मासिक पाळीत वेगवेगळे अनुभव प्रत्येक स्त्री ला येतात. तुमची मासिक पाळी चुकली आहे किंवा मासिक पाळीची तारीख पुढे गेली आहे का? मासिक पाळी अनियमित असणे असे नियमित असे होते का तर तुम्हाला याबाबतीत विचार करायला हवा. कारण हे कोणत्याही गंभीर समस्येचे कारण अथवा स्किन रॅशचे (Skin Rash) कारण ठरू शकते. हे तुम्हाला एक्झिमा अथवा अन्य त्वचेच्या विकारामुळेही होऊ शकते. मात्र मासिक पाळीच्या दरम्यान तुमच्या त्वचेमध्ये बदल होत असतील तर तुम्हाला वेळीच याकडे लक्ष द्यायला हवे. वास्तविक मासिक पाळीदरम्यान मुरूमं येणे, अॅक्ने अथवा रॅशेस येणे ही अत्यंत सामाईक समस्या आहे. पण हे सतत होत असेल आणि याचे प्रमाण जास्त असेल तर तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही. विशेषतः मासिक पाळीदरम्यान तुमच्या छातीवर रॅश येत असतील तर तुम्ही सतर्क व्हायला हवे. जाणून घेऊया असे नक्की का होते.
प्रोजेस्टेरॉन काय आहे (What is Progesterone)
प्रोजेस्टेरॉन हे महिलांच्या शरीरात आढळणारे हार्मोन आहे. महिलांच्या गर्भाशयातील एस्ट्रॉजनची पातळी कमी करून हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीच्या स्वरूपात हे काम करते. यामुळेच महिलांना मासिक पाळी सुरू होते. तसंच मासिक पाळी नियमित करण्यासाठी याची मदत मिळते. याच प्रोजेस्टेरॉनमुळे मासिक पाळी महिन्याच्या महिन्याला नियमित येते.
प्रोजेस्टेरॉन हायपर सेन्सिटीव्हिटी (Pregesterone Hyper Sensitivity)
raredisease.info.nih.gov या साईटनुसार प्रोजेस्टेरॉन हायपर सेन्शिटिव्हीटीमुळे त्वचेवर परिणाम होतो. हे बरेचदा मासिक पाळीदरम्यान होते. याची लक्षणे मासिक पाळीच्या साधारण 3-10 दिवस आधी दिसायला सुरूवात होते. पण मासिक पाळी संपल्यानंतर हे निघून जाते. त्वचेवर सूज येणे, छातीवर पुळ्या येणे, पित्त होणे, त्वचेवर खाज येणे अथवा फ्लेकी पॅच येणे अशा मासिक पाळीदरम्यान त्वचेच्या समस्या हे अत्यंत कॉमन आहे. जर हे वाढले तर जखम होणे अथवा अस्थमा अशी लक्षणेही दिसून येतात.
प्रोजेस्टेरॉन वाढले तर काय होते
मासिक पाळी संपल्यानंतर ओव्युलेशननंतर प्रोजेस्टेरॉनची पातळी हळूहळू वाढू लागते. जेव्हा शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते तेव्हा याची लक्षणे प्रिमेन्स्ट्रूअल सिंड्रोम (premenstrual syndrome) प्रमाणेच असतात. यादरम्यान छातीवर सूज येणे, नैराश्य येणे, थकवा येणे अथवा वजन वाढणे असे परिणाम दिसून येतात. वास्तविक पित्ताची समस्या मासिक पाळीदरम्यान अधिक दिसून येते. अशावेळी काही हार्मोन्स हे अशा पद्धतीच्या अलर्जीला ट्रिगर करतात. पण काही महिलांसाठी हे घातक ठरू शकते. ज्याचा उपाय ऑटोइम्यून प्रोजेस्टेरॉन डर्मेटायटिस (एपीडी) स्वरूपात करता येऊ शकतो.
उपचार
या समस्येबाबत तुम्ही वेळीच डॉक्टरांशी बोलायला हवे. याकडे दुर्लक्ष करून काहीही उपयोग नाही. जेव्हा छातीवर अधिक मासिक पाळीदरम्यान रॅश येतात तेव्हा टॉपिकल स्टेरॉईड अथवा अँटिहिस्टामाईन क्रिम लावण्याचा सल्ला देण्यात येतो. याशिवाय प्रोजेस्टेरॉन अधिक निर्माण होऊ नये यासाठी हार्मोन थेरपीदेखील घेण्याचा सल्ला देण्यात येतो. पण याकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि यावर उपाय करा.
सूचना – मासिक पाळीदरम्यान तुम्हाला शरीरात असे कोणतेही लक्षण दिसून आल्यास, अजिबात याकडे दुर्लक्ष करू नका. तसंच घरच्या घरी उपाय न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. अन्यथा याचे दुष्परिणाम अधिक घातक ठरू शकतात.