग, त्याचा आकार आणि नखं जर सारखी तुटत असतील तरत तुमच्या शरीरामध्ये काहीतरी चुकीचं घडत आहे. हो हे खरं आहे की, तुम्ही नखं बघून जाणून घेऊ शकता की, तुम्हाला नक्की कोणता आजार झाला आहे.

1. नखांचा रंग अगदी फिका दिसत असल्यास, तुम्हाला कोणत्या तरी प्रकारचं इन्फेक्शन झालं असून तुमच्या शरीरामध्ये कमी पोषण मिळत आहे आणि शरीरामध्ये अंतर्गत समस्या असल्याचं हे लक्षण आहे. नखं पांढरीफटक पडली असल्यास, तुमच्या शरीरामध्ये लोह कमी असल्याचं लक्षण असून नखं तपकिरी रंगांची दिसत असल्यास वा डार्क असल्यास, थायरॉईड वा कुपोषण असल्याची शक्यता आहे.

2. कोरडी आणि कमजोर नखं लवकर तुटतात, त्याचा संबंध अगदी थायरॉईड अथवा फंगल इन्फेक्शनशी असतो.

ADVERTISEMENT

3. नखांवर जर सफेद डाग दिसत असतील, तर तुम्हाला अनुवंशिक काहीतरी आजार असतो.

4. नखांवर अगदी काठावर कधीतरी पांढरी लाईन दिसते. रक्तात प्रोटीनची क्षमता कमी असल्यास, ही लाईन दिसते.

Nails-7

देखील वाचा – 

ADVERTISEMENT

घरच्या घरी काढा अॅक्रेलिक नखं आणि वाचवा पैसेच पैसे

How to Grow Nails in Hindi

22 Nov 2018

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT